साहित्यः
१. उकडलेली अंडि - ३
२. हिरव्या मिरच्या/पेरभर आलं बारीक चीरुन
३. १/२ जुडि प्रत्येकि मेथी आणि पालक बारीक चीरुन
४. ओवा - १/२ चमचा
५. हळद - १/२ चमचा
६. बेसन - गरजेप्रमाणे
७. चवीनुसार मीठ
८. चाट मसाला (ऑप्शनल)
९. तळण्यासाठि तेल
कॄती:
१. पकोडे तळण्यासाठि मंद आचेवर कढईत तेल तापत ठेवा
२. एका मोठया बाउल मधे/भांडयात उकडलेली अंडि किसुन घ्या. आता त्यात अनुक्रमे बारीक चीरलेल्या हिरव्या मिरच्या, आलं, मेथी, पालक, ओवा, हळद आणि चवीनुसार मीठ घालुन सारखं करा
३. गरजेप्रमाणे बेसन घालुन भज्यांच्या पीठप्रमाणे भीजवा
४.
गरज लागली तरच पाणी (हबक्याने) घाला अन्यथा पालक/मेथीला जे पाणी सुटतं त्याने ज्यादा पाणी घालायची गरज उरत नाहि
५. गरम तेलात बुडवलेल्या चमच्याने पकोडे गोल्डन बाउन होईस्त तळुन घ्या. पकोडे तळताना आच मंदच असु द्या. मोठया आचेवर तळले तर पकोडे बाहेरुन लाल दिसतील पण आतुन कच्चे लागतील. (गरम तेलात चमचा बुडवुन घेतल्याने पीठ चमच्याला चीकटत नाहि)
६. टिश्यु पेपेरवर काढले कि गरम असतानाच त्यावरुन चाट मसाला भुरभुरा
७. आवडत्या चटणी/सॉस आणि वाफाळणार्या चहासोबत गरमागरम पकोडयांचा आस्वाद घ्या
टीपा:
१. हि पाकॄ अंडे न घालताहि करता येईल :D पण अंडयाची उणीव भरुन काढण्यासाठि त्यात किसलेला फ्लॉवर घालता येईल. पालक-मेथी-फ्लॉवर जरा वेगळं कॉम्बो होईल पण अगदिच वाईटहि लागणार नाहि.
२. अंडयात नुसती मेथी किंवा नुसता पालक घालुनहि करता येईल. मी पालक अश्यासाठि घेतलं ज्याने मेथीचा कडवटपणा जरा कमी झाला
३. कमी तेलात तळण्यासाठि आप्पेपात्राचा उपयोग करता येईल त्या करीता पीठ जरा घट्ट ठेवा आणि थोडया थोडया वेळाने पकोडे गोलाकार फिरवत रहा म्हणजे सर्व बाजुनी सारखे शीजतील
४. ह्या पकोडयांबरोबर तिखट-गोड पुदिना चटणी बेस्ट लागेल (असा आपला माझा अंदाज)