कानी पडला आवाज पैंजणांचा
झपकन नजर मागे गेली
मनास झाला भास पावलांचा
मला तर वाटले तुच आली
असे कित्येकदा होत असते
तुच सगळीकडे दिसत असते
वार्याची एखादी झुळुकही
तुझ्या येण्याची चाहुल भासते
तु दूर जातेस जेव्हा
परतीची मी वाट बघतो
ज्या वाटेने गेलीस तु
त्याच वाटेवर उभा राहतो
तुझे निघुन जाणे नेहमीचेच
माझेही वाट पाहणे नेहमीचेच
जरी प्रेम आपल्यात टिकुन आहे
आपले भांडण होणे नेहमीचेच
तु परत येण्याची खात्री आहे
तरी अजुन रात्र भित्री आहे
लवकर परत येशील का तु?
माझी मिठि अद्याप खुली आहे..........
- कवि म.ना.दे.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
9126
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्याकरण
तेवढं बघा जरा...
तरी व्याक्रण बघून धाय
In reply to व्याकरण by वेल्लाभट
तरी व्याक्रण बघून धाय मोकलायाची गरज नाही हे कै कमी नाही ;)
व्याकरणाविषयी काही चुका वाटत असतील तर त्या तपशिलान लिहाव्यात....
In reply to व्याकरण by वेल्लाभट
व्याकरणाविषयी काही चुका वाटत असतील तर त्या तपशिलान लिहाव्यात....
आयला, कवितेच्या कव्हरातनं
In reply to व्याकरणाविषयी काही चुका वाटत असतील तर त्या तपशिलान लिहाव्यात.... by पंडित मयुरेश न…
जाहिरातीची मिठी खोल्लीये!
आयला, कवितेच्या बाहूतून
In reply to व्याकरणाविषयी काही चुका वाटत असतील तर त्या तपशिलान लिहाव्यात.... by पंडित मयुरेश न…
हलकेच जाहिरातीची मिठी खोल्लीये! क्या आयडिया है सरजी!!
व्याकरणाविषयी काही चुका वाटत असतील तर त्या तपशिलान लिहाव्यात....
In reply to व्याकरण by वेल्लाभट
व्याकरणाविषयी काही चुका वाटत असतील तर त्या तपशिलान लिहाव्यात....
हे घ्या तपशील:
In reply to व्याकरणाविषयी काही चुका वाटत असतील तर त्या तपशिलान लिहाव्यात.... by पंडित मयुरेश न…
कानी पडला आवाज पैंजणांचा
झपकन नजर मागे गेली
मनास झाला भास पावलांचा
मला तर वाटले तूच आली
असे कित्येकदा होत असते
तूच सगळीकडे दिसत असते
वार्याची एखादी झुळूकही
तुझ्या येण्याची चाहूल भासते
तू दूर जातेस जेव्हा
परतीची मी वाट बघतो
ज्या वाटेने गेलीस तू
त्याच वाटेवर उभा राहतो
तुझे निघून जाणे नेहमीचेच
माझेही वाट पाहणे नेहमीचेच
जरी प्रेम आपल्यात टिकुन आहे
आपले भांडण होणे नेहमीचेच
तू परत येण्याची खात्री आहे
तरी अजून रात्र भित्री आहे
लवकर परत येशील का तू?
माझी मिठी अद्याप खुली आहे..........
मला तर वाटले तूच आली
In reply to हे घ्या तपशील: by सूड
आली ??
मुंबईच्या मुली म्हणतात तसे का? मी आली, मी गेली..
आमच्या कोल्लापुरात 'आलीस' म्हणतात..
बाकी यमकासाठी कायपन चालतय म्हणा.. ;)
ओ काका,
In reply to मला तर वाटले तूच आली by यसवायजी
ओ काका,
आमच्या मुंबईला काही बोलायचं नाही.
काका >>> ब्बॉर्र...
In reply to ओ काका, by कवितानागेश
:)) काका :)) >>> ब्बॉर्र...
आणी माऊ, कुणीतरी म्हटलंय...
मुंबईला जर कुणी एक भिकार म्हणालं तर आपण सात भिकार असं म्हणून मोकळं व्हावं..
(जाज्वल्य अभिमानी)
>>मुंबईच्या मुली म्हणतात तसे
In reply to मला तर वाटले तूच आली by यसवायजी
>>मुंबईच्या मुली म्हणतात तसे का? मी आली, मी गेली..
आमच्या कोल्लापुरात 'आलीस' म्हणतात..
आमच्याकडं पन त्येच म्हनत्यात, पर त्येचं कसंय ह्ये कवी लोकं त्येंचं त्ये येमक का काय जुळवाया सूट घेत्यात. शेवटी तुमी म्हनलंच हा न्हवं 'बाकी यमकासाठी कायपन चालतय म्हणा..'
म्हमयच्या पोरींचं म्हराटी काय ईचारता. त्येस्नी लाज वाटती म्हराटी बोलाया. ;)
स्वगतः काडी टाकली, आता पळावं.
जाऊद्या हो!!
In reply to व्याकरण by वेल्लाभट
निरंकुश: कवयः म्हणून सोडून द्यायचं...
बाऽरीक दुरुस्ती
In reply to जाऊद्या हो!! by वडापाव
ते निरंकुशा: कवयः असे आहे, निरंकुशः हे एकवचन झाले.
कवी हे निरंकुश असतील पण तसे सांगणार्या वाक्याला मात्र व्याकरणाचा अंकुश आहे ;)
अर्रर्रर्रर्र
In reply to बाऽरीक दुरुस्ती by बॅटमॅन
चुकलो चुकलो चुकलो चुकलो :)
आवडलं. पटलं.
आँ !!!
आँ !!!
हा प्रकार
....अपरात्री घडल्यासारखा वाटतो.
अस काही नाही..
In reply to हा प्रकार by संजय क्षीरसागर
अस काही नाही कि रात्रीचीच कविता आहे.....हे शेवटच कडव आहे ज्यात तो ती गेल्यावर रात्रहि कशी भासते ते सांगतोय
असंय होय
In reply to अस काही नाही.. by पंडित मयुरेश न…
मिठी मारल्यावर ती गेली का कविनं उगीच आपली मिठी खुली सोडलीये? (ती आली तर बोलण्यात वेळ जायला नको म्हणून)
ओ
मग ती बंद कधी करताय ?
हो ना लवकर करा
In reply to ओ by इरसाल
यांच्या मिठ्यांची वर्णन वाचता वाचता आमच्या मुठी वळू लागल्या.
लिहा.
छान. अजून लिहा.
-दिलीप बिरुटे
धन्यवाद...
In reply to लिहा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद तुम्ही कवितेला छान म्हणलात म्हणुन नाही तर निदान एकानी तरी कवितेला साजीशी प्रतिक्रिया दिली....
ऊगाच पानचट प्रतिक्रिया वाचुन थोडा हिरमुसलो होतो..........या संकेतस्थळावर नविन असल्यामुळे या प्रकाराची सवय नाही अजुन........
पण तुमच्या प्रतिक्रियेने धीर दिला......
छान. बिरूटेसरांसाठी अजून लिहा
छान. बिरूटेसरांसाठी अजून लिहा. ;)
लेका...
In reply to छान. बिरूटेसरांसाठी अजून लिहा by सुहास..
बिरूटेसरांसाठी अजून लिहा.
आपल्या सर्वांसाठी म्हणायचं ना राव. :(
कानी पडला आवाज पैंजणांचा
झपकन नजर मागे गेली
मनास झाला भास पावलांचा
मला तर वाटले तुच आली
यातले पैंजण साले आता दिसतच नाही. कुठे आवाज नै कै नै.
बंजारा स्त्रीया छम छम आवाज येणा-या पैजणं घालायच्या आता तेही दिसत नाही.
-दिलीप बिरुटे
आँ सर कहिच दिसत/एकु येत नाहि म्हणता???
म्हणजे वय झालं आता!!!
सरांना म्हणे
In reply to आँ सर कहिच दिसत/एकु येत नाहि म्हणता??? by दिपक.कुवेत
मेणबत्त्या मोजता मोजता लागे धाप !
चांगली प्रतीक्रिया
In reply to आँ सर कहिच दिसत/एकु येत नाहि म्हणता??? by दिपक.कुवेत
एखादा जेव्हा चांगली प्रतीक्रिया देतो तेव्हा त्य्चे स्वगत करयची मनसिकत ठेवा...
तुमच्यासारख्यांमुळेच लोक अशा चांगल्या संकेत स्थळांवर येणे बंद करतात........
अरे देवा
In reply to चांगली प्रतीक्रिया by पंडित मयुरेश न…
:hz:
एक काम करा,
In reply to चांगली प्रतीक्रिया by पंडित मयुरेश न…
पुढल्या वेळेपासून 'माझ्या लिखाणाला चांगलंच म्हणा' अशी सूचना लिहीत चला तुमच्या लिखाणात. एकाला आवडली म्हणून दुसर्यालाही आवडलीच पाह्यजे असा नियम आहे का?
प्रतिक्रिया किमान पानचट नसावी
In reply to एक काम करा, by सूड
चुका काढण्याविषयी किंवा टीका करण्याविषयी माझी काहीच हरकत नाही........
पण टीका कवितेला समर्पक असाव्यात एवढी साधी अपेक्षा आहे.......
माझ्या कवितेला चांगलच म्हणा अशी अपेक्षा नाही पण किमान टीका करताना त्या टीकेचाही अभिमान वाटुद्या.......
साहीत्यात लेखका इतकच समिक्षकालाही मान आहे......
कविता बरी असावी. वाचेन नंतर.
In reply to चांगली प्रतीक्रिया by पंडित मयुरेश न…
कविता बरी असावी. वाचेन नंतर.
अवांतरः तुमचं नाव पंडित आहे का?
तुम्हाला ज्योतिष विषयक सल्ला कसा विचारु? इथेच की फोन वर? फी किती?
वास्तुशास्त्रानुसार संडास कुठल्या दिशेस असावा?
भाग्यांक सांगण्यासाठी तुम्हाला काय माहिती द्यावी लागते?
Gemology म्हणजे काय?
भारतातला भ्रमण ध्वनी क्रमांक आहे का?
धन्यवाद!
>>वास्तुशास्त्रानुसार संडास
In reply to कविता बरी असावी. वाचेन नंतर. by प्यारे१
>>वास्तुशास्त्रानुसार संडास कुठल्या दिशेस असावा?
कुठल्या का दिशेस असेना पटकन अॅक्सेसेबल असावा.
ऑटोमॅटिक?
In reply to >>वास्तुशास्त्रानुसार संडास by सूड
ऑटोमॅटिक? ;)
कवितेवर प्रतिक्रिया देताय ना?
In reply to कविता बरी असावी. वाचेन नंतर. by प्यारे१
कवितेवर प्रतिक्रिया देताय ना? मग कवितेविषयीच बोला ना.....अवांतर विषयांसठी दुसरे खादे सदर बघा..
पंडीत मयुरेशकाका
In reply to कवितेवर प्रतिक्रिया देताय ना? by पंडित मयुरेश न…
पंडीत मयुरेशकाका प्यारेकाकाकडे दुर्लक्ष करा. असाच आहे तो. वशाड मेलो !! ;)
>>> अवांतर विषयांसठी दुसरे
In reply to कवितेवर प्रतिक्रिया देताय ना? by पंडित मयुरेश न…
>>> अवांतर विषयांसठी दुसरे खादे सदर बघा..
हे काय वाईट आहे? :)
श्री श्री
सुड आणी प्यारे१...
तुमच्यासारख्यांमुळेच लोक अशा चांगल्या संकेत स्थळांवर येणे बंद करतात. समजलं !
अहो आम्ही ज्योतिष विषयक सल्ला
In reply to श्री श्री by इरसाल
अहो आम्ही ज्योतिष विषयक सल्ला विचारला होता फक्त.
बाकी संडास कुठे असावा हा प्रश्न असतोच की. सूड ने तातडीच्या वेळची गरज सांगितली इतकंच.
ह्या मुळं लोक बंद होत असतील तर आमचा 'ना विलाज'!
सुपारी घेतलीय का?
In reply to अहो आम्ही ज्योतिष विषयक सल्ला by प्यारे१
सुपारी घेतलीय का?
अस्सं
आला तुमचा डाव माझ्या लक्षात....
मग कवितेविषयीच बोला ना.....अवांतर विषयांसठी दुसरे एखादे सदर बघा.
आला तुमचा डाव माझ्या लक्षात....
In reply to अस्सं by इरसाल
मी पैलेच म्हटलं होतं
कवितेच्या बाहूतून हलकेच जाहिरातीची मिठी खोल्लीये! क्या आयडिया है सरजी!!