दिल्लीतील सत्तापालट म्हणजे एका नव्या युगाची सुरुवात?
अपेक्षेप्रमाणे दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन होऊन अरविंद केजरीवालांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पडला. त्याचबरोबर विधानसभेच्या त्रिशंकू स्थितीमुळे दिल्लीत नव्याने निवडणुका होण्याची शक्यता काही काळापुरती का होईना पण संपल्याचे संकेत मिळत आहे. लोकशाहीच्या दृष्टीने हे चांगले संकेत मानायला हवे. बदलती राजकीय स्थिती आणि प्रादेशिक पक्षांचा वाढता प्रभाव यामुळे देशात वारंवार त्रिशंकू परिस्थिती निर्माण होणे आता यापुढे नित्याचेच ठरणार आहे. त्यावर वारंवार निवडणुका हा काही पर्याय असू शकत नाही. विभिन्न विचाराचे आणि प्रचंड राजकीय वैचारिक विरोधाभास असला तरी काही पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करणे, हाच यावर एकमेव इलाज आहे. अशा बिकट प्रसंगी जर अपरिहार्यतेने विरोधाभासी पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करत असेल तर याला संधीसाधूपणा म्हणता येणार नाही.
अपेक्षेप्रमाणे दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन होऊन अरविंद केजरीवालांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पडला. त्याचबरोबर विधानसभेच्या त्रिशंकू स्थितीमुळे दिल्लीत नव्याने निवडणुका होण्याची शक्यता काही काळापुरती का होईना पण संपल्याचे संकेत मिळत आहे. लोकशाहीच्या दृष्टीने हे चांगले संकेत मानायला हवे. बदलती राजकीय स्थिती आणि प्रादेशिक पक्षांचा वाढता प्रभाव यामुळे देशात वारंवार त्रिशंकू परिस्थिती निर्माण होणे आता यापुढे नित्याचेच ठरणार आहे. त्यावर वारंवार निवडणुका हा काही पर्याय असू शकत नाही. विभिन्न विचाराचे आणि प्रचंड राजकीय वैचारिक विरोधाभास असला तरी काही पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करणे, हाच यावर एकमेव इलाज आहे. अशा बिकट प्रसंगी जर अपरिहार्यतेने विरोधाभासी पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करत असेल तर याला संधीसाधूपणा म्हणता येणार नाही.
केजरीवाल मुख्यमंत्री झाल्याने आता त्यांना जनतेला दिलेले महागाई व कांद्याचे भाव वगळता अन्य अभिवचन पूर्ण करणे फारसे कठीण नाही, कदाचित शंभर टक्के यश मिळणार नाही पण एक पारदर्शक आणि "लोकांनी लोकांसाठी चालविलेले लोकांचे राज्य" असे म्हणण्याइतपत चांगले सरकार ते नक्कीच देऊ शकतात. त्यामुळे लोकाभिमुख राज्यकारभाराचा एक अत्यंत चांगला पायंडा पडण्यास सुरुवात होण्याची नक्कीच शक्यता आहे.
मला अरविंद केजरीवालांच्या वागण्याच्या पद्धतीत, बोलण्यातील ढबीत आणि पेहरावाच्या स्टाइलमध्ये एक "महात्मा" दिसत होता. ही त्यांची नौटंकी की निसर्गदत्त गुणविषेशता हे काळाच्या ओघात स्पष्ट होईलच. पण सध्यातरी माझा भ्रमनिरासच झाला आहे कारण सत्तेच्या माध्यमातून लोकनेता होणे आजवर कुणालाच शक्य झाले नाही. केजरीवालांना शक्य होईल, हेही शक्य वाटत नाही त्यामुळे आता ’महात्मा’ व ’युगपुरुष’ होण्याची त्यांनी संधी गमावलीच आहे. मात्र त्यांना चांगला ’राजकारणी’ होता आले तर ती भारतीय लोकशाहीला कलाटणी देण्याची लोकाभिमुख सुरुवात ठरेल.
केजरीवाल उत्साही आहे, मेहनती आहे आणि विषय समजून घेण्यासाठी अभ्यास करण्याची प्रवृत्ती आहे. सोबत साधी राहणी आणि निर्धोकपणा या त्यांच्या जमेच्या बाजू आहे. देश घडवण्यासाठी लागणारी कळकळ आणि उद्दिष्ट गाठण्यासाठी परिणामास सामोरे जाण्याची तयारी आहे. मात्र त्यांचा धूर्तपणा यात सर्वात मोठा अडसर ठरेल असे मला वाटते. दिनांक १७/१२/२०१३ च्या फेसबुकवरील एका पोस्टमध्ये मी असे म्हटले होते की, "कोणाचा पाठिंबा घेणार नाही, कोणाला पाठिंबा देणार नाही" या डावपेचामागे भाजपाला सत्तेपासून अडवणे आणि विधानसभेच्या त्रिशंकू अवस्थेचे सर्व सूत्र संचलन आपल्या हातात घेणे, हा उद्देश केजरीवालांचा आहे, आणि नेमके तेच आज ते खरे झाले आहे. निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर
’आप’ला २८ जागा मिळाल्याने देशातील जनतेच्या आशा पालवल्या होत्या. अरविंद केजरीवालांच्या रूपाने एक प्रामाणिक नेता देशाला मिळाल्याची भावना व्यक्त व्हायला लागली होती. दिल्लीतून सुसाट निघालेला अश्वमेघाचा घोडा आता भारताच्या खेड्यापाड्यापर्यंत घोडदौड करून भारतीय राजकारणाला एक खंबीर आणि स्वच्छ पर्याय उपलब्ध करून देईल, अशी शक्यता निर्माण व्हायला लागली होती. मात्र त्रिशंकू विधानसभेतून सत्तेचा मार्ग शोधण्यात केजरीवालांनी धूर्तपणाच्या ज्या तिरक्या चाली खेळल्यात, त्या चाली आणि कॉग्रेस व भाजपाच्या मुत्सद्देगिरीच्या तुलनेत धूर्तपणाच्या होत्या, यात मुत्सद्देगिरी खचितच नव्हती. त्रिशंकू विधानसभेत "आप" निर्णायक स्थितीत असताना आणि सरकार स्थापनेचे भवितव्य ’आप’च्या हातात एकवटले असताना ’आप’ची ही भूमिका लोकशाहीला पोषक नव्हती. आपची ही भूमिका प्रामाणिकपणाची नव्हती तर भाजपला रोखून स्वतःचे सरकार स्थापन करण्यायोग्य वातावरण निर्मिती करण्यासाठी खेळलेली ’आप’मतलबी व धूर्तपणाची खेळी होती, असे माझे स्पष्ट मत आहे.
निवडणुकांच्या निकालानंतर भाजप सर्वात जास्त जागा जिंकून दिल्ली विधानसभेत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेला होता. प्रचलित व्याख्येनुसार जनादेश भाजपला मिळालेला होता. भाजपने सरकार स्थापन करणे व इतर पक्षांनी त्यांना पाठिंबा देणे, हा सरळसोपा आणि प्रामाणिकपणाचा मार्ग होता. मात्र कॉग्रेसच्या मुत्सद्देगिरीने आणि केजरीवालांच्या धूर्तपणाने हा डाव उधळला गेला. याच कारणाने माझ्या नजरेत केजरीवालांचा प्रामाणिकपणा संशयाच्या भोवर्यात आला आहे. पण एवढ्याशा कारणाने त्यांच्या डोक्यावरील गांधीटोपीला गालबोट लागले, असे काही म्हणता येणार नाही. त्यांच्या डोक्यावर गांधीटोपी काँग्रेसवाल्यांच्या डोक्यावरील टोपीपेक्षा जास्त उठावून दिसते, हे सुद्धा तेवढेच खरे आहे.
केजरीवालांना आणि भारतीय शोषित जनतेला अपेक्षित असलेले व्यवस्था परिवर्तन सत्ताप्राप्तीतून साध्य होण्याची शक्यता नाही. तरीही केजरीवाल सत्तेच्या मैदानात उतरले. आता सत्तेतूनही व्यवस्था परिवर्तन साध्य होऊ शकते हे सिद्ध करण्याची जबाबदारी केजरीवालांची आहे. नाहीतर भारतीय जनतेचा परिवर्तनवादी चळवळीवरीलच विश्वास डळमळीत होईल.
सध्या देशात भ्रष्टाचारविरोधी वातावरण तापवण्यात केजरीवालांना आणि त्यांच्या आम आदमी पक्षाला आल्यामुळे देशासमोरील एकमेव समस्या म्हणजे भ्रष्टाचार असे चित्र निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे. या गदारोळात शेतमालाच्या भावाचा प्रश्न पार मागे ढकलला गेला आहे. तरीपण सध्यातरी देशात केजरीवाल वगळता राष्ट्रीय पातळीवर दुसरा कोणताही अन्य आशेचा किरण उपलब्ध नाही, त्यामुळे परिवर्तनवादी घटकांनी अरविंद केजरीवालांना सक्रिय समर्थन देण्याची सक्त गरज निर्माण झाली आहे. ही ऐतिहासिक संधी आपण गमावता कामा नये.
महाराष्ट्रात आम आदमी पक्ष, शेतकरी संघटना, विदर्भ संयुक्त कृती समिती, काही रिपब्लिकन पक्ष व आणखी काही संघटना एकत्र आल्यास राज्यात एक ताकदवान दबावगट निर्माण होऊन व्यवस्था-परिवर्तनाच्या दिशेने पाऊल टाकले जाऊ शकते, एवढी मला नक्कीच खात्री आहे.
- गंगाधर मुटे
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वाचने
24223
प्रतिक्रिया
89
मिसळपाव
प्रतिक्रिया
सरकार चालवणे याला खेळ वाटतोय,
भारतीयांच्या रक्तातच शिस्त
In reply to सरकार चालवणे याला खेळ वाटतोय, by ग्रेटथिन्कर
:)
भाजपला राजकारण जमत नाही..
म्हणजे नेमके काय?
In reply to भाजपला राजकारण जमत नाही.. by ग्रेटथिन्कर
केजरीवालला पाठींबा द्यायला
In reply to म्हणजे नेमके काय? by हतोळकरांचा प्रसाद
गेम चेंजर ?!
१. मतदारांना पैसे, दारु, इ.
In reply to गेम चेंजर ?! by मोहन
१. टीव्ही वर दाखवल्या प्रमाणे
In reply to १. मतदारांना पैसे, दारु, इ. by हतोळकरांचा प्रसाद
भाबड्या अपेक्षा….
In reply to १. टीव्ही वर दाखवल्या प्रमाणे by प्रसाद१९७१
२ दिवसात जे केले ते तर बघा.
In reply to भाबड्या अपेक्षा…. by हतोळकरांचा प्रसाद
+१
In reply to १. मतदारांना पैसे, दारु, इ. by हतोळकरांचा प्रसाद
श्रीमंत लोकांची श्रीमंतांसाठी
In reply to गेम चेंजर ?! by मोहन
प्रगती ,सुधारणा याची जबाबदारी आपण काळावर टाकली आहे
@महाराष्ट्रात आम आदमी पक्ष,
लेखनातले विचार पटले नाहीत, अतिशय निराशावादी दृष्टीकोन आहे.
देशाला प्रथम भ्रष्टाचारी राजकारण्यांच्या विळख्यातून सोडवा,
In reply to लेखनातले विचार पटले नाहीत, अतिशय निराशावादी दृष्टीकोन आहे. by संजय क्षीरसागर
महाराष्ट्रात आम आदमी पक्ष,
सुलभ ज्ञानेश्वरीवाले?
In reply to महाराष्ट्रात आम आदमी पक्ष, by विशाल चंदाले
ह्म्म्म... सध्या आपच्या
आपण आशावादी रहायला हवे.
सध्याच्या परिस्थितीत केजरीवाल हीच एक आशा आहे!
In reply to आपण आशावादी रहायला हवे. by प्रसाद१९७१
आपलं ते लेकरू…
In reply to सध्याच्या परिस्थितीत केजरीवाल हीच एक आशा आहे! by संजय क्षीरसागर
कशाची कशाही तुलना करावी याला लिमीट आहे
In reply to आपलं ते लेकरू… by हतोळकरांचा प्रसाद
मुद्धे वि. गुद्दे!!
In reply to कशाची कशाही तुलना करावी याला लिमीट आहे by संजय क्षीरसागर
परत एकदा +१
In reply to मुद्धे वि. गुद्दे!! by हतोळकरांचा प्रसाद
गुद्दे?
In reply to मुद्धे वि. गुद्दे!! by हतोळकरांचा प्रसाद
क्लिंटन यांच्या मताचा आदर करत
In reply to गुद्दे? by संजय क्षीरसागर
आता तुम्ही देशभावनेचा मुद्दा घेतला!
In reply to क्लिंटन यांच्या मताचा आदर करत by हतोळकरांचा प्रसाद
सध्यातरी चित्र असे आहे कि
In reply to क्लिंटन यांच्या मताचा आदर करत by हतोळकरांचा प्रसाद
इंडिया अगेन्स्ट करप्शन हे काँग्रेसचे पिल्लु आहे?
In reply to सध्यातरी चित्र असे आहे कि by आनन्दा
हे आप ( केजरीवाल ) चे यश च आहे.
हरभरा टरारून वर…
In reply to हे आप ( केजरीवाल ) चे यश च आहे. by प्रसाद१९७१
आम आदमी पक्षाला अभिप्रेत असलेले नवे युग
माहितीपूर्ण
In reply to आम आदमी पक्षाला अभिप्रेत असलेले नवे युग by क्लिंटन
नक्की काय घडले ? काय घडेल ?
आपल्या नोकरीत पद्धतशीर
In reply to नक्की काय घडले ? काय घडेल ? by चौकटराजा
@जोपर्यंत शेतकरी ते शेतमालाचा
In reply to आपल्या नोकरीत पद्धतशीर by धन्या
बुवा...
In reply to @जोपर्यंत शेतकरी ते शेतमालाचा by अत्रुप्त आत्मा
थोडक्यात काय तर आपल्यासमोर
In reply to बुवा... by नाखु
खरयं
In reply to थोडक्यात काय तर आपल्यासमोर by धन्या
आज NSUI दिल्लीत लोकपालच्या
मला तर...
हेच म्हणतो..
In reply to मला तर... by अर्धवटराव
लगेच काहीही बोलणे घाईचे ठरेल.
+१
In reply to लगेच काहीही बोलणे घाईचे ठरेल. by ऋषिकेश
केजरीवाल व त्यांच्या कंपूचे
आत्ता तरी
In reply to केजरीवाल व त्यांच्या कंपूचे by विद्युत् बालक
सारवासारव
In reply to आत्ता तरी by विकास
आधी मिपा वरचा काश्मीरचा धागा
In reply to सारवासारव by विद्युत् बालक
अहो केजरीवाल मिपा वाचतात.
In reply to आधी मिपा वरचा काश्मीरचा धागा by अनुप ढेरे
ते मिपा वाचत असतील. पण तो
In reply to अहो केजरीवाल मिपा वाचतात. by बॅटमॅन
अहो ते "जलेबी" मुळे म्हणलो
In reply to ते मिपा वाचत असतील. पण तो by अनुप ढेरे
मोहल्ला सभा विधेयक
अगदी मोहल्ला सभा नव्हे पण ...
+१
In reply to अगदी मोहल्ला सभा नव्हे पण ... by चौकटराजा
एक माणूस/नागरिक म्हणून
In reply to +१ by विकास
नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
....
In reply to नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा by शशिकांत ओक
तिकडे तोवर राहूलजींच्या खांद्यावर धुरा आली की ते कसे वागतात व भ्रष्टाचाराला चटावलेल्या नेत्यांना कसे वठणीवर आणतात ते पाहणे रंजक ठरेल.पप्पू ची पण नाडी पहिली कि काय तुम्ही?ए खुदा उनको सबकुछ मालूम होता
In reply to .... by विद्युत् बालक
एका चांगल्या चर्चेला विनाकारण
In reply to .... by विद्युत् बालक
विषयाला वांज़ोठा फाटा नाही
तुम्ही सरळ गुगल मराठी
In reply to विषयाला वांज़ोठा फाटा नाही by देव मासा
आता पासून वापरीन
अभिनंदन करण्यास उशीर नको
शीला दिक्षित
केजरीवाल यांनी कितीही वेगळे
In reply to शीला दिक्षित by विकास
+१
In reply to केजरीवाल यांनी कितीही वेगळे by ऋषिकेश
बाबूंसाठी वेळ आहे.
In reply to +१ by चिरोटा
विश्वासमत मिळवण्याच्या आधी
In reply to बाबूंसाठी वेळ आहे. by विकास
आता केजरीवाल म्हणत आहेत कि
लादेन, भिंद्रनवाले की नजीबखान रोहिला हे कळायचे आहे -
वेळ द्या !
मौन्व्रत
तुलना
मला वाट्ते...
ढगांशी वारा झुंजला रे
चांगला धागा
घोषणाबाजी
In reply to चांगला धागा by पैसा
मोदिन्वरचा फोकस केजरीवाल
.....१०१% टक्क्क्के सहमत...!!
आप, राजसाहेब, नि नितीश कुमार
In reply to .....१०१% टक्क्क्के सहमत...!! by विनोद१८
>>> आप, राजसाहेब, नि नितीश
In reply to आप, राजसाहेब, नि नितीश कुमार by सचीन
भाजपला मोदी मुळे ह्या
In reply to >>> आप, राजसाहेब, नि नितीश by श्रीगुरुजी
सुंदर विवेचन केलेत...
In reply to भाजपला मोदी मुळे ह्या by सचीन
>>> भाजपला मोदी मुळे ह्या
In reply to भाजपला मोदी मुळे ह्या by सचीन
मोदी प्रधानमंत्री होणे अशक्य
In reply to >>> भाजपला मोदी मुळे ह्या by श्रीगुरुजी
संक्रांतीच्या शुभेच्छा!
In reply to मोदी प्रधानमंत्री होणे अशक्य by सचीन
काय संबंध आहे माहिती नाही पण