घेत भरारी गगन विहारी विहंग मन प्रतिमा कोरी
वेध दिशांचे युगे युगे जन्मो जन्मी विस्मयकारी
अशक्य कोटी असंख्य नाती गुंता अनुनय गाभारी
अन्वय शोध बिचारे अगणित चुकार भाषा व्यभिचारी
गाळिवशा रिपुकांच्या भिंती रोप पेरती अविचारी
किती करावे थोडे ते तृप्ती न कधीच महाद्वारी
द्यावे घ्यावे विसरावे परतून न यावे माघारी
निववेल कुणी इच्छा वांच्छा थांबेल कधी का ही वारी ??
………………………. अज्ञात
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1944
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुपर्ब.........
सुपर्ब.........
धन्यवाद वेल्लाभत
In reply to सुपर्ब......... by वेल्लाभट
धन्यवाद वेल्लाभत :)
समारोप अवडला..पण वाचताना
समारोप अवडला..पण वाचताना खटक्यावर बोट होत नैय्ये!
पण वाचताना खटक्यावर बोट होत
In reply to समारोप अवडला..पण वाचताना by अत्रुप्त आत्मा
पण वाचताना खटक्यावर बोट होत नैय्ये हे उलगडलं नाही बुवा !!
आहा. फार सुंदर.
आहा. फार सुंदर.