'अ'विचारजंतांवर काही म्हणायचा आधी इंटरनेट (आंतरजाला)च्या निर्मीती प्रक्रीये पासून हा लेख सुरु करतो. सध्या संगणकीय भाषेत म्हणायचे झाले तर अर्पानेटच्या पहिल्या वापरापासून इंटरनेट वापर प्रक्रिया सुरु आहे. ह्याच इंटरनेटचा वापर करून 'विभिन्न तत्व' लेखकू कपाळकरंटेपणाणे (वैचारिक भाषा) एकत्र आले आणि आजची आंतरजालिय लेखन सृष्टी डोळ्यांसमोर आहे.
आमच्या सारखे असंख्य लोक आंतरजालाच्या व्यासपीठाला मानणारे, लोकांच्या मते ह्याच व्यासपीठाच्या माध्यमातून अनेकाविध विचारधारा एकत्र होण्याची इच्छा निर्माण झाली आणि आंतरजालिय लेखनाची सुरवात झाली. प्रथम लेख आणि त्या लेखावर, 'सर्वांपासून पासून अलग आहोत हे दाखविण्याची' इच्छा असलेल्या पहिल्या प्रतिसादापासून या मायावी विचारजंती सृष्टीची आणि बद्धकोष्ठतेची निर्मिती झाली. त्या पहिल्या लेखावरच्या पहिल्या प्रतिसादापासूनच परमात्मा रचित प्रत्येक विचारजंत आपल्या विचारजंती लेखनातून "सर्वांपासून पासून अलग होण्याची" इच्छा मनात धारण करून बद्धकोष्ठ निर्मितीची इच्छा पूर्ण करीत आहे. आंतरजालाचा विकास आपल्या या विचारजंती लेखनाच्या इच्छेमुळेच मुळेच होत आहे आणि जेंव्हा ही इच्छा संपेल तेव्हा आंतरजाल ही संपेल. आपल्या ज्ञात ज्ञानाचा अंत होईल.
परमेश्वराने 'स्त्री-पुरुष' यांच्यारूपात विचारजंतांची निर्मिती केली आहे. आंतरजालावरच्या अन्य जीवांप्रमाणे 'सर्वांपासून पासून अलग आहोत हे दाखविण्याची' इच्छा आपल्यात ही आहे. हीच इच्छा मनात धारण करून स्त्री-पुरुष आपापल्या विचारजंती लेखांचे 'पाडन' करत असतात. विचारजंत लेख पाडतात, त्यावर प्रतिसाद येतात आणि त्या प्रतिसादावर विचारजंती उपप्रतिसाद देता देता विचारजंतांची सर्वांपासून पासून अलग आहोत हे दाखविण्याची मूळ इच्छा पूर्ण होते. स्पष्ट आहे, विचारजंती लेखांचे मूळ उद्दिष्ट बद्धकोष्ठ प्राप्ती होय. या मुळेच 'सर्वांपासून पासून अलग आहोत हे दाखविण्याची' मानवाची इच्छा पूर्ण होते व आनंद ही मिळतो. केवल लेखन-आनंदा साठी केलेल्या लेखनाला आपल्या प्राचीन विचारजतांनी कधीही उचित मानले नाही कारण अश्या लेखनामुळे मुळे समाजातली बद्धकोष्ठता नष्ट होते. म्हणून सर्वांपासून पासून अलग आहोत हे दाखविण्याची इच्छा असलेल्या जुन्या खोडांनी या अशा सम-लेखकूंना 'विचारजंत' या रूपाने परिभाषित केले.
समाजातले तथाकथित बुद्धीजीवी ह्या अविचारजंती (आनंददायी) लेखनाला जास्तीत जास्त प्रतिसाद मिळावे असा घाट घालत आहेत. त्यांना एकाच विचारायचं आहे, केवल लेखन-आनंदा साठी केलेले लेखन परमेश्वर प्रदत्त मानवाची 'सर्वांपासून पासून अलग आहोत हे दाखविण्याची' मूळ इच्छा पूर्ण करू शकते का? आपण सर्वाना माहित आहे. विचारजंती लेखन केल्याशिवाय ती इच्छा फलित होऊ शकत नाही. अविचारजंती व्यक्ती 'सर्वांपासून पासून अलग आहोत हे दाखविण्याची' मानवाची मूळ इच्छा कधीच पूर्ण करू शकत नाही. आपणास वाटत असेल केवळ आनंदा साठी लेखन केले जात असेल. पण इथे एक गोष्ट नमूद कारणे जरुर आहे. 'आनंद' बद्धकोष्ठतेमध्ये असतो, जिथे बद्धकोष्ठता नाही तिथे आनंद मिळण्याची यत्किंचित ही शक्यता नाही. अविचारजंती व्यक्तींना 'बद्धकोष्ठतेचा' आनंद कधीच प्राप्त होत नाही. अश्या व्यक्ती आयुष्यभर 'पोट-रिकामपणाचे' दुःख भोगतात, हेच वास्तव. खरे म्हणजे अविचारजंतीपणा माणसात दडलेली एक वैचारिक विकृती आहे. एक वैचारिक आजार आहे. योग्य 'अॅन्टी लेक्सिटीव्ह चिकित्सा' केल्यास त्याला या विकृती पासून मुक्ती सहज मिळू शकते. वैचारिक विकृती नेहमीच झपाट्याने कुठल्याही समाजात तीव्रतेने पसरते. अविचारजंतीपणाला प्रोत्साहन देणे म्हणजे मानवजातीला बद्धकोष्ठ मिर्मूलनाच्या मार्गावर प्रवृत्त कारणे होय. या विकृतीला प्रोत्साहन दिल्यास बद्धकोष्ठतेचा गोळा फूटून जाईल आणि मानवजाती समेत बद्धकोष्ठतेचा विनाश होईल. हे आपल्याला चालेल का?
वाचने
5342
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
अर्धे वाचूनच अपचन झालय.....
हेच म्हणायचं होतं
In reply to अर्धे वाचूनच अपचन झालय..... by विजुभाऊ
चर्चा तर होणारच.
@प्रथम लेख आणि त्या लेखावर,
निषेध!
+१
In reply to निषेध! by नंदन
ब्याटस्य वचन द्वय: एशां
चूक
नवे अलंकार
चर्चा तर होणारच.
.
जे ब्बात!!
च्यायला
In reply to जे ब्बात!! by राजेंद्र मेहेंदळे
विकारजंत एवजी विचारजंत हा
हे राम
साले रिकामपोट धंदे!
भारतात अनेकांना
+१११११११११११
In reply to भारतात अनेकांना by पैसा
आंतरजालीय विकिपिडिया
In reply to +१११११११११११ by दिनेश सायगल
अस्सं होय.
In reply to आंतरजालीय विकिपिडिया by पैसा
द सिम्पसन्स नावाच एक
प्लस ..
In reply to द सिम्पसन्स नावाच एक by पिंपातला उंदीर
च्यायला,*clapping* हसून हसून
धन्यवाद!
In reply to च्यायला,*clapping* हसून हसून by विवेकपटाईत