हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वतःचाच पंजा खूप भिववतो
वर्षानुवर्ष विश्वासलो ज्यावर
तोच हल्ली घाबरवतो
हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वत:चाच पंजा खिसा कापतो
दोन भा़ज्या जास्त खातोस रे हावरटा
असे म्हणून धमकावतो
हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वतःचाच पंजा चिडवतो
गाडी घेतलीस काय रे साल्या म्हणून
हळुच इंधनाचे दर वाढवतो
हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वतःचाच पंजा हिणवतो
९५ टक्के मिळाले का रे तुझ्या पोरांना म्हणत
५०% वाल्याला डोक्यावर बसवतो
हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वतःचाच पंजा गंध पुसू पाहतो
नारळ फोडतोस का रे भाड्या म्हणत
लगेच अंधश्रद्धेचे लेबल लावतो
हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वत:चाच पंजा गळफास लावतो
कधी शेतावर तर कधी शहरात
आत्महत्या करायला लावतो
हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वत:चाच पंजा वस्त्र फेडतो
दिवस-रात्र-जात-धर्म निरपेक्ष
अब्रूहीन जगायला लावतो
हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वत:चाच पंजा फितुर होतो
कधी स्वकीयांवर अत्याचार
तर कधी परक्यांना 'आधार' देतो
हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वत:चाच पंजा माझा इतिहास पुसतो
माझी तलवार म्यान करुन
इतरांची दाढी कुरवाळतो
हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वतःचाच पंजा धमकावतो
ताई माई अक्का म्हणत म्हणत
दर पाच वर्षांनी फसवतो
---------------------------------------------------
पण आता नाही घाबरणार
पंजाला नाही जुमानणार
निरुपयोगी अन् त्रासदायक अपेंडिक्ससारखे
त्याला कापून काढणार
---------------------------------------------------
- मंदार
०५.०१.२०१४
पौष शु. ५, गुरु गोविंद सिंग जयंती
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3678
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
:)
(No subject)
In reply to :) by पैसा
:)
कमळा दिसायला कशी आहे हो?
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नी मै कमली कमली...
तुमचा पंजा तूमी कापल्यानंतर
गरज लागली तर माझा पंजा उधारीवर द्यायला मी तयार आहे.
In reply to तुमचा पंजा तूमी कापल्यानंतर by दर्यावर्दी
काय रे बॅट्या तू लांडगा कधी
In reply to गरज लागली तर माझा पंजा उधारीवर द्यायला मी तयार आहे. by बर्फाळलांडगा
प्रत्येकातच एक लांडगा लपलेला असतो
In reply to काय रे बॅट्या तू लांडगा कधी by दर्यावर्दी
अहो
मुळव्याधीवर एक कमलतैलमोदम
(No subject)
In reply to मुळव्याधीवर एक कमलतैलमोदम by दर्यावर्दी
नऊच स्मायल्या!!
In reply to (No subject) by सचीन
एक तोंड 'आलं' असेल.
In reply to नऊच स्मायल्या!! by हतोळकरांचा प्रसाद
:lol:*lol*
In reply to नऊच स्मायल्या!! by हतोळकरांचा प्रसाद
कविता आवडली...
नवल आहे
In reply to कविता आवडली... by मदनबाण
कोण हे फडणवीस?
In reply to कविता आवडली... by मदनबाण
मस्त....
.