Skip to main content

संयमाची रेघ..

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 26/09/2008 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
वादळांचे श्वास होते भावनांचे मेघ ही मीलनाची ओढ होती संयमाची रेघही ओठ नाही त्या गुलाबी दोन होत्या पाकळ्या चुंबताना होत काटेरी जरासा स्पर्शही कामिनीचे रूप पाहू दे मला गे सुंदरी रोखले मी श्वास आणी सोसला आवेगही तारकांचे गूज सांगे रातराणी गंधुनी चांदण्याशी रासक्रीडा खेळला ना चंद्रही पश्चिमेचा गारवारा का सुगंधी वाहिला संयमाची तो परिक्षा घेत आहे आजही - प्राजु
Taxonomy upgrade extras

वाचने 7379
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

तारकांचे गूज सांगे रातराणी गंधुनी चांदण्याशी रासक्रीडा खेळला ना चांदही सुंदर ओळी.. तरल कविता,आवडली. स्वाती

कविता आवडली. चांदण्याशी रासक्रीडा खेळला ना चांदही येथे चंद्रही असे चालेल का? मला मध्येच चांद हा शब्द खटकला. मला कवितेतले कळत नाही. सूचना योग्य नसेल तर दुर्लक्षावी ! --लिखाळ.

In reply to by लिखाळ

ते चंद्र असंच होतं .. स्वातीताईला वाचून दाखवताना चंद्र च वाचलं.. पण तिथे चांद राहिलं.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

पण मला चांदही खटकलं नाही..चांद मातला मातला.. ह्या गाण्याची आठवण झाली. स्वाती

In reply to by प्राजु

गंधुनी वाचल्यावर खाली चंद्रही वाचणे बरे वाटते. चांदही मधल्या द वर जोर येत नव्हता म्हणून सुचवले. -- लिखाळ.

क्या बात है !!! सुंदर कविता.

In reply to by नंदन

नंदनच्या मताशी सहमत. प्राजु कविता आवडली :)

In reply to by नंदन

परस्परविरोधी भावनांचा खेळ असेच म्हणतो.मला कविता चक्क समजली. नाय तर हल्ली मी प्लेन टेक्स्ट्ला पण सायफर टेक्स्ट समजुन डिक्रिप्ट करत बसायचो. ----------- फाटलेल्या प्रोजेक्टची रेघ ----------- इश्युंचे थवे होते, सपोर्टची बोंबही परतायची ओढ होती , कंप्लिशनची डेट ही बग्ज होता होता करप्टेड बायनरी होता रनवताना कोर डंप तयार होत होता प्रॉजेक्टचे स्टेटस पाहू दे रे मला रोखले मी श्वास आणी सोसला क्लायंटचा आवेगही क्लायंटची बोंब ऐकु येते भर दुपारी हॅडलायला सिच्युएशन पी.एम. कोलमडला कुठेही सर्वररूमचा गारवारा खालुन वर वाहीला संयमाची तो परिक्षा घेत आहे आजही ओढ आहे युरोपाची पण अनुभवाची झोळी मोकळी हवेत अजुन डॉलर अन्यथा कुणा वेळ ही हवी ? ता.क. वरिल कवीतेस कुठलेही वृत्त, तत्व, यमक का काय ते .. काहीही लागु होत नाही

पश्चिमेचा गारवारा का सुगंधी वाहिला संयमाची तो परिक्षा घेत आहे आजही ह्या ओळी विशेष भावल्या .............. अजुन येऊ देत.

In reply to by मानस

हेच म्हणतो. कविता आवडली.

लय भारी! आवडली! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

मस्त आहे कविता हे वादळांचे श्वास होते भावनांचे मेघ ही मीलनाची ओढ होती संयमाची रेघही आणि हे पश्चिमेचा गारवारा का सुगंधी वाहिला संयमाची तो परिक्षा घेत आहे आजही अधिक आवडले.

फारच छान........ सुंदर शब्दरचना आणि कल्पना !

फार फार आवडली. चांद, चंद्र दोन्ही चालेलसे वाटते. (आस्वादक)बेसनलाडू

प्राजु........ एकदम बढिया जमलीये गझल...... मजा आ गया जानेमन :) वादळांचे श्वास होते भावनांचे मेघ ही मीलनाची ओढ होती संयमाची रेघही ............. मतला एकदम कातिल ;)

आयला! आमची प्राजू आजकाल भलतीच मॅच्युअर कवयत्री झालेली आहे बॉ! :) आम्हाला मिपाच्या मुखपृष्ठावर टाकण्याकरता दिवसेंदिवस उत्तम साहित्य मिळत आहे, हेच खरं! :) असो, प्राजू, कविता नि:संशय सुरेख....! जियो... आपला, (प्रतिभावान कवयत्री प्राजूचा मित्र!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आयला! आमची प्राजू आजकाल भलतीच मॅच्युअर कवयत्री झालेली आहे बॉ! कवयित्री म्हणायचे आहे बहुतेक तुम्हाला.. ;) धन्यवाद तात्या. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

कविता खूप आवडली. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

क्या बात है!! मस्तच!! :* लगे रहो!!! :)

मस्त कविता.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

मस्त आहे कविता.... अभिनंदन. पण मला एक समजत नाही. एवढे सारे काही पूरक असताना संयम कशासाठी?

In reply to by प्रभाकर पेठकर

पण मला एक समजत नाही. एवढे सारे काही पूरक असताना संयम कशासाठी? मान गये प्रभाकरपंत!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

पश्चिमेचा गारवारा का सुगंधी वाहिला संयमाची तो परिक्षा घेत आहे आजही या ओळी विशेष आवडल्या