Skip to main content

कवडसे

लेखक उपटसुंभ यांनी शनिवार, 21/12/2013 21:33 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊल माझे चालले रस्ता जिथे जाई तसे शोधायला येऊ नका माझ्या इराद्यांचे ठसे नाही दिली जन्मात या कोणासही मी सावली आयुष्यभर जपलेत मी माझ्या उन्हाचे वारसे विश्वास या दुनियेवरी ठेवायचा कोणी कसा एकाच खाणीच्या उरी यावे हिरे अन् कोळसे वाटेवरी माझ्या जिथे अंधार होता दाटला पेरीत मी गेलो तिथे माझ्या विजांचे कवडसे आयुष्य येथे भेटते प्रत्येक वळणावर नवे ताजी पुन्हा होते गझल धरते नव्याने बाळसे -- उपटसुंभ
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1873
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

सुरेख. आवडली गजल

मस्त रे...
आयुष्य येथे भेटते प्रत्येक वळणावर नवे ताजी पुन्हा होते गझल धरते नव्याने बाळसे
सुंदर!

:)