'गाय' चे चोवीस कोटींचे चित्र, आणि साबरमतीच्या संताचे टमरेल
.
'गाय' चं एक चित्र मुंबईतल्या एका लिलावात सुमारे चोवीस कोटी रुपयात विकलं गेलंय म्हणे.
'गाय' हा थोर आधुनिक भारतीय चित्रकार.
त्यामुळे समस्त थोर्थोर आधुनिक भारतीय चित्रकारांचा ऊर अभिमानानं दाटून आलाय, आणि त्यांची आशा पल्लवित झालीय म्हणे.
त्यातून 'गाय' हा मराठी माणूस. मुंबईकर.
त्यामुळे तमाम मराठी मुंबईकरांचा ऊर अभिमानानं दाटून आलाय, आणि त्यांची आशा पल्लवित झालीय म्हणे.
'गाय' थंडीत मफलर गुंडाळून हिंडायचा.
त्यामुळे समस्त थंडीत मफलर गुंडाळून हिंडणार्यांचा ऊर अभिमानानं दाटून आलाय, आणि त्यांची आशा पल्लवित झालीय म्हणे.
'गाय' बूट घालत नसे, सँडिलं वापरायचा. त्यामुळे तमाम बूट न घालता सँडिलं वापरणारांचा ऊर अभिमानानं दाटून आलाय, आणि त्यांची आशा पल्लवित झालीय म्हणे....
***
'गाय'चं एक चित्र चोवीस कोटींना विकत घेणार्या नरपुंगवा, नरशार्दुला, तुला कोटि कोटि प्रणाम.
आता लवकरच तू ते चित्र चाळीस कोटीत विकशील, मग तो चाळीस कोटीवाला पुढे ते साठ कोटीत विकेल....
हे नरपुंगवांनो, 'गाय' जेंव्हा हयात होता, तेंव्हा तुम्ही हेच चित्र खुद्द त्याच्याकडून चोवीस लाखात, किंवा चोवीस हजारात जरी घेता, तर तो औषध-पाणी करता, स्वतःचे घर बांधता, आरामात राहता....
.... पण पाण्यासाठी रानावनात वणवण फिरणारी एकादी गाय हेरून, उंच आकाशात घिरट्या घालत तिच्यावर नजर ठेवणारांची तुमची जमात.
ती गाय शेवटी कोसळली, की मग झडप घालून तुम्ही तिचे लचके तोडणार.
आमचा 'गाय' विझत चालल्यावर तुम्ही त्याच्यावर एक फिल्म बनवून घेतलीत, आणि जगभरात दाखवलीत म्हणे. त्यात 'गाय' च्या स्टुडियोत सर्वत्र ठाण मांडून बसलेली धूळ, जळमटं, आणि त्या सर्वात अगदी अविचल, निर्विकार, पुतळ्यासारखा बसलेला, निर्लिप्त 'गाय' दाखवलाय म्हणे.
गाय कोसळत चालल्याची बातमी पसरवण्याचा हा इशारा तर नव्हता?
आता 'गाय' च्या चित्रांची किंमत सदैव आणखी आणखी वाढत रहावी, म्हणून देश-विदेशात मोठमोठी प्रदर्शने भरवली जातील. थोर-थोर समिक्षकांना हाताशी धरून त्यांच्याकडून 'गाय' वर अखंड स्तुतिसुमने उधळली जात रहातील....
***
गाय, चोवीस कोटींची ही बातमी वाचून मला जुने दिवस आठवले... तेंव्हा तुम्ही साठीत, तर मी तिशीत असेन. तुम्ही माझे आदर्श होता. मी तुम्हाला भेटायला यायचो, तेंव्हा तुम्ही आपुलकीनं चवकशी करायचात, मी करत असलेल्या धडपडीचं, माझ्या चित्रांचं तुम्हाला कौतुक वाटायचं... पण तुम्ही स्वतःविषयी, तुमच्या चित्रांविषयी मात्र कधीच काही बोलला नाहीत.
पुढे पुढे तुम्ही खूप अलिप्त होऊ लागलात. तुमच्या स्टुडियोत सर्वत्र धुळीची पुटं, कोळीष्टकं जमू लागली. मी फार व्यथित व्हायचो हे सर्व बघून. एकदोनदा "रविवारी मी येऊन सगळं स्वच्छ करून देतो" असं मी म्हटलं, त्यावर तुम्ही फक्त 'असू दे तसंच' म्हणालात... काही काळानंतर तुम्ही गेल्याचीच बातमी आली.
गाय, अलिकडे तीन-चार वर्षांपूर्वी दिल्लीतला एक कला-व्यापारी माझ्याकडे हळहळ व्यक्त करता झाला. त्यानं तुमच्याकडून पुष्कळ वर्षांपूर्वी प्रत्येकी शंभर-शंभर रुपयात चार चित्रे खरेदी केली होती. आणि काही वर्षांनी ती सव्वा-सव्वा लाखात विकली होती. अर्थात त्या पाच लाखातून तुम्हाला काही देण्याचा विचार त्याच्या मनात येण्याचा प्रश्नच नव्हता. तर त्यानं माझ्याकडे व्यक्त केलेली हळहळ अशी: " अरे यार, मै और कुछ साल रुकता, तो आज एकेक पेंटिंग सत्तर-अस्सी लाखमे बेचता"
... आता चोवीस कोटींची बातमी ऐकून त्याची हळहळ किती वाढली असेल ?
***
हे लिलावकर्तेहो, तुम्ही केवळ महान. गीतेत सांगितलंय, 'समत्वं योग उच्यते' तर तुम्ही महान योगीच. परब्रम्हाचे उपासक. आप-पर भेद तुम्हासि नाही. तुमच्या लेखी सर्व सारखे. कुणाचे चित्र, तर कुणाचा पंचा, कुणाची तलवार, तर कुणाचा चष्मा. कुणाची कवळी तर कुणाचे टमरेल. सर्व सारखे. सर्व लिलाव करण्याच्या वस्तु.
तुम्हाला कोटि कोटि प्रणिपात.
***
आता लवकरच बातमी येईल, साबरमतीच्या संतानं वापरलेलं टमरेल अमूक इतक्या कोटीत लिलावातून विकलं गेलं...
... हे ऐकून बोहरा गल्लीतल्या सर्व टमरेलं विकणार्यांचा ऊर अभिमानानं दाटून येईल आणि त्यांची आशा पल्लवित होईल...
... 'साबरमती के संत तुने कर दिया कमाल, रघुपति राघव, राजाराम' या गाण्याची सिडी विकणार्यांचाही ऊर अभिमानानं दाटून येईल, आणि त्यांची आशा पल्लवित होईल...
जय महाराष्ट्र. भारतमाताकी जय. जय हो.
In reply to +१११ by राही
गायतोंडे स्वतःच लोकांना टाळत होते म्हणतात. खरे आहे का ते?माझा स्वतंचा तरी तसा अनुभव नाही. बाकी प्रसिद्ध व्यक्तींना नको त्या लोकांचा उपद्रव जास्त होत असतो, अश्या लोकांना ते टाळत असतीलही.
In reply to प्रश्न by आतिवास
In reply to वाईट वाटलं. by पैसा
गाय, चोवीस कोटींची ही बातमी वाचून मला जुने दिवस आठवले... तेंव्हा तुम्ही साठीत, तर मी तिशीत असेन. तुम्ही माझे आदर्श होता. मी तुम्हाला भेटायला यायचो, तेंव्हा तुम्ही आपुलकीनं चवकशी करायचात, मी करत असलेल्या धडपडीचं, माझ्या चित्रांचं तुम्हाला कौतुक वाटायचं... पण तुम्ही स्वतःविषयी, तुमच्या चित्रांविषयी मात्र कधीच काही बोलला नाहीत. पुढे पुढे तुम्ही खूप अलिप्त होऊ लागलात. तुमच्या स्टुडियोत सर्वत्र धुळीची पुटं, कोळीष्टकं जमू लागली. मी फार व्यथित व्हायचो हे सर्व बघून. एकदोनदा "रविवारी मी येऊन सगळं स्वच्छ करून देतो" असं मी म्हटलं, त्यावर तुम्ही फक्त 'असू दे तसंच' म्हणालात..मला गायतोंडे साहेबांबद्दल जास्त माहित नाही, प्रचंड कुतूहल मात्र आहे. त्यांच्यावर लघुपट बनवणाऱ्या श्री सुनील काळदाते यांचा खालील लेख बरच काही सांगून जातो http://epaper.loksatta.com/201959/indian-express/22-12-2013#page/9/2
In reply to हे वर दाखवलेले चित्र हेच by प्रचेतस
In reply to चित्रगुप्त जी - हे २४ कोटीला by प्रसाद१९७१
In reply to प्रसादराव उलगडून सांगितले तरी by अभ्या..
In reply to चित्रगुप्त जी - हे २४ कोटीला by प्रसाद१९७१
In reply to ये अर्थशास्त्र का मामला है by चित्रगुप्त
In reply to चित्रगुप्त जी - मला ते चित्र by प्रसाद१९७१
In reply to ये अर्थशास्त्र का मामला है by चित्रगुप्त
In reply to चित्रगुप्त जी - हे २४ कोटीला by प्रसाद१९७१
In reply to विकत घेणारा आहे म्हणून .... by सुनील
In reply to विकत घेणारा तरी का आहे? तर by चित्रगुप्त
तर त्याला वाटते, की काही काळानंतर त्या वस्तूची किंमत आणखी जास्त वाढेल, तेंव्हा ती मी विकेन.हेच! शेअर विकत घेणारादेखिल ह्याच कारणांसाठी घेत असतो. ICICI घेणाराला बँकिंगविषयी किंवा इन्फोसिस घेणाराला आयटीतील शष्पदेखिल कळायची गरज नसते! चित्राबाबतही हेच!
In reply to विकत घेणारा तरी का आहे? तर by चित्रगुप्त
In reply to बनाव म्हणले की मला ती रैना का by अभ्या..
In reply to कोण ही रैना का नैना ? by चित्रगुप्त
In reply to विकत घेणारा आहे म्हणून .... by सुनील
In reply to साहेब ICICI बँकेचा समभाग ११०० by सुबोध खरे
कलेची किंमत ठरविण्याचे कोणतेही निकष नाहीत.अगदी खरे. जंगलाचा कायदाच तिथे चालतो. जिसकी लाठी उसकी भैस. यावरून हे आठवले: तेरा वर्षांपूर्वी मुंबईतील एका कितितरी स्टार हॉटेलाने 'मिलेनियम नाईट' ला संगीताचा कार्यक्रम करण्याचे ठरवले. त्यासाठी पंडित भीमसेन जोशी यांनी दीड लाख रुपये घेईन सांगितले, तर 'तुनुक तुनुक तुन धा धा धा' वाला सरदारजी (नाव विसरलो) त्याने सत्तर लाख रुपये मागितले. बहुधा हा कार्यक्रम शेवटी झालाच नाही. (तेंव्हा त्या हॉटेलातील एका अधिकार्याने हे सांगितले होते, सदर कार्यक्रम झाला होता का, असल्यास कुणाचा, हे अजून विचारू शकतो)
In reply to ऑ ? by सोत्रि
कुठली कलाकृती! अन कोणते टमरेल! याच्या व्याख्यामस्त, अगदी गाभ्यालाच हात घातलात मालक.
*** 'गाय'चं एक चित्र चोवीस कोटींना विकत घेणार्या नरपुंगवा, नरशार्दुला, तुला कोटि कोटि प्रणाम. आता लवकरच तू ते चित्र चाळीस कोटीत विकशील, मग तो चाळीस कोटीवाला पुढे ते साठ कोटीत विकेल....
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- I'm a Peaky Blinder ( Official Video )
गायतोंडे यांची चित्र अनेकांना एवढी विलक्षण का वाटतात, हे त्या चित्रांचे फोटो पाहून लक्षात येणार नाही. कारण फोटोंमधून चित्राचा आकार, रंगाचे थर, त्यातला प्रवाहीपणा समजून घेता येत नाही. त्यासाठी ती चित्रं प्रत्यक्ष पाहावी लागतात. अशा चित्रांचा अर्थ लावायचा नसतो, तर अनुभव घ्यायचा असतो. तो अनुभव कधी मनाला शांत करतो, कधी आत खोलवर हादरवून टाकतो, पण काही झालं तरी समृद्ध करून जातो.... एकदम बरोबर.
+१११