'अ'विचारजंतांवर काही म्हणायचा आधी इंटरनेट (आंतरजाला)च्या निर्मीती प्रक्रीये पासून हा लेख सुरु करतो. सध्या संगणकीय भाषेत म्हणायचे झाले तर अर्पानेटच्या पहिल्या वापरापासून इंटरनेट वापर प्रक्रिया सुरु आहे. ह्याच इंटरनेटचा वापर करून 'विभिन्न तत्व' लेखकू कपाळकरंटेपणाणे (वैचारिक भाषा) एकत्र आले आणि आजची आंतरजालिय लेखन सृष्टी डोळ्यांसमोर आहे.
आमच्या सारखे असंख्य लोक आंतरजालाच्या व्यासपीठाला मानणारे, लोकांच्या मते ह्याच व्यासपीठाच्या माध्यमातून अनेकाविध विचारधारा एकत्र होण्याची इच्छा निर्माण झाली आणि आंतरजालिय लेखनाची सुरवात झाली. प्रथम लेख आणि त्या लेखावर, 'सर्वांपासून पासून अलग आहोत हे दाखविण्याची' इच्छा असलेल्या पहिल्या प्रतिसादापासून या मायावी विचारजंती सृष्टीची आणि बद्धकोष्ठतेची निर्मिती झाली. त्या पहिल्या लेखावरच्या पहिल्या प्रतिसादापासूनच परमात्मा रचित प्रत्येक विचारजंत आपल्या विचारजंती लेखनातून "सर्वांपासून पासून अलग होण्याची" इच्छा मनात धारण करून बद्धकोष्ठ निर्मितीची इच्छा पूर्ण करीत आहे. आंतरजालाचा विकास आपल्या या विचारजंती लेखनाच्या इच्छेमुळेच मुळेच होत आहे आणि जेंव्हा ही इच्छा संपेल तेव्हा आंतरजाल ही संपेल. आपल्या ज्ञात ज्ञानाचा अंत होईल.
परमेश्वराने 'स्त्री-पुरुष' यांच्यारूपात विचारजंतांची निर्मिती केली आहे. आंतरजालावरच्या अन्य जीवांप्रमाणे 'सर्वांपासून पासून अलग आहोत हे दाखविण्याची' इच्छा आपल्यात ही आहे. हीच इच्छा मनात धारण करून स्त्री-पुरुष आपापल्या विचारजंती लेखांचे 'पाडन' करत असतात. विचारजंत लेख पाडतात, त्यावर प्रतिसाद येतात आणि त्या प्रतिसादावर विचारजंती उपप्रतिसाद देता देता विचारजंतांची सर्वांपासून पासून अलग आहोत हे दाखविण्याची मूळ इच्छा पूर्ण होते. स्पष्ट आहे, विचारजंती लेखांचे मूळ उद्दिष्ट बद्धकोष्ठ प्राप्ती होय. या मुळेच 'सर्वांपासून पासून अलग आहोत हे दाखविण्याची' मानवाची इच्छा पूर्ण होते व आनंद ही मिळतो. केवल लेखन-आनंदा साठी केलेल्या लेखनाला आपल्या प्राचीन विचारजतांनी कधीही उचित मानले नाही कारण अश्या लेखनामुळे मुळे समाजातली बद्धकोष्ठता नष्ट होते. म्हणून सर्वांपासून पासून अलग आहोत हे दाखविण्याची इच्छा असलेल्या जुन्या खोडांनी या अशा सम-लेखकूंना 'विचारजंत' या रूपाने परिभाषित केले.
समाजातले तथाकथित बुद्धीजीवी ह्या अविचारजंती (आनंददायी) लेखनाला जास्तीत जास्त प्रतिसाद मिळावे असा घाट घालत आहेत. त्यांना एकाच विचारायचं आहे, केवल लेखन-आनंदा साठी केलेले लेखन परमेश्वर प्रदत्त मानवाची 'सर्वांपासून पासून अलग आहोत हे दाखविण्याची' मूळ इच्छा पूर्ण करू शकते का? आपण सर्वाना माहित आहे. विचारजंती लेखन केल्याशिवाय ती इच्छा फलित होऊ शकत नाही. अविचारजंती व्यक्ती 'सर्वांपासून पासून अलग आहोत हे दाखविण्याची' मानवाची मूळ इच्छा कधीच पूर्ण करू शकत नाही. आपणास वाटत असेल केवळ आनंदा साठी लेखन केले जात असेल. पण इथे एक गोष्ट नमूद कारणे जरुर आहे. 'आनंद' बद्धकोष्ठतेमध्ये असतो, जिथे बद्धकोष्ठता नाही तिथे आनंद मिळण्याची यत्किंचित ही शक्यता नाही. अविचारजंती व्यक्तींना 'बद्धकोष्ठतेचा' आनंद कधीच प्राप्त होत नाही. अश्या व्यक्ती आयुष्यभर 'पोट-रिकामपणाचे' दुःख भोगतात, हेच वास्तव. खरे म्हणजे अविचारजंतीपणा माणसात दडलेली एक वैचारिक विकृती आहे. एक वैचारिक आजार आहे. योग्य 'अॅन्टी लेक्सिटीव्ह चिकित्सा' केल्यास त्याला या विकृती पासून मुक्ती सहज मिळू शकते. वैचारिक विकृती नेहमीच झपाट्याने कुठल्याही समाजात तीव्रतेने पसरते. अविचारजंतीपणाला प्रोत्साहन देणे म्हणजे मानवजातीला बद्धकोष्ठ मिर्मूलनाच्या मार्गावर प्रवृत्त कारणे होय. या विकृतीला प्रोत्साहन दिल्यास बद्धकोष्ठतेचा गोळा फूटून जाईल आणि मानवजाती समेत बद्धकोष्ठतेचा विनाश होईल. हे आपल्याला चालेल का?
मिसळपाव
प्रतिक्रिया
अर्धे वाचूनच अपचन झालय.....
अर्धे वाचूनच अपचन झालय..... सोट्री लै भारी स्टॅमिना आहे तुमच्यात. ओरीजनल लेख संपूर्ण वाचताय वर त्यावर इडम्बन सुद्धा ल्हिताय. ;)
हेच म्हणायचं होतं
In reply to अर्धे वाचूनच अपचन झालय..... by विजुभाऊ
हेच म्हणायचं होतं
चर्चा तर होणारच.
चर्चा तर होणारच.
@प्रथम लेख आणि त्या लेखावर,
@प्रथम लेख आणि त्या लेखावर, 'सर्वांपासून पासून अलग आहोत हे दाखविण्याची' इच्छा असलेल्या पहिल्या प्रतिसादापासून या मायावी विचारजंती सृष्टीची आणि बद्धकोष्ठतेची निर्मिती झाली. >>>
निषेध!
विचारजंती लोकांनी विचारजंती लोकांसाठी लिहिलेला स्युडो-इंटुक लेख!
+१
In reply to निषेध! by नंदन
विचारजंतुकल्याणम् खलु विकृतिसम्पदा |
बद्धकोष्ठविनाशाय सदैवावाहयामहे ||
ब्याटस्य वचन द्वय: एशां
ब्याटस्य वचन द्वय: एशां कथयामि.
तदैव सुदिनं लग्नं तदैव सुखिनः सन्तु.........
चूक
पोटरिकामपणातच खरा आनंद असतो. म्हणूनच अ-विचारजंती आपला कोठा बंद करण्याऐवजी जिथे तिथे मोकळा करून आपल्या निर्मितीचा आनंद सर्वत्र पसरवतात. लेख पाडणे, जिलब्या टाकणे हे शब्द सर्व पाणी ओतण्याच्या आधीचे आहेत. :)
नवे अलंकार
मिसळपावचे मराठी साहित्यास नवे अलंकार देण्याचे धोरण आहे का ?
जुन्या ,जाणत्या मिपावरील सभासदांना हि विनंती आहे
विडंबना चे विडंबन याला विवी अलंकार म्हनल्यास कोनाचे डॉले वतारले जातील का ?
चर्चा तर होणारच.
वादे वादे जायते तत्वबोधः हे आता जुने झाले. इथे मिपावर वादे वादे जायते कंठशोषः हेच नवे ब्रीड ब्रीद आहे.
.
छान
जे ब्बात!!
श्री श्री १००८ सकल बद्धकोष्ठ्निवारण रिकामपोट कॉकटेलसम्राट सोत्रिमहाराज कि जय!!!
(कृ.ह.घ्या.)
च्यायला
In reply to जे ब्बात!! by राजेंद्र मेहेंदळे
रिकामपोट
तुम्हाला नक्की हेच अपेक्षित आहे काय ?
विकारजंत एवजी विचारजंत हा
विकारजंत एवजी विचारजंत हा शब्द वापरल्याबद्दल तुला कंपुतुन अपात्र का ठरवु नये ;)
आता कंपुची चर्चा तर होणारच ;)
नोटीसबाज कंपुबाज
वाश्या
हे राम
हे राम =))
साले रिकामपोट धंदे!
साले रिकामपोट धंदे! ;)
भारतात अनेकांना
भारतात अनेकांना "विचारजंत" या मानसिक आजाराची लागण आहे असे वाचनात होते. मराठी आंजावर अनेकांची मते वाचल्यावर त्यांची संख्या बरीच मोठी आहे हे जाणवले. केवळ सामान्य प्रतिसादकच नाही तर बरेच इंटुक लोकही या आजाराने ग्रस्त दिसतात.
या आजारावर अजून तरी औषध निघालेले नाही (पुढे निघेलही कोणी सांगावे?). तोवर किमान या लोकांनी योग्य वेळी समुपदेशन वगैरे उपचाराद्वारे काही उपयोग होतो का ते बघावे.
- राक्षसी केस
+१११११११११११
In reply to भारतात अनेकांना by पैसा
अहो, जरा जप्पून विधानं करा हो.
इंटुक लोकही विचारजंत असल्याचा आणि विचारजंत हा मानसिक आजार असल्याचा काही विदा तुमच्याकडे आहे का?
दिन्नेश सायगळवी
आंतरजालीय विकिपिडिया
In reply to +१११११११११११ by दिनेश सायगल
आंतरजालीय विकिपिडिया आणि अडीच मराठी संस्थळे वाचा राव!
-आबा पाटील
अस्सं होय.
In reply to आंतरजालीय विकिपिडिया by पैसा
अस्सं होय.
म्हणजे आंतरजालीय विकिपंडित हे विचारजंत असतात असे तुम्हास म्हणावयाचे आहे काय?
द सिम्पसन्स नावाच एक
द सिम्पसन्स नावाच एक भन्नाट सिरिअल इथे कुणी बघत ते माहित नाहि. त्यात लिसा नावाच्या एका छोट्या मुलीच पात्र आहे . लिसा ही घरातली स्कॉलर. तिने वयाच्या आठव्या वर्षी बौद्ध धर्म स्वीकारला असून शाकाहार अंगिकारला आहे.जेंव्हा सिंपसन्स परिवार किंवा स्प्रिंगफील्ड एखाद्या मोठ्या निर्णयाच्या उंबरठ्यावर असतो तेव्हा लिसाचा आवाज हा सद्सद विवेका चा आवाज असतो. एकूण लिसा ही समाजातील कटू सत्य सांगणार्या 'intellectual minority' ची प्रतिनिधी. पण जेन्वा तीच एखाद मत बहुसंख्य लोकांच्या विरुद्ध जात तेंवा लोक तिला नाही नाही ते बोलतात . तिला गप बसवून खाली बसवतात . तिचे मत कितीही बरोबर असले तरी तिचा गुन्हा एकच असतो ते म्हणजे ती out of the box विचार करत असते आणि तिचे विचार तार्किक कसोटी वर घासून घेतलेले असतात . जेन्वा कुणी विचारजंत शब्दप्रयोग केला कि बहुसंख्यांच्या विरोधात असणारी हि लिसा आठवते
प्लस ..
In reply to द सिम्पसन्स नावाच एक by पिंपातला उंदीर
प्लस १११
च्यायला,*clapping* हसून हसून
च्यायला,*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping: हसून हसून पोट दुखले जिथे बद्धकोष्ठता नाही तिथे आनंद मिळण्याची यत्किंचित ही शक्यता नाही.
पोट रिकामे करण्यासाठी मला पुष्कळदा रात्री इसबगोल घ्यावे लागते. मी आनंदी आहे पावती मिळाली. धन्यवाद.
धन्यवाद!
In reply to च्यायला,*clapping* हसून हसून by विवेकपटाईत
धन्यवाद!
विडंबनावर मूळ लेखाकाकडून दाद मिळण्यासारखे दुसरे सुख नसते!
- (आनंदी) सोकाजी