✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

धर्मांतरे का होतात ?

स
सचीन यांनी
Wed, 12/25/2013 - 13:42  ·  लेख
लेख
जगाच्या इतिहासात अनेक धर्मांतरे घडली आपल्या भारत भूमीत हि अनेक धर्मांतरे घडली ह्याचे काय कारण असावे? लोक धर्मांतर का करत असावेत? माणूस हा आपल्या धर्मावर प्रेम करतो.त्याचा आदर करतो. धर्माने दिलेल्या रिती परंपरा, पाळतो आपला धर्म कसा श्रेष्ठ आहे नि दुसर्याचा धर्म कसा टाकावू आहे ह्याबद्दल घसा सुकेपर्यंत चर्चा करतो वाद विवाद करतो प्रसंगी गुद्दागुद्दी हि करतो तरीही धर्मांतरे का होतात?. धर्माबद्दल काही बोलले शंका घेतल्या कि माणूस रागावतो उत्तरादाखल दुसऱ्या धर्मातील चुका दाखवतो. काहीना आपला धर्म हा प्राचीन वाटतो काही जणांना तर तो माणसाने निर्माण केलाय असे वाटतच नाही. एरवी सामान्य असणारा माणूस धर्माच्या नावाने दंगली करायलाही मागे पुढे पाहत नाही आपला धर्म खतरे मे असे त्याला वाटू लागते नि तो दुसर्या धर्मियावर तुटून पडतो परधर्मीय बद्दल द्वेष हा त्याला स्वधर्माचा अभिमान वाटतो. धर्मावर असे अनिर्बंध प्रेम करणारा माणूस धर्मांतर का करत असावा?धार्मिक दंगलीत तळहातावर शीर घेवून लढणारे धार्मिक लोक पाहिले तर त्यांच्या धर्मप्रेमाचे आश्चर्यच वाटते पण इतके होवूनही एक प्रश्न पडतो कि धर्मावर निरतिशय प्रेम करणारा माणूस धर्मांतर का करत असावा ? धर्मांतरे का होतात ???आपल्या भारतातही अनेक धर्मांतरे झालेली आहेत त्याचे काय कारण असावे?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
36848 वाचन

💬 प्रतिसाद (164)

प्रतिक्रिया

इथे बहुतेक कोणी नाहित

अभ्या..
Wed, 12/25/2013 - 13:47 नवीन
इथे बहुतेक कोणी नाहित धर्मान्तरित. व्हा पुढे. ;-)

आपल्याच धर्मात जर बाकीचे

प्रकाश घाटपांडे
Wed, 12/25/2013 - 14:00 नवीन
आपल्याच धर्मात जर बाकीचे धर्मबांधव आपल्याला हीन व माणुसकीविहीन जगण जगायला लावत असतील तर त्यांनी धर्म का बदलू नये? हिंदु धर्मातील दलितांनी केलेली धर्मांतरे ही याच प्रकारात मोडतात. हाणुन मारुन मुसलमान हा शब्दप्रयोग सक्तीच्या धर्मांतरातून आला आहे. स्वेच्छेने केलेली धर्मांतरे देखील असतात. लाभापोटी केलेली पण असतात. धर्म बदलल्याने त्यांच्या जगण्यात फरक पडतोच असे नाही.

एका शतका नंतर लगेच दुसरी

जोशी 'ले'
Wed, 12/25/2013 - 14:03 नवीन
एका शतका नंतर लगेच दुसरी ईनींग सुरु, ऊलशीक उसंत घ्या राव

<<धागे का प्रसवतात?>>

गणपा
Wed, 12/25/2013 - 14:03 नवीन
आंजाच्या इतिहासात अनेक धागे प्रसवले गेले. आपल्या मिपाभूमीत हि अनेकजण धागे प्रसवतत असतात ह्याचे काय कारण असावे? लोक धागे का प्रसवत असावेत? धागाकर्ता हा आपल्याच धाग्यावर प्रेम करतो. त्याचा टिआरपी वाढवतो. धर्माने दिलेल्या रिती परंपरा, पाळतो आपलाच धागा कसा श्रेष्ठ आहे नि दुसर्याचा धागा कसा टाकावू आहे ह्याबद्दल घसा सुकेपर्यंत चर्चा करतो वाद विवाद करतो प्रसंगी गुद्दागुद्दी हि करतो तरीही धागे प्रसवले का जातात?. स्वत:च्या धाग्याबद्दल कुणी काही वाईट बोलले शंका घेतल्या कि माणूस रागावतो उत्तरादाखल दुसऱ्याच्या धाग्यातील चुका दाखवतो. काहीना आपला धागा हा सर्वोत्कृष्ट वाटतो काही जणांना तर तो माणसाने निर्माण केलाय असे वाटतच नाही. एरवी शांत असणारा आयडी धाग्यांच्या नावाने दंगली करायलाही मागे पुढे पाहत नाही आपला धागा खतरे मे असे त्याला वाटू लागते नि तो दुसर्या धाग्यांवर तुटून पडतो परकीयलेखना बद्दल द्वेष हा त्याला स्वलेखनाचा अभिमान वाटतो. स्वलेखनावर असे अनिर्बंध प्रेम करणारा आयडी धागे प्रसवत असावा का? जालिय दंगलीत तळहातावर शीर घेवून लढणारे आयडी पाहिले तर त्यांच्या धागाप्रेमाचे आश्चर्यच वाटते पण इतके होवूनही एक प्रश्न पडतो कि मिपावर निरतिशय प्रेम करणारा आयडी दंगा का करत असावा ? धागे का प्रवसतात ???आजही आपल्या मिपावरही अनेक धागे प्रवसले जात आहेत त्याचे काय कारण असावे?

_/\_

जोशी 'ले'
Wed, 12/25/2013 - 14:07 नवीन
_/\_
↩ प्रतिसाद: गणपा

(No subject)

प्रकाश घाटपांडे
Wed, 12/25/2013 - 14:13 नवीन
:)
↩ प्रतिसाद: गणपा

@ गणपा शेठ....

मुक्त विहारि
Wed, 12/25/2013 - 14:14 नवीन
काय राव आता तुम्ही पण.... एकूणच "मिपा=विडंबन+दंगा+निखळ मैत्री"
↩ प्रतिसाद: गणपा

=))

पैसा
Wed, 12/25/2013 - 23:28 नवीन
=)) =))=)) मेले हसून! म्हणून तू हल्ली लिहीत नाहीस काय!
↩ प्रतिसाद: गणपा

अरारा. वाईट्ट हाणलाय राव.

मृत्युन्जय
Fri, 12/27/2013 - 13:23 नवीन
अरारा. वाईट्ट हाणलाय राव.
↩ प्रतिसाद: गणपा

जबरी टोला ....

ईन्टरफेल
Fri, 12/27/2013 - 20:36 नवीन
जबरी टोला .... *biggrin* :-D :D +D =D :biggrin:
↩ प्रतिसाद: गणपा

सांगा... सांगा, येईल काय ???

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 12/25/2013 - 15:49 नवीन
संस्थळावर एखादी आयडी धागा-दंगा करते म्हणून इतरानी त्या आयडीला भरपूर प्रतिसादिक चोप दिला म्हणून त्या आयडीने आयड्यांतर केले (डूआयडी घेतली) किंवा संस्थळांतर केले तर ते धर्मांतरासारख्या शतकी धाग्याची जिल्बी पाडून चघळता येईल काय?

=))

जेपी
Wed, 12/25/2013 - 16:55 नवीन
=)) =)) =))

धर्मांतरे का होतात ?

इरसाल
Wed, 12/25/2013 - 20:10 नवीन
धर्मांतरे का होतात ? तुम्हाला असे धागे काढायला मिळावेत म्हणुन !!!! टेन्शन इल्ला....

फारच अपेक्षेने लेख उघडलेला पण

विद्युत् बालक
Wed, 12/25/2013 - 21:45 नवीन
फारच अपेक्षेने लेख उघडलेला पण काहीच मजा आली नाही ! रामू सारखी उतरती कळा लागली कि काय तुमच्या लेखनाला? तुमच्या निरागस विनोदी विडंबन साहित्याचा शेकडो चाहत्यान पैकी एक --- बालक

धरर्मांतर का करतात : उत्तर

विजुभाऊ
Wed, 12/25/2013 - 23:54 नवीन
धरर्मांतर का करतात : उत्तर अगदी सोप्पे आहे: लोकाना वेळ घालवायला नवे साधन मिळते म्हणून.

ए. आर. रेहमान

रमेश आठवले
गुरुवार, 12/26/2013 - 10:32 नवीन
ए. आर. रेहमान या ख्यातनाम संगीत दिग्दर्शकाने धर्मांतर का केले असावे ? त्यांच्या धर्मांतराची कारणे काय ? माहितगारांनी प्रकाश टाकावा.

नक्की माहीत नाही पण

चौकटराजा
गुरुवार, 12/26/2013 - 15:39 नवीन
नकी माहीत नाही पण त्याचे वडील हे ही संगीतकार होते. व त्यांच्या आजारात काही मद्त अन्य धर्माच्या लोकांकडून झाली असे वाचल्याचे आठवते.
↩ प्रतिसाद: रमेश आठवले

रहमान (पूर्वीचा दिलीप, त्याचे

राजो
Fri, 12/27/2013 - 18:10 नवीन
रहमान (पूर्वीचा दिलीप, त्याचे संगीतक्षेत्रातले मित्र अजूनही त्याला दिलीप च म्हणतात) च्या लहानपणी त्याच्या बहिणीला काही गंभीर आजार झालेला होता, सर्व डॉक्टरी उपाय संपल्यावर पूजा, प्रार्थना, जप, इ. प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर इतर धर्मातील वैद्य, मौलवी इ. चा ही आधार घेण्यात आला. या सर्वांदरम्यान या कुटंबावर इस्लाम चा प्रभाव पडला, आणि त्यांनी इस्लाम स्वीकारला संदर्भ : "ए. आर. रहमान - संगीतातील वादळ", अनुवादित पुस्तक
↩ प्रतिसाद: रमेश आठवले

प्रिटी वूमनचे धर्मांतर

सुनील
गुरुवार, 12/26/2013 - 11:04 नवीन
आमच्या आवडत्या प्रिटी वूमनचे धर्मांतर आठवले!

सोयीस्कर धर्मांतर

रमेश आठवले
गुरुवार, 12/26/2013 - 14:15 नवीन
हरयाणाच्या सरकारच्या एका विवाहित मंत्र्याने त्याच्याच धर्माच्या दुसर्या बाईशी लग्न करायचे ठरवले आणि त्यासाठी दोघांनी मुस्लिम धर्म स्वीकारला होता.

सगळ्या विषयांवर सांगोपांग

सचीन
गुरुवार, 12/26/2013 - 21:07 नवीन
सगळ्या विषयांवर सांगोपांग चर्चा करणारे विद्वान धर्मांतरा सारख्या महत्वाच्या प्रश्नावर का टोलवा टोलवी करतायत ते कळत नाही ?

टोलवा टोलवी

शेखर
गुरुवार, 12/26/2013 - 21:36 नवीन
टोलवा टोलवी ही तुम्हाला केलेली आहे. विषयाला नाही. ह्यातुन काही अर्थबोध घेतला तर बरे पडेल.
↩ प्रतिसाद: सचीन

अर्थबोध झाला फक्त सोयीचाच

सचीन
गुरुवार, 12/26/2013 - 21:51 नवीन
अर्थबोध झाला फक्त सोयीचाच काथ्याकुट होतो
↩ प्रतिसाद: शेखर

ज्जे बात!!! एकच मारा पर

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 12/26/2013 - 22:10 नवीन
ज्जे बात!!! एकच मारा पर शाॅलिड मारा.
↩ प्रतिसाद: शेखर

बरे मग?

विनायक प्रभू
गुरुवार, 12/26/2013 - 22:42 नवीन
कं प ल स री आहे का?
↩ प्रतिसाद: सचीन

ए आर रहेमानच्या आजारात

विजुभाऊ
Fri, 12/27/2013 - 02:06 नवीन
ए आर रहेमानच्या आजारात त्याच्या पालकानी कोणत्या तरी पिराला नवस केला होता. त्यामुळे नवसाची उतराई म्हणून त्यानी धर्म बदलला

पिराला नवस केला होता

अभ्या..
Fri, 12/27/2013 - 02:08 नवीन
पिराला नवस केला होता
हम्म. आम्ही पण करायला हवा. ;) पुरुषविभागासाठी.
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

नक्की क्करा..

पिलीयन रायडर
Fri, 12/27/2013 - 13:13 नवीन
नक्की क्करा.. पण आधी डिल काय ते बोला..
↩ प्रतिसाद: अभ्या..

मिस्टराना प्रवक्ते पद देऊ.

अभ्या..
Fri, 12/27/2013 - 13:17 नवीन
मिस्टराना प्रवक्ते पद देऊ. ;-)
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

थोडक्यात परत मलाच..!! जमतय..

पिलीयन रायडर
Fri, 12/27/2013 - 13:29 नवीन
थोडक्यात परत मलाच..!! जमतय.. सविस्तर डिल साठी व्यनि करा मग!
↩ प्रतिसाद: अभ्या..

हा हा हा

बॅटमॅन
Fri, 12/27/2013 - 13:13 नवीन
हा हा हा ;)
↩ प्रतिसाद: अभ्या..

आधी "धर्म"..

नाखु
Fri, 12/27/2013 - 09:50 नवीन
म्ह्णजे काय त्ये माहिति पडू दे मग पुढचं बघू.. संदर्भ : प्यारेंचा "दत्त"धागा आनि "मंदार कात्रेंच्या धाग्यावरिल विचारव्(जं)त प्रतिसाद.

आर्थिक कारणांमुळे

मारकुटे
Fri, 12/27/2013 - 12:19 नवीन
आर्थिक कारणांमुळे

धर्मांतराचं राहू देत. तुमचे

श्रीगुरुजी
Fri, 12/27/2013 - 12:31 नवीन
धर्मांतराचं राहू देत. तुमचे पवारसाहेब अनेकवेळा पक्षांतर का करतात ते सांगा पाहू.

गुरुजी बर झाले तुम्ही इथे

सचीन
Fri, 12/27/2013 - 14:09 नवीन
गुरुजी बर झाले तुम्ही इथे आलात तुम्हीच सांगा धर्मांतर का होत? का लोक एखाद्या धर्माला विटून दुसऱ्या धर्मात जातात? गुरुजी हा धर्मावरचा धागा आहेत ते पवारांचं जावू द्या. आणि काय हो उठसूट पवार, मोदी करत बसता उद्या तुम्हाला कुत्रा चावला तरी बोलाल हा पवारांनीच सोडला होता.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

का लोक एखाद्या धर्माला विटून दुसऱ्या धर्मात जातात?

नाखु
Fri, 12/27/2013 - 14:57 नवीन
का लोक एखाद्या पक्षाला विटून (पंतप्रधान न होता आल्याने) दुसऱ्या पक्षात जातात? आणि नंतर पाठींबा देवून "खाते" मिळवतात.
↩ प्रतिसाद: सचीन

गुरुजीना+१

नाखु
Fri, 12/27/2013 - 15:18 नवीन
१)स्वतःच्या धर्मातल्या लोकांकडून होणारा छळ/पीडा/अपमान/पिळवणूक इ...इ.. २)दुसर्‍या धर्माबद्दल अंधळ आकर्षण/मिळणारी हरेक स्वरुपातली प्रलोभन ३)आपल्या दुबळ्या समाजावर अत्याचार पूर्वक धर्म लादला जाणे. ४)आणी शेवट(दुसर्‍या धर्मातल्या) वैयक्तिक कुतुहला पासून ते उपासनामार्ग अवडल्यामुळे. ५) तुमच्या सार्ख्यांना धागे काढायला विषय मिळावा म्हणून..
↩ प्रतिसाद: सचीन

>>> तुम्हीच सांगा धर्मांतर का

श्रीगुरुजी
Sat, 12/28/2013 - 14:13 नवीन
>>> तुम्हीच सांगा धर्मांतर का होत? का लोक एखाद्या धर्माला विटून दुसऱ्या धर्मात जातात? ज्या उच्च नीतिमूल्यांसाठी व तात्विक भूमिकेतून पवारसाहेबांनी १९७८ साली पक्षांतर केले त्याच कारणातून धर्मांतर होते. ज्या देशहिताच्या कारणांमुळे पवारसाहेब काँग्रेसला विटून दुसर्‍या पक्षात गेले त्याच कारणांमुळे लोक एखाद्या धर्माला विटून दुसर्‍या धर्मात जातात. >>> उद्या तुम्हाला कुत्रा चावला तरी बोलाल हा पवारांनीच सोडला होता. छे. आम्ही असं कशाला म्हणू. अहो, कुत्र्याचं पिल्लू गाडीखाली आम्हाला वाईट वाटतं. मग आम्ही असा आरोप कसा करणार?
↩ प्रतिसाद: सचीन

ज्या धर्मात आपमतलबी ,स्वार्थी

ग्रेटथिन्कर
Sat, 12/28/2013 - 18:26 नवीन
ज्या धर्मात आपमतलबी ,स्वार्थी, रक्तपिपासु ,लोकांकडे धर्मसत्ता असते, असा धर्म लोक सोडून देतात अथवा असल्या फालतु धर्माचा अभिमान वगैरे बाळगत नाहीत.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

त्याबराबर ज्या धर्मात आपमतलबी

गब्रिएल
Sat, 12/28/2013 - 18:34 नवीन
त्याबराबर ज्या धर्मात आपमतलबी ,स्वार्थी, रक्तपिपासु ,लोकांकडे धर्मसत्ता असते त्यांचा धर्म दूसर्‍यांवर लादला जान्याचि जास्त उदाहारण जगात आहेत... आणि अश्या धरमाच्या कडे धर्मांध भाट-चरनान्ची मोठी फौजपन असते नायका?
↩ प्रतिसाद: ग्रेटथिन्कर

उलट सांगत आहात, असा आपमतलबी

ग्रेटथिन्कर
Sat, 12/28/2013 - 20:21 नवीन
उलट सांगत आहात, असा आपमतलबी धर्म एका ठराविक प्रदेशात सिमित होऊन जातो आणि त्यातले लोक मोठ्या संख्येने अशा डबकेरुपी धर्माचा त्याग करतात, मग त्या धरमातल्या आपमतलबी लोकांना धर्मातराची चिंता करावी लागते .'शुद्ध करुन धर्मात घेतो' वगैरे फुटकळ अमिषे दाखववी लागतात, पण त्यांना कुणी भीक घालत नाहि. (मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मातली तत्वे आवडणारा आणि विचारांनी बुद्धीष्ट असणारा परंतू कागदोपत्री हिंदू -ग्रेटथिन्कर )
↩ प्रतिसाद: गब्रिएल

आयला, ग्रेट थिंकर लोकान्लाबी

गब्रिएल
Sat, 12/28/2013 - 21:05 नवीन
आयला, ग्रेट थिंकर लोकान्लाबी "आब्यास वाडवा", "इतिहास वाचा" अगर "आजूबाजूला बगा, पेपरं वाचा, त्ये खांद्याव का मानेच्या वर काय असतय ते वापरा" असा सांगायच दिवस आले... लोकं नावालाबी जागायची बंद झाल्यावर अजून काय व्हनार !!! पन ईनोद बरा व्हता. लईच कर्म्णुक करून ह्राय्ले रावसाय्ब Image removed. Image removed. Image removed.
↩ प्रतिसाद: ग्रेटथिन्कर

(मुस्लिम आणि ख्रिश्चन

arunjoshi123
Sat, 12/28/2013 - 21:51 नवीन
(मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मातली तत्वे आवडणारा आणि विचारांनी बुद्धीष्ट असणारा परंतू कागदोपत्री हिंदू -ग्रेटथिन्कर )
सम्यक बुद्धीने असे असेल तर फार चांगली गोष्ट आहे. हिंदू धर्मावर ३६० डिग्री द्वेष मात्र नसावा. हिंदू धर्मातही बरंच त्याज्य असं काही आहे, ते वजा जाता बाकी गोष्टींवर प्रेम असायला हवं. ते नसेल तर वाईट बापामुळे दुखावलेले मूल कूटूंबाचा तिरस्कार करू लागते त्यातला प्रकार होईल. लोकशाहीने ६०-७० वर्षांतच लोकांच्या आशा आकांक्षांवर पाणी फेरले आहे. इस्लाम व ख्रिश्चन धर्म त्यामानाने नवे आहेत. ते इतके भ्रष्ट झालेले नाहीत. हिंदू धर्म फारच जूना आहे आणि आज तर पूर्णतः रसातळाला गेला आहे. पण सरासरी काढली तर जुन्या एका काळात हिंदू धर्माने भारतीय उपमहाद्वीपात बरेच चांगले जीवनमान दिले होते हे नाकारू नये. बाय द वे, ख्रिश्चनांचे व मुसलमानांचे अंतर्गत वर्तन फार चांगले आहे असे मानून चाललो तरी त्यांचे इतर धर्मांशी वर्तन हिंदूंपेक्षा खालच्या दर्जाचे होते हे वादातीत आहे.
↩ प्रतिसाद: ग्रेटथिन्कर

सहमत

ग्रेटथिन्कर
Sat, 12/28/2013 - 23:13 नवीन
सहमत
↩ प्रतिसाद: arunjoshi123

बाय द वे, ख्रिश्चनांचे व

टवाळ कार्टा
Sat, 12/28/2013 - 23:14 नवीन
बाय द वे, ख्रिश्चनांचे व मुसलमानांचे अंतर्गत वर्तन फार चांगले आहे असे मानून चाललो तरी त्यांचे इतर धर्मांशी वर्तन हिंदूंपेक्षा खालच्या दर्जाचे होते हे वादातीत आहे.
आता बघु काय उत्तर येते :)
↩ प्रतिसाद: arunjoshi123

>> ख्रिश्चनांचे व मुसलमानांचे

मारकुटे
Sun, 12/29/2013 - 13:00 नवीन
>> ख्रिश्चनांचे व मुसलमानांचे अंतर्गत वर्तन फार चांगले आहे असे मानून चाललो शिया सुन्नी भाई भाई कॅथोलिक प्रोटेस्टंट हॅलो ब्रदर जावू द्या छप्परबंद मुस्लिमांचं काय? अरे कोण म्हण्तो तिक्डे त्यांच काढू नका.. तुमचं काय ते बोला... ओके अय माय स्वारी.... हिंदू तेव्ढे खराब बाकी सगळॅ छान... खुष ? अरे खुष? काय करावं या विचारवंतांना ... सदैव एरंडाचे तेल प्यायलेले.. हसत पण नाहीत.
↩ प्रतिसाद: arunjoshi123

....ग्रेट.....ग्रेटर.....ग्रेटेस्टथिन्कर......शाब्बाश......????

विनोद१८
Sat, 12/28/2013 - 23:20 नवीन
उलट सांगत आहात, असा आपमतलबी धर्म एका ठराविक प्रदेशात सिमित होऊन जातो आणि त्यातले लोक मोठ्या संख्येने अशा डबकेरुपी धर्माचा त्याग करतात, मग त्या धरमातल्या आपमतलबी लोकांना धर्मातराची चिंता करावी लागते .'शुद्ध करुन धर्मात घेतो' वगैरे फुटकळ अमिषे दाखववी लागतात, पण त्यांना कुणी भीक घालत नाहि.
अरे बाबा दुसर्‍याला भीक घालण्यासाठी मुळात आप्ल्याकदे काहीतली ?? असावे लागते, ते जर मुळातच नसेल भीक कसली घाल्णार आपण ?? आपला सगळाच नन्नाचा पाढा दिसतोय, एकुणच सगळा आनन्दी आनन्द. यालाच म्हणतात 'आडातच नाही तर पोहर्‍यात कुठुन येणार' (मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मातली तत्वे आवडणारा आणि विचारांनी बुद्धीष्ट असणारा परंतू कागदोपत्री हिंदू म्हणजेच एक ना धड.. असा धेडगुजरी- *fool* ग्रेटथिन्कर *fool* ) ( आपले मत अधर्मनिरपेक्ष, कुपुरोगामी, आदर्श देश-लुटारु व सर्वकालीन सर्वात महाभ्रष्ट पक्षालाच द्या - असा जीवाचा आटापिटा करून टाहो न फोडणारा ) विनोद१८
↩ प्रतिसाद: ग्रेटथिन्कर

>>> उलट सांगत आहात, असा

श्रीगुरुजी
Sun, 12/29/2013 - 13:12 नवीन
>>> उलट सांगत आहात, असा आपमतलबी धर्म एका ठराविक प्रदेशात सिमित होऊन जातो आणि त्यातले लोक मोठ्या संख्येने अशा डबकेरुपी धर्माचा त्याग करतात, मग त्या धरमातल्या आपमतलबी लोकांना धर्मातराची चिंता करावी लागते .'शुद्ध करुन धर्मात घेतो' वगैरे फुटकळ अमिषे दाखववी लागतात, पण त्यांना कुणी भीक घालत नाहि. गर्व से कहो हम हिंदू है! >>> आपले मत धर्मनिरपेक्ष ,पुरोगामी पक्षालाच द्या ताकाला जाऊन भांडे कशाला लपविता? सरळ स्पष्ट शब्दात सांगा ना की आपले मत 'भाजप'लाच द्या म्हणून.
↩ प्रतिसाद: ग्रेटथिन्कर

भाजप हा धर्मनिरपेक्ष पक्ष

ग्रेटथिन्कर
Sun, 12/29/2013 - 13:37 नवीन
भाजप हा धर्मनिरपेक्ष पक्ष नाही आणि हिंदुत्ववादी तर आजिबातच नाही. खरा हिंदुत्ववादी पक्ष काँग्रेस आहे ,मुस्लिमांना गाफिल ठेवून काँग्रेसने खरी सत्ता आजपर्यंत हिंदुच्याच ताब्यात ठेवली आहे.राज्यात दलित मते तीन दशके मिळवून दलितांना एकही पद दिले नाही ,तसे.. आजपर्यत एकही काँग्रेसी पीएम मुस्लिम नव्हता...या उलट फेकू गुजरातमध्ये मुस्लिमांचे भले केले' असे सांगत फिरत आहे. उद्या हेच मुस्लिम हिंदूंच्या उरावर बसले तर पून्हा काँग्रेसकडे बोट दाखवायला आपण मोकळे ..कसे? जिथपर्यंत भारतातले पक्ष विचारकरुन थांबतात, तिथुन पुढे काँग्रेस विचार करायला सुरवात करते... आताही आप'ला Expose होताना आपण पहालच.खरी चाणक्यनिती काँग्रेसकडेच आहे.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

+१

अर्धवटराव
Sun, 12/29/2013 - 13:58 नवीन
प्रतिसाद आवडला. >>जिथपर्यंत भारतातले पक्ष विचारकरुन थांबतात, तिथुन पुढे काँग्रेस विचार करायला सुरवात करते... -- अगदी खरं. गेल्या दोन दशकात भाजप काँग्रेसकडुन बरेच राजकारण शिकला पण अजुनही मोठा पल्ला गाठायचा आहे. शिवाय आता काँग्रेसमधे जनमानसाचा ठाव घेणारे मुरलेले राजकारणी कमि झालेत... किंबहुना गांधी घराण्याच्या निष्ठेपायी त्यांना डेव्हलप होऊ दिलं गेलं नाहि. राहुल गांधी सध्या काँग्रेसची साफसफाई करण्यावर भर देताहेत. त्यांनी प्रस्थापीत नेत्यांच्या वारसदारांना भाव न देता जर पवारांसारखे सल्लागार निवडले तर काँग्रेस परत आपला बेस कमवेल.
↩ प्रतिसाद: ग्रेटथिन्कर
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा