✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

लेकरू

स — स्वाती फडणीस, गुरुवार, 09/25/2008 - 16:50

प्रतिक्रिया द्या
6301 वाचन

💬 प्रतिसाद (17)
ब
बहुगुणी Fri, 09/26/2008 - 09:01 नवीन

मर्मस्पर्शी!

फारच सुंदर आणि सहज ओळी आहेत, ज्यांनी असं दु:ख जवळून पाहिलंय त्यांना नक्कीच भावेल.
  • Log in or register to post comments
स
स्वाती फडणीस Fri, 09/26/2008 - 09:59 नवीन

मनापासून आभार

:)
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Fri, 09/26/2008 - 15:57 नवीन

सशक्त कल्पना

सशक्त कल्पना.. मात्र ठिक उतरलीय! का कोण जाणे शेवटचा धक्का जाणवला पण जोरात बसला नाहि -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
स
स्वाती फडणीस Fri, 09/26/2008 - 17:14 नवीन

आभार

ही कल्पना नाही वास्तव आहे. शब्दबंबाळ नसलेल भयाण वास्तव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
ऋ
ऋषिकेश Fri, 09/26/2008 - 17:27 नवीन

मला

मला कविता-विषयाची कल्पना असे म्हणायचे होते. बाकी शब्दबंबाळ व्हायची गरज नाहि.. तुमच्याच १२-१३ वर्षांच्या तीच्या कवितेतही शब्दबंबाळपणा नव्हता पण नेमकी शब्द योजना होती. ती इथे जाणवली नाहि इतकंच -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती फडणीस
स
स्वाती फडणीस Fri, 09/26/2008 - 17:49 नवीन

आता मी आहे. पण माझ्या पुढं?

हा कमीतकमी ७० वर्ष वय असलेल्या आईला पडलेला प्रश्न आहे.[त्याहुन जास्तच] इथे तिच वय ती दिसत नाही.[हव होत का?] त्या मुळे.. वय वर्ष साठ-पासष्ठ धरून बघा. मग हाच प्रश्न खुप मोठा वाटेल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
ऋ
ऋषिकेश Fri, 09/26/2008 - 18:08 नवीन

भा पो

अहो स्पष्टीकरण वगैरे नका हो देऊ.. आहे ती कविता छान आहे मात्र सांगायची गोष्ट मला या कवितेतील भावना पोचल्या तरी मात्र टोचल्या नाहित -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती फडणीस
स
स्वाती फडणीस Fri, 09/26/2008 - 18:58 नवीन

कवितेतील भावना पोचल्या तरी मात्र टोचल्या नाहित

याला नेहमी कविताच जवाबदर असते अस नाही असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
ऋ
ऋषिकेश Fri, 09/26/2008 - 22:06 नवीन

म्हणूनच तर

याला नेहमी कविताच जवाबदर असते अस नाही
अगदी बरोबर!! म्हणूनच तर मला बोल्ड केला आहे :) -(दगड) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती फडणीस
ल
लिखाळ Fri, 09/26/2008 - 19:28 नवीन

ह्म्म

कवितेतून मोठाच प्रश्न मांडला आहेत. अशी स्थिती असलेल्या एका कुटुंबाला जवळुन पाहिले आहे. त्या पालकांची व्यथा मी चांगलाच ओळखुन आहे. त्यात असे अपत्य मुलगी असेल तर अजूनच प्रश्न असतो. पण कवितेच्या शेवटच्या कडव्यात धक्का बसायला हवा होता तसा बसला नाही. बहुधा आत्ता तुम्ही ज्या मुलीला भेटलात ती ४०-४५ वर्षांची आहे हे मला वाचताना समजले नाही. तर मला असे वाटले की.. आई म्हणते आहे ... आज ठीक आहे, उद्या ही मुलगी मोठी झाल्यावर मी कसे करु असे काही. ते असो. या पालकांची व्यथा ( मुल मतिमंद असो अथवा मनोरुग्ण ) समोरच्याला भिडते हे खरेच आहे. --लिखाळ.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 09/26/2008 - 21:09 नवीन

कलाटणी

विचारांना उद्युक्त करणारी कलाटणी दिलेली आहे.
  • Log in or register to post comments
न
नंदन Fri, 09/26/2008 - 21:34 नवीन

कविता

आणि शेवटची कलाटणी आवडली. (शेवटच्या कडव्यात - 'एकदा बोलली तिची आई माझ्याशी' असा बदल केला तर वाचताना होणारा संभाव्य गोंधळ टळू शकेल, असे वाटते.)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
स
स्वाती फडणीस Fri, 09/26/2008 - 23:42 नवीन

छोटीची आई

छोटीची आई ========================= समस्या खूप आहेत.. अगदी सकाळी उठल्यावर; दात घासण्यापासून.. रात्री झोपताना; शू करून आणण्यापर्यंत. हात थकतात ! पाय लटपटतात! डोळ्यापुढे अंधार.. तरी होती उभारी!!! तिच निरागस असणं.. तिच निष्पाप हसणं.. बघितलं की; सार भरून पावायचं! आजही ती तशीच असते.. आ़जही ती तशीच हसते.. बघितलं की;रडूच फुटत! म्हातार्‍या डोळ्यांना.. तापदायक असती.. कंटाळता आलं असत! सोडव विनवता आलं असत! पण नाही... हात जोडले तरी .. ओठ हालत नाहीत..! डोळे मिटायला आलेत.. आणि झोपच येत नाही..!! माझी लाडी अजून छोटीच आहे. देवा तिला गोठवलंस.. ठीक आहे! पण मग मलाही गोठवायचंस.. छोटीची आई म्हणून!!! ========================= स्वाती फडणीस....................... २६-०९-२००८
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sat, 09/27/2008 - 00:05 नवीन

क्या बात है!

क्या बात है! त्यातही
हात जोडले तरी .. ओठ हालत नाहीत..!
थेट भिडले.. अतिशय सुंदर -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती फडणीस
ब
बेसनलाडू Fri, 09/26/2008 - 23:45 नवीन

कविता आवडली

'कलाटणी' बाबत ऋषिकेश आणि लिखाळशी सहमत. (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 09/26/2008 - 23:50 नवीन

हेच म्हणते..

मला दुसरी कविता.. "छोटीची आई" जास्ती भावली. अतिशय हृदयस्पर्शी झाली आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
भ
भाग्यश्री Sat, 09/27/2008 - 03:19 नवीन

कविता

कविता भावली.. अशा एका कुटुंबाला जवळून ओळखते म्हणून जास्त भावली. अगदी ४०शी नसली तरी ३०शी ला आली ती मुलगी आता. तिचा भाऊही,जो माझ्याहून १-२ वर्षांनी मोठा असेल त्याचीही हीच व्यथा.. पण चांगली गोष्ट ही, की त्यांना या गोष्टीची जाणीवच नसते! सतत हसतमुख असतात ते. कळायला लागल्यापासून आजपर्यंत एकदाही मला त्यांच्या हसतमुख चेहर्‍याकडे बघून स्माईल देता आलेली नाहीए. एक विचित्र फिलिंग येतं, नॉर्मल वागता येत नाही, आणि एक्स्ट्रा-काळजी,दया दाखवणंही चांगलं नाही! वाईट या गोष्टीचं वाटतं की,तो भाऊ बहीणीच्या सहवासामुळे तसाच झाला. लहानपणी आम्ही सगळॅ एकत्र खेळायचो,तेव्हाही थोडा होता तसा. पण आम्ही आकडे म्हणायचो,पाढे म्हणायचो इत्यादी गोश्टींनी त्याच्यात थोडीतरी सुधारणा होत होती.. पुढे मोठे झालो.. खेळ संपले. संवाद कमी झाला. बहीणीबरोबरच खेळ,राग,'संवाद'.. तसाच झाला.. कुठेतरी वाटतं आम्ही जमवून घेतलं असतं त्याच्याशी तर कदाचित चित्र वेगळं असतं.. पण हे सगळं मोठं झाल्यावर उमगतं.. :(
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा