.
'गाय' चं एक चित्र मुंबईतल्या एका लिलावात सुमारे चोवीस कोटी रुपयात विकलं गेलंय म्हणे.
'गाय' हा थोर आधुनिक भारतीय चित्रकार.
त्यामुळे समस्त थोर्थोर आधुनिक भारतीय चित्रकारांचा ऊर अभिमानानं दाटून आलाय, आणि त्यांची आशा पल्लवित झालीय म्हणे.
त्यातून 'गाय' हा मराठी माणूस. मुंबईकर.
त्यामुळे तमाम मराठी मुंबईकरांचा ऊर अभिमानानं दाटून आलाय, आणि त्यांची आशा पल्लवित झालीय म्हणे.
'गाय' थंडीत मफलर गुंडाळून हिंडायचा.
त्यामुळे समस्त थंडीत मफलर गुंडाळून हिंडणार्यांचा ऊर अभिमानानं दाटून आलाय, आणि त्यांची आशा पल्लवित झालीय म्हणे.
'गाय' बूट घालत नसे, सँडिलं वापरायचा. त्यामुळे तमाम बूट न घालता सँडिलं वापरणारांचा ऊर अभिमानानं दाटून आलाय, आणि त्यांची आशा पल्लवित झालीय म्हणे....
***
'गाय'चं एक चित्र चोवीस कोटींना विकत घेणार्या नरपुंगवा, नरशार्दुला, तुला कोटि कोटि प्रणाम.
आता लवकरच तू ते चित्र चाळीस कोटीत विकशील, मग तो चाळीस कोटीवाला पुढे ते साठ कोटीत विकेल....
हे नरपुंगवांनो, 'गाय' जेंव्हा हयात होता, तेंव्हा तुम्ही हेच चित्र खुद्द त्याच्याकडून चोवीस लाखात, किंवा चोवीस हजारात जरी घेता, तर तो औषध-पाणी करता, स्वतःचे घर बांधता, आरामात राहता....
.... पण पाण्यासाठी रानावनात वणवण फिरणारी एकादी गाय हेरून, उंच आकाशात घिरट्या घालत तिच्यावर नजर ठेवणारांची तुमची जमात.
ती गाय शेवटी कोसळली, की मग झडप घालून तुम्ही तिचे लचके तोडणार.
आमचा 'गाय' विझत चालल्यावर तुम्ही त्याच्यावर एक फिल्म बनवून घेतलीत, आणि जगभरात दाखवलीत म्हणे. त्यात 'गाय' च्या स्टुडियोत सर्वत्र ठाण मांडून बसलेली धूळ, जळमटं, आणि त्या सर्वात अगदी अविचल, निर्विकार, पुतळ्यासारखा बसलेला, निर्लिप्त 'गाय' दाखवलाय म्हणे.
गाय कोसळत चालल्याची बातमी पसरवण्याचा हा इशारा तर नव्हता?
आता 'गाय' च्या चित्रांची किंमत सदैव आणखी आणखी वाढत रहावी, म्हणून देश-विदेशात मोठमोठी प्रदर्शने भरवली जातील. थोर-थोर समिक्षकांना हाताशी धरून त्यांच्याकडून 'गाय' वर अखंड स्तुतिसुमने उधळली जात रहातील....
***
गाय, चोवीस कोटींची ही बातमी वाचून मला जुने दिवस आठवले... तेंव्हा तुम्ही साठीत, तर मी तिशीत असेन. तुम्ही माझे आदर्श होता. मी तुम्हाला भेटायला यायचो, तेंव्हा तुम्ही आपुलकीनं चवकशी करायचात, मी करत असलेल्या धडपडीचं, माझ्या चित्रांचं तुम्हाला कौतुक वाटायचं... पण तुम्ही स्वतःविषयी, तुमच्या चित्रांविषयी मात्र कधीच काही बोलला नाहीत.
पुढे पुढे तुम्ही खूप अलिप्त होऊ लागलात. तुमच्या स्टुडियोत सर्वत्र धुळीची पुटं, कोळीष्टकं जमू लागली. मी फार व्यथित व्हायचो हे सर्व बघून. एकदोनदा "रविवारी मी येऊन सगळं स्वच्छ करून देतो" असं मी म्हटलं, त्यावर तुम्ही फक्त 'असू दे तसंच' म्हणालात... काही काळानंतर तुम्ही गेल्याचीच बातमी आली.
गाय, अलिकडे तीन-चार वर्षांपूर्वी दिल्लीतला एक कला-व्यापारी माझ्याकडे हळहळ व्यक्त करता झाला. त्यानं तुमच्याकडून पुष्कळ वर्षांपूर्वी प्रत्येकी शंभर-शंभर रुपयात चार चित्रे खरेदी केली होती. आणि काही वर्षांनी ती सव्वा-सव्वा लाखात विकली होती. अर्थात त्या पाच लाखातून तुम्हाला काही देण्याचा विचार त्याच्या मनात येण्याचा प्रश्नच नव्हता. तर त्यानं माझ्याकडे व्यक्त केलेली हळहळ अशी: " अरे यार, मै और कुछ साल रुकता, तो आज एकेक पेंटिंग सत्तर-अस्सी लाखमे बेचता"
... आता चोवीस कोटींची बातमी ऐकून त्याची हळहळ किती वाढली असेल ?
***
हे लिलावकर्तेहो, तुम्ही केवळ महान. गीतेत सांगितलंय, 'समत्वं योग उच्यते' तर तुम्ही महान योगीच. परब्रम्हाचे उपासक. आप-पर भेद तुम्हासि नाही. तुमच्या लेखी सर्व सारखे. कुणाचे चित्र, तर कुणाचा पंचा, कुणाची तलवार, तर कुणाचा चष्मा. कुणाची कवळी तर कुणाचे टमरेल. सर्व सारखे. सर्व लिलाव करण्याच्या वस्तु.
तुम्हाला कोटि कोटि प्रणिपात.
***
आता लवकरच बातमी येईल, साबरमतीच्या संतानं वापरलेलं टमरेल अमूक इतक्या कोटीत लिलावातून विकलं गेलं...
... हे ऐकून बोहरा गल्लीतल्या सर्व टमरेलं विकणार्यांचा ऊर अभिमानानं दाटून येईल आणि त्यांची आशा पल्लवित होईल...
... 'साबरमती के संत तुने कर दिया कमाल, रघुपति राघव, राजाराम' या गाण्याची सिडी विकणार्यांचाही ऊर अभिमानानं दाटून येईल, आणि त्यांची आशा पल्लवित होईल...
जय महाराष्ट्र. भारतमाताकी जय. जय हो.
वाचने
44488
प्रतिक्रिया
61
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१११
लोकांना टाळणे
In reply to +१११ by राही
.
चान चान
प्रश्न
सहमत.
In reply to प्रश्न by आतिवास
इतिहासाची बाजारवाट
वाईट वाटलं.
असे कसे म्हणता. मायवतीनी नाही
In reply to वाईट वाटलं. by पैसा
कलेच्या बाजारपेठेत किमती ठरवणे
ह्यावरून का कुणास ठावूक पण....
चित्रकलेत बराच रस असूनसुद्धा
ट्यांव ...रेपरन्स लागेना हो
परिणामकारक
साबरमतीचं टमरेलं अजून ठीकठाक
व्यापारी वृत्ती मराठी माणसात नाही
गाय, चोवीस कोटींची ही बातमी
काही दधिंचीं'च्या हाडांना फार
ह्म्म,
हे वर दाखवलेले चित्र हेच
गायतोंडेंचे चित्र
In reply to हे वर दाखवलेले चित्र हेच by प्रचेतस
निव्वळ अप्रतिम
मागणी व पुरवठा या तत्त्वाला
चित्रगुप्त जी - हे २४ कोटीला
प्रसादराव उलगडून सांगितले तरी
In reply to चित्रगुप्त जी - हे २४ कोटीला by प्रसाद१९७१
कळण्याची शक्यता अगदीच थोडी
In reply to प्रसादराव उलगडून सांगितले तरी by अभ्या..
ये अर्थशास्त्र का मामला है
In reply to चित्रगुप्त जी - हे २४ कोटीला by प्रसाद१९७१
चित्रगुप्त जी - मला ते चित्र
In reply to ये अर्थशास्त्र का मामला है by चित्रगुप्त
अमुक एक चित्र समजून घेणे
In reply to चित्रगुप्त जी - मला ते चित्र by प्रसाद१९७१
कसले अर्थशास्त्र?
In reply to ये अर्थशास्त्र का मामला है by चित्रगुप्त
श्रीमंतीची जाहिरात.
In reply to चित्रगुप्त जी - हे २४ कोटीला by प्रसाद१९७१
विकत घेणारा आहे म्हणून ....
विकत घेणारा तरी का आहे? तर
In reply to विकत घेणारा आहे म्हणून .... by सुनील
हेच!
In reply to विकत घेणारा तरी का आहे? तर by चित्रगुप्त
बनाव म्हणले की मला ती रैना का
In reply to विकत घेणारा तरी का आहे? तर by चित्रगुप्त
कोण ही रैना का नैना ?
In reply to बनाव म्हणले की मला ती रैना का by अभ्या..
अहो ते "लेडीज व्हर्सेस रिकी
In reply to कोण ही रैना का नैना ? by चित्रगुप्त
साहेब ICICI बँकेचा समभाग ११००
In reply to विकत घेणारा आहे म्हणून .... by सुनील
भीमसेन आणी तुनुक तुनुक तुन धा धा धा वाला
In reply to साहेब ICICI बँकेचा समभाग ११०० by सुबोध खरे
लेख अप्रतिम झाला आहे
आपल्याला बी काई परसन
ऑ ?
या बाबतीत कायदा हवा
In reply to ऑ ? by सोत्रि
कलाकृती आणि टमरेल
कुठली कलाकृती! अन कोणते टमरेल!
बर ते जाऊ दे... मी काय म्हणतो ते ऐका....
लेख प्रचंड आवडला
दिल्लीतील कला व्यापारी
आज आलेल्या बातमीने हा धागा
लेख
चित्र अव्वाच्यासव्वा भावात
लेख अंतर्मुख करणारा!
सुंदर मर्मस्पर्शी लेख लिवलाय
योगायोग
लेखाच्या निमित्ताने...
आज परत बातमी
६० कोटींना विक्री झाल्यावर हा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- I'm a Peaky Blinder ( Official Video )मेल्यावर चित्रांना किंमत येते असं नाही.
कंजूस साहेब +१
BBC marathi वरील न्यूज
@ Rajesh188: एकदम बरोबर.