पुढच्यासाठी
कुणास ठाउक बाग कुणाची
कुणी शिंपली हिरवी झाडे
तारुण्याचे मोल, कुणाच्या
हाडांची अन झाली काडे
हिरवळ दिसते, पानोपानी
मंजुळ किलबिल मंद स्वरांची
जागोजागी खूण सापडे
चराचरातिल अद्वैताची
विश्वाचा हा जरी कोपरा
कोप-यातले विश्व सुखाचे
भय- क्रोधाला इथे न थारा
इथे न वाढे तण्य फुकाचे
आनंदाने भोग दान हे
घाल तशी भर अपुली काही
किंवा केवळ पाही इतुके
कीड- वाळवी लागत नाही
ठेव आठवण त्या पहिल्याची
झाड लावले येथे ज्याने
आपसूक मग सुचेल तुजला
पुढच्यासाठी ठेवुन जाणे
-- अमेय
छान.
नेहेमीप्रमाणेच लयबद्ध!
सुंदर
सुंदर
****
सुंदर
आहा!
सुन्दर
आहा!
सुंदर कविता
तण्य हा शब्द विशेषण म्हणुन
धन्यवाद
सोडुन द्या
वा!
आनंदाने भोग दान हे
सुंदर
Farach chan kavita
farach sundar kavita asa
मस्त हो मित्रा !
सुन्दर
छान!
छान
छान
कविता लयबद्ध आहे - नेहमीच
कवितेविषयी
अप्रतिम!! लयबद्ध तर आहेच
काय म्हणु सांग मित्रा.......
वा वा! सुंदर काव्य.
सुंदर अतिशय सुंदर रचना, साधी
+१ सुंदर कविता...
सुरेख
वा! साध्या सोप्या शब्दांचा
खुप छान
आवडली.
अप्रतीम!
ठेव आठवण त्या पहिल्याची
अमेय शेठ ची कविता खूप दिवसांत