Skip to main content

राजकीय चेटकीशोध अर्थात पॉलीटीकल विच हंटींग

लेखक विकास यांनी शुक्रवार, 27/12/2013 02:13 या दिवशी प्रकाशित केले.
​आज मोदींच्या विरोधात पुन्हा चालू केला गेलेला खटला झकीया जाफरी आणि त्यांच्या बोलवित्या धनी मोदी विरोधक टिस्टा सेटलवाड (आणि पार्टी) परत एकदा हरल्या... अर्थात त्यांनी परत जाहीर केले आहे की आम्ही हा लढा चालूच ठेवू. जे झकीया जाफरींच्या बरोबर वैयक्तीक आयुष्यात झाले ते दुर्दैवी होते, अक्षम्य कृत्य होते. पण त्यांच्या आणि तशाच इतरांच्या भावनांशी खेळ करत जे काही टिस्टा सेटलवाड आणि त्यांच्या समाजवादी/डाव्या/स्युडोसेक्यूलर्सनी गेले १०+ वर्षे चालवले ते त्याहूनही अक्षम्य आहे असे वाटते. यात मोदी बरोबर का चूक, आदर्श का अजून काही हे माझ्या दृष्टीने अत्यंत मामूली आहे. पण त्यांच्या (टीस्टा आणि पार्टीच्या) ह्या द्वेष आणि भडक विचार-प्रचाराने समाजात दुफळी माजत गेली हे कटू सत्य आहे. मात्र, कोर्टाने आज स्पष्ट केले आहे, याला genocide/pogram वगैरे म्हणणे बरोबर ठरणार नाही, जे शब्द सातत्याने या स्युडोसेक्यूलर्सनी वापरले आहेत... याला इंग्रजीत शब्द प्रयोग केला जातो: पॉलीटीकल विचहंटीग. कुणालाही चेटकी आहे असा समज करण्याचा प्रयत्न... अंधश्रद्धेतील भूताखेताइतकेच किंबहूना त्याहूनही अधिक भिषण असे हे कृत्य आहे. दुर्दैव असे की त्याला अनेक चांगले, बुद्धीवादी त्यांच्यातील बौद्धीक अहंकाराने, कुठेतरी डावेपणाचे आकर्षण (अथवा डावी प्रवृत्ती) आणि धार्मिकतेस असलेला एकंदरीत विरोध यातून असा अप्रामाणिकपणा घडतो... या विचहंटींगचा त्रास केवळ मोदी-भाजपा-संघ इतकाच मर्यादीत नव्हता. मोदींना व्हिसा नाकारा म्हणून आरडाओरड करत भारतीयांमधील फूट अमेरीकेस स्पष्टपणे दाखवणार्‍यांना एक समजले नाही की आता तो आत्मविश्वास अमेरीका इतरत्रही वापरू शकते. आज खोब्रागडेंच्या बाबतीत जे काही झाले आहे ती केवळ पुढची पायरी आहे. मोदींचा व्हिसा आणि खोब्रागडे याच्या मधे अजून एक घटना घडली होती. अमेरीकन नागरीक असलेल्या, गोल्डमन सॅक्सच्या उपाध्यक्ष, गुगल फाउंडेशनच्या ग्लोबल डेव्हलपमेंट इनिशिएटीव्हच्या प्रमुख असलेल्या सोनल शहांना नव्याने अध्यक्ष झालेल्या ओबामांना चांगले पद देऊन कॅबिनेट मधे घेयचे होते. पण परत या मोदी विरोधक डाव्या समाजवाद्यांनी हल्लाबोल केला. ओबामाने पूर्ण माघार घेतली नाही, पण सोनल शहांवर अन्याय होयचा तो झालाच. त्यांचा अपराध काय होता? तर त्या विश्व हिंदू परीषद ऑफ अमेरीका या अमेरीकन कायद्यानुसार आजही अधिकृत नोंदणी असलेल्या संस्थेत, त्या त्यावेळेस तरूण कार्यकर्ती म्हणून काम करत होत्या आणि त्यावेळेस, म्हणजे गुजरातच्या २००१ च्या भूज भूकंपाच्या वेळेस त्यांनी अमेरीकेत मदतनिधी गोळा केला होता आणि तेथे सेवाभावी संस्थांना पाठवला होता.... मला गंमत वाटते, हे डावे कम्युनिस्ट समाजवादी स्वतः मात्र अमेरीकेत राहतात! त्या व्यतिरीक्त ज्या गोष्टी आता खोट्या ठरल्या आहेत, त्या खर्‍याच आहे असे खोट्या आचारांनी दाखवून ते अनेक ठिकाणी छापून ठेवले आहे. त्यावर टिपिकल डाव्या पद्धतीने पुस्तके, पेपर्स, रीपोर्ट्स तयार केले गेले आहेत आणि तुमच्या-माझ्या सारख्या मध्यमवर्गीय बुद्धीवाद्यांचे ब्रेनवॉशिंग करायला वापरले गेले आहेत.
_______________

अधिक माहीती:

या निमित्ताने किती गोष्टी गेल्या दहा वर्षात मोदी विरोधात केल्या गेल्या हे बघण्यासारखे आहे...
  1. सर्व प्रथम दंगल झाली तेंव्हा मोदी हे सत्तेत येऊन केवळ दोनच महीने झाले होते.
  2. दंगल चालू होताच त्यांनी या संदर्भातील नेहमीच्या पद्धतीप्रमाणे, गुजरात सीमेलगतच्या सर्व राज्यांना (महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान) या राज्यांना कायदासुव्यवस्थेसाठी मदत मागितली होती. काँग्रेसच्या राज्यांनी - महाराष्ट्र (मुख्यमंत्री विलासराव देशमुख) राजस्थान आणि मध्यप्रदेश (मुख्यमंत्री दिग्विजय सिंग) यांनी मदत देण्याचे नाकारले अथवा टाळले. दुरूस्ती: फक्त महाराष्ट्र सरकारने (विलासराव देशमुख, मुख्यमंत्री) राज्यसुरक्षादलाच्या दोन तुकड्या मदतीसाठी पाठवल्या होत्या.
  3. गोध्रा मध्ये २७ फेब्रुवारी २००२ ला गाडी जाळण्यात आली, दुसर्‍या दिवशी धार्मिक दंगलीस सुरवात झाली. त्याच दिवशी म्हणजे २८ फेब्रुवारीस गुलबर्ग सोसायटी हिंसाचार घडला. परीस्थिती राज्यसरकारच्या हाताबाहेर जात आहे, हे पाहून त्याच दिवशी केंद्राकडे लष्करी मदतीसाठी मदत मागितली गेली. पण अहमदाबदेत स्थानिक लष्करी तळ नसल्याने, सर्व पूर्ण होऊन लष्कर तैनात होईस्तोवर एक मार्च म्हणजे पुढचा दिवस लागला.
  4. एसआयटी स्थापण्याआधी शहा-नानावटी आयोग नेमण्यात आला आणि त्यातले निष्कर्ष हे काँग्रेस आणि टिस्टा सेटलवाड पार्टीस पटले नाहीत कारण तो आयोग भाजपाच्या राजवटीने स्थापला होता.
  5. मग लालू प्रसाद यादव यांनी रेल्वेमंत्रीपद मिळताच - सुप्रिम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली अजून एक आयोग स्थापला. त्या आयोगाने रेल्वेमधे घातपात नसून अपघात झाला असे जाहीर केले. (नानावटी कमिशनने उलट सांगितले होते). त्याला, त्यात वाचलेल्या एका अपघात/घातपात ग्रस्त व्यक्तीने गुजरात हायकोर्टाने आव्हान दिले. लालूच्या अख्त्यारीतील रेल्वे मंत्रालयाने, "असे आव्हान देण्याचा हक्क त्या व्यक्तीस नाही," म्हणून याचना केली, जी कोर्टाने फेटाळली आणि पुढे जाऊन, "संपूर्ण बॅनर्जी आयोगच बेकायदेशीर आहे," असा निष्कर्ष काढला. युपिएच्या केंद्रसरकारने त्याला सुप्रिम कोर्टात आव्हान दिले नाही, याचा अर्थ त्यांना हा निर्णय मान्य होता. त्यामुळे हा अधिकृतपणे संसदेच्या पटलावर ठेवलाच गेला नाही/ ठेवू शकले नाहीत. तरी या संदर्भात राहून राहून आश्चर्य वाटते की आपण एका पोटेन्शिअली बेकायदेशीर आयोगावर काम करत आहोत हे एका सुप्रिम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधिशाला कळले देखील नाही? का दुर्लक्ष केले?
  6. त्यानंतर २००९ मध्ये सुप्रिम कोर्टाने स्वतंत्ररीत्या एसआयटी स्थापली. त्यांच्या निष्कर्षानुसार मोदींचा यात कट नव्हता हा भाग तर होताच पण टिस्टा सेटलवाड यांनी "cooking up macabre tales of killings" केले असा निष्कर्ष काढला.
  7. या सर्व काळात आणि नंतर ही दंगल पूर्ण आटोक्यात आणे पर्यंत अक्षम्य हिंसाचार झाला. पण त्याला मग तितकेच किंबहूना त्याहूनही अधिक अक्षम्य रंग लावले गेले. भडकपणा टाळण्यासाठी ते येथे लिहीत नाही... पण सुप्रिम कोर्टाने स्थापलेल्या स्पेशल इन्व्हेस्स्टीगेशन टिम (एसआयटी) ने छाननी केल्यावर त्यात काही तथ्य आढळले नाही. ते धादांत खोटे आरोप होते असा एस आय टी चा निष्कर्ष झाला.
  8. एसआयटी साठी अजून एक कारण होते ते म्हणजे आय पी एस ऑफिसर संजीव भट्ट यांचे विधान की दंगल मोदींच्या आदेशाने झाली. पण चौकशी करताना लक्षात काय आले? दंगलींच्या संदर्भातील त्या बैठकींना स्वतः भट्ट उपस्थितच नव्हते आणि हवे ते काम / जबाबदारी न मिळाल्याने ते मोदी सरकारवर नाराज (disgruntled employee) आहेत/होते.
  9. अजून एक नीचांकः मोदींच्या नावावर सर्वप्रथम टाईम्स ऑफ इंडीयाने आणि नंतर तमाम वृत्तपत्रांनी, ते "‘every action has an equal and opposite reaction’ - “Har kriya ki pratikriya hoti hai” असे म्हणाल्याचे प्रसिद्ध केले आणि त्यांच्यावर तुटून पडले. मात्र एसआयटीच्या म्हणण्याप्रमाणे ते तसे बोललेच नव्हते, त्यांचे मूळ म्हणणे, " "Every action causing an equal and opposite reaction. I don't want action, neither do I want any reaction." हे अर्धवट तोडून त्याचा गैरवापर केला गेला. कोणी केला अर्थातच परत टिस्टा सेटलवाड आणि पार्टीने.
  10. (टिव्हीवर ऐकल्याप्रमाणे) मोदी हे एकमेव मुख्यमंत्री आहेत ज्यांनी स्वतःस चौकशीसाठी हवाली (submit) केले होते. एस आय टी समोर ते स्वतः (वकील नाही) ९ तास बसून प्रश्नांना सामोरे गेले. असे कुठल्याच दंगलींच्या संदर्भात कधी झालेले नाही. ना मुख्यमंत्री ना पंजाब दंगलीच्या वेळेस पंतप्रधान राजीव गांधी....
असो.

वाचने 44171
प्रतिक्रिया 147

प्रतिक्रिया

तुम्ही भाजप, मोदी समर्थक असल्यानं तुमचं म्हणणं खरं आहे की नाही हे समजून घेण्याची आम्हाला गरज नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे खटखटवू. आमचा लढा सुरु राहीलच. - 'लेफ्ट' हॅण्डर स-माजवादी प्यारे

झोपलेल्यांना जागे करता येते, पण झोपेचे सोंग घेतल्याना जागे कसे करणार? वक्तिश मला मोदी पंतप्रधान झालेले बघायला आवडेल (पण पूर्ण बहुमत मिळूनच)

उच्च न्यायालय अथवा सर्वोच्च न्यायालय कुठलिही याचिका केवळ अर्ज केला गेला आहे म्हणून दाखल करून घेत नसते. त्यात प्राथमिक पातळीवर तथ्य असल्यासच दाखल करून घेतली जाते. अंतिम निकाल लागण्यापर्यंत अनेक घटक महत्वाची भूमिका पार पाडतात. वादी व प्रतिवादी उपलब्ध साक्षी पुराव्यांच्या आधारे काय सिद्ध करू शकतात यावर न्यायालयाचा निकाल ठरतो. या प्रकरणावर मी येथे पूर्वी लिहिले आहे; त्याची पुनरावृत्ती टाळतो. या धाग्यावर आणखी एक महत्वाचा मुद्दा मांडला गेला होता की या सर्व (प्रस्तुत धाग्यात उल्लेखलेल्या) प्रकारांचा (मतांच्या ध्रुवीकरणाद्वारे) राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी झाला किंबहूना अजूनही होत आहे; असे असल्यास बळी गेल्याचा आव आणणे पटत नाही.

मोदिंचं कितीही वकिलपत्र तुम्ही घेतलं तरिही त्यांची डाळ शिजणार नाहि. इथे मिपावर देखील अनेक मोदिभक्त आहेत जे सार्कास्टिकली काँग्रेसला पाठिंबा दाखवतात पण अ‍ॅक्च्युली मोदिंचा प्रचार करतात. येत्या निवडणुकीत राहुलजींची यंग ब्रिगेड मोदिंना धुळ चाटायला लावेल यात शंका नाहि. धागा अत्यंत बाळबोध वाटला. कोर्ट वगैरे सर्व मॅनेज केलय मोदिंनी. टिस्टाबाईंसारख्या सत्यासाठि झटणार्‍या व्यक्तिंना असल्या न्यायालयीन पुराव्यांची गरज नसते. त्या स्वयंभू सत्य आहेत. काय तर म्हणे मोदि स्वतः आयोगाला सामोरे गेले... राजीव गांधींकडे तेव्हढेच उद्योग होते काय आयोगाला सामोरे जायला? आता लालूजी देखील जेलच्या बाहेर आले आहेत. धर्मांध शक्तींना रोखण्याचा विडा उचलला आहे त्यांनी. भूतपूर्व रेलमंत्री म्हणुन खरं तर त्यांच्याच अध्यक्षतेखाली आयोग नेमायला हवा होता.. म्हणजे सत्य समोर आले असते. असो. भारतीय मतदार सूज्ञ आहेत.. आणि मिपाकर देखील.

In reply to by अर्धवटराव

सहमत यासाठि तिस्तांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत आणि मिपाकर त्यांना न्याय देतील.

मोदींचा पंतप्रधानपदाकडे जाणार्‍या वाटेतला एक मोठा अडसर दूर झाला. अजून बरेच अडथळे आहेत. आणि दूरची मजल आहे. पण अकारण फासिस्ट, हिटलर, वंशच्छेदी वगैरे शेलक्या विशेषणाने ह्या कर्तबगार माणसाची केली जाणारी निंदानालस्ती थांबावी अशी अपेक्षा. काँग्रेसने ब्राह्मणांच्या, शिखांच्या डूख धरुन कत्तली केल्या पण त्या कुणाला फार खटकल्या नाहीत. काँग्रेसवर कुणी हिटलरगिरी, जेनोसाईड (वंशच्छेद) वगैरे आरोप करत नाहीत. मात्र मुस्लिमांविरुद्ध कुणी काही केले असा संशय आला तरी त्याविरुद्ध रान उठवुन माणूस आयुष्यातून उठवायचा प्रयत्न केला जातो. हे दुटप्पी धोरण का हे मला न उलगडलेले कोडे आहे. बघू या इथले नेहमीचे काँग्रेसी ह्या घटनेची कशी प्रतिक्रिया देतात ते. मोदी, गुजराथमधील दंगली आणि त्याविरुद्ध केलेल्या कारवायांची, तपासाची, खटल्यांची जंत्री मुद्देसूदपणे प्रसिद्ध केल्याबद्दल विकासरावांचे आभार.

लेख आवडला....धन्यवाद...

तिस्ता सेटलवाड मुझफ्फरनगर मधील जाटांच्या कत्तलीबद्दल काय करत आहेत आता?

In reply to by सचीन

मंग तुमी करा की राव.. तुमच्यासारखे पुरोगामी-ओरिगामी सामाजिक जाण असलेले लोक हिते रतीब घालण्यापेक्षा त्या लोकांना मदत करतील तर बरं.. नाय का ?

In reply to by पैसा

सबरंग हे टिस्ता सेटलवाडचे पब्लीकेशन. दंगलग्रस्तांसाठी जमा केलेले पैसे त्यांना मिळायच्या ऐवजी तेथे आणि तिस्ताच्या बाकी संघटनेत आणि पगारात जात होते अशी तक्रार आहे. त्यात तथ्य आहे का माहीत नाही. पण वार्षिक पेपर्स फाईल न केल्या मुळे Ministry of Corporate Affairs कडून तुर्तास चौकशी करणे चालू झाले आहे

Ministry of Corporate Affairs taking legal action against Teesta Setalvad's company by dharma next


अभिनंदन, विकासराव. मोदींचा मी समर्थक नाही. पण त्यांनी केलेले चांगले काम हे चांगलेच म्हणायला हवे. त्यांच्यातल्या गुणांचा उपयोग या देशाला होत असेल तर तो करुन घेतला पाहिजे. इंदिराजींवरही अनेक आरोप केले गेले. ते कधी सिद्ध झाले नाहीत. त्यांच्यातल्या धडाडीचा देशाला उपयोग झाला. निपक्षपातीपणे विचार करता येणे हे बहुसंख्य भारतीयांना कोणीतरी शिकवणे जरुरी आहे.

मला एक कळत नाही जातीय / धार्मिक दंगली काय फक्त गुजरातेत झाल्या काय? महाराष्ट्र, दिल्ली, पंजाब, काश्मीर, उत्तर प्रदेश इथल्या दंगलींचे काय? काश्मीरमधुन विस्थापित झालेल्या लाखाहुन अधिक काश्मीर पंडितांचे काय? त्यांची जी पद्धतशीरपणे हकालपट्टी झाली, दहशत माजवली गेली ती गुजरातपेक्षा खुपच भयानक होती. इथे नक्की कुठल्या गोष्टीचा विपर्यास केला जातो आहे ते कळत नाही. "मुस्लिमांना वेचुन मारा " अशी जोपर्यंत मोदींनी आज्ञा केली नसेल तोवर ते कसे काय दोषी ठरतात? यापेक्षा जहाल भाषेत वक्तव्ये आणि कॄती ठाकर्‍यांनी केली नव्हती काय? आणि तरीही त्यांना काही शिक्षा झाली नाही मग मोदी दोषी कसे? राजीव गांधींनीही इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शीख शिरकाणासंदर्भात सूचक वक्तव्ये केली होती त्याबद्दल काय? महात्मा गांधींच्या हत्येनंतर ब्राह्म्णांची घरे जाळली गेली आणि त्यात नंतर मुख्यमंत्री झालेले एक दिग्गज गाढव नेते पण सहभागी होते. त्यांच्यावर तर खटलाही दाखल झाला नाही. असो.

आम्च्या हाकेला ओ देवून आले एकदाचे.. "हाता"वर "घड्याळ" आणि डोळे(डोके)बंद सचीनचा पंखा नाद्खुळा

In reply to by नाखु

दिल्लीत केजरीवाल आले आणि मोदींची मिडीया पब्लिसीटी गायब झाली.. छान, योग्य वेळी केजरीवाल यांच्या प्रतिमेने आणि चांगल्या नेतृत्वाने मोदीला निप्रभ केले...

In reply to by ग्रेटथिन्कर

अभिनंदन! जे पप्पूला रात्रंदिवस मेहनत करून जमलं नाही, ते केजरीवालांनी करून दाखवलं. पुन्हा एकदा त्रिवार अभिनंदन!

कुणाला पटो न पटो. आवडो न आवडो. पण मोदींना गोध्राचे ओझे कायमचेच वागवीत रहावे लागणार आहे. जसे गांधींना ५५ कोटींचे आणि नेहेरूंना कश्मिरचे ओझे वागवीत रहावे लागत आहे. यात खरे-खोटे, योग्य-अयोग्य याचा काहीही संबंध नाही.

In reply to by सुनील

माझ्या मते गोध्राचे ओझे मोदींपेक्षा विचारवंतच वाहत आहेत. सर्वसामान्य जनता बाबरी विसरली, मुंबै स्फोट दंगे, गोध्रा गुजरात सर्व काही विसरली आहे. रोजच्या महागाई, टंचाईपुढे भुतकाळ आठवून वेचून वेचून आसवं गाळायला वेळ कुठे ? विचारवंतांचे तसे नसते, हेच करायला त्यांना पैसे मिळतात.

In reply to by सुनील

कुणाला पटो न पटो. आवडो न आवडो. पण मोदींना गोध्राचे ओझे कायमचेच वागवीत रहावे लागणार आहे. सहमत. पण त्यातील कारण वेगळे आहे... उदाहरणादाखल ३ दंगली घेऊयात जेथे ३ मुख्यमंत्री हे त्या दंगली तात्काळ आटोक्यात आणण्यास कमी पडले. मुंबईची १९९३ ची दंगल, गोध्रा प्रकरणानंतरची २००२ ची गुजरात दंगल आणि गेल्या काही महीन्यांपूर्वी झालेली उत्तर प्रदेशातील - मुझफ्फूरनगरची दंगल. तिन्ही मधे नेतृत्व कमी पडले. पण मोदींचे राक्षसीकरण केले गेले. जसे गांधींना ५५ कोटींचे आणि नेहेरूंना कश्मिरचे ओझे वागवीत रहावे लागत आहे. ५५ कोटी पाकीस्तानला द्यावेत हा गांधीजींचा आग्रह होता हे वास्तव आहे. नथुरामने ते त्यांच्या उपोषणाला जोडले ह्याला ठोस पुरावा नाही. काश्मीरचा प्रश्न युएन मधे नेण्याचे श्रेय/अपश्रेय नेहरूंकडे जाते. तेच सार्वमतासंदर्भात... या दोन्हीचे अनेक संदर्भ आहेत पण येथे विषयांतर टाळत आहे. हवे असल्यास खरडूयात अथवा वेगळी चर्चा करूयात. फरक नेहरू-गांधींवर काश्मीर-५५ कोटींबद्दल टिका करणे योग्य का अयोग्य ह्यात दुमत होऊ शकेल. पण त्यामुळे गांधीवाद्यांचे अथवा गांधीवादाचे राक्षसीकरण केले गेले नाही. कुठल्याही विचारधारेला आवडणे-नावडणे, त्यावरील वैचारीक टिका सगळे समजू शकते. गांधीवादावर टिका करणार्‍या विचारवंतांनी आणि राजकीय नेत्यांनी कधी खोट्याचा आधार घेतला नाही. पण गुजरात दंगलीनंतर समाजवादी विचारवंतांनी अत्यंत खोट्याचा आधार घेतला. आणि ते मी केवळ मोदींच्या संदर्भातच म्हणत नसून ते अगदी अमेरीका-इग्लंड मधील अनिवासी भारतीयांचे देखील राक्षसीकरण केले गेले, जे कधीच सत्य ठरवता आले नाही. हे अक्षम्य आहे आणि असले दुफळी माजवणारे विचारवंत खरे राक्षस आहेत, वेगळी रुपे घेऊन पब्लीकमध्ये येतात इतकेच...

In reply to by विकास

नाही?? बरे. >>गांधीवादावर टिका करणार्‍या विचारवंतांनी आणि राजकीय नेत्यांनी कधी खोट्याचा आधार घेतला नाही. बरे. >> पण गुजरात दंगलीनंतर समाजवादी विचारवंतांनी अत्यंत खोट्याचा आधार घेतला. ब ऽ र!! (फार एक्झांपल?) --- महोदय, चष्मा तसे दिसते, इतकेच म्हणतो. तुमचा चष्मा भगव्या काचेचा आहे, असेही म्हणतो.

In reply to by आनंदी गोपाळ

महोदय, चष्मा तसे दिसते, इतकेच म्हणतो. तुमचा चष्मा भगव्या काचेचा आहे, असेही म्हणतो. सहमत. काही लोकांचा हिरवाळलेल्या लाल काचेचा असतो पण त्याला सगळ्यांनी स्वच्छ आणि बिनरंगी म्हणावे असा अट्टहास असतो इतकेच.

>>> कुणाला पटो न पटो. आवडो न आवडो. पण मोदींना गोध्राचे ओझे कायमचेच वागवीत रहावे लागणार आहे. जसे गांधींना ५५ कोटींचे आणि नेहेरूंना कश्मिरचे ओझे वागवीत रहावे लागत आहे. गांधींचा ५५ कोटी प्रकरणात व नेहरूंचा काश्मिर प्रश्नाचा विचका करण्यात प्रत्यक्ष सहभाग होता. पण गुजरात दंगलीचा डाग विनाकारण मोदींवर लावला जात आहे आणि फक्त काँग्रेसी विचारांचे निधर्मांधच हा दोषारोप करतात. सर्वसामान्य जनतेचा या आरोपांवर विश्वास नाही व न्यायालयाने अनेकवेळा त्यांना निर्दोष जाहीर केलेले आहे. पण ५५ कोटी प्रकरणात व काश्मिर प्रश्नाचा विचका करण्यामध्ये गांधी-नेहरू नव्हते असे कोणीच म्हणत नाही कारण ती वस्तुस्थिती होती. मोदी प्रकरणात मात्र गोबेल्स तंत्राने खोटा प्रचार गेले १२ वर्षे रात्रंदिवस सुरू आहे. न्यायालयात अनेकवेळा उघडे पडूनसुद्धा काँग्रेसवाले कोडगेपणाने तोच प्रचार सुरू ठेवत आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

यू प्रूव्ड माय पॉईंट ;) गांधी-५५ कोटी, नेहेरू-कश्मिर ही तुणतुणी जशी "काही" मंडळींकडून (कुठल्याही ठोस पुराव्याविना) कायमच तुणतुणवली जातात. तसेच काहीसे मोदी-गोध्रा प्रकरण आहे.

In reply to by सुनील

>>> यू प्रूव्ड माय पॉईंट गांधी-५५ कोटी, नेहेरू-कश्मिर ही तुणतुणी जशी "काही" मंडळींकडून (कुठल्याही ठोस पुराव्याविना) कायमच तुणतुणवली जातात. तसेच काहीसे मोदी-गोध्रा प्रकरण आहे. तुम्हाला माझा प्रतिसाद समजलेला नाही. पुन्हा एकदा प्रयत्न करतो. गुजरात दंगलीसाठी मोदींवर काँग्रेसकडून दोषारोप केले जातात. परंतु मोदी त्यात दोषी नाहीत हे अनेकवेळा सिद्ध झालेले आहे. पण गांधी-नेहरू प्रकरणाचे तसे नाही. काश्मिर प्रकरणाचा नेहरूंनी स्वतः विचका केला हा इतिहास आहे. तो कोणीही (काँग्रेसवाले सुद्धा) नाकारत नाहीत. ५५ कोटी प्रकरण सुद्धा गांधींमुळेच घडले हा इतिहास आहे. गांधी व नेहरू या घटनांकरता प्रत्यक्ष व्यक्तिगत जबाबदार होते. तो घडलेला इतिहास होता. त्यात खर्‍याखोट्या आरोपांचा प्रश्नच उद्भवत नाही. मोदींच्या बाबतीत मात्र कोणताही पुरावा नसताना सातत्याने खोटे आरोप केले जात आहेत, ज्या आरोपांना न्यायालयाने सुद्धा नाकारले आहे.

In reply to by सुनील

सहमत. गृहीतक आणि निष्कर्ष यातील फरक न कळल्यामुळे बर्‍याच हिंदुत्त्ववादी लोकांचा हा गोंधळ आहे, त्यात भर अज्ञानाची आणि पूर्वग्रहांची. पाकिस्तानची निर्मिती होण्यास गांधीजी पूर्णपणे कारणीभूत होते हे धादांत असत्य इतकी वर्षे या लोकांच्या माथी त्यांच्या बोलवित्या धन्यांनी मारले आहे की हे लोक स्वतंत्र आणि विचक्षण बुद्धिने विचारच करु शकत नाहीत. यामुळे आणि अनेक पूर्वग्रह आणि अज्ञान यामुळे जडित झालेल्या यांच्या बुद्धिने गांधीजी हेच केवळ फाळणीला कारणीभूत असा निर्णयसुद्धा देऊन टाकला आहे. त्यामुळे आपण म्हणतो तेच सत्य असा एक प्रलापी विभ्रम यांना होत असतो. याला उपाय एकच- सावरकरप्रणित वस्तुनिष्ठ आणि विज्ञानवादी हिंदुत्त्ववादाचे संघप्रणित सत्यापलापी, पराभूत हिंदुत्त्ववादावर आरोपण. ते हे होवू देणार नाहीत कारण ते राजकीयदृष्ट्या सोयिस्कर नाही.

In reply to by सुनील

>>> विचका केला असे "काही" लोक मानतात. परंतु तसे मानण्यास ठोस पुरावे नाहीत. काश्मिरची सध्याची दारूण अवस्था, तिथे उघडउघड होत असलेल्या भारतविरोधी कारवाया, त्या राज्याला दिली गेलेली स्वतंत्र राज्यघटना व विशेष दर्जा, तिथे व तिथून फोफावत असलेला दहशतवाद इ. गोष्टी पाहिल्या तर पाकिस्तानविरूद्ध जिंकत आलेलं युद्ध अर्धवट सोडून माऊंटबॅटनच्या सल्ल्याने काश्मिर प्रश्न यूनोत नेऊन व नंतर त्या राज्याला विशेष दर्जा देऊन त्या प्रश्नात यूनोची व ३७० व्या कलमाच्या कायमस्वरूपी पाचरी मारून ठेवून विचका केला हे उघड सत्य आहे. विचका झालेलाच नाही किंवा विचका झाला याचे पुरावे नाहीत असे तुम्हाला वाटत असेल तर पुढे बोलणंच खुंटलं.

In reply to by श्रीगुरुजी

गुरुजी उत्कृष्ठ प्रतिसाद. अहो गांधी, नेहरूच ठीक आहे हो पण मोदींवर डाग साक्षात मोदींवर डाग! ये नाही हो सक्त गुर्जी . अरेरे बिच्चारे मोदी. त्यांच्या सारख्या पुरोगामी,सत्शील,चारित्र्यवान,धर्मनिरपेक्ष, जातीय सलोखा राखण्यासाठी झटणारा समाजसुधारक इ..आणि त्याच्यावर डाग.. नही ये डाग झुटे है गुरुजी आप बराबर कहते है..

In reply to by सचीन

>>> त्यांच्या सारख्या पुरोगामी,सत्शील,चारित्र्यवान,धर्मनिरपेक्ष, जातीय सलोखा राखण्यासाठी झटणारा समाजसुधारक इ.. हे सर्व गुणविशेष त्यांच्या बाबतीत खरे आहेत, नाही का?

स्वाध्वी प्रज्ञासिंग ह्याच्या विरुध्द कोणताही पुरावा न सापडल्यामुळे त्याना निर्दोष मुक्त करण्यात येइल असे त्यात म्हटले आहे.मग इतकी वर्ष सरकार आणि तपास यत्रंणा काय झक मारत होत्या काय?

>>> स्वाध्वी प्रज्ञासिंग ह्याच्या विरुध्द कोणताही पुरावा न सापडल्यामुळे त्याना निर्दोष मुक्त करण्यात येइल असे त्यात म्हटले आहे.मग इतकी वर्ष सरकार आणि तपास यत्रंणा काय झक मारत होत्या काय? साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहित, असीमानंद व इतर ८-९ जणांविरूद्धचे आरोप पूर्ण राजकीय आरोप आहेत. त्यांच्याविरूद्ध कणभरही पुरावा नाही. ऑक्टोबर २००८ पासून हे सर्वजण तुरूंगात आहेत. आतापर्यंत महाराष्ट्र पोलिस, एटीस - १, एसआयटी, सीबीआय, एटीस - २ आणि एनआयए या सर्व तपाससंस्थांनी तपास करून कणभरही पुरावा तयार करता आलेला नाही. त्यामुळेच आजतगायत त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केलेले नाही व आरोपपत्र नसल्यामुळे खटलाच सुरू होत नाही. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बॅकफूटवर ढकलण्यासाठी हिंदू संघटनांशी संबंधित असलेल्या या लोकांवर खोटे आरोप करून त्यांना गेली ५ वर्षे डांबून ठेवण्यात आले आहे. आजतगायत त्यांना जामीन दिलेला नाही.

पण फक्त हिंदु संघटनाना दडपण्यासाठी कॉग्रेस व सेक्युलर लोकानी स्वाध्वीना खोट्या आरोपाखाली अटक करुन त्याचा छ्ळ केला.निदान आता तरी त्याना लवकर तुंरुगातुन सोडवावे.

In reply to by सचीन

कायच्या काय? त्यांनी काय लालूसारखा करोडोचा चारा खावून त्यातले चार पैसे भाट मन्ड्लिंना चारले आहेत की डोके विकून खानग्रेस समोर सपशेल शरणागति घेतलिय? का ते सुडो-सेक्युलर हाय्त??? बाजारात चार पैसे, चार मतं किम्वा निदान दम्दार पाय्चाटुपणा असा भक्कम खजिना असल्याशिवाय माय्बाप सर्कार तुरूम्गातून कस्काय सोडणार? हे काय चार खोट्या गोड शब्दाचा लेख लिहिण्याएवढं सोपय होय??? :)

In reply to by सचीन

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून दुग्धस्नान हसन मुश्रीफ कोल्हापूर: बुलडाण्यात अंगावर शाईचा अभिषेक झाल्यानंतर आमदार हसन मुश्रीफ यांचा आज दुग्धाभिषेक करण्यात आला आहे. कोल्हापुरामधील सर्किट हाऊसवर राष्ट्रवादीच्या सुमारे 200 कार्यकर्त्यांनी हसन मुश्रीम यांना दुग्धस्नान घातलं. बुलडाण्यातल्या समाधान योजना कार्यक्रमात राष्ट्रवादी अपंग सेलचा जिल्हाध्यक्ष नामदेव डोंगरदिवेने मुश्रीफ यांच्या अंगावर शाई फेकली होती. त्यानंतर त्याला अटक करुन जिल्हाध्यक्ष पदावरुन निलंबित करण्यात आलं. ही शाई उतवण्यासाठी मुश्रीम यांचा दुग्धाभिषेक करण्यात आला. हसन मुश्रीफ यांच्यावर शाई फेकली त्यानंतर आज सकाळी हसन मुश्रीफ रेल्वेने कोल्हापुरात परतले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना थेट सर्किट हाऊसवर नेलं आणि दुधाने अभिषेक केला.

In reply to by सचीन

जोपर्यंत "अखिल बगळे" (काही) पण ठोकमत चे मिपा धुरीण विचार(?)वंताबरोबर चर्चा करित नाहीत तो पर्यंत सोडता येणार नाही "हाता"वर "घड्याळ" आणि डोळे(डोके)बंद सचीन("अखिल बगळे") चा पंखा नाद्खुळा

In reply to by सचीन

आम्ही खुळे आहोत हे आपल्या सारख्या (दिड) शहाण्याना पण कळले.. पन तुम्ही (दिड्)शहाणे आहात हे सगळ्यांना पूर्ण समजेपर्यण्त आप्ले प्रयत्न चालू राहू द्यात. ==== घड्याळात वाज्ले तीन| काहिपण चेपीन्-सची$$न सची$$न||

In reply to by सचीन

आता ह्या क्षणी ते तुरुंगातून सुटले पाहिजेत तुम्ही नुसते म्हणायचा अवकाश, तात्काळ (डिसेंबर २७) ही बातमी दिसली! NIA set to drop case against Sadhvi Pragya, others arrested by MP Police

In reply to by विकास

बघा सुटल्यान तुम्ही आपले उगाच काळजी करत बसला होता. बाकी लेख झ्याक आहे. वाचून गम्मत वाटली. असेच गमतीदार लिहा .

लेख आवडला हे वेगळे सांगायलाच नको.
गोध्रा मध्ये २७ फेब्रुवारी २००२ ला गाडी जाळण्यात आली, दुसर्‍या दिवशी धार्मिक दंगलीस सुरवात झाली. त्याच दिवशी म्हणजे २८ फेब्रुवारीस गुलबर्ग सोसायटी हिंसाचार घडला. परीस्थिती राज्यसरकारच्या हाताबाहेर जात आहे, हे पाहून त्याच दिवशी केंद्राकडे लष्करी मदतीसाठी मदत मागितली गेली. पण अहमदाबदेत स्थानिक लष्करी तळ नसल्याने, सर्व पूर्ण होऊन लष्कर तैनात होईस्तोवर एक मार्च म्हणजे पुढचा दिवस लागला.
१३ डिसेंबर २००१ रोजी संसदभवनावर हल्ला झाल्यानंतर भारतीय लष्कर भारत-पाकिस्तान सीमेवर, विशेषतः काश्मीरातील एल.ओ.सी आणि परिसरात तैनात होते.त्यामुळे तिथून लष्कर काढून गुजरातमध्ये आणेपर्यंत नक्कीच वेळ गेला. २००५ मध्ये रेडिफमध्ये Did Godhra save Pakistan? हा लेख आला होता. अर्थातच २००१-०२ मध्ये भारताने पाकिस्तानवर आरामात विजय मिळविला असता असल्या कल्पना लढविणार्‍यांपैकी मी नाही.पण या लेखातील बाकीचे मुद्दे नक्कीच विचार करण्यासारखे आहेत.

In reply to by क्लिंटन

लष्कर बोलवायला विलंब व्हायचे कारण अप्रत्यक्षरित्या भाजपा केंद्रीय सरकार असे सुचवायचे आहे का इथे? संसदेसारख्या सर्वोच्च संस्थेवर पाकपुरस्कृत दहशतवादी हल्ल्याला असे आक्रमक उत्तर देणे चुकीचे होते असे आपण सूचित करत आहात का? भारतीय लष्कर इतक्या तोकड्या संख्येचे आहे का की पाकच्या सीमेवर काही दले हलवली तर अन्यत्र ते दुबळे होते? काही जास्तीची सैन्यदले अशा आणीबाणीकरता नेमलेली नसतात का? संसदेवरील हल्ल्याच्या प्रत्युत्तरामुळे सैन्यदलाची हलवाहलव झाली त्यामुळे सैन्य अहमदाबादेत पोचायला "नक्की" उशीर झाला असे आपण म्हणता ही कुठल्या पुराव्यावर आधारित वस्तुस्थिती की निव्वळ आपले मत?

In reply to by हुप्प्या

>>> भारतीय लष्कर इतक्या तोकड्या संख्येचे आहे का की पाकच्या सीमेवर काही दले हलवली तर अन्यत्र ते दुबळे होते? काही जास्तीची सैन्यदले अशा आणीबाणीकरता नेमलेली नसतात का? पाकच्या सीमेचं सोडा, २६/११ च्या रात्री ८ च्या हल्ल्यानंतर काही वेळातच दिल्लीला माहिती मिळून व पहिल्या २ तासातच घटनेचं गांभीर्य लक्षात येऊन कमांडो पाठविण्याचा निर्णय झाला होता. तरी प्रत्यक्षात ते कमांडो दिल्लीहून मुंबईला पोहोचण्यास तब्बल १५ तास लागले होते. लष्कर/कमांडो हलवाहलवी इ. ला इतका वेळ का लागतो हे एक गूढच आहे.

>>सर्व प्रथम दंगल झाली तेंव्हा मोदी हे सत्तेत येऊन केवळ दोनच महीने झाले होते. आपण गुजरात दंगलींची तुलना अनेकवेळा १९८४च्या शीख विरोधी दंगलींशी केली आहे (असे स्मरते. आत्ता मी दुवे शोधत बसलो नाही). आपल्या मोदी-दोनच महिने झाले लॉजिकने पाहिले तर राजीव गांधी पंतप्रधान होऊन एक दिवसच झाला होता (किंवा तेवढाही झाला नव्हता). बाकी चालू द्या. अवांतरः २०१४ मध्ये जर मोदी नव्यानेच पंतप्रधान झाले त्यानंतर किती काळपर्यंत अप्रिय घटना घडल्यास "ते नवीनच आहेत" हा युक्तिवाद चालू शकेल?

In reply to by नितिन थत्ते

आपण गुजरात दंगलींची तुलना अनेकवेळा १९८४च्या शीख विरोधी दंगलींशी केली आहे (असे स्मरते. आत्ता मी दुवे शोधत बसलो नाही). मान्य. दुवे शोधण्याची गरज नाही. :) आपल्या मोदी-दोनच महिने झाले लॉजिकने पाहिले तर राजीव गांधी पंतप्रधान होऊन एक दिवसच झाला होता (किंवा तेवढाही झाला नव्हता). बर्‍याचदा लोकांना ते माहीत नसते म्हणून ते लिहीले (आधीपण लिहीलेले आहे) आणि तेथेच ते संपले. पुढली सर्व विधाने क्रमांक २-९ शी त्याचा काहीच संबंध नाही. त्यात मोदींनी स्वतःला देखील चौकशी समोर बसवले हे आहे. मोदींचे "action reaction" संदर्भातील विधान हे आऊट ऑफ कॉन्टेक्स्ट कसे आहे ते कोर्टाने सांगितले हे देखील लिहीले आहे. इतर मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत काय न्याय लावले जातात आणि मोदींच्या बाबतीत काय लावले जातात हे देखील सांगून झाले. इत्यादी सर्वांबाबत आपले काय मत आहे? का फक्त "बाकी चालू द्या." इतकेच? अवांतरः २०१४ मध्ये जर मोदी नव्यानेच पंतप्रधान झाले त्यानंतर किती काळपर्यंत अप्रिय घटना घडल्यास "ते नवीनच आहेत" हा युक्तिवाद चालू शकेल? आधी देखील सांगून झाले की हा युक्तिवाद नाही. पण अनेकदा मोदी जणू काही रांगत असल्यापासूनच मुख्यमंत्री होते असा समज होतो म्हणून दिलेली माहिती होती. मोदी पंतप्रधान झाले तर (जी माझ्या दृष्टीने कमी शक्यता आहे) मग काय अप्रिय घटना होण्याची आशा बाळगणार आहात का? माझा मुद्दा हा आधी देखील अनेकदा सांगितले आहे आणि या लेखानिमित्ताने देखील सांगितला आहे की केवळ मोदींपुरताच नाही/नव्हता. ते जर चूक ठरले असते तर त्यांना सगळ्यात कडक शिक्षा न्यायालयाने द्यायला हवी. पण या दंगलीचा आणि दंगलग्रस्तांचा तथाकथीत विचारवंतांनी अतोनात गैरफायदा घेऊन सामाजीक फूट पाडली आणि जे त्यांच्या विरुद्ध आहेत त्यांना गांधीहत्येप्रमाणेच बादरायण संबंध आणि खोट्या विधानांनी गिल्ट बाय असोसिएशन तयार करून नामोशेष करण्याचा प्रयत्न केला. जे अत्यंत आक्षेपार्ह होते. त्या बद्दल आपले काही त्याच्या विरुद्ध म्हणणे असले अथवा आपण का असहमत आहात ते सांगितले तर बरे होईल.

In reply to by नितिन थत्ते

वेधलं कि लक्ष... म्हणजे, मोदिंना जे काम निपटायला दोन महिने लागले ते काम राजीवजींनी एका दिवसात केलं म्हणा कि... ह्म्म्म्म... म्हणजे, मोठा वृक्ष उन्मळून पडणार असा त्यांना दृष्टांत झाला होता काय त्यांना... आणि २०१४ मध्ये म्हणाल तर... अम्म्म्म... बघु... तसंही काँग्रेसला काहि काम राहणार नाहि... तेंव्हा ते जोपर्यंत काँग्रेस वृक्षकटाई करतील तोपर्यंत मोदिंना नाविन्य दाखवता येईल. शिवाय लालूजी वगैरे मंडळी आहेत सोबतीला... मॅड्डमला तेव्ह्ढीच सोबत लाकडं तोडायला. च्यायला... राजीवजी गेलेत कि कधिचे... शांतपणे राहुद्या ना त्यांना जिथं असतील तिथं.

In reply to by नितिन थत्ते

अवांतरः २०१४ मध्ये जर मोदी नव्यानेच पंतप्रधान झाले त्यानंतर किती काळपर्यंत अप्रिय घटना घडल्यास "ते नवीनच आहेत" हा युक्तिवाद चालू शकेल? आहा ! म्हणजे असा काही कॉग्रेसी लोकांचा डाव आहे तर... ग्रेट,... वरील प्रतिसादाची लिंक सायबर सेलच्या लोकांनी पाहायला हवी...

धाग्याच्या विषयाशी संबंधित आजच्या लोकसत्तेतील एक लेख: मोदींची प्रतिमासफेदी राजस्थान, मध्य प्रदेश आणि झारखंडमधील भाजपच्या विजयानंतर भरधाव निघालेल्या मोदीरथाचा मार्ग गुजरातमधील महानगर दंडाधिकाऱ्यांनी गुजरात दंगलीप्रकरणी दिलेल्या निकालाने निष्कंटक झाल्याचे भासत असले, तरी वस्तुस्थिती तशी नाही. या निकालाने नरेंद्र मोदी यांना निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र नक्कीच मिळाले आहे. त्यामुळे देशभरातील मोदी ब्रिगेडला हायसे वाटले असणार यात शंका नाही. राहता राहिला प्रश्न मोदींचे निकटवर्ती अमित शहा यांनी, त्यांच्या साहेबांकरिता एका तरुणीवर गुप्तहेरांकडून ठेवलेल्या पाळतीचा. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळ न्यायालयीन आयोगाची स्थापना करणार आहे. पुढील तीन महिन्यांत त्या चौकशीचा अहवाल येईल. मोदींना त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मोदी ब्रिगेडची गोष्ट वेगळी आहे. अहवालातून काहीही बाहेर आले तरी मोदीभक्तांच्या श्रद्धेमध्ये अणुमात्र फरक पडणार नाही. त्यांनी मोदींना केव्हाच पंतप्रधानपदावर बसवून टाकले आहे. पण आपल्या भक्तांचे प्रेम हे टीकाकारांवर समाजमाध्यमातून तुटून पडणे यापलीकडे फारसे उपयोगाचे नाही; ट्विटरवरील फॉलोअर्स आणि फेसबुकवरील लाइक्स यांची संख्या या जोरावर निवडणूक जिंकता येत नाही, हे जाणण्याची राजकीय शहाणीव मोदी यांच्याकडे निश्चितच आहे. निवडणुकीचे गणित जमवायचे तर त्यासाठी जाती, धर्म, वर्ग यांची समीकरणे जुळवावी लागतात, हे येथील राजकीय वास्तव आम आदमी पक्षाने दिल्लीत मोडीत काढले असले, तरी तो अजूनही अपवादच आहे. याची जाणीवही मोदी यांना नक्कीच असणार. गुजरात दंगल प्रकरणाच्या निकालानंतर त्यांनी लिहिलेल्या प्रदीर्घ लेखातून हीच जाणीव स्पष्ट दिसते. मोदी यांचा चेहरा विकासपुरुषाचा आहे. त्यास सर्वसमावेशकत्वाची रंगसफेदी करण्याचा प्रयत्न म्हणजे तो लेख आहे. लोकसभा निवडणुकीत रालोआला सर्वाधिक जागा मिळतील; परंतु पूर्ण बहुमत मिळेल अशी शक्यता सध्या तरी दृष्टिपथात नाही. अशा वेळी सत्तास्थापनेसाठी अन्य पक्षांकडून रसद घ्यावी लागणार आहे. त्याची तरतूद करण्याचा प्रयत्न म्हणजे तो लेख आहे. आपण दंगल प्रकरणाच्या अग्निपरीक्षेतून तावून सुलाखून बाहेर पडलो आहोत, हे या लेखाद्वारे अधोरेखित करून मोदींनी या संभाव्य मित्रपक्षांची सोय करून दिली आहे. उद्या वेळ आलीच तर त्यांना मोदींचा हात धरणे यामुळे सोपे होणार आहे. अर्थात या लेखामागे केवळ राजकीय-व्यापारी उद्देशच आहे असे म्हणणे हा मोदींवरील अन्याय ठरेल. गुजरात दंगलीतील िहसक वेडाचारामुळे आपण मुळापासून हादरलो होतो, ही जी भावना मोदी यांनी व्यक्त केली आहे त्याबद्दल शंका घेता येणार नाही. दंगलीबद्दल त्यांनी माफी मागितली नाही, अशी टीका आता केली जात आहे. परंतु त्याचे कारण स्पष्ट आहे. त्यांना माफीचे काही कारणच दिसले नाही. न्यायालयानेही तसा निर्वाळा दिला आहे. तेव्हा तशी अपेक्षा करणे चूक आहे. एक गोष्ट खरी, की या लेखात त्यांनी केलेले काही दावे वस्तुस्थितीशी विपरीत आहेत. दंगलग्रस्तांना मदत आणि पुनर्वसन करण्यासाठी साधी समिती नेमण्यातही मोदींचे सरकार चालढकल करीत होते आणि अखेर वाजपेयींना त्यात हस्तक्षेप करावा लागला होता, असे वृत्त गेल्या शनिवारीच ‘इंडियन एक्स्प्रेस’ने प्रसिद्ध केले होते. तेव्हा मोदी यांच्या शोकाकुल लेखाने भारावून जाण्याचेही कारण नाही. प्रतिमासंवर्धनाची सुंदर खेळी एवढाच त्या लेखाचा खरा अर्थ आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

लोकसत्तेतील "अन्वयार्थ" मधील संपादकीय लेख येथे दिल्याबद्दल धन्यवाद. त्यासंदर्भात प्रतिवाद करण्यासाठी खालील प्रतिसाद नाही हे कृपया लक्षात असुंदेत. तरी देखील काही वेगळे / विरुद्ध वाटल्यास अवश्य कळवा... सर्वप्रथम मूळ लेखाचा विषय हा मोदी कस्से चांगले हा नाही. वर देखील एका प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे, मोदी जर दोषी ठरले असते तर त्यांना शिक्षा व्हायलाच हवी होती. पण ते दोषी ठरलेले नाहीत. आणि का ठरले नाहीत याचे कारण वकीली वाद-प्रतिवाद नसून जर नीट वर चर्चाप्रस्तावात दिलेले रिलेटेड मुद्दे पाहीले तर लक्षात येईल की जे आरोप होते, ते खोटे ठरले. पांडे हे २७ फेब्रुवारीच्या मिटींगला हजरच नव्हते. यावरून पांडे यांना एनडीटिव्हीवर देखील प्रश्न विचारला होता, पण त्यांनी त्याचे उत्तर दिले नाही, अर्थात "मुद्दा तो नाही" असे म्हणत टाळले. मग हा माणूस त्या मिटींगबद्दल कसे काय काही सांगू शकतो, त्यातील कुणावरही आरोप करू शकतो आणि त्याचा वापर करत इतर जण ते आरोप ज्यांच्यावर केले त्या मोदींना राक्षस ठरवू शकतात... बाकी असे अनेक मुद्दे वर आहेत पण परत परत लिहायचे टाळतो. मात्र मुख्य मुद्दा आहे तो, मोदीं दोषी आहेत असे गृहीत धरत त्यामुळे सर्वांनाच म्हणजे जे कोणी संघाशी संबंधीत काम करत असतील त्या सर्वांनाच दोषी ठरवून नायनाट करायचा प्रयत्न केला गेला (अमेरीकेतील एक उदाहरण वर दिलेले आहेच), त्यातून प्रचंड सामाजीक फूट पाडण्यात आली, जी अक्षम्य होती, अक्षम्य आहे. आता आपण दिलेल्या लेखासंदर्भात बघूयातः पहीला मुद्दा: स्नूपिंग प्रकरणातील केंद्रसरकारचा चौकशी आयोग. परत तेच जर त्यात ते दोषी ठरले तर जी काय कायद्याने शिक्षा होयला हवी ती होउंदेत. पण एक प्रॉब्लेम हा काँग्रेसला होऊ शकतो. भाजपा आणि मोदी या संदर्भात बहुदा केंद्राच्या विरोधात खटला दाखल करणार आहेत. राज्य सरकारने एकदा चौकशी आयोग स्थापल्यावर परत केंद्र सरकारने स्थापणे म्हणजे कायद्याच्या चौकटीत न बसणारे ठरू शकेल. जर ते तसे ठरले तर ऐन निवडणुकीच्या वेळेस काँग्रेस नाकावर आपटू शकते. आणि जरी काँग्रेसच्या बाजूने अशा खटल्याचा निकाल लागला, तरी भाजपा-मोदी काँग्रेसची राजकीय खेळी म्हणून जनतेमध्ये मार्केटींग करू शकते. आत्ताची तरी अवस्था अशी आहे की काँग्रेसवर कुठल्याही डोके शाबूत असणार्‍या व्यक्तीचा विश्वास नाही (अगदी अशा व्यक्ती भाजपा नको म्हणून अथवा स्वतःच्या स्वार्थापोटी काँग्रेसला मते देत असल्या तरी). मुद्दा २: लेखाचे कारण हे इतर संभाव्य पक्ष जे निवडणुकांनंतर पाठींबा देऊ शकतील त्यांच्या सोयीसाठीचा अगदी बरोबर वाटला हा मुद्दा. पण हे राजकारण आहे. खेळले तर म्हणणार राजकीय चाल. नाही खेळले तर म्हणणार म्हणून संघवाले मार खातात! ;) मुद्दा ३: "गुजरात दंगलीतील हिंसक वेडाचारामुळे आपण मुळापासून हादरलो होतो, ही जी भावना मोदी यांनी व्यक्त केली आहे त्याबद्दल शंका घेता येणार नाही... त्यांना माफीचे काही कारणच दिसले नाही. न्यायालयानेही तसा निर्वाळा दिला आहे. तेव्हा तशी अपेक्षा करणे चूक आहे" मला वाटते (बे"सुमार"तेतून बदलेला) लोकसत्ता हे मुख्यप्रवाहातील पहीले वर्तमानपत्र असेल ज्यांनी इतके स्पष्टपणे मान्य केले आहे. बाकी टिका करताना त्यात राक्षसीकरण करणे यातून पूर्णपणे टाळलेले दिसत आहे, जे स्वागतार्ह आहे. शेवटचा मुद्दा: दंगलग्रस्तांना मदत आणि पुनर्वसन करण्यासाठी साधी समिती नेमण्यातही मोदींचे सरकार चालढकल करीत होते आणि अखेर वाजपेयींना त्यात हस्तक्षेप करावा लागला होता, असे वृत्त गेल्या शनिवारीच ‘इंडियन एक्स्प्रेस’ने प्रसिद्ध केले होते. मला ह्या बातमीचा दुवा मिळू शकला नाही. पण उत्सुकतेपोटी जेंव्हा गुगलले तेंव्हा हिंदू मधील ७ मार्च २००२ मधली बातमी मिळाली. त्यात म्हणले आहे: "...The Chief Minister, Narendra Modi, has announced a judicial inquiry into the post-Godhra violence. But a spokesman of the Chief Minister's Office said that the Government was yet to decide on whether or not to club the inquiry with the one into the train carnage. He said since the "nature" of the two incidents were different, it was possible that separate commissions would be constituted to go into them. " आणि पुढे असा देखील उल्लेख आला आहे, "...Mr. Modi visited relief camps housing the minorities and instructed the officials concerned to ensure supply of essential commodities. Doctors visited the camps to treat the injured for the first time today since the beginning of the violence. Some 30,000 people are being sheltered in 18 relief camps. " जर आठवड्याभराच्या आत १८ कँप्स होते आणि चौकशी समितीची घोषणा केली होती, तर नक्की त्यांनी किती आळमटळम केली ह्याचा विचार करावा लागेल. तुलनेसाठी: मुझ्झफरनगरची दंगल २७ ऑगस्टला चालू झाली समिती ९ ऑगस्टला स्थापली (१३ दिवसांनी). मुंबई दंगल आणि श्रीकृष्ण आयोग स्थापण्यामधे किती काळ होता माहीत नाही...

In reply to by विकास

गुजरात मधील २००२ हिंसाचारांमध्ये तत्कालिन व तेव्हापासून आजवर मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी यांना त्यासाठी प्रत्यक्ष वैयक्तिकरित्या दोषी सिद्ध करणे ही बाब भारतीय न्यायव्यवस्था व राजकीय व्यवस्था जुजबी ओळख असणारे सुद्धा अशक्य कोटीतील मानतील. मी आजवर मांडत आलेला मुद्दा केवळ एवढाच आहे की त्यावेळी व त्यानंतरही राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जे कर्तव्य पार पाडायला हवे होते त्यात मोदी यांनी होईल तेवढी कसूर केली. यावर मी येथे सविस्तर लिहिले आहे. आजवर कुठल्याही कारणामुळे महाराष्ट्रातील खटला दुसर्‍या राज्यात हलवावा लागला का? याउलट गुजरातमधील खटले महाराष्ट्रात चालवावे लागले. बाकी आंतरराष्ट्रीय स्तरावर मे २००४ पासून केंद्रीय सत्तेत असलेल्या केंद्रीय सरकारने वारंवार गुजरात मधील हिंसाचार ही पूर्णपणे भारताची अंतर्गत बाब आहे हीच भूमिका घेतली. दुसर्‍या देशातील सरकार भारत सरकारची भूमिका लक्षात न घेता यावर आपले धोरण ठरवत असतील तर ती त्यांची अपरिपक्वता आहे. पण २००२ मध्येच गुजरातचे मुख्यमंत्री अधिक जबाबदारीने वागले असते अथवा जबाबदारी पार पाडणे जमत नसल्याने पदावरून दूर झाले असते तर ही वेळच आली नसती.

In reply to by श्रीरंग_जोशी

नरेंद्र मोदी यांना त्यासाठी प्रत्यक्ष वैयक्तिकरित्या दोषी सिद्ध करणे ही बाब भारतीय न्यायव्यवस्था व राजकीय व्यवस्था जुजबी ओळख असणारे सुद्धा अशक्य कोटीतील मानतील. जर सिद्ध होत नसेल तर त्यांना राक्षस का केले जात आहे? हे कायद्याने तरी योग्य आहे का? गुजरातमधे घडलेल्या हिंसाचारास सातत्याने pogram म्हणले गेले आहे. हिंसाचार जितका अक्षम्य आणि निर्घॄण होता तितकाच त्याचे वर्णन करण्यासाठी वापरला गेलेला शब्द. इथे सर्वांच्या माहितीकरता सांगतो की हिटलरने जो ज्यूंचे पद्धतशीरपणे हत्याकांड केले त्याला pogram म्हणतात, ज्याचा अर्थ "An organized, often officially encouraged massacre or persecution of a minority group, especially one conducted against Jews." असा आहे. तुम्हाला काय म्हणायचे आहे की गुजरातसरकारने हिटलर सारखे पद्धतशीर हत्याकांड केले आहे? मी आजवर मांडत आलेला मुद्दा केवळ एवढाच आहे की त्यावेळी व त्यानंतरही राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जे कर्तव्य पार पाडायला हवे होते त्यात मोदी यांनी होईल तेवढी कसूर केली. मोदींनी कर्तव्य पार पाडले असे कोर्टाने संदर्भ मिळाले म्हणून म्हणले आणि त्यांच्यावरील गुन्हेगारीचे आरोप रद्द केले आहेत. त्यामुळे हे जे तुम्ही म्हणत आहात त्याला कृपया संदर्भ दिलेत तर बरे होईल. केंद्रीय सरकारने वारंवार गुजरात मधील हिंसाचार ही पूर्णपणे भारताची अंतर्गत बाब आहे हीच भूमिका घेतली. मी माझ्या चर्चा प्रस्तावात अथवा या संदर्भातील लेखनात नक्की कुठे केंद्रसरकार बद्दल बोललो आहे हे दाखवाल का? माझा मुद्दा समजून घेतलात तर बरे होईल. समजत नसेल तर अवश्य विचारा परत एकदा समजावून सांगेन. पण २००२ मध्येच गुजरातचे मुख्यमंत्री अधिक जबाबदारीने वागले असते अधिक म्हणजे काय आणि कोणासारखे? १९९२-९३ च्या मुंबई दंगलीतल्या मुख्यमंत्र्यांसारखे का आत्ताच्या उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्र्यांसारखे, का १९८४ च्या शिख दंगलीच्या वेळेस वागले गेलेल्या पंतप्रधानांसारखे का अगदी भारताला स्वातंत्र्य मिळता क्षणी दुर्दैवी गांधीहत्येनंतर झालेल्या पश्चिम महाराष्ट्रातील दंगलीच्या वेळेस जसे नेहरू सरकार वागले तसे का त्यावेळ पासून ते १९८४ च्या अनंत दंगली झाल्या (त्यात ठाणे-भिवंडी दंगली पण आल्या) त्यात वागलेल्या सरकारांसारखे? सगळ्याची गोळाबेरीज करूयात.

In reply to by विकास

विकास, अगदी योग्य आणि मुद्देसूद प्रतिसाद! काल सिब्बल म्हणत होता की आता इतक्या उशीरा ११ वर्षांनंतर खेद व्यक्त करण्याला अर्थ नाही. तो वकील असल्यामुळे कोणते मुद्दे सोयिस्कररित्या पुढे आणायचे व गैरसोयीचे मुद्दे कसे मागे ठेवायचे हे त्याला चांगले माहित आहे. १९८४ साली झालेल्या एकतर्फी दंगलीत ३००० हून अधिक शिखांची हत्या झाल्यावर त्यातल्या एकाही आरोपीवर काँग्रेसने खटला दाखल केला नाही. उलट त्यातल्या काही जणांना कॅबिनेट मंत्रीपदाची बक्षिशी दिली (हरेकृष्णलाल भगत, ललित माखन, सज्जनकुमार, टायटलर, कमलनाथ इ.). नंतर लोकसभेत २००५ मध्ये (म्हणजे तब्बल २१ वर्षांनी) पंतप्रधानांनी दंगलीबद्दल माफी मागितली. जर ११ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर खेद व्यक्त करणे चुकीचे तर २१ वर्षांनंतर माफी मागणे हे कसे समर्थनीय आहे?