✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शतशब्द कथा: म्हादा

ख
खेडूत यांनी
गुरुवार, 12/26/2013 - 22:14  ·  लेख
लेख
सक्काळच्यान दादू कावलावता. तंबाकू नाय का च्या नाय. कळकाच्या पाटया वळू वळून बोटं पाक सोलवटली व्हती. पाटलाच्या वाड्यावनं सांगावा आलावता. उद्याच्याला येरवाळी वाजान्त्री पायजेल. आता मानसं हाताशी नायती तर कोन वाजीवनार? गाडवं? मायला . . गाडाव म्हनल्यावर ध्येनात आलं. . हौसा कुटाय? मास्तरच्या घरला इटा लगीच पायजील हाईत. गाडवं मोकळी हुबी र्हाऊन जमंल व्हय ? यो म्हादा बी आयकंना झालाय.. हितं बा कामानं मरतुया आन ह्यो साळंत जातुया ! भेटला की गुर्जीला इचार्तूच आता. बाबारं, पोरगं प्वाट भरनार का शिक्शान करनार ? -------- म्हादा आला. बाला बगून हाराकलाच. दादा . . म्या सातवी पास झालो! '' झालास न्हवं ? झ्याक! आता शाळा बास. उद्यापस्नं सुदरा, गाडवं संबळा ! '' म्हादाचं त्वांड चिमनीयवडं झालं !
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
अनुभव
मत

प्रतिक्रिया द्या
4125 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

बिचारा म्हादा..

यसवायजी
गुरुवार, 12/26/2013 - 22:26 नवीन
बिचारा म्हादा.. पण दोष ना कुणाचा.. हातावरचं पोट.. चालायचंच. :( कथा छान झालीय.
  • Log in or register to post comments

याला जीवन ऐसे नाव ! दुर्दैवी

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 12/26/2013 - 22:28 नवीन
याला जीवन ऐसे नाव ! दुर्दैवी पण सत्य !!
  • Log in or register to post comments

+१

आतिवास
गुरुवार, 12/26/2013 - 22:33 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

:(

पॉइंट ब्लँक
Fri, 04/10/2015 - 16:14 नवीन
असं म्हणून कसं चालंल? हे बदलायला पाहिजे. चक्र कुठ तरी थांबायला नको का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

मस्त जमलीय. शुभेच्छा.

अभ्या..
Fri, 12/27/2013 - 01:55 नवीन
मस्त जमलीय. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

*****

जेपी
Fri, 12/27/2013 - 11:24 नवीन
मस्त .
  • Log in or register to post comments

दुर्दैवी.....

एक एकटा एकटाच
Fri, 04/10/2015 - 14:54 नवीन
दुर्दैवी.....
  • Log in or register to post comments

मस्त

ganeshpavale
Sat, 06/06/2015 - 10:29 नवीन
याला जीवन ऐसे नाव !
  • Log in or register to post comments

विदारक

अभिरुप
Sat, 06/06/2015 - 12:25 नवीन
माणसाच्या दुर्दैवाचं विदारक आणि परिणामकारक चित्रण...... पण हे चित्र सुद्धा बदलेल हे निश्चित कारण काळ कधीच सारखा नसतो.
  • Log in or register to post comments

विदारक चित्र.

प्रभाकर पेठकर
Sat, 06/06/2015 - 12:43 नवीन
सुंदर आणि मनाला थेट भिडणारी शतशब्द कथा. आवडली. भारताला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली तरीही ही परिस्थिती पाहून विशेष वाईट वाटते.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा