लेखकदिपक.कुवेतयांनी गुरुवार, 26/12/2013 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः
१. उकडलेली अंडि - ३
२. हिरव्या मिरच्या/पेरभर आलं बारीक चीरुन
३. १/२ जुडि प्रत्येकि मेथी आणि पालक बारीक चीरुन
४. ओवा - १/२ चमचा
५. हळद - १/२ चमचा
६. बेसन - गरजेप्रमाणे
७. चवीनुसार मीठ
८. चाट मसाला (ऑप्शनल)
९. तळण्यासाठि तेल
कॄती:
१. पकोडे तळण्यासाठि मंद आचेवर कढईत तेल तापत ठेवा
२. एका मोठया बाउल मधे/भांडयात उकडलेली अंडि किसुन घ्या. आता त्यात अनुक्रमे बारीक चीरलेल्या हिरव्या मिरच्या, आलं, मेथी, पालक, ओवा, हळद आणि चवीनुसार मीठ घालुन सारखं करा
३. गरजेप्रमाणे बेसन घालुन भज्यांच्या पीठप्रमाणे भीजवा
४. गरज लागली तरच पाणी (हबक्याने) घाला अन्यथा पालक/मेथीला जे पाणी सुटतं त्याने ज्यादा पाणी घालायची गरज उरत नाहि
५. गरम तेलात बुडवलेल्या चमच्याने पकोडे गोल्डन बाउन होईस्त तळुन घ्या. पकोडे तळताना आच मंदच असु द्या. मोठया आचेवर तळले तर पकोडे बाहेरुन लाल दिसतील पण आतुन कच्चे लागतील. (गरम तेलात चमचा बुडवुन घेतल्याने पीठ चमच्याला चीकटत नाहि)
६. टिश्यु पेपेरवर काढले कि गरम असतानाच त्यावरुन चाट मसाला भुरभुरा
७. आवडत्या चटणी/सॉस आणि वाफाळणार्या चहासोबत गरमागरम पकोडयांचा आस्वाद घ्या
टीपा:
१. हि पाकॄ अंडे न घालताहि करता येईल :D पण अंडयाची उणीव भरुन काढण्यासाठि त्यात किसलेला फ्लॉवर घालता येईल. पालक-मेथी-फ्लॉवर जरा वेगळं कॉम्बो होईल पण अगदिच वाईटहि लागणार नाहि.
२. अंडयात नुसती मेथी किंवा नुसता पालक घालुनहि करता येईल. मी पालक अश्यासाठि घेतलं ज्याने मेथीचा कडवटपणा जरा कमी झाला
३. कमी तेलात तळण्यासाठि आप्पेपात्राचा उपयोग करता येईल त्या करीता पीठ जरा घट्ट ठेवा आणि थोडया थोडया वेळाने पकोडे गोलाकार फिरवत रहा म्हणजे सर्व बाजुनी सारखे शीजतील
४. ह्या पकोडयांबरोबर तिखट-गोड पुदिना चटणी बेस्ट लागेल (असा आपला माझा अंदाज)
बघा ना हा गणपा कसा जखमेवर मीठ चोळतोय ते! त्यामुळे भारतात गेलो कि वर्षभराचा कोटा कप्लीट(च) करुन येतो....... सुरवात जेट एअरवेज नी कुवेत एअरस्पेस सोडला कि लगेच होते :D
विचारशील म्हणुन. पनीर असल्यामुळे मिश्रण तेलात घातल्यावर कदाचीत फुटेल (बेसन असलं तरी) आणि कुठल्याच पदार्थाची नक्कि अशी चव कळणार नाहि (माझा अंदाज). बाकि प्रत्यक्ष तू करुन(च) पहा आणि सांग ना........अरे हाय काय नाय काय!
>>बाकि प्रत्यक्ष तू करुन(च) पहा आणि सांग ना........अरे हाय काय नाय काय!
आयला!! मला वाटलं करुन बघतो आणि सांगतो म्हणाल. =)) . आता कधी रसगुल्ले किंवा पनीर पराठे करायची लहर आलीच तर वाटीभर पनीर बाजूला काढून करुन बघायला हवं. नायतर येवढ्यासाठी पनीर विकत आणून ते वाया गेलं तर प्रचंड हळहळ वाटेल राव. ;)
दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम
और पल पल पे लिखा है मिलनेवाले का नाम....
जावू दे....
आता एक काम करु या.येण्यापुर्वी व्य.नी.करा.
कुठे तरी पिकनिक करू या आणि तिथेच अन्न बनवून खावू या.
(वरील आमंत्रण नागपूरकर स्टाईलने नसून, डोंबिवली स्टाईलने आहे.)
दिवाळी अंकात ती सिगार्सची पाककृती बघितल्यापासुन मी ह्या माणसाच्या पाकृ बघणे सोडुन दिले आहे. करायला जमत तर काही नाही आणि ऊगाच फजिती होते.
३१ ला चकणा म्हणुन आयते करून मिळाल्यास ऊत्तम!
मला नुसती मेथी किंवा मेथी पालक भजी जास्त आवडतील. उगीच अंडी घालून ती भजी भ्रष्ट कशाला करा?
शुद्ध शाकाहारी भज्यांमध्ये वरणाचा घट्ट गोळा मिसळला की भजी हलकी होतील.
मला नुसती मेथी किंवा मेथी पालक भजी जास्त आवडतील. मलाही!!!!
उगीच अंडी घालून ती भजी भ्रष्ट कशाला करा?..... सहमत.
शुद्ध शाकाहारी भज्यांमध्ये वरणाचा घट्ट गोळा मिसळला की भजी हलकी होतील.
हे माहित नव्हते, वरण घातले तर डाळीचे पीठ घालायचे नाही काय?
प्रतिक्रिया
आयला अंडे उकडलेले हजर हायेत .
भारीच फोटो! पाकृ मग वाचते!
चटपटीत.
कुवैतचे ३१ डिसेंबर.....
In reply to चटपटीत. by गणपा
तेच तर
In reply to कुवैतचे ३१ डिसेंबर..... by मुक्त विहारि
असा उपास सोडायचा असेल तर...
In reply to तेच तर by दिपक.कुवेत
भजी देखणी दिसत आहेत.
>>हि पाकॄ अंडे न घालताहि करता
मला वाटलचं तू हा प्रश्न
In reply to >>हि पाकॄ अंडे न घालताहि करता by सूड
>>बाकि प्रत्यक्ष तू करुन(च)
In reply to मला वाटलचं तू हा प्रश्न by दिपक.कुवेत
हेच विचारायला आले होते, की
In reply to >>बाकि प्रत्यक्ष तू करुन(च) by सूड
होतेत रे सुडक्या. मस्त पकोडे
In reply to >>बाकि प्रत्यक्ष तू करुन(च) by सूड
हायला दिपूकाकाला
In reply to होतेत रे सुडक्या. मस्त पकोडे by अभ्या..
दरवेळी कॉम्प्लिमेंट्स
In reply to हायला दिपूकाकाला by अभ्या..
बघा की हो. आजकाल प्रतिसाद
In reply to दरवेळी कॉम्प्लिमेंट्स by यशोधरा
खडखाव, खडकाव. आपके दिन हय
In reply to बघा की हो. आजकाल प्रतिसाद by अभ्या..
कातील....
ओ नो मुवि
In reply to कातील.... by मुक्त विहारि
सालं शेवटी....
In reply to ओ नो मुवि by दिपक.कुवेत
अंडे न घालता अंडे के पकोडे
पाकृ बघितली नाही आहे.
भयंकर देखणा चखणा !
सुभानअल्लाह !!!
बिन अंड्यांची भजी.
१००% सहमत
In reply to बिन अंड्यांची भजी. by प्रभाकर पेठकर
फोटो मस्त.
फोटो मस्तच
मला नुसती मेथी किंवा मेथी
मला नुसती मेथी किंवा मेथी पालक भजी जास्त आवडतील.मलाही!!!! उगीच अंडी घालून ती भजी भ्रष्ट कशाला करा?..... सहमत.शुद्ध शाकाहारी भज्यांमध्ये वरणाचा घट्ट गोळा मिसळला की भजी हलकी होतील.हे माहित नव्हते, वरण घातले तर डाळीचे पीठ घालायचे नाही काय?>>>>वरण घातले तर डाळीचे पीठ
In reply to मला नुसती मेथी किंवा मेथी by इन्दुसुता
@इंदुसुता,
खल्लास फोटो !
स्नेहातै
ऑस्सम