Skip to main content

संशयास्पदरीत्या चहा प्यायल्याबद्दल अटक...............

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 19/12/2013 या दिवशी प्रकाशित केले.
कोल्हापुर पोलीसानी एका ४९ वयीन इसमास संशयास्पद रीत्या चहा पिण्याअबद्दल अटक केली. त्याबद्दल न्यायालयाने त्याना फटकारले आनि संशयास्पदरीत्या चहा कसा पितात ते दाखवुन द्या असेही सांगितले. मटा मधील बातमीचा भाग कॉपी करतोय
" संशयास्पदरित्या चहाचे घुटके घेतल्याचे कारण देत ४९ वर्षीय इसमाला अटक केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने कोल्हापूर पोलिसांना चांगलेच फटकारले आहे. 'चहा कसा प्यावा याबद्दल कोणताही कायदा काहीही सांगत नाही. प्रत्येकाची चहा पिण्याची वेगळी स्टाईल असू शकते. त्यात संशय घेण्यासारखे आणि चुकीचे काय आहे,' असा सवालही न्यायालयाने केला".
अधीक बातमी या इथे http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/Bombay-high-c… मिपावर कोणी काय व कसे प्यावे याचे जाणकार बरेच आहेत. संशायास्पद रीत्या चहा कसा प्यायला असेल हे कोणी साम्गेल का?

वाचने 3745
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

जागा पकडुन बसतो . हामाला बी चर्चा ऐकायची हाय

दुर्दैवाने खटल्याचा खर्च आणी झालेला मनस्ताप याची किंमत कशी भरून काढणार? त्यासाठी आपल्याला दुसरा खटला चालवावा लागतो आणी खर्च म्हणून १९०४ साली ठरविलेली रुपये पस्तीस फक्त नुकसान भरपाई आपल्याला मिळते. जर अशा निष्कारण केलेल्या खटल्याचा खर्च जर अशा पोलीस अधिकार्याच्या पगारातून देण्याची तरतूद् कायद्यात केली तर असे फालतू आणी न्यायालयाचा वेळ खर्च करणारे खटले उभे राहणार नाहित.

विजभाय वेळ जात नाये का >? जिल्ब्याच टाकायच्या असतील तर ताज्या तरी टाका :D जानेवारी लिहा बघू

अँ ? संशयास्पदरित्या चहा पिण्याबद्दल अटक हा प्रकार रोचक आहे खराच पण हे प्रकरण हायकोडतापर्यंत पोचणे.. इट हॅपन्स ओन्ली इन इंडिया.. अरे वर्षानुवर्षांचा अन दशकानुदशकांचा तो प्रलंबित ढिगारा उपसा पहिल्यांदा..!!

प्रतिक्रिया न्हेमीपर्माने जब्री आहेत मटावर-पण मुपीची सर नाही.
हे विजय पाटील नावाचे गृहस्थ्, जर आवाज काढत चहा पित असतील आणी जर का हा कोल्हापूर पोलिसांच्या दृष्टीने गुन्हा असेल, तर कोल्हापूर् पोलिसांनी सर्वात पहिल्यांना त्या ’फरिदा जलाल’ नावाच्या अभिनेत्रीला अटक करायला हवी होती, कारण ती वेगवेगळ्या वाहिन्यांवरील जाहिरातीमधून सारखी सांगत असते, की ’सुररऽऽऽऽऽके पीओ’, ’सुररऽऽऽऽऽके पीओ’ आणी सगळ्यांसमोर तोडांनी जोरात सुररऽऽऽऽऽ असा आवाज काढत चहा पीते, खरतर विजय पाटीलांच्या आधी तिला कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात (आबा स्टाईल हिन्दीमध्ये ’ताबेमे’) घ्यायला हवे होते. इथे मुंबईत, अफझल उस्मानी सारखा इंडियन मुजाहीदिनचा दहशतवादी मुंबईतील मकोका न्यायालयाच्या आवारातून पोलिसांची सुरक्षा भेदून पसार होतो, एवढे गाफिल पोलिस राहू शकतात आणी कोल्हापूर पोलिस एका व्यक्तीला संशयास्पदरित्या चहा पित होता म्हणून अटक करतात, न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करतात आणी असा हास्यास्पद गुन्हाही दाखल करतात. म्हणतात ना, ’वेड्यांचा बाजार आणी पेढ्याचा पाऊस’ तो असा.
बाकी पोलिसांनी त्याआधी बोम्मारिल्लू पिच्चर मधील जेनेलियाला देखील अटक करावयास पाहिजे होती असे आमचे स्पष्ट मत आहे. शिवाय कोल्लापुरात येऊन त्यानं भौतेक आधी मिसळ खाल्ली नसेल. आधी मिसळ अन मग च्या हा फंडा सर्वप्रसिद्ध असताना तो उल्लंघिण्याचे साहस त्यांनी केलेच कैसे?