"पाऊस येईल"
नको फुलवूस श्वास
नको हताश होऊस
तुझ्या अंगणातही रे
आता पडेल पाऊस
येता बरसून धारा
मेघव्यथेला घेऊन
सहवेदनेची दिठी,
डोळा जाईल भरून
जाणीवाही नवनव्या
उरातून वाहतील
जे ना आकळले कधी
माग त्याचा काढतील
असे जगासाठी जुना
तुझा पहिला असेल
कायामन भिजताना
खूप काही गवसेल
नको आकांत जिवाचा
नको पाण्यामध्ये देव
फक्त स्वागतासाठी तू
भुई नांगरून ठेव
-- अमेय
वाचने
3422
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
मस्तच!!
सुरेख.
छान !
क्या बात
In reply to क्या बात by चाणक्य
दीठी
आहा! फार सुंदर लिहिता तुम्ही.
In reply to आहा! फार सुंदर लिहिता तुम्ही. by कवितानागेश
असेच म्हणतो!
मस्तच!
आवडली
छानच!
व्वाह!!
छान!
आवडली
छान .
फार सुंदर लिहिता हो तुम्ही
In reply to फार सुंदर लिहिता हो तुम्ही by निवांत पोपट
:)
बर्याच दिवसानी एक साधी सरळ
अहाहा!
मस्तच :)
सुंदर
मस्त
सुरेख!