एक गृहस्थ आहेत. "पोलीस" ह्या "खात्यात" कामाला आहेत. शारीरिक उंची ५.३, बौद्धिक (तुम्ही ठरवा वाचून झाल्यावर)....वय ५०-५२ असेल, रंग ना काळा ना गोरा असा जो असतो तो, सरळ नाक, कुरळे केस, नाकावर चष्मा वगैरे. माणूस वागा बोलायला एकदम सोफ्ट. कायद्याचे विद्यापीठ असल्यागत बरीच कलमे मुखोद्गत. कसलेही व्यसन नाही
इमारतीमध्ये 'ए' विंग ते 'बी' विंग पर्यंत पसरलेली सदनिका इमारतीमध्ये सर्वांशी संबंध चांगले (मेंटेनन्स थकलेला नाही,गणपतीला भरपूर वर्गणी, एखादा शेलीब्रेटी आणून कार्यक्रम करणे,अक्कलकोट, शिर्डी चालूच असते वगैरे) आणि त्याही पेक्षा आज गुरुचरित्राचे पारायण संपून उद्यापन आहे जे दरवर्षी ना चुकता तो करतो. सगळे लालदिवे, कनिष्ठ वरिष्ठ हजेरी लावतात. प्रचंड कौतुक करतात सगळ्या कुटुंबाचे आणि जातात. गेली अनेक वर्ष हे चालू आहे.
वर वर बघता हे साधे सोपे त्यात काय मोठी ष्टोरी नाय. पण ह्या भाऊकडे प्रचंड पैसा आहे (ब्युटी पार्लर्स आहेत, भाड्याने दिलेल्या सदनिका आहेत, शेअर्स आहेत बरेच काही आहे.)ज्ञात सोर्स आणि ज्ञात संपत्ती ह्यात प्रचंड तफावत आहे.
१)गेल्या कित्येक वर्षात बदली नाही.
२)मुले शिकता आहेत हुशार आहेत, काही वाईट अजून तरी ऐकू आले नाही.
३)घरात एक मारुती गाडी आहे.
४)धार्मिक कार्य जोरात असतात.
५)अडल्या-नडल्याला मदत होतेय. पंचक्रोशीत भला माणूस हाये पण माया लई जमवली बघा त्यांनी असे ऐकू येते.
आता प्रश्न असे आहेत कि इतक्या भ्रष्ट माणसाचे पाठीराखे कोण?
१) त्याचे स्वतःचे खाते?
२) त्याचा जनसंपर्क?
३) त्याचे धार्मिक-अध्यात्मिक कार्यक्रम? (गणपती, दत्त माउली )किंवा ३३ कोटींपैकी ज्यांना रोजचा नैवेद्य जातो ते?
४) की जगात फक्त दोनच प्रकाराची माणसे असतात जी जन्मतःच चांगली आणि वाईट असतात असे म्हणून हा माणूस चांगला असल्याने त्याचे बरे चालले आहे.
हा आपला एक मला पडलेला प्रश्न आहे. चला, मलाही आमंत्रण आहे तीर्थ प्रसादाला जायला हवे......
वाचने
10848
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
थोडक्यात त्याचे उपद्रव मूल्य
म्हणजे....
तुम्ही जर सदगृहस्थ असाल तर
In reply to म्हणजे.... by ज्ञानव
मी आधी,
हे असे प्रश्र्न पडणे योग्य नाही......
वेलेवर चांगल्या
विषय लक्षात घ्या .....
काय योग्य, काय अयोग्य.
In reply to विषय लक्षात घ्या ..... by ज्ञानव
इथे योग्य अयोग्य
त्याचे पाठीराखे "तुम्ही
In reply to इथे योग्य अयोग्य by ज्ञानव
पंचक्रोशीत भला माणूस हाये पण माया लई जमवली बघा त्यांनी असे ऐकू येते.या वाक्यातल्या "भला माणूस" आणि "माया लई जमवली" या स्वतःच्याच शब्दांतला विरोधाभास जेव्हा लोकांच्या नीट ध्यानात येईल आणि त्याप्रमाणे चोराला चोर म्हणण्याची धमक त्यांच्यात जेव्हा येईल तेव्हाच तुम्ही या लेखातून व्यक्त केलेली तुमची गुप्त इच्छा प्रत्यक्षात आलेली दिसेल. तोपर्यंत तिर्थप्रसादावर समाधान मानावे !+१
In reply to त्याचे पाठीराखे "तुम्ही by डॉ सुहास म्हात्रे
भ्रष्ट असणे अयोग्यच.
In reply to इथे योग्य अयोग्य by ज्ञानव
'दरोडेखोरांची कौशल्ये ते
In reply to भ्रष्ट असणे अयोग्यच. by प्रभाकर पेठकर
+१
>>> त्याचे धार्मिक-अध्यात्मिक
मला असं सांगा की तुम्हाला
बरेचजण वैयाक्तिक पातळीवर
वैयक्तिक पातळीवरच विचार करण्याची गरज आहे.
In reply to बरेचजण वैयाक्तिक पातळीवर by ज्ञानव
महान विचारवंत
भक्ताची परिक्षा
In reply to महान विचारवंत by मारकुटे
हरकत नाही
In reply to भक्ताची परिक्षा by llपुण्याचे पेशवेll
दिलेल्या माहितीवरून सदर
शारीरिक उंची ५.३,
शारीरिक उंची ५.३,आणि पोलिस खाते ?बघा इथून सुरवात आहे.
In reply to शारीरिक उंची ५.३, by जेपी
निष्फळ वाद चालू ठेवूया का ?
अनिरुद्ध प आणि प्यारे१ च्या
इंटरेस्टिंग!