बंद होणार्या विमा योजना - वस्तुस्थिती काय आहे ??
गेले महिना दोन महिने लाईफ इन्शुरन्सच्या बाबतीत बर्याच वावड्या उठत आहेत. बहुतांशी सर्वच कंपन्याच्या प्रतिनिधीं कडुन ' लोकप्रिय’ प्लान्स बंद होणार आहेत, प्रिमियम वाढेल --' ई. कारणे सांगुन ग्राहकांची फसवणुक चालु असल्याचे पाहण्यात आले आहे.
वस्तुस्थिती अशी आहे की IRDA ( विमा क्षेत्र नियमित करणारी सर्वो्च्च संस्था) ने काही मोठे बदल सुचविले हे खरे आहे परंतु हे बदल निश्चितपणे ग्राहक हिताचे आहेत. सद्यस्थिती लक्षात घेता विमा असो की म्युचुअल फंड्स, वा अन्य कोणतेही अन्य क्षेत्र, त्यात किरकोळ गुंतवणुकदारांचे नुकसान होईल, असे कोणतेही पाउल ऊचलले जाणे कठीणच आहे.
सध्या ह्या बदलांकरिता पुर्व निर्धारित मुदत वाढवुन ती 01 जानेवारी. 2014 करण्यांत आली आहे. नव्याने अंमलांत येणार्या बदलानुसार -
(१) आतापर्यंत LIC आपल्या ग्राहकांकडुन प्रिमियम वर सर्विस टॅक्स वेगळा घेत नसे तर त्यांच्या कडील गंगाजळीतुन तो सरकार दरबारी भरत असे. येथुन पुढे तो सरळ सरळ प्रिमियम बरोबरच घेतला जाईल , याचाच अर्थ प्रिमियम हा त्या प्रमाणांत वाढेल. अर्थातच याचा दुसरा परिणाम म्हणुन गंगाजळीवर पडणारा सर्विस टॅक्सचा बोजा कमी झाल्याने पॉलिसीघारकांचे प्रिमियम मध्ये झालेले नुकसान काही प्रमाणांत भरुन निघेल.
मात्र अन्य खाजगी विमा कंपन्या आधीपासुनच प्रिमियम वर सर्विस टॅक्स आकारत असल्याने त्यांच्या प्रमियममध्ये वाढ होणार नाही. (कदाचित यामुळेच दिशाभुलीच्या बाबतीत काही विशिष्ट कंपन्याचे एजंट्स आघाडीवर दिसतात)
(२) यापुढे 'सरेंडर व्हॅल्यु' चे निकष बदलुन ते ग्राहकांसाठी अधिक फायदेशीर करण्यांत आले आहेत. या आधी ती रक्कम किमान 30 % असे मात्र पहिल्या वर्षीचा प्रिमियम त्यात अंतर्भुत नसे. आता 30 % रक्कम ठरविताना पहिल्या वर्षीचा प्रिमियमचाही अंतर्भाव करावा लागेल. अधिक कालावधीनंतर ( उदा. 05, 07 वा अधिक वर्षांनतर) द्याव्या लागणार्या किमान 'सरेंडर व्हॅल्यु' च्या प्रमाणांतही वाढ सुचविण्यांत आली आहे.
(३) नवीन पॉलिसी साठी 'मोर्टेलिटी टेबल' ची सुधारित आवृती वापरणे बंधनकारक राहिल. हे टेबल सर्व इन्शुरन्स पॉलिसीजच्या प्रिमियम निश्चितीचा मुळ आधार असते. सुधारीत टेबल मधील दर सामान्यतः १०% नी कमी आहेत. सहाजिकच नविन पॉलिसीजचा प्रिमियम तेवढ्या प्रमाणांत कमी असेल अशी आशा बाळ्गण्यास हरकत नाही.
(४) विम्याची रक्कम आणि दिलेला प्रिमियम यांच्या किमान गुणोत्तरात वाढ सुचविली आहे. सोप्या शब्दांत सांगायचे तर आता त्याच प्रिमियम मध्ये अधिक रकमेचे विमा कव्हर मिळण्याची शक्यता आहे.
(५)सर्वांत महत्वाचे म्हणजे जेंव्हा एखादे प्रॉडक्ट खरेदीदारासाठी अधिक फायदेशीर बनते तेंव्हा ते विकावयास सोपे बनते या गृहितकामुळे व या सर्व उपांयांतुन आपले मार्जिन घटेल या भीतीने विमा कंपन्या एजंटांचे कमिशन कमी करण्याची शक्यता आहे. 'पॉलिसी आताच घ्या' --- हया घिसाड-घाई मागे हे एक महत्वाचे कारण आहे.
सोबत एक अशीच जाहिरात जोडली आहे. अर्थातच ती वानगीदाखल व प्रातिनिधिक आहे, या लिखाणाचा उद्देश कोणत्याही एका विशिष्ट कंपनीबाबत लिहिणे असा नाही वा सर्व एजंट असेच वागत आहेत असेही बिलकुलच सुचवायचे नाही तर गुंतवणुकदारांमध्ये जागृती निर्माण करणे हा आहे.. चुक भुल द्यावी घ्यावी.
प्रसाद भागवत.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हे राम...
मुळात .....
उत्तम माहिती
धन्यवाद !
ईन्सुरन्स
फसवणे?
मला वाटत की एजंट तेच आणि
तसे असेल तर केस बाय केस सहमती
@ ऋषिकेश - (१) सर्व्हिस
आपण आपल्या विमा सल्लागाराची
lic च्या चार योजना बंद
@तथास्तु - मुळात एक गोष्ट
@ ऋषिकेश - (१) सर्व्हिस
गेल्या काही महिन्यांपासून
मुळात LIC हि सर्वात महागडी
माहिती आवडली
जीवन अक्षय या L.I.C च्या
...
....