नमिताचा क्लास (शतशब्दकथा)
लेखनविषय (Tags)
कॉमर्सच्या बारावीला मार्कांचं एवढं काही कौतुक नसतं. तरी बोर्डात येणं भारीच! दहा मित्र-मैत्रिणींच्या ग्रूपमध्ये नमिताच बोर्डात आली होती. "माहेश्वरी आहे." कुळ्या म्हणाला. "कॉमर्सच्या बोर्डात नाही आली तर उपयोग काय मारवाडी असण्याचा?" सगळे जोरजोरात हसले. नमितासुद्धा, पण डोळ्यांत थोडी उदासी होती.
बाकीच्यांना बरे मार्क होते तसे, भारी काही नाही. सीए करायचं. "झावरे" लावायचा, का "जोशी", का "अग्रवाल" हे ठरंत होती. नमिता एकटीच बसली होती, कडेला.
क्लासचं विचारल्यावर म्हणाली, "काय पप्पा म्हणतील तसं..."
आठवड्यातच तिची लग्नपत्रिका सगळ्यांना पोस्टाने आली. लातूरचा तेलाचा व्यापारी होता. क्लासहून परस्पर सगळे रिसेप्शनला गेले. फोटोत पाठीवर सॅक घेतलेले, हसरे नऊ जण आणि टिकल्याटिकल्यांच्या साडीतली न हसणारी दहावी नमिता…
.
(पण नमिताची कथा इथेच संपत नाही...)
प्रतिक्रिया
बय्रापैकी जमलय!
:-(
ह्म्म्म..
नमिता?
असल्या नमिता सीए व्हायला
हे चित्र पाहून मि.पा च्या
गोष्ट छान आहे. पण कोणत्या
मस्त
छान !!
आवडली
खूप आवडली कारण अशी एक अर्चना
नमिता {नमिथा} वर हा धागा
आता सुरु करीन. पुढचा लेख
आवडली .
छान कथा आहे!!! जमलंय!!
छान
थोडक्यात !
कथा आवडली
जमलंय........ शेवट पंच जमलाय
शतशब्द म्हणजे काय
http://www.misalpav.com/node
छान जमलीये.
मस्त जमलीये. अशा सत्यकथा
शतशब्द कथाच का??
शतशब्दकथा हा "फॉर्म" एकदा
मान्य...
मला एक सट्ल अर्थ असाही जाणवला...
+१
टिकल्याटिकल्यांच्या साडीतली न हसणारी दहावी नमिता…
जीवन चलनेका नाम.....
पेठकर काका
खूप सुंदर प्रतिसाद.
कथा आवडली.
ही कथा हे एक "पॉईंट स्टेटमेंट" आहे. नमिताच्या आयुष्यातल्या एका क्षणाचा फोटो आहे. नमिता पुढील आयुष्यात काय करते (किंवा करत नाही) हे कथेच्या मर्यादेपुरतं गैरलागू आहे.हे अगदी व्यवस्थित ( शब्दांचा पसारा न वापरता) प्रतीत होते आहे असे माझे वैयक्तिक मत आहे.नकारात्मक संदेश.
'लातूरच्या एका तेलाच्या
मुद्दा तो नाहीच!!!
डोळ्यात टचकन पाणी आणले हो कथेने!
समाजात बर्याच ठिकाणी दिसणारी
रमाबाई रानडे
तुम्हा सगळ्यांच्या १ गोष्ट