✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

धुसरिका - व्युत्क्रम

ज — जातवेद, Tue, 12/17/2013 - 17:16
कधितरी झाडांवर सावली पडेल पण मग सुर्य ढग फ़ाडून टाकेल अक्कलकोटला जाउन यावं म्हणतो विषयांतर करू नकोस विकासाच्या गतीची ऐशी तैशी चहा पिताना कपात बसली माशी नुस्तां वेंधळा आहेस असं म्हणुन गेली कालची फ़ॅटल एरर कोण काढली? सरता सरता काळ सरेना काय मस्त खेळती ही सेरेना मी दोन चार ठिकाणी अप्लाय् केलय टाटा माझा स्वीकार करा

प्रतिक्रिया द्या
15583 वाचन

💬 प्रतिसाद (75)

?

सुहास..
Wed, 12/18/2013 - 15:16 नवीन
सरांनी राजपाट बदलला की काय ? की गंगापुरमध्ये काय तरास बिरास झाला का ? करु का कल्याण पाटलाला वा सुभाष ला फोन ;) लई पहुंच असलेला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारकुटे

अजुन गावीच आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 12/18/2013 - 15:33 नवीन
अजुन तरी मराठवाड्यातच आहे :) बाकी विटेकर साहेबांनी धाग्यावर मजा आण ली...!!! -दिलीप बिरुटे (औरंगाबादवासी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

अहो..

विटेकर
Wed, 12/18/2013 - 15:54 नवीन
सर अजून मराठवाड्यातच आहेत ( मराठ्वाड्याला पोरके करायचे आहे का ? ) .. नगरवासी म्हनजे ते आयवरी टोवर मधे राहणारे .. "नीरस- ग्रह्ण" पुन्हा एकदा नीट वाचा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विटूकाका पेटलेत!

कवितानागेश
गुरुवार, 12/19/2013 - 12:09 नवीन
विटूकाका पेटलेत! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

फुटलो....

अमोल मेंढे
Wed, 12/18/2013 - 15:36 नवीन
कशात काय... आणि उलटे झाले पाय... बिरुटे सर आणि विटेकर काका साष्टांग नमस्कार
  • Log in or register to post comments

विटेकर काका.

विजुभाऊ
गुरुवार, 12/19/2013 - 00:44 नवीन
विटेकर काका. तुमच्या कवितेतले काका पुतणे कुठल्या गावचे. बारामतीचे की वांद्र्याचे? रच्याकाने : जातवेद यांना "गरीबांचे शरदिनी" हा पुरस्कार द्यावा अशी सूचना मांडतो
  • Log in or register to post comments

विजुभाऊ..

विटेकर
गुरुवार, 12/19/2013 - 11:03 नवीन
आहो काका- पुतणे कुठलेही असले तरी जातकुळी तीच ! गुणवत्तेत तसुमात्र ही फरक नाही, कवितेतील गरिबांना वालीच नाही ! पण या ठिकाणी दिल्लीच्या महिषीचा ( मर्दीनी नव्हे , ती वेगळी , ती तीची सासु) उल्लेख आहे तेव्हा कवीला बहुधा १२मती अपेक्षीत आहे .( बाकी १२ मती म्हणजे खरोखरच १२ दिशांना तोंड करुन हा इसम उभा आहे , खोबरं तिकडे चांगभलं करायला...... असो ते क्लिंट्न महाशयांचा विषय आहे.. आपण त्यात बोलू नये म्हणून थांबतो )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

पुरस्काराचे नेमके स्वरूप काय

जातवेद
Fri, 12/20/2013 - 00:00 नवीन
पुरस्काराचे नेमके स्वरूप काय अस्ते म्हणे? नाही म्हणजे रोख रक्कम वगैरे किती अस्ते? कि नुस्ती उपधी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

*****

जेपी
गुरुवार, 12/19/2013 - 09:53 नवीन
मजा आली .
  • Log in or register to post comments

वि़जुभौ

विटेकर
गुरुवार, 12/19/2013 - 11:08 नवीन
जातवेद यांना "गरीबांचे शरदिनी" हा पुरस्कार द्यावा अशी सूचना मांडतो तुमच्या सूचनेला बेशर्त ( किती दिवसांनी हा शब्द सापडला, त्यानिमित्ताने ,पूज्य शब्दकर्त्याचे स्मरण झाले , कळ्फलक कंपित जाहला आणि बोटे पाणावली) संमती ! तुमच्या सूचनेला उपसूचना : जीवनभाउना ही एखादा पुर्स्कार द्यावा. त्यांच्या सेवेची जालीय समाजाने अजून म्हणावी तशी दखल घेतली नाही म्हणोन सौम्य णिषेध व्यक्त करुन माझे ४ शब्द संपवतो....
  • Log in or register to post comments

आई शप्पथ!!!!

बॅटमॅन
गुरुवार, 12/19/2013 - 12:39 नवीन
आई शप्पथ!!!! एरवी शांत असणार्‍या शीनियर मंडळींनी इथे "हू इज द बॉस" हे दाखवून दिले. बिरुटेसरांचे रसग्रहण पाहून पैजारबुवांच्या तंतुनाभमानवकाव्याच्या रसग्रहणाची आठवण झाली, तर विटेकरकाकांची प्रतिभा म्हणजे प्रतिसादागणिक प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णु असल्याचे दिसून आले. ओव्हरमध्ये साही बॉलवर सिक्सर मारणार्‍या युवराजाची आठवण झाली. "साही सिक्सर मारता संपल्या ओव्हरी, ते तू बॉलरलागी फटके जे मारी" अशी नवीन आरती लिहिण्याच्या प्रतीक्षेत. वाढता वाढता वाढे, भेदी विडंबकमंडळा हा साक्षात्कार जाहला आणि अष्टसात्विक भाग जागृत होवोन सर्वांस येक कॉमन लोटाङ्गण घालोन सर्व विडंबनपंडित काका लोकांचा गंडा बांधल्या गेला आहे.
  • Log in or register to post comments

लैच !! >>तंतुनाभमानवकाव्य

सूड
गुरुवार, 12/19/2013 - 14:03 नवीन
लैच !! >>तंतुनाभमानवकाव्य *clapping*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

तंतुनाभमानवट

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 12/20/2013 - 11:11 नवीन
तंतुनाभमानव :- या शब्दप्रयोगाने सद्गदीत झालो आहोत. आ. १००८ श्री श्री बट्टमण यांना मानाचा मुजरा तंतुनाभमानव तंतुनाभमानव, माझ्याकडे तुझी नजर वळव फेकुन आपल्या प्रेमाचे जाळे, तू मला माझ्या घरुन पळव (हे इस्पायडरमैन या गाण्याच्या चालीत बरोबर बसते. मोठ्यांदा गाउन बघावे.... स्वतःच्या जबाबदारी वर) असे एक काव्य मला सहज स्फुरले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

वाचनखूण...

आदूबाळ
Fri, 12/20/2013 - 03:59 नवीन
:)) वाचनखूण...
  • Log in or register to post comments

आणि वाचक-खून

आदूबाळ
Fri, 12/20/2013 - 03:59 नवीन
आणि वाचक-खून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

कविता आणि त्यावरचे प्रतिसाद

आतिवास
Fri, 12/20/2013 - 08:31 नवीन
कविता आणि त्यावरचे प्रतिसाद मजेशीर आहेत. बिरुटे सर आणि विटेकर काका - दोघांनीही मूळ कवितेत नसलेले रंग भरुन मजा आणली.
  • Log in or register to post comments

आता यापुढे

चौकटराजा
Fri, 12/20/2013 - 09:04 नवीन
साहित्य संमेलनात 'धुसर कवितेचे जनक ' जातवेद यांची मुलाखत प्राडा व कविराज विटेकर घेतील.यासाठी सज्ज रहा ! मग जातवेद यांचा समावेश केशवसूत, मर्ढेकर याच्या लायनीत होणार !
  • Log in or register to post comments

नका... नका हो एवढ चढऊ.

जातवेद
Fri, 12/20/2013 - 12:36 नवीन
नका... नका हो एवढ चढऊ. असल्याची सवय नाय आपल्याल. कुठ २ वर्षातनं १० ओळी लिहिणारा मी आणि कुठे ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

नका तुम्ही आपल्या कंटाळवाण्या

कंजूस
Fri, 12/20/2013 - 10:03 नवीन
नका तुम्ही आपल्या कंटाळवाण्या कविता इथे टाकू . नका तुम्ही वही पेन काढू . नवीन खेळाडू आला झटकन सिक्सर मारून गेला . एक हात उंचावून एक पाय लाईनच्या आतच ठेऊन बॉल पकडून दाखवला त्याची सर नाही कुणाला .
  • Log in or register to post comments

कहर आहे

टवाळ कार्टा
Tue, 01/20/2015 - 20:12 नवीन
कहर आहे =))
  • Log in or register to post comments

मूळ कविता

सस्नेह
Wed, 01/21/2015 - 14:34 नवीन
आणि उपकाव्ये वाचून मस्तक-व्युत्क्रम होऊन मति धूसर जाहली आहे *lol*
  • Log in or register to post comments

(No subject)

मंदार दिलीप जोशी
Wed, 01/21/2015 - 16:29 नवीन
:D
  • Log in or register to post comments

भारीच !!!

सतिश गावडे
Tue, 11/10/2015 - 20:14 नवीन
मुळ कविता, प्रा. डॉंनी केलेली तिची चिरफाड, विटूकाकांची कविता, सारेच भारी.
  • Log in or register to post comments

सहमत +१११११

मांत्रिक
Tue, 11/10/2015 - 20:50 नवीन
सहमत +१११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

सहमत +१११११

मांत्रिक
Tue, 11/10/2015 - 20:51 नवीन
सहमत +१११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा