Skip to main content

भान

लेखक mohite jeevan यांनी रविवार, 29/12/2013 17:52 या दिवशी प्रकाशित केले.
'हे बघा तुमची मुलगी खुपच वेगळी वागते,'सासु म्हणाली, 'तुम्हाला म्हणायचे नेमके काय?एवढे दिवस काही नव्हते बरं ती काय नविन आहे का?,'मुलीचा बाप बापु म्हणाला, 'आता पर्यत खुप सहन केली, आता या पुढे जमणार नाही,'महेश मध्येच म्हणाला, 'बापु ह्याचं काही एकु नका हे तुमच्या समोर एक बोलतात आणि माघारी माझ्या समोर एक वेग़ळच बोलतात,'मुलग़ी ग़ीता म्हणाली, 'हो हो हो तुझावरच विश्वास ठेवतील बघ,शेवटी तुझा बाप,'सासु म्हणाली, 'आहो तसे नव्हे,दोघांचंही ऐकुण घेतोच की ,हे बघा महेशराव आतापर्यत देवाच्या आशिर्वादान ग़ोडी ग़ुलाबीन चालु होत, हो की नाय,'बापु हात करत, 'मग़ ह्या दोघाचं आता का पटंना?कारण दोघांनी ही एकमेकांना समजावुन घेतलं पाहिजे,एवढाच याच्यात दोष आहे बघा बाकी मला काही वाटत नाही,'बापु म्हणाले, हे एकुण एकदम शांतता पसरली,महेश खुर्चीवर बसुन एकसारखा त्या जमिनीकडे पाहत आसतो,तर ग़ीता ही त्याच स्थितीत उभी आसते, बहुतेक त्याच्या त्याना चुका माहीत झाल्या आसाव्या आसे वाटत होते, 'तुम्ही आलात म्हणुन बरे,माझ्या एकट्याला काही सोडविता येणार नाही,याची भांडणे,'सासु बाई म्हणाल्या, 'बापु खरं साग़ु का ते तुमच्या माघारी खुप प्रेम करतात पण ह्याना चार चौघात काय होतय काय माहीत,उग़ाच माझ्यावर राग़ काढत आसतात,'ग़ीता म्हणली, 'हे बघ पोरी तु पण समजावुन घेत जा,जास्ती प्रेम झालं की आसचं होतं,'बापु म्हणाले, 'पण नाही म्हणजे नाही मला हे सहन होत नाही,'महेश म्हणाला, आता जावई आजुन ही रागातच आहेत हे पाहुन बापु खालच्या आवाजात म्हणाले,' महेशराव काय चुकलं आसलं तर माफ करा,ओहो फार ग़ुणाची मुलग़ी हाय बघा,उग़ाच डोक्यात राग़ घालुन घेऊ नका,' 'बापु नाही',आसे मोठ्या आवाजात गीता म्हणाली, 'ह्या मानसासमोर हात पाय जोडु नका, हा बापय फार वाईट आहे,'ग़ीता आता नवर्याविरुध् बोलु लागली, 'अग़ं ए भवाने कोणाला म्हणालीस, माझा पोरग़ा साहेब आहे साहेब,'सासु म्हणाली, 'तो खरं काय आहे हे फक्त मलाच माहीत आहे,'ग़ीता म्हणाली, 'हे ग़प्प बस नाहीतर याद राख,'महेशराव म्हणाले, 'ग़ीत हे आसं बोलु नये,तुझ्या बापासाठी तर,'बापु म्हणाले, 'नाही आताच्या आता बाहेर जा चालती हो ह्या घरातुन,'महेशराव मोठ्या आवाजात म्हणाले, आसे म्हणताच गीता ठसा ठसा रडु लाग़ली आणि म्हणाली,'नको हो मला आसे बोलु माझ्या वडीलाच्या समोर, खुप जीव आहे त्याचा माझ्यावर,' 'ग़ीता आसे म्हणु नको,मला सहन होणार नाही,'बापु म्हणाले, आसे म्हणताच ग़ीताच्या चेहर्यावर एक जोरदार तडाखा बसला व ती खाली कोसळली, सासु बाई हे पाहुन जाग़ेवरच उभ्या राहिल्या व देवघरात ग़ेल्या, आणि बापुना आसला मार त्याना पाहवेना व ते दारातुन बाहेर पडु लाग़ले, तीच्यावर महेश लाथा बुक्या मारत शिवी देत होता.आणि ते बापुना पाहवत नव्हते,ग़ीता आरडा ओरडा करत होती. 'बापु ,बापु,' म्हणुन हाक्का मारत होती,शेवटी बापुनी माग़े पाहिले व म्हणाले,'पोरी माझा लय जीव आहे बघ तुझ्यावर एवढी एवढी होतीस ना खुप जपलं बघ तुला एखाद्या हातावरील फोडा सारखं,पण हे पाहवत नाही मला,आता मी तर काय करणार शेवटी दिल्या घरचं दु:ख तुलाच सहन केलं पाहिजे, जातो मी, तुझ्या आईला साग़तो ग़ीता राणी सारखी हाय बघ म्हणुन,' 'बापु नाय मला घेऊन चला ही लोक खुप छळतात हो,'त्या रक्तबंबाळ ओठातुन तो आवाज येत होता, शेवटी बापु ग़ेले. थोड्या वेळाने गीता तशीच खाली पडलेली होती,घरात एकदम शांतता वाटत होती, काही वेळात तीचा पाच वर्षाचा मुलग़ा बाहेरुन खेळुन येताना तिच्या सासुला दिसला, आणि तिची सासु म्हणाली,'अग़ ग़ीता राजु आला बघ खेळुन', हे एकताच तीने आपला चेहरा बाथरूम मध्ये जाऊन धुतला व त्याला पाहुन हासरा चेहरा करुन म्हणाली,'ये रे राजु ये कोठे ग़ेलतं माझं बाळ? चल तुला लाडु देते,' आणि तो राजु म्हणाला,'मला दोन पाहिजे,' 'आरे हो दोन का चार घे,पण आधी तुझ्या पप्पाना देऊन ये बघु आताच वरती ग़ेलेत बघ,' 'हो दे, .......पप्पा पप्पा,'आसे म्हणत तो वरती जाऊ लाग़ला, 'आहो एकलं का राजु येतो पहा वरती,'ग़ीता म्हणाली, वरून खाली त्याच्या पप्पाचा आवाज आला,'आरेच्या राजु बाळ ये ये मम्मीला चारलास का लाडु?,' * तिकडे बापु घरी जाउन पोहचतात,ग़ीताची आई ग़ीता कशी आहे विचारते,ते म्हणतात,' संग़ळच चाग़लं आसुन चालत नाही माणसं ही चाग़ली लाग़तात,' यावर ते ठसा ठसा रडु लाग़तात, ग़ीताची आई ही रडु लाग़ते. तेवढ्यात त्याचा चार वर्षाचा नातु ग़णेश येतो, दोघे ही डोळे पुसतात. 'अरे ग़णु बघ मी तुझ्यासाठी काय आणंलं आहे , ये ये ,' आसे म्हणताच बापुच्या कडे ग़णेश धावत जातो, तसे बापु त्याचे मुके घेऊ लागतात. तेवढ्यात सुन व मुलग़ा तेथे येतात , व बापु मुलग़ा रमेशला मटण आणयला साग़तात. मुलीच्या घरी चमचमीत मटण खाण्याची जी आशा मनाशी होती ,ती संपली होती. बापु आपल्या नातुला बाग़ेत फीरायला नेतात, व त्याच्याशी खुप आनंदाने खेळतात.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 12685
प्रतिक्रिया 47

प्रतिक्रिया

मला आजपर्यंत मुळुमुळु आणि ओक्साबोक्सी हे दोनच रडण्याचे प्रकार माहित होते. ठसा ठसा????? म्ह्णजे काय? आणि कथा मलाही कळली नाही.

In reply to by Atul Thakur

आतापर्यंत रडण्याचे फक्त तिनच प्रकार माहीत होते...मुळुमुळु, ओक्साबोक्सी व ढसाढसा...पण जियो जीवन भाऊ ...

मुलीच्या वेदनेने पिळवटुन जाणार बापाच काळीज, गीते ला मारणारा पुरुषप्रधान क्रुर व्यवस्थेच प्रतिक असणारा महेशराव, मार खाण्यातच धन्यता आहे हे पटवुन देणारा बापाच्या काळजातला छुपा रुस्तम पुरुष प्रधान व्यवस्थेतला पुरुष बाप, त्या काळजातल्या अजुन आतील काळजांत मरुन गेलेली मटण खाण्याची दैहिकपातळी वरील उत्कट वासना, तुझ्या आइला तु राणी सारखी आहे असे सांगण्याच वचन देउनही शेवटी ओकायची तीच गरळ अखेर ओकणारा गीते चा बाप, या अपार जीवन संघर्षाच्या पारष्वभुमी वर निरागसता जपुन बागडणारा गणु, बापाचा शब्द पडु नये म्हणुन मटण आणण्यास मोठ्या बाणेदारपणे घराबाहेर पडणारा सुपुत्र रमेश काय सुंदर मानवी भावनांचा विशाल पट मांडणारया महाभारताची प्रकरशाने आठवण जाहली व अस्मादिकांचे डोळे भावनातिरेकाने वाहु लागले आणि जिभ मटणासाठी ललचाउन गेली आता मी कुठल्या बागेत जाउ आणि लग्न च झाले नाही तर कुठला नातु बरोबर घेउ ? जीवन भाउ आपण मराठी साहीत्याचा झेंडा असाच फडकवत राहा आमची मराठी आमचच मटण !

'बापु खरं साग़ु का ते तुमच्या माघारी खुप प्रेम करतात पण ह्याना चार चौघात काय होतय काय माहीत अगं गीतुडे, प्रेम चार चौघात करता येत न्हाई. ते माघारीच करावं लागतं. 'बापु ,बापु,' म्हणुन हाक्का मारत होती "हक्का नुडल मागत होती" असं म्हणायचंय काय तुम्हाला? बापु मुलग़ा रमेशला मटण आणयला साग़तात. मुलीच्या घरी चमचमीत मटण खाण्याची जी आशा मनाशी होती ,ती संपली होती.बापु आपल्या नातुला बाग़ेत फीरायला नेतात, व त्याच्याशी खुप आनंदाने खेळतात. शेवट गोड करीSSS गुरुराया.. शेवट गोड करी..

In reply to by यसवायजी

शेवट गोड करीSSS गुरुराया.. शेवट गोड करी..
मटण हाय की शेवटात! आता मटण काय ग्वाड असतया काय भौ? शेव्ट तिकट हाय वो.

In reply to by परिंदा

मटणाचं म्हायती नै पण कधीकाळी मुर्ग अफगाणी/लाहोरी/अमुकस्तानी नामक डिश खाल्ली होती ती चक्क गोड लागत होती. अस्सा टर्नॉफ झाला बीसी परत कधी खाल्लोच नै ती डिष.

In reply to by बॅटमॅन

ओ भौ, गोड नॉनव्हेज लै मंजे लै भारी अस्तय. फक्त मनासरख बनलं पाहीजे

In reply to by लॉरी टांगटूंगकर

@ परिंदा - तुमी शब्दश्या अर्थ घेउन र्‍हायले राव.. त्याच्याशी खुप आनंदाने खेळतात.. असा श्येवट ग्वाड झालाय कतेत..

In reply to by लॉरी टांगटूंगकर

असहमत. कसंही असो आम्हाला नॉनव्हेज म्हणजे खंग्री पायजे. एकुणातच गोडाची आम्हांला आवड कमीच.

कथेच्या शेवटि अनपेक्षीत दिलेली "मटणाची" कलाटणी कथेला एका वेगळ्याच उंचीवर नेउन ठेवते. हि गोस्ठ खुपच आवडली. जीवनभौ नविन वर्षात अश्याच उत्तमोत्तम कथांचा नजराणा समस्त मिपाकरांना बहाल करोत हिच त्या ईश्वरचरणी विनंती.

कोल्लाप्रात नेमका ३१ डिसेंबरच्या मुहूर्तावर मटणविक्रेत्यांनी संप पुकारलाय, त्या ज्वलंत पार्श्वभूमीवर कथा आणखीनच भिडली. कल्पनेला वास्तवाची डूब असावी तर अशी.

ह्या धड्यावरचे संभाव्य २१ प्रश्न काढा पाहू? परिक्षार्थी

जीवनभाऊंच्या कथेवरील प्रतिसाद वाचणे म्हणजे पर्वणीच असते पण १-२ प्रतिसाद वगळता आज निराशा झाली. असो थोड्या वेळाने परत चक्कर मारुन बघतो.

लागले सर्वे तेज्यायला चेष्टा करायला. अरे काव्यात्मकता बघा
मुलीचा बाप बापु
फँटसीची बेमालूम दिलेली डूब बघा
पण आधी तुझ्या पप्पाना देऊन ये बघु आताच वरती ग़ेलेत बघ
"अति प्रीती, हानाहानीची भीती" हा नवसंदेश पहा
'बापु खरं साग़ु का ते तुमच्या माघारी खुप प्रेम करतात पण ह्याना चार चौघात काय होतय काय माहीत,उग़ाच माझ्यावर राग़ काढत आसतात,'ग़ीता म्हणली, 'हे बघ पोरी तु पण समजावुन घेत जा,जास्ती प्रेम झालं की आसचं होतं,'बापु म्हणाले
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग़ीताच्या स्थितीच्या अपरिहार्यतेकडे आणि दैवदुर्विलासाकडे G1 भाव कसं लक्ष वेधतात पहा:
'आरेच्या राजु बाळ ये ये मम्मीला चारलास का लाडु?,
टीपः "*" या चिन्हाच्या पुढची कथा कळली नाही. एका दमात बुद्धीला जास्त ताण देता येत नाही... G1 भाव आप लगे रहो...

In reply to by आदूबाळ

हसून हसून डोळ्यातनं पाणी आलं तेच्यायला या प्रतिक्रीया वाचून! http://www.sherv.net/cm/emo/laughing/smiley-says-lol.gif @आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग़ीताच्या स्थितीच्या अपरिहार्यतेकडे आणि दैवदुर्विलासाकडे G1 भाव कसं लक्ष वेधतात पहा: 'आरेच्या राजु बाळ ये ये मम्मीला चारलास का लाडु?, >>>http://www.sherv.net/cm/emo/laughing/troll-face-evil-laugher-smiley-emoticon.gif

वरून खाली त्याच्या पप्पाचा आवाज आला,'आरेच्या राजु बाळ ये ये मम्मीला चारलास का लाडु?,' * येथून पुढे (इकडे) मी पण मम्मीला मग़ाच इतके धम्मकलाडु चारले आहेत की तिचं पोट भरलं आसेल. चल, माझ्याबरोबर. या ग़ोडाचा कंटाळा आलाय. आपण बाजारात जाऊ आणि मटण आणू या, तुझ्या आईला लई आवडताय! दोघेही मटण आणायला जातात. वाटेत बागेमधे मनसोक्त खेळतात. घरी आल्यावर महेशराव म्हणतात, ए,चल मटण कर लवकर, नाहीतर तुझा खिमा करुन टाकीन! ग़ीता मटण करते. सासुबाईंचा उपास आसतोय. ग़ीता सर्वांना वाढते. " राजुबाळ, घे तुला नळी." "आय, मला दोन पायजे." "आरे, दोन काय, चार घालते." " राजुबाळ, एकूण चारच नळ्या हायेत. आता मला आन तुझ्या आयला येक येक र्‍हाऊ दे की." "मला नग़ं, मला ओठांना झोंबतंय बग़ा." " अग़ं, मी औशद लावून देईन ना !" " इश्यं." आशा तर्‍हेने जेवण संपते. ग़ीता राजुबाळाला झोपवते. त्यानंतर .... महेशराव आणि ग़ीता मधे दिलजमाई होते. सक्काळी न्याहारी वेळेवर केली नाही म्हणून पुन्हा तडाखे बसून ग़ीता जमिनीवर कोसळते. हे असेच चालू रहाते आणि ग़ोष्ट संपल्यामुळे वाचक ठसा ठसा रडू लागतात.

आदूबाळ आणि तिमा या दोघांनाही आधी =)) =)) करून मग एक साष्टांग णमस्कार _/\_ पयलं णमण अर्थातच जीवणदेवाला.

बापुंना घरी गेल्यावर आपल्याला चमचमीत मटण खायचे होते हे "भान" आले एवढा जबरदस्त संबंध असताना तुम्ही असे विचारताच कसे????

लाग्ले सग्ले लगीच च्येष्ठा कर्याला...... जीवनभो नी काथा लिवली की तुमाला कै चेव येतोय व्हय? तीक्डं त्या बाईला बापय मारु र्‍हायलाय आन तुमी हितं आशी चेष्ठा कर्ताय? सोभतं का ह्ये? तो ब्याट्या साश्ठांग करु र्‍हायलाय त्यापेकशा त्या यड्या बाईला ह्या आसल्या दादल्या सोबत र्‍हाण्यापेकशा सौताच्या पायावर उबी र्‍हायची हिम्मत दे म्हनावं

मराठी साहित्यात समर्पण प्रेमकथा हा नवा प्रकार रुजू होत आहे आणि त्यात मिपाचा मोठा वाटा आहे याबद्दल तुम्हाला एक मिपाकर म्हणून अभिमान वाटला पाहिजे. तर लागले सगळे शिमगा करायला! (विनंती: सर्व संबंधितांनी कृपया हलके घ्यावे.)

In reply to by पैसा

पथ्थ्रका जवाब समर्पणसे. तुम्हाला समर्पणकथा आवडतात का नाही ते आधी सांगा! आम्हाला सर्वच समर्पणकथा नाही आवडत. फक्त जीवनभौंनी लिहिलेल्याच आवडतात. कारण त्या वाचता वाचता भान हरपते.

In reply to by जेपी

लोकांना मुद्दाम गहन विचार कर्रुन आणि उद्धट व अज्ञानी हलवायाने पाडलेल्या बिन केशरी जिलब्या आवडतात. ह्या निरुपद्रवी हलवायाच्या जीवनरंगी मिठाईला कोण विचारतो? बाकी नेहमी प्रमाणे, "वरील उपप्रतिसाद हा "तथास्तु" ह्यांनाच असल्याने, इतरांनी आपापला आणि माझा मुल्यवान वेळ वाया घालवू नये. ह्या उपप्रतिसादांचे काय कुटाणे करायचे ते करायला मी आणि तथास्तू समर्थ आहोत."

In reply to by मुक्त विहारि

@लोकांना मुद्दाम गहन विचार कर्रुन आणि उद्धट व अज्ञानी हलवायाने पाडलेल्या बिन केशरी जिलब्या आवडतात. ह्या निरुपद्रवी हलवायाच्या जीवनरंगी मिठाईला कोण विचारतो? >>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/smiley.gif