Skip to main content

प्रेम आणि ममता....... भाग एक

लेखक mohite jeevan
Published on शनीवार, 14/12/2013
लाल साडी घातलेली लता आपल्या पाच वर्षाचा मुलगा राजुला हाताला धरुन ती भराभरा जात होती,राजुच्या पायात ते चप्पल मोठे आसल्याने तो आडखळत चालत होता.तरी ही तो आई बरोबर चालण्याचा प्रयत्न करीत होता,त्याला भिती होती की आईचा हात सुटेल व तो हारवेल,आता त्याला घर ही माहीत नव्हते.लहानपणापसुनच आनेक समस्यानी त्याला घेरले होते. लता एका गल्लीतुन दुसर्या गल्लीत जात होती,कोणी ओळखीचेतर पाहणार नाही ना याबाबत ती दक्ष होती, चालत चालत ती सुनसान गल्लीत पोहचली, तेथे कोणी ही नव्हते, मग ती पाठीमागे आपल्या कोणी येत तर नाही ना हे पाहिले व पुन्हा डोक्यावर पदर घेऊन चालु लागली. राजुला आई कोठे जात आहे माहीत नव्हते.त्याला नेहमी वाटत की ती महत्वाच्या कामासाठीच जात आसणार म्हणुन तर ती भराभर जात आहे. भराभर चालत आचानक लताला राजुच्या बाबाची आठवण झाली, मजदुरी करण्यासाठी तो गेला होता पण पुन्हा परत आलाच नाही.काही दिवसानी कळाले की ट्रकच्या खाली येऊन त्याचा मृत्यु झाला.त्या गावात अनेकजण तसे बळी पडत आसल्याने कोणी फारसे लक्ष देत नव्हते.लताने ही काही दिवस दु:ख केले.पण तिला माहीत होते आयुष्य येथे सपंत नाही.जसा राजु आपल्या पोटी आला तसे आपल्या आयुष्यात खुप दु:ख आले आसे तिला वाटु लागले. या विचारात ती भराभर वेगाने चालत होती,आपल्या मनामधील त्या वादळाशी ती लढत होती. समोरच तिला कोपर्यावर पाण्याचा नळ दिसला.तहान खुप लागली होती ती त्या नळाजवळ गेली,तीने त्या नळाचे पानी पिण्या आगोदर तीच्या मनामध्ये प्रेमाचा निर्णय घेतला होता.तीच्या मनामध्ये प्रेमाचा विजय झाला होता. पाणी पिऊन झाल्यावर तीने राजुला पानी पिण्यास सांगितले. तो त्या नळाजवळ गेला लहान लहान हाताची ओझळ करुन तो पाणी पिऊ लागला,मातीच्या धुळीने माखलेले ते चप्पल व चिमुकल्या चेहर्यावर ही त्याने पानी घेतले. 'आवर लवकर,'आसे तीची आई म्हणताच तो चावी पासुन आई जवळ आला. आधारं पडायच्या आत तिला काम आवरायचे होते.सुर्याची गरम किरणे शरीराला चटके देत होती. ती पुन्हा जोर जोरात चालु लागली, आता तिला आपण घातलेली ती लाल साडीवरून रमेश बाबुची आठवत होते, त्याचे एकच वाक्य तीच्या मानात घोळत होते, ' लवकर या पोराचा ठीकाणा लाव मगच लगीन करीन तुझ्याशी,' पुढे खुप दुरुन तिला ताशे वाजल्याचा आवाज कानावर येत होता,जस जसे ती चालत होती तो आवाज वाढत होता. शेवटी तिला काही अंतरावर एक दर्गा दिसला,तो चाँद पिर साहेबाचा दर्गा होता.आज तेथे उरुस होता.ज्याच्या इच्छा नवस पुर्ण झाल्यात ते तेथे दररोज कोणी ना कोणी जेवण देत आसे. फुल हार कब्र वर चढवत आसे.हे खुप वर्षापासून चालत आसले तरी लता तेथे पहिल्यादाच आली होती. दर्गाच्या बाजुला लाचार लुळे,पांगळे,आधंळे,बहीरे, फकीर आप आपली चादर पसरुन हातातील ताट्या वाट्या वाजवत विचित्र आवाज काढत होते, त्यातील एक फकिर म्हणाला,'ओ देखो खाना आवे,' आणि सर्वजण ओरडु लागले.आता लता ही झटकण त्या फकीरला लागुन बसली. 'आई आपल्याजवळ ताटी नाही,'राजुने आईला आठवण करुन दिली, हे ऐकताच त्या फकिरने आपल्या झोळीतील एक ताटी त्याच्या कडे दिली व म्हणाला,'मेरे पास दो है, खा कर वापस कर देना,' राजुने आपल्या आयुष्यात आशी स्वादिष्ट बिर्याणी खाल्ली नव्हती, तो आईला म्हणाला,'किती चांगले लोक आहेत हे फुकट जेवायला देतात,आपण रोज येऊया का येथे?,' आसे बडबडत त्याला चांगलीच सुस्ती आली होती,आईजवळ बसुन त्या गुगीत आर्धवट डोळे उघडे करत तो आईकडे पाहत होता, त्याला वाटत होते की आई आपणाला सोडुन तर जाणार नाही ना? झोपेच्या गुगीत एकदम त्याला डुलका लागे व तो एकदम जागा होऊन आईच्या मांडीवर हात मारी, व त्याला खात्री होई की आई आपल्या जवळच आहे. शेवटी त्याने आईच्या मांडीवर डोके टेकले. थोड्या वेळाने लताने त्याला जमिनीवर झोपवले व त्याला म्हणाली,'राजु पिर साहेबाकडुन मागुन येते हं आपल्यासाठी,' ते ऐकुन राजु मदं आवाजात म्हणाला,'लवकर ये हं आई,' आणि लता ने जाताना ती ताटी त्याच्या समोर ठेवली. आणि ती तेथुन भराभर जाऊ लागली तिला वाटत होते की राजु जागा तर होणार नाही ना? ती एक गल्ली सोडुन दुसर्या गल्लीत जात होती पण तो ताशाचा आवाज जसा तीचा पाठलाग करीत होता,आसे तिला वाटत होते, खुप दूरवर गेल्यावर तीने पाठीमागे पाहुन तीने प्रार्थना केली, ' पिर साहेब माझ्या राजुला सांभाळ,' आणि ती तेथुन डोळे पुसुन भराभर चालु लागली. * एक आठवडा रमेश बाबु बरोबर खुप चांगला गेला, कोणी लताला विचारले की,ती सांगत राजु मावशीकडे गेला आहे. पण राजु तर रोजच तिच्याकडे येत होता, कधी जेवन करताना, झाडु मारताना, गायीला चारा घालताना , ती त्याला विसरायचा खुप प्रयत्न करीत होती पण नाही, रोज रात्री तिला तो आठवत आसे, झोपेतच ती 'राजु तु कसा आहेस? जेवतोस ना? खुप आठवण येते रे राजु तुझी, मी येऊ का रे तिकडे ,' आशी झोपेत ती बडबड करीत आसे. एक दिवस ती रात्री घरातील काम आवरून रमेश बाबुची वाट पाहत होती, तीला रमेश बाबुचा खुपच आधार वाटत होता, तिला पुन्हा खुप बरे वाटत होते. तेवढ्यात तिला पैजण व बांगड्या घालुन कोणीतरी येत आसल्याचा आवाज आला, हे ऐकुन तिने दार उघडले. तिने दार उघडताच, तिला आश्चर्याचा धक्का बसला. क्रमश:
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 2267
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

ढँट ट ढँट आता लेख वाचतो...किंवा कथानक किंवा जे काही टंकले आहे ते...