मला आवडलेली शेअर ट्रेडिंग पद्धत....
ट्रेडिंगला सुरुवात कशी करावी?
त्याला साधा सोपा अभ्यास काय ?
तांत्रिक (आणि त्या मागील मांत्रिक )विश्लेषण बाजूला ठेऊन जर सुरवात करायची असे असेल तर एक सोपी पद्धत खालील प्रमाणे :-
कंपनी : बँक ऑफ इंडिया
वर्ष : २०१३
महिना ------- उच्च पातळी (हाय) ............ नीचतम पातळी (लो)
जानेवारी ------- ३९३ ............ ३३२.४०(अ)
फेब्रुवारी ------- ३५८.५० ............ ३१२.१०
मार्च ------- ३३०.७० ............ २८१.९०
एप्रिल ------- ३४५.८० ............ २९२
मे ------- ३४१ ............ २८५
जून ------- २९८ ............ २१९
जुलै ------- २४३.२५ ............ १६६
ऑगस्ट ------- १९०.४० ............ १२६.५० (ब)
सप्टेंबर ------- १९३.९५ ............ १३२
ऑक्टोबर ------- २१४.२० ............ १५६.५५
नोव्हेंबर ------- २४४.१० ............ २०४.२५
डिसेम्बर ------- (अजून पातळी ठरायची आहे.)
जेव्हा ट्रेडिंगला सुरुवात करणार तेव्हा
१) प्रथम आजच्या महिन्या पासून मागे बँक ऑफ इंडियाने उच्चतम पातळी काय गाठली होती ते पाहू.
जसे वरील तक्त्यात(अ)ने दर्शवलेली पातळी जी जानेवारी महिन्यात होती ती रु.३९३ आहे. ती लिहून ठेवणे.
२) त्यानंतर आजच्या महिन्या पासून मागे बँक ऑफ इंडियाने न्यूनतम पातळी काय गाठली तेही पाहू.
जसे वरील तक्त्यात(ब)ने दर्शवली आहे जी ऑगस्ट महिन्यात रु.१२६.५० आहे.
३) ह्यावरून असा निष्कर्ष निघतो की (३९३ - १२६ = २६६.५०)रुपये २६६.५० इतके रुपये तो फिरतो हा "इतिहास" आहे.
ट्रेडिंग मध्ये खरेदी अत्यंत महत्वाची असते.
ती खरेदी झाल्यावर कोणती रण नीती वापरायची ते ज्याने त्याने आपआपल्या हाव-भावावरून ठरवावे
(म्हणजे ग्रीड(हाव) आणि वास्तव किंमत(भाव)...)पण त्यातही अनेक शास्त्रोक्त पद्धती आहेत.
मी स्कॅल्पिंग हि पद्धत वापरतो. (शुद्ध मारवाडी इष्टाइल)
ऑगस्टमध्ये गाठलेली न्यूनतम पातळी हि शेवटची पातळी आहे कसे ओळखावे ?
तर ते सप्टेंबर सुरु झाल्याशिवाय शक्यच नाही.
- सप्टेंबरमध्ये न्यूनतम पातळी ही ऑगस्टमध्ये दर्शवलेल्या पातळीला मोडून नवी न्यूनतम पातळी गाठते आहे का ते पाहावे.
- तसेच ऑगस्ट मधली उच्चतम पातळी मोडून नवीन उच्चतम पातळी केली का ते पाहावे
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
चांगली माहिती !
धन्यवाद
अभ्यास पुर्ण लेख ! वाचतो आहे
अभ्यास पुर्ण लेख ! वाचतो आहे
.
****
धन्यवाद.....
blue चिप
मी केव्हाही एस बी आय
अतिशय चुकीची पद्धत
ट्रेन्ड इज फ्रेंड....
Fundamental analysis बद्दल
फंडामेंटल अनालिसिस
१००% सर्वोत्तम
श्री वारेन बफे म्हणतात.....
नक्की लिहा
बँकिंग आणि FMCG