जो भी प्यार से मिला हम उसी के हो लिये :)

Atul Thakur जनातलं, मनातलं
किशोर कुमार बद्दल मला नेहेमी एक गोष्ट महत्वाची वाटते कि जी गाणी त्याला मिळाली त्यातला काव्यगुण लक्षात घेतला तर तो रफीला मिळालेल्या एकाचढ एक गाण्याच्या तुलनेत कमी होता. किशोरला अगदी नंतरच्या काळात गुलजार सारखा प्रतिभावंत गीतकार मिळाला. तरीही त्याची गाणी लोकप्रिय झाली यातच किशोरदांचं यश आहे असं मला वाटतं. याबद्दल भिन्न मते असु शकतात पण रफीकडे किंवा तलतकडे असलेल्या गझल किंवा इतर अनेक क्लासिक म्ह्टली जाणारी गीते बाजुला ठेवली कि उरलेली उडत्या ठायीची गाणी किशोरच्या वाट्याला आली. तरीही त्याने ती लोकप्रिय केली. गाईड हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. “दिन ढल जाये”, “क्या से क्या हो गया” च्या तुलनेत “गाता रहे मेरा दिल” हे श्रवणीय वाटलं तरी काव्य यादृष्टीने बरोबरीचं ठरणार नाही. शायरीच्या बाबतीत जुन्या संगितकारांनी किशोरचा कधीही विचारदेखिल केलेला नाही. अमिताभच्या सुपरस्टारपदात किशोरचा वाटा आहेच. मात्र “कभी कभी” च्या तरल गीतांसाठी मुकेशला बोलवावं लागलं आणि किशोरच्या वाट्याला आलं ते “प्यार कर लिया तो क्या”. सारखं सुमार गाणं. त्रिमुर्तीमधील राजसाहेब मुकेशच्याच आवाजात गायिले. दिलीप साहेबांनी रफीच पसंद केला. किशोरची क्लासिक म्ह्टली जाणारी बहुतेक गाणी ही प्रथम देव आनंदने पडद्यावर गायिली त्यानंतर काही प्रमाणात राजेश खन्नाने. अमिताभला मिळालेली किशोरची गाणी कितीही लोकप्रिय असली तरी त्यांना क्लासिक म्ह्णावं काय हा प्रश्नच आहे. इतर अतिशय महत्वाची गणली जाणारी किशोरची गाणी खुद्द किशोरने स्वतःच पडद्यावर गायिली आहेत. त्यात “पायलवाली देखना”, “अगर सुनले तो इक नगमा”, “मेरे मेहबुब कयामत होगी”, “ठंडी हवा ये चांदनी सुहानी”, “अजनबीसे बनके करो ना किनारा”, “कोई लौटादे मेरे बीते हुए दिन”, “हवाओं पे लिख दो”, “जीवन से ना हार जीने वाले” अशी अनेक. पुढे काही क्लासिक गणली गेलेली गाणी ही नायक म्ह्णुन हिन्दीत फारसे न गाजलेल्या लोकांच्या पदरी पडली. त्यात “तुम कितनी खुबसुरत हो” (किरण कुमार), “चंदा कि किरनोंसे लिपटी हवाये” (बलदेव खोसा), “ये वोही गीत है”, “समा है सुहाना सुहाना” (जलाल आगा)ही काही त्यातील लोकप्रिय गाणी आहेत. आघाडीच्या नायकांनी किशोरचा आवाज कितीही वापरला तरी दिलिपचं रफी बरोबरचं किंवा राज कपूरचं मुकेशबरोबरीचं सातत्य हे ज्या प्रकारचं होतं तसं फारसं कुणाचंही झालं नाही. त्यामुळे झालं हे की “पल पल दिल के पास”, ” देखा है जिंदगी को कुछ इतना करीब से” सारखी जबरद्स्त गाणी धर्मेंद्र साठी गाऊन देखिल किशोर हा धर्मेंद्रचा आवाज होऊ शकला नाही. अमिताभच्या वाट्याला क्लासिक आलं ते “रिमझीम गिरे सावन”, आणि दुसरं ” हर हसीं चिज का मै तलबगार हुं” काही प्रमाणात “अभिमान” चित्रपटाचा अपवाद वगळला तर बाकी सगळा मामला “खईके पान बनारसवाला” आणि “जहां चार यार मिल जाये” वालाच होता. पुढे काही मिळालं नाही म्ह्णुन “मंझिले अपनी जगह है” साठी गळे काढणारी माणसे अवतरली. हे सारं विवेचन यासाठी कि महत्वाचा म्हटला जाईल असा नायक देव आनंदचा अपवाद वगळता हाताशी नाही. अशा परिस्थीतीत किशोरकुमार त्या काळात टिकुन राहिला आणि त्या कालावधीत महत्वाची, क्लासिक म्ह्टली जाणारी गाणी त्याने गायिली. पुढे राजेश खन्नाचे “मेरे सपनों कि रानी” युग आले. त्यातला किशोरच्या लोकप्रियतेत त्याकाळच्या तरुणाईचा हात होता हे नाकारता येणर नाही. त्यामुळे गीतांमध्ये काव्यगुण फारसा नसला तरी किशोरच्या आवाजातील तरुणाईचा जोश, सत्तरच्या दशकातील बदलणार्‍या परिस्थीतीचे चित्रपटात पडलेले प्रतिबिंब आणि त्याला चपखल न्याय देणारा तरुण सळसळत्या रक्ताचे प्रतिनिधित्व करणारा, काहीसा बिनधास्त, हॅपि गो लकी, कलंदर असा किशोरचा आवाज त्या पिढीने उचलुन धरला. तेव्हाही “परदा है परदा” रफीच गात होता. “मै पल दो पल का शायर हुं” मुकेशसाठी लिहिलं जात होतं तरीही किशोर नुसता टिकला नाही तर त्याच्या वावटळीत भले भले मागे पडले. हे किशोरच्या प्रचंड गुणवत्तेचं यश आहे असं मला वाटतं. अतुल ठाकुर
वर्गीकरण
लेखनप्रकार

10 टिप्पण्या 4,130 दृश्ये

Comments

नीलकांत नवीन

किशोर कुमार आवडतात , त्यांची गाणी सुध्दा आवडतात. बाकी जून्या गायकांबद्दल अश्या प्रकारे अधिक वाचायला आवडेल.

हुप्प्या नवीन

अमिताभकरता किशोरकुमारने गायलेली गाणी लोकप्रिय असली तरी यथातथाच आहेत हे पटते. तुम्ही दिलेली उदाहरणे आहेतच शिवाय मिली, फरार, जमीर असे काही तुरळक अपवाद. राजेश खन्नाची यादी मोठी आहे. सफर, अमर प्रेम, नमक हराम, मेहबूब की मेहंदी, दो रास्ते, दाग, आप की कसम, अजनबी, मेहबूबा, कटी पतंग आणि असे अनेक. जितेंद्र आणि संजीव कुमार ह्यांनाही काही चांगली गाणी मिळाली. जितेंद्र : किनारा, परिचय, खुशबू, जैसे को तैसा. नंतर हिंमतवाला टाईप धांगडधिंगा सुरु झाल्यावर हे पर्व संपले. संजीव कुमार : मन मंदीर, सीता और गीता, आंधी, अनामिका. शशी कपूरः प्यार का मौसम, शर्मिली, दीवार, आ गले लग जा, फकीरा, काला पत्थर. वरील काही सिनेमातील प्रत्येकी एकच गाणे गाजले पण तरी अविस्मरणीय.

मुक्त विहारि नवीन

पण आपले ते... "ख्वॉब हो तुम या" (http://www.youtube.com/watch?v=3rKiTkTQZZs) हे अप्रतिम गीत राहिलेच की. आणि शिवाय ते..."अरे यार मेरी तुम भी हो गज़ब"...(http://www.youtube.com/watch?v=M9oQZQvCQqE) हे पण मस्तच..मला त्यातले मध्येच येणारे "हूं हुं" जास्त आवडते...

देव मासा नवीन

आजाद भारत २५ साल का हो गया ,आजादिसे जुडे हुये सपने जब बिखरने लगे , तब जन्म लिय विजयने ... आणी आमिताबने हिंदी सिनेमाचा परदा व्यापुन घेतला, शेवटी शेवटी हिप्पि हेयर स्टाइल करुन सुध्दा काकाचे स्टारडम काहि टीकले नाहि , रंगिबेरंगि मायापुरित छापुन येनारय्या विनोद खन्ना,विनोद मेहरा ,या हिप्पि हेयर स्टाईल मंडळीच्या घोळ्क्यात राजेश खन्नाला ओळ्ख्नने कठिन होऊण बसले.... असाच ढळतानाचा हेमा मालिनि सोबतचा सिनेमा '' कुदरत'' . जाता जाता किशोरदाने काकाला एका अविस्मरनिय गान्याचि सौगात दिलि '' हमे तुम से प्यार कितना, ये हम नहीं जानते मगर जी नहीं सकते, तुम्हारे बीना....हि पुढचि ओळ तर कातिल गायलि आहे .तुम्हें कोई और देखे, तो जलता हैं दिल ,बड़ी मुश्किलों से फिर, संभलता हैं दिल 'पहिल्यादां प्रेमात पडतात ते लोक जि गाणी सारखि सारखि एकतात त्या यादितले हे एक अढळ गित ' आगदि ९०-९८च्या काळा पर्यतं. ''मेरे दिलमें आज क्या है.. तु कहे तो मे बता दु'' या गान्यातिल शेवटचे कडवे गाताना ''तेरे गेसुओं मे छुपकर,मैं जहाँ के ग़म भुला दूँ'' आवाज आल्हादपने खालि आणायचि जादु करुन दाखवलि आहे ,लता बाई हि जादु नेहमि करुन दाखवतात ( या प्रकाराला काय म्हनतात माहित नाहि , पाण आम्च्या सारख्या सामान्य कानसेनांन साठि हि जादुच आहे बा..) ''यह जमि गा रहि हे ,आस्मा गा राहा हे '' गानारे अमित कुमारा , फारसे एकु का आले नाहि ? कुनितरि लिहा हो..

जे.पी.मॉर्गन नवीन

तुमच्या लेखानी एक वेगळा विचार दिला. मला वाटतं....किशोरचा उदय होईपर्यंत सिनेसंगीतात काव्याचा दर्जा घसरायला ऑलरेडी सुरुवात झाली होती. गाण्यांमधला भरणा वाढून नवनवीन वाद्यांच्या वापराकडे पंचम, एलपी सारख्या संगीतकारांचा कल जास्त होता. त्यामुळे नाविन्य तर आलं...पण अर्थपूर्ण शब्दरचना हद्दपार होत चालली. रफीला "गोल्डन एरा"मध्ये जितकी वैविध्यपूर्ण आणि लक्षात रहाणारी गाणी मिळाली तितकी किशोरला नाही. किशोरचं एखादं भजन आठवायला गेलं तर पटकन आठवणारही नाही....पण रफीची सॅड गाणी...पार्टी साँग्ज किशोरैतकीच आठवतात. अर्थात त्यातूनही किशोर लक्षात राहतो आणि हुरहुर लावतो यातच त्याचं यश! लेख आवडला! जे.पी.

विवेकपटाईत नवीन

लेख आवडला. किशोरदा चे गाणे ऐकतानाच नाही तर पाहतानाही वेगळा आनंद मिळतो. चलती का नाम गाडीचे गाणे असो किंवा एक चतुर नार..पाहताना भलतीच मौज मिळते.

विजुभाऊ नवीन

पल पल पल दिलके पास तुम रहती हो.............. एकदम वेगळेच गाणे आहे. गाता रहे मेरा दिल.मधला पहाडी चा मूड किशोर कुमार ने मस्त पकडला आहे. किंवा मेरे महेबूब कयामत होगी मधला राग किशोर कुमारने जसा पकडलाय तसा कोणी पकडू शकेल असे वाटत नाही. इतर गाण्यातील काव्य मूल्य बाबत तर तुमच्याशी सहमत

निनाद मुक्काम … नवीन

मुकेश व राज कपूर हे समीकरण होते पुढे राजकपूर चा नगारा त्याच्या तुमानीला जुमेनसा झाला व मुकेश साहेबांची गोची झाली पुढे रफी व किशोर ह्यांच्या स्पर्धेत काळानुसार किशोर ने आपले अष्टपैलुत्व पणाला लावले म्हणून त्याने जेव्हा राजेश साठी प्रणय गीत गायली तर अमिताभ साठी उडत्या चालीची मग मधेच संजय साठी क्या यही प्यार हे तर ऋषी साठी ओ हन्सिनी आजही आठवतात.मधेच तो दिल क्या करे गौण जायचा आता त्याची आंधी सिनेमातील गाणी आजही रात्री ऐकले तर जागेपणी आपण स्वप्न पाहायला लागतो. अगदी अमिताभ साठी त्याने ओ साठी रे गायले ते ऐकले तर आजही अंगावर काटा येतो. शेवटी क्लासिक क्लासिक मध्ये नक्की काय माझ्या आजोबांच्या काळात लोकप्रिय सेह्गेल ची क्लासिक गाणी आजच्या पिढीला रडगाणी वाटतील , काळासोबत जगणारा व आहे त्या ट्रेंड मध्ये स्वतःचे वेगळेपण जपणारा किशोर आजही तरुणपिढी रफी पेक्ष्या त्यांची गाणी जास्त ऐकते, लेखकाला क्लासिक ह्या संकल्पनेविषयी वेगळ्या अपेक्षा असाव्यात तसे असेल तर लेखात मन्ना डे चा उल्लेख हवा होता. त्यांना एकदा अण्णांनी तुम्ही आमच्या शास्त्रीय संगीतात या असे त्यांच्या जाहीर निमंत्रण दिले होते.