✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मुंबई कट्टा

स
सुबोध खरे यांनी
Sat, 12/14/2013 - 18:26  ·  लेख
लेख
आजच सकाळी मुक्त विहारींकडून असे कळले कि श्री इस्पिकचा एक्का भारतात आले आहेत आणी पुण्यात वास्तव्याला आहेत. आपण त्यांना भेटूया असे आम्ही ठरविले आहे. त्यावर मी त्यांना दूरध्वनी( हा मुक्त विहारीनीच दिला) केला आणी ते शनिवार दिनांक २१ डिसेम्बर रोजी परत विदेशी जात आहेत. त्यांचे विमान सायंकाळी ७.३० ला सुटत आहे आणी त्यांना ४.३० ला चेक इन करायचे आहे म्हणून आम्ही त्यांना सहार विमानतळाजवळ एखाद्या हॉटेल मध्ये साधारण २ वाजता भेटायचे ठरविले आहे. ज्या मित्रांना तेथे येण्याची इच्छा आहे त्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. खर्च स्वतःचा स्वतःने करायचा आहे. (प्रायोजक मिळाला तर सोन्याहून पिवळे) या वेळेत आणी स्थळात बदल होणे नाही. कारण एक्का साहेब थोडा वेळ अगोदर येत आहेत आणी त्यांना चार वाजल्यानंतर थांबणे शक्य नाही. तरी सर्वांनी अगत्य येण्याचे करावे. वय वजन उंची आकार लिंग जात धर्म देश याचे कोणतेही बंधन नाही.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
23549 वाचन

💬 प्रतिसाद (129)

प्रतिक्रिया

हे पुढे फुटबॉलच्या पेनल्टीकीक

विजुभाऊ
Tue, 12/24/2013 - 22:10 नवीन
हे पुढे फुटबॉलच्या पेनल्टीकीक अडवायच्या पोजमधले थोडेसे सुदेश भोसलें सारखे दिसणार्‍या सदगृहस्थांचा परीचय द्या की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अहो, उत्सवमूर्ती इस्पिकचा

खटपट्या
Tue, 12/24/2013 - 23:29 नवीन
अहो, उत्सवमूर्ती इस्पिकचा एक्का आहेत ते !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

(No subject)

सुबोध खरे
Tue, 12/24/2013 - 10:31 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

झकास.

प्रभाकर पेठकर
Tue, 12/24/2013 - 10:35 नवीन
अरे व्वा! सपाटाच लावलाय की छायाचित्रांचा. (कांही छायाचित्र पुनर्प्रकाशित झाली आहेत.)
  • Log in or register to post comments

साहेब फोटो चिकटविण्याचा

सुबोध खरे
Tue, 12/24/2013 - 13:21 नवीन
साहेब फोटो चिकटविण्याचा पहिलाच प्रयत्न आहे त्यामुळे काही फोटो परत चिकटवले गेले असावेत माफ करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

असे नुसते फोटू नाय पायजे.

प्रचेतस
Tue, 12/24/2013 - 11:10 नवीन
असे नुसते फोटू नाय पायजे. वृत्तांत पण पाहिजेच.
  • Log in or register to post comments

फोटोतल्या मिपाकरांची ओळख करून

खटपट्या
Tue, 12/24/2013 - 12:23 नवीन
फोटोतल्या मिपाकरांची ओळख करून द्या लवकर
  • Log in or register to post comments

(No subject)

सुबोध खरे
Tue, 12/24/2013 - 13:14 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

ओळखपरेड

सुधांशुनूलकर
Tue, 12/24/2013 - 16:52 नवीन
डावीकडून - सुधांशुनूलकर, विमे, विलासराव, किसन शिंदे, ज्ञानव, इस्पिक एक्का, भाते, मुक्त विहारी, स्पा. डॉ. सुबोध खरे यांनी हा फोटो काढला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

(No subject)

सुबोध खरे
Tue, 12/24/2013 - 13:15 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

व्रुतांत ????????????????????

जेपी
Tue, 12/24/2013 - 13:16 नवीन
व्रुतांत ?????????????????????????????????????????????????????????????????
  • Log in or register to post comments

(No subject)

सुबोध खरे
Tue, 12/24/2013 - 13:17 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

मुवि काका का लत्तात?

प्यारे१
Wed, 12/25/2013 - 21:30 नवीन
मुवि काका का लत्तात? काय जालं? तुमाला कोन दिस्शं का? गेत्तिंकल/ चीन्स आलेला का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

>>मुवि काका का लत्तात?

सूड
गुरुवार, 12/26/2013 - 14:17 नवीन
>>मुवि काका का लत्तात? छे, त्यांच्या डोळ्यात काहीतरी गेलं असेल. एरवी तुमच्याइतकं छान रडता येणारे का कोणाला प्यारेकाका, तुम्हीपण ना कम्माल करता !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

कोणीतरी(लेखक) आतातरी लेख/

सुबोध खरे
Tue, 12/24/2013 - 13:29 नवीन
कोणीतरी(लेखक) आतातरी लेख/ वृत्तांत टाका की.
  • Log in or register to post comments

Tonight... Was waiting for

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 12/24/2013 - 15:10 नवीन
Tonight... Was waiting for photos.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

ह्यातले

दिपक.कुवेत
Tue, 12/24/2013 - 13:32 नवीन
स्पावडया (निळा चेक्सचा शर्ट), विमे (लाल टि शर्ट), मुवि (एक डोळा चोळतानाचे), एक्का तर माहितच आहेत, किसन शींदे (पिवळा टि शर्ट), सुबोधजी (ग्रे कलर शर्ट)....बाकिचे माहित नाय.
  • Log in or register to post comments

पुणे कट्ट्यांच्या तुलनेत

मस्त कलंदर
Tue, 12/24/2013 - 14:02 नवीन
पुणे कट्ट्यांच्या तुलनेत स्त्री सदस्यांच्या उपस्थितीचे प्रमाण कमी दिसते.. नाही म्हणजे आमचा विमे म्हणतो तसे 'जाताजाता आपले निरिक्षण नोंदवले'
  • Log in or register to post comments

>>पुणे कट्ट्यांच्या तुलनेत

सूड
Tue, 12/24/2013 - 14:27 नवीन
>>पुणे कट्ट्यांच्या तुलनेत स्त्री सदस्यांच्या उपस्थितीचे प्रमाण कमी दिसते.. अर्रर्र लैच!! पुणे कट्ट्याला स्त्रिया येतात हे कोणी सांगितलं बयो तुला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

अगदी अगदी!!

बॅटमॅन
Tue, 12/24/2013 - 14:48 नवीन
आता "मआंजावर ठरलेल्या कट्ट्यांना स्त्रियांची उपस्थिती कमी का असते?" असा पुनरेकवार धागा येऊदे ;) (मक म्याम हल्के घेणे- न घेतल्यास अंमळ लोड इकडे पाठवून देणे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अभ्यास वाढव रे सूड..

मस्त कलंदर
Tue, 12/24/2013 - 15:10 नवीन
अभ्यास वाढव रे सूड..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अनाहिता कट्टा (कट्टी)?

प्रभाकर पेठकर
Tue, 12/24/2013 - 16:16 नवीन
आता 'अनाहिताचे' (असेच कांहीतरी नांव आहे नं?) 'महिला मंडळी' कट्टे सुरु होतील.
  • Log in or register to post comments

होतील??? झाले सुद्धा!

पिलीयन रायडर
Tue, 12/24/2013 - 17:44 नवीन
होतील??? झाले सुद्धा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

हो, असतीलही!! तुमचा सगळा

सूड
Tue, 12/24/2013 - 18:17 नवीन
हो, असतीलही!! तुमचा सगळा सोवळ्यातला कारभार आहे ना. :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

सोवळ्यातला कार्भार>>>>>

बॅटमॅन
Tue, 12/24/2013 - 18:28 नवीन
सोवळ्यातला कार्भार>>>>> =)) अशक्य वारल्या गेले आहे =)) :yahoo: =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

हां मग?

पैसा
Tue, 12/24/2013 - 18:34 नवीन
कट्टा करून वृत्तांत टाकला तर कोणीतरी येऊन सांगायचा, "ह्या:, हा काय कट्टा आहे? आम्ही कसे तेव्हा पिऊन रात्रभर पडत होतो!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

बस का?

प्रचेतस
Tue, 12/24/2013 - 18:36 नवीन
बस का? आमच्या कट्ट्यात कधी असं झालेलं दिसलंय का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हीहीही!

पैसा
Tue, 12/24/2013 - 18:38 नवीन
तुम्ही ताक पिता. पडताय कसले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

छ्या. काही लोक भांडे लपवून

प्रचेतस
Tue, 12/24/2013 - 18:46 नवीन
छ्या. काही लोक भांडे लपवून ठेवतात उगा. बाकी अनाहिताची ट्रिप वैग्रे निघते का नाय कधी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

+१

बॅटमॅन
Tue, 12/24/2013 - 18:48 नवीन
सहमत आहे. भांडेच लपविल्यावर कुठले ताक अन कुठली साय =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

कमेंटींची इतकी भीती वाटते

बॅटमॅन
Tue, 12/24/2013 - 18:40 नवीन
कमेंटींची इतकी भीती वाटते म्हणूनच सगळं सोवळ्याआड सुरूये तर =)) समजलं, चालूदे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

कमेंटांची भिती माझं खेटर..

पिलीयन रायडर
गुरुवार, 12/26/2013 - 11:43 नवीन
कमेंटांची भिती माझं खेटर.. आणि स्वतंत्र विभाग काढण्यासाठी जेव्हा पुरूष लोक एका धाग्यावर बोंबा मारत होते तेव्हा तुम्हाला नक्की कुणाच्या कमेंटांची भिती वाटत होती?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ते नाकावरच्या रागाच्या औषधाचं

बॅटमॅन
गुरुवार, 12/26/2013 - 12:36 नवीन
ते नाकावरच्या रागाच्या औषधाचं गाणं कुठलं हो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

"निघता विषय बालिकांचा.. पहा

पिलीयन रायडर
गुरुवार, 12/26/2013 - 13:18 नवीन
"निघता विषय बालिकांचा.. पहा येई लगोलग कोण.. लागता विरोधी सुर स्त्रिद्वेष्ट्यांचा.. नाक खुपसे ब्याटम्यान"... हेच का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आम्ही स्त्रीद्वेष्टेविरोधी

बॅटमॅन
गुरुवार, 12/26/2013 - 13:58 नवीन
आम्ही स्त्रीद्वेष्टेविरोधी असल्याचे कबूल केल्याबद्दल धन्यवाद! बाकी तो नाकावरचा शेंड्यावरील राग इथूनही दिसतोय बरे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

मतप्रदर्शन केले असते. पण उगाच

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 12/26/2013 - 14:43 नवीन
मतप्रदर्शन केले असते. पण उगाच संपादिकांची कामे का वाढवा, म्हणून थत्ते चाचा व्हायचे ठरवले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

असे व्हायचा प्रयत्न करतो आहे

बॅटमॅन
गुरुवार, 12/26/2013 - 14:48 नवीन
असे व्हायचा प्रयत्न करतो आहे पण अजून वास्तव स्वीकारण्याइतका निगरगट्टपणा नै आलेला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

पिरा ताई,

सुबोध खरे
गुरुवार, 12/26/2013 - 12:54 नवीन
पिरा ताई, लोकांना कुणाच्या कॉमेंटची भीती वाटत नव्हती तर GOLF ( GENTLEMEN ONLY LADIES FORBIDDEN ) अशा प्रतिसादासाठी स्वतंत्र विभाग काढावा असे काथ्या कूट चालले होते. अजूनतरी आपली मिपा संस्कृती स्त्रियांसमोर सभ्य शब्दात बोलावे असे सांगते. आता तुम्ही फोडून सांगा म्हणताय म्हणून सांगितले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

खरे काका..

पिलीयन रायडर
गुरुवार, 12/26/2013 - 13:13 नवीन
खरे काका.. तोच तर मुद्दा आहे ना.. भिती हे कारण नाहीये "अनाहिता" च्या निर्मिती मागे.. (आणि तसंही, मि.पा वरच्या बायका कमेंटस ना भितील??) जसं तुम्हाला तुमचे विषय आहेत, तसे आम्हाला आमचे.. आम्हालाही आमच्या असभ्य गप्पा मारायच्या असतील तर!? सो तुम्हाला तुमचा विभाग हवा की नको आणि का हवा ह्यावर बायका चर्चा करणार नाहित (ह्या उलट अनाहिता बद्दल मात्र पुरूषांनी पण हिरीरीने चर्चा केल्या होत्या.. असो..).. पण तुमचा विभाग निघालाच तर त्या मागची कारणं आम्हाला नक्की माहीती असतील.. "घाबरले म्हणुन स्वतःचा विभाग काढला रे.." असले फालतु मुद्दे आम्ही काढणार नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

पिरा ताई

सुबोध खरे
गुरुवार, 12/26/2013 - 13:58 नवीन
पिरा ताई अहो बैट मैन चे अजून लग्न झालेले नाही त्यामुळे त्याला बायकांच्या गप्पात कुतूहल असणारच. एकदा लग्न होउदे म्हणजे मग त्या काय गप्पा मारतात त्याबद्दल काहीच स्वारस्य राहणार नाही. बायकांचे आवडते विषय म्हणजे मुले, दागिने किंवा खरेदी आणि मोलकरीण. एकदा त्याला कळूदे मग पहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

b + E - बॅ

प्यारे१
गुरुवार, 12/26/2013 - 14:03 नवीन
b + E - बॅ m+ E - मॅ s+ O - सॉ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

कुतूहल तादृश कै नै.

बॅटमॅन
गुरुवार, 12/26/2013 - 14:11 नवीन
कुतूहल तादृश कै नै. किमानपक्षी अनाहितामध्ये प्रवेश मिळवावा इथवर तर नाहीच नाही. अन लग्न न झाले तरी बर्‍याच पोरींचं संभाषण ऐकलं आहे अन महिलांचंही. तेवढा विदा पुरेसा आहे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

"आपल्याला (पक्षी: ब्याट्याला)

पिलीयन रायडर
गुरुवार, 12/26/2013 - 14:27 नवीन
"आपल्याला (पक्षी: ब्याट्याला) अनुभव नाही"...हे ब्याट्या मान्य करेल तो सुदिन..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अनुभव नक्की कशाचा नाही आणि

बॅटमॅन
गुरुवार, 12/26/2013 - 14:30 नवीन
अनुभव नक्की कशाचा नाही आणि नक्की कशाचा अनुभव इथे रिलेव्हंट आहे पिरा आज्जी? बैकांचे बोलण्याचे विषय काय असतात हे कळायला लग्न व्हावं लागत असेल तर तो पुरुष दुर्दैवी समजला पाहिजे. लग्न झालं नाही याचा अर्थ आमच्या आसपास स्त्रीजात वावरत नाही असा होत नाही हे तुम्हांस कळेल तो सुदिन. भ्रमाच्या भोपळ्याचे भरीत करून खा जावा जरा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

अगदी हेच लिहायला आले होते, की

कवितानागेश
गुरुवार, 12/26/2013 - 15:44 नवीन
अगदी हेच लिहायला आले होते, की ब्याट्याला काही कळत नाहीये. पण "घाबरले" म्हणून लिहिलं नाही! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

हो आहे सोवळ्यातला कारभार..

पिलीयन रायडर
गुरुवार, 12/26/2013 - 11:40 नवीन
हो आहे सोवळ्यातला कारभार.. झालच तर माजघरातल्या गप्पा.. वगैरे वगैरे.. तुम्हाला का जळजळतय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

जर तसे असेल तर माजघरातल्या

बॅटमॅन
गुरुवार, 12/26/2013 - 12:38 नवीन
जर तसे असेल तर माजघरातल्या गप्पांना माजघरातल्या गप्पा म्हणण्याने जळजळ क्कॉ बर्रे होत्तेय ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

कुणाला जळजळ होतेय? माजघर हा

पिलीयन रायडर
गुरुवार, 12/26/2013 - 13:08 नवीन
कुणाला जळजळ होतेय? माजघर हा शब्द आम्हाला नाही बुवा टोचत.. त्यात वाईट ते काय? आणि हो.. बालसंगोपन, झबल्यांचे डिझाईन, नट्टापट्टा हे ही आमचे लाडके विषय आहेत.. आम्हाला जे आवडतं त्या बद्दल आम्ही खुष आहोत.. आणि माजघरात बसुन निवांत गप्पा मारणेही आमचा आयुष्याचा महत्वाचा भाग आहे.. ह्यात जळजळ कुठे आहे दादा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ते "हो आहेत या माजघरातल्या

बॅटमॅन
गुरुवार, 12/26/2013 - 14:00 नवीन
ते "हो आहेत या माजघरातल्या गप्पा...तुमाला प्राब्ळम??" वैग्रे वाचून अंमळ जळका वास आला हो तै. बाकी जळजळ होत नाही ना, मग उत्तमच आहे. तेवढाच इनो वाचला..काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

तुला लईच जळके वास यायला

पिलीयन रायडर
गुरुवार, 12/26/2013 - 14:25 नवीन
तुला लईच जळके वास यायला लागलेत रे.. काही जळो अथवा न जळो.. ब्याट्याला वास येणारच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा