हठयोग- कुंडलिनी (१)
कुंडलिनी...हठयोग
मागे पातंजल योगशास्त्रावर लेख लिहला होता तेव्हा कांही जणांनी कुंडलिनी बद्दल विचारणा केली होती. आज आपण त्या संबंधी थोडी माहिती पाहू.
सर्व जण मान्य करितात की ब्रह्माचा-परमात्म्याचा अंश प्रत्येक जीवात वास करत असतो. पण जीवाला त्याची जाणिव नसते. अद्वैत तत्वज्ञान सांगते की मायेचा पडदा जीवावर अज्ञानाचे झापड घालतो. हा पडदा दूर केला की जीवाला आपण ब्रह्मच आहो याची जाण होते. हठयोगात हे जरा निराळ्या पद्धतीने सांगितले आहे. त्यांनी "कुंडलिनी" नावाची एक शक्ती प्रत्येकाच्या शरीरात वास करीत असते असे मानले. ही शक्ती निद्रित असते. ती झोपलेली आहे म्हणून तुम्हाला "जाण" नाही, तुम्ही जर तिला "जागृत " करू शकला तर तुम्हाला समाधी लाभते, तुम्ही ब्रह्माशी एकरूप होता. सर्व हठयोग्यांचे "लक्ष्य" एकच, कुंडलिनी जागृत करणे. हठयोगाची माहिती पहिल्यांदी करून घेऊ व मग कुंडलिनीकडे वळू.
पातंजल योगशास्त्रात आसनाला महत्व नाही. करीत असलेली कुठलीही गोष्ट सुखकारक रीतीने करतां यावी एवढीच आसनाकडून अपेक्षा. हठयोगात मात्र आसन, प्राणायाम, मुद्रा, बंध यांना फार महत्व आहे, किंबहुना तो यांवरच अवलंबून आहे. प्रथम शरीराच्या तंदुरुस्तीकरता सुरवात झाली असावी पण पुढे मात्र त्याचे ध्येयही पारलौकिक गती हेच ठरले. आज योगासने म्हणून जे काही शिकवले जाते ती ही वरील आसनेच. आपणास लक्षात आले असेलच की मुख्य आसने ही मेरुदंड (पाठीचा कणा) व पोट यांचे आरोग्य सुधारावयास मदत करतात. इतर फायदे तदनुषंगाने प्राप्त होतात. तर अशा या आसनांवर प्राविण्य मिळवणे ही पहिली बाब. या आसनांच्या सहाय्याने शरीरातील "नाड्या" शुद्ध करणे हा प्रमुख उद्देश असतो. नाडी म्हणजे जीच्या मधून शरीरातील शकीचे अभिसरण होते ती. शरीरविज्ञानातील शीर, मज्जा, नस वगैरे यांचा हिच्याशी काहीही संबंध नाही. तर प्राणायाम व आसने यांच्या सहाय्याने आपणास या नाड्यांवर विजय मिळवून त्यांना शुद्ध करावयाचे असते. जास्त माहिती पुढे येणारच आहे. त्याच बरोबर षटकर्मे म्हणून आणखी एक महत्वाची बाब इथेच बघू. शरीरात मेदवृद्धी असणे, कफवातादी विकारांचे प्राबल्य असणे इत्यादी विकारांवर मात मिळवण्यासाठी साधकाने (१) धौती, (२) बस्ती, (३) नेती, (४) त्राटक, (५) नौली व (६) कपालभाती ही षटकर्मे उपयोगात आणावीत.. बर्याच जणांना केरलीय आयुर्वेदिक पद्धतीत्तील "पंचकर्मे" माहीत असतीलच. इथे त्यांची जास्त माहिती देत बसत नाही पण शरीरशुद्धी हा महत्वाचा उपयोग.
प्राणायाम हा तिसरा महत्वाचा भाग. याचीही इथे जास्त माहिती देत बसणे उचित होणार नाही. फक्त एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहोजे की प्राणायाम म्हणजे केवळ श्वासोच्छ्वास नव्हे. ज्याच्या जोरावर ही क्रिया चालू असते त्या शक्तीला "प्राण" म्हणावयाचे व या शक्तीच्वा निरोध करावयास शिकणे म्हणजे प्राणायाम. प्राणायामाच्या अभ्यासात येतात मुद्रा व बंध. प्राणायाम करतांना तुमचे शरीर जा स्थीतीत आहे त्याला म्हणावयाचे मुद्रा, बंध. ब्रह्म, योग, सिंह, शांभवी, काकी या काही महत्वाच्या मुद्रा व महा, उड्डियान, जालंधर, मूल वगैरे काही मह्त्वाचे बंध. यातील तीन बंध आपण कुंडलिनीच्या संदर्भात बघणार आहोतच.
वरील पाच गोष्टींवर काबू मिळवणे म्हणजे हठयोगाचा अर्धा अभ्यास पुरा करणे. पण या सर्व क्रिया "शारीरिक" आहेत. हे झाले साधन, "साध्य", ते पुढेच आहे.
हठयोग ही एक कष्टसाध्य साधना आहे. हठ म्हणजे बलात्कार. स्वत:चे शरीरावर बलात्कार करून, त्याला कष्ट देऊन करावयाची साधना म्हणजे हठयोग. दुसरा अर्थ : ह म्हणजे उजव्या नाकपुडीतून व ठ म्हणजे डाव्या नाकपुडीतून वाहणारा श्वासोच्छ्वास. या प्राणापानांचे ऐक्य घडवून आणणे हे साध्य..हे फार कष्टप्रद आहे म्हणून हा हठयोग.
शरीरात ७२००० नाड्या आहेत. त्यातील ईडा, पिंगला व सुषुम्ना ह्या महत्वाच्या. नेहमी ईडा व पिंगला ह्या दोन नाड्यांमधून प्राणशक्ती वहात असते. त्यांच्यावर ताबा मिळवणे हे उद्दिष्ट.
पाठीच्या कण्यात दोन बाजूस इडा व पिंगला या नाड्या असून मध्ये सुषुम्ना आहे. सुषुम्ना मस्तकातील शहस्रार चक्रापासून खालील मुलाधार चक्रापर्यंत आहे. (चित्र पहा).
इडा व पिंगला या दोन नाड्यांमधून प्राणवायु वहात असतो. तो त्यांचा मार्ग बंद करून त्यांना सुषुम्ना नाडीतून वहावयास लावणे हा पहिला भाग. प्राणायाम, जालंधर बंध, उड्डियान बंध व मूलबंध यांच्या सहाय्याने प्रथम वर जाणारा प्राणवायु व खाली सरणारा अपान वायु यांच्यावर विजय मिळवून त्यांची दिशा बदलली जाते. हे दोन वायु एकमेकावर आदळून सुषुम्ना नाडीत प्रवेश करतात. तेथे ते उष्णता निर्माण करतात व निद्रित कुंडलिनीला जागृत करतात.
कुंडलिनीची माहिती पुढील भागात.
शरद
इडा व पिंगला या दोन नाड्यांमधून प्राणवायु वहात असतो. तो त्यांचा मार्ग बंद करून त्यांना सुषुम्ना नाडीतून वहावयास लावणे हा पहिला भाग. प्राणायाम, जालंधर बंध, उड्डियान बंध व मूलबंध यांच्या सहाय्याने प्रथम वर जाणारा प्राणवायु व खाली सरणारा अपान वायु यांच्यावर विजय मिळवून त्यांची दिशा बदलली जाते. हे दोन वायु एकमेकावर आदळून सुषुम्ना नाडीत प्रवेश करतात. तेथे ते उष्णता निर्माण करतात व निद्रित कुंडलिनीला जागृत करतात.
कुंडलिनीची माहिती पुढील भागात.
शरद
Book traversal links for हठयोग- कुंडलिनी (१)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
इंटरेस्टिंग वाचतोय
+१
वाचतोय
उत्सुकता
आवडेश !!
लेख आवडला.....
शास्त्रीय दृष्ट्या अस्तित्वात
शास्त्रीय दृष्ट्या अस्तित्वात
वरती चित्रामधे जी विविध चक्र
शास्त्रीय द्रुष्टया सिद्ध
वाचत आहे !
वाचतेय...
वाचतोय... पुभाप्र
वाचतोय...
मारकुटे
शरदसर, हा धागा काही पटला नाही
लेखामागील दृष्टीकोन - सकारात्मक का नकारात्मक ?
योगकडे ( मुद्दाम योगा लिहिले
+१
तुम्ही बहुधा मराठी बलात्कार समजत आहात
मुद्दा मान्य
मंबो-जंबो
समाधान करण्याचा प्रयत्न
सर लै भारी हं... लेख वाचतोय.
हठ या शब्दाचा अर्थ जबरी हा
मूलाधार चक्र कसं दिसतं
कुंडलिनी जेव्हा अज्ञाचाक्रात
वाचतेय. पुढिल भागाच्या
चक्रं, ऑरा आणि त्यांचे रंग
आम्च्या कंपनीत ह्याचं
भाषा!
रोचक
ज्ञानेश्वरांची समाधी, डायफ्राम वगैरे.
समाधी वगैरे
समाधी शब्दाच्या अर्थांमध्ये
रायगडावर जगदीश्वराच्या
संत ज्ञानेश्वर यांनी 'समाधी'
यालाच भ्रम होणे, भास होणे
@ म्हैस
तो सिद्ध गुरूंच्या
पतंजलि योगसूत्रे
कुंडलिनी स्वच्छेने जागृत होत नाही...
हे मुळात पतंजली सूत्रे न
@ म्हैस
वाचतोय...
वाचनीय धागा