वास्तविक शेअर मार्केट हा सगळ्यांचा वादाचा, समज - गैरसमजाचा असा विषय आहे. पण मला कळलेले मार्केट (जे प्रत्येकाचे वेगवेगळे असणार कारण ते चक्रधर स्वामींच्या दृष्टांतासारखे आहे. )थोडेसे असे की ज्यात दोन प्रकारचे पैसे कमावण्याचे मार्ग लोक ढोबळपणे अवलंबतात.
अत्यंत किचकट ट्रेडिंग प्रणाली पासून लांब राहून मी माझे काही ट्रेडिंग आणि गुंतवणुकीचे साधे प्रयोग केले ते हि मांडतो आहे.
तर
१) गुंतवणूक योग्य मार्केट २) ट्रेडिंग योग्य मार्केट.
दोन्ही पद्धतीच्या मार्केट मध्ये अभ्यास हा अपेक्षित आहे. म्हणजे जेव्हा मी बाजारात जाऊन वांगी घेऊन येतो तेव्हा ती खराब निघतात आणि बायको बदडून काढून माझ्या पाठीचे भरीत करते. आता तुम्ही म्हणाल की बाजारात वांगी खरेदी करणे आणि एखादा शेअर खरेदी करणे सारखेच का? तर मी म्हणेन होय कारण इथे सुद्धा दोघे आहेत एक विकणारा आणि एक घेणारा. आता घेणारा जर मी असेन जो फारसा कधीही बाजारात जाऊन भाजी घेत नाही आणि घेणारी माझी बायको असेल जी रोज बाजारात जाऊन भाजी खरेदी करते तर विकणारा जो एकाच जागी कित्येक वर्ष बसून भाजी विकतोय तो तुम्हाला लगेच ओळखतो की हा बकरा चांगला आहे आणि त्याची ना खपणारी वस्तू तो तुमच्या गळ्यात मारतो पण बायको हा प्राणी जगात फार हुशार असतो (ती नावारासुद्धा एका नजरेत जोखते हो !)ती भाजी बरोबर पाहून, भाव करून घेते मी भाजीवालीकडे पाहून(हे फार महत्वाचे आहे बरे का!) भाजी घेतो. थोडक्यात मी ज्या चुका तिथे करतो त्याच सर्वत्र करत फिरत असतो त्याला अपवाद एकाच प्रांताचा ज्या प्रांतात मी मुरलेलो आहे. तिथे मला कुणी फसवू शकत नाही (आणि इथे सगळे क्रेडीट मला बर का. आणि तिथे मात्र भाजीवालीने फसवले हो...हल्लीचे भाजीवाले...आणि स्वातंत्रपूर्व काळात वगैरे गप्पा मारायला मी मोकळा ) तर जी गत भाजीवालीकडे तीच शेअर मार्केटमध्ये. कुणीतरी मला सांगितले हॉट टीप आहे आणि मी घेतले शेअर्स आणि नंतर आपटला की हो शेअर!! झाले मग मार्केट कसे वाईट माणूस कसा फसतो जु गा र आहे जू गा र ..वगैरे वगैरे
मग मार्केट मध्ये टीप येते ती हॉट असते तरी मला का मिळत नाहीत पैसे : - ह्याचे विवेचन नको का करायला. मुळात टिप्स ह्या ब्रोकर,ओपेरेटर (च्यायला म्हणजे काय आणि नवीन ?!!) जनरेटेड असतात. म्हणजे मार्केट जर कंपनीच्या आर्थिक निकषांवर चालत असते तर त्यात चढ उतार (आणि आपल्याकडे जरा जास्तच चढ उतार) आलेच नसते किंवा फारतर जेव्हा कंपन्याचे आर्थिक निकाल जाहीर होतात तेव्हाच ते चढ उतार झाले
असते. मग हे गुजराती (पिढ्यानपिढ्या) कमावतील कसे ?
मग एखादा शेअर जमा करून ठेवायचा असेल तर मार्केटमध्ये वाईट बातमी सोडायची ती बातमी पूर्वी कर्णोपकर्णी पसरत असे आता सी एन बी सी आणि तत्सम तज्ञ आहेत ते करायला तर आपण कुठे होतो हं वाईट बातमी सोडायची आणि सामान्य माणसाला शेअर्स विका म्हणून सांगायचे (मग त्यांनी विकले ते घेतात कोण?) जेणे करून शेअर्स गडगडले पाहिजेत आता हे गडगडणारे शेअर्स एकट्याने घेणे शक्य नाही मग ग्रुप करून विकत घ्यायचे (इथे हि अनेक प्रकार आहेत) आणि आपला पूर्ण पैसा त्यात लागला की मार्केट मध्ये चागल्या बातम्या सोडायच्या आणि खरेदी करा म्हणून सांगायचे हे करत असतानाही त्यांची गणिते असतात म्हणजे किती रुपये किती काळ गुंतून पडणार आहेत त्यावर किती व्याज मला द्यावे लागणार आहे त्यानुसार शेअरचा भाव ठरलेला असतो त्या भावापर्यंत शेअर पळवत नेला कि लोकांनाही त्या शेअरबद्दल विश्वास निर्माण होतो आणि जिथे हि मंडळी बाहेर पडणार तिथे तुम्ही आम्ही आत जाण्यासाठी धडपडतो.
ह्या सगळ्यांचे प्रतिबिंब ग्राफ्सद्वारे मांडले जाते पण पडद्यामागचे खेळ सामान्य लोकांपुढे न ठेवता त्याला सपोर्ट-रेझिस्टन्स अशी नावे दिली जातात आणि आणखीन गुंगवले जाते.
हे सगळे अतिशय जवळून पाहिले असल्याने आणि पार मार्केट रिंग मध्ये काम केल्याने हे खेळ करणाऱ्याबद्दल मनात राग ठासून भरलेला आहे.(निधड्या छातीचा मराठी मुठी आवळणे आणि रागावणे हेच करू शकतो) पण सर्व अर्थशास्त्र आणि अर्थ क्षेत्र हे मारवाड्यांच्या (होय गुजरात्यांच्यातर अजीबात नाही )हातात का आहे? त्यांच्याकडे पैसे आहेत रे ?आरे मग माझ्या कडे का नाहीत ? तीर्थारुपानी ठेवले नाहीत काय करणार ?आपल्या रक्तातच नाही काय करणार ? शेअर्स असोत कि मेटल असो किंवा रियल इस्टेट असो.सर्व मारवाड्यांच्या हातात.
पण त्यांच्यात राहून मी एक शिकलो कि आपण अभ्यास करतो ते हि अभ्यास करतात पण ते करतात तो वेगळा अभ्यास (ज्याच्या कडे मी काम केले तो तर मला हिणवून हिणवून सांगायचा तू बी कॉम मी आठवी जेमतेम पण मी बघ आणि तू बघ....पण त्यानेच बरेच हिंडवले मला मार्केटमध्ये अर्थ क्षेत्राची ओळख करून दिली वाणिज्य म्हणजे नुसतेच अकाउंटीग नाही रे हे मला शिकवले ) मी करतो ती खर्डेघाशी.
मग इकडचा लाडू तिकडे करताना पडणार्या पाकळ्या खाऊन जगलेल्या कैद्याची गोष्ट मला आठवते. तेव्हा आपणही तेच करायचे ठरवून मी ट्रेडिंग आणि गुंतवणूक ह्या दोघांची सांगड घातली.
इथे येऊन माझा प्रवास सुरु झाला की गुंतवणूक योग्य मार्केटमध्ये ट्रेडिंग योग्य मार्केटमधून पैसे कमवायचे आणि गुंतवत राहायचे. आता मी जी पद्धत अवलंबली त्यात पैसे हळू हळू मिळतात कारण मी ही मराठीच सुरक्षितता आधी.
मग नवीन नवीन सुरुवात करणार्यांसाठी कशी सुरवात करावी किती पैसे लावावेत ? हे प्रश्न येतात (वास्तविक लावावेत असे विचारल्यावर विचारणार्याची मानसिकता कळते कि आज तंगडी येणार कि बंगला ह्या पद्धतीने तो मार्केट कडे हि जुगार म्हणूनच बघतोय मग त्याला सांगावे लागते "बाला ! जल्ला कवरे लाऊ नाय रे कवरे गुंतवू म्हण हं ) तर त्यावर माझे उत्तर हे की तुझ्याकडचे पैसे १० वर्ष अडकून पडले तरी चालतील असे असतील तेवढे लाव किंवा भरपूर असतील तर तुझी उद्दिष्टे वगैरे ठरवून त्याप्रमाणे शास्त्रोक्त पद्धतीने गुंतव.
तुमचे पैसे ठरले आता शेअर्स कोणते घेऊ? शेअरची निवड करण्याआधी सेक्टर, इंडस्ट्रीजवगैरे समजून घ्या म्हणजे फार्मा सेक्टर,बँक सेक्टर वगैरे नंतर त्यातल्या कंपनीज.
मला विचारले तर (म्हणजे होमियोपाथकडे जाऊन मी कुठली मुळी चोखाल्यावर बरे वाटेल हो....चुकतय हो ) मी म्हणेन बँक हा सेक्टर बेस्ट कारण तिथे जोखीम इतर कंपनींच्याबाबतीत असलेल्या जोखमीपेक्षा कमी असते. (मी फार ढोबळपणाने इथे हे लिहितोय ह्यावरचे विवेचन मी नंतर करीनच ). पण एखादा माणूस फार्मा सेक्टर मध्येच कामाला असेल किंवा ज्या सेक्टर मध्ये कामाला असेल त्याच सेक्टरचा विचार त्याने करावा कारण त्याला त्यात अधिक माहिती असण्याचा संभव आहे. मी वाणिज्य म्हणजे व्यापार करणार आणि व्यापाराच्या खेळात लहान असल्यापासून बँक बनून बाजूला बसणेच आवडत आले आहे.(दुसर्या शब्दात महाआळशी प्राणी )
आता एखादी बँक ठरली तर थोडा अभ्यास करा कसला ? किमतीतले चढ उतार कमीत कमी गेल्या ३ महिन्यांचे आणि.......
१) जर १० शेअर्स घेणार असाल तर २ च घ्या आणि हळू हळू घेत १० पूर्ण करा आणि लिहून ठेवा कितीला पडले ते म्हणजे ब्रोकरेज वगैरे सगळे मिळवून उदा. रु. १०० ला एखादा शेअर घेतला तर १००*१० = १०००/- आता ह्यच्या १०% शेअर्स सरळ डीमेट करा म्हणजे ९ राहिले आता १०००/९ = १११ भाव आल्यावर तुम्ही ९ शेअर्स पूर्ण विकून टाका जमलेला १ शेअर तुमच्याकडे नाहीच असे समजून डीमेटला पडला राहू देत जेव्हा जेव्हा डीमेट स्टेटमेन्ट येईल तेव्हा तो त्यातला फक्त आणि फक्त प्रोफीटच दाखवेल. जर भाव १११ आलाच नाही तर...तर तुमचा अभ्यास कमी पडतोय. अभ्यास वाढवा हेच त्याला उत्तर आहे. आणि जरी १११ ला भाव नाही गेला तरी शेअर्स लाभांश देईलच म्हणून थांबू शकता त्याचा दुष्परिणाम म्हणजे ट्रेडिंग बंद. (पुन्हा स्वातंत्र्योत्तर काळात......सुरु )
२) रोज एका बँकेचा एकाच शेअर घ्या त्यासाठी भाव पाहू नका, अभ्यास करू नका आणि वर्ष संपल्यावर किंवा चांगला परतावा मिळेल (३६% वर्षाला....मारवाडी म्हणतो )तेव्हा बाहेर पडा.
३) आता जानेवारी ते मे सुगीचा काळ आहे मिळणाऱ्या लाभांशावर नजर ठेऊन आणि आपले भांडवल लक्षात घेऊन थोडा अभ्यास करून लाभांश देणारे शेअर्स घ्या आणि येणारा लाभांश परत त्याच कंपनीत गुंतवत राहा. (माझा १४ वर्षाचा मुलगा हेच करतो आणि लाभांशाच्या रुपात पैसे पासबुकात वाढलेले दिसले कि जो आनंद मी त्याच्या चेहऱ्यावर पाहतो तो अवर्णनीय आहे.)
मला माहित आहे वरील लिखाण त्रोटक आहे.विस्तृत आता खाली प्रतिसादाद्वारे होईलच....
(ढिशक्लेमर : वरील लिखाण ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. प्रेमभंग झालेल्यांनी....म्हणजे मार्केट मध्ये पोळलेल्यानी लांब राहावे किंवा बोध घ्यावा )
वाचने
43775
प्रतिक्रिया
60
मिसळपाव
प्रतिक्रिया
विशेष मार्गदर्शन हवे..
एकूण भाव आणि आजचा सेन्सेक्स बघता....
In reply to विशेष मार्गदर्शन हवे.. by अव्यक्त
नफ्यातला लॉस लक्षात ना घेता
In reply to एकूण भाव आणि आजचा सेन्सेक्स बघता.... by ज्ञानव
नफ्यातला लॉस
In reply to नफ्यातला लॉस लक्षात ना घेता by यसवायजी
अव्यक्त जी
In reply to विशेष मार्गदर्शन हवे.. by अव्यक्त
अव्यक्त जी
In reply to विशेष मार्गदर्शन हवे.. by अव्यक्त
धन्यवाद
मुद्दा क्रमांक एक
In reply to धन्यवाद by अव्यक्त
वाचत आहे..
NSC
त्यातही मेख आहे
प्रथम ज्ञानाव यांचे आभार कि
धन्यवाद.....
In reply to प्रथम ज्ञानाव यांचे आभार कि by आनंदराव
आनंदयात्री जी
ज्ञानव जी...
सध्या एवढेच.....
In reply to ज्ञानव जी... by सदासुखि
मॉक ट्रेड
In reply to सध्या एवढेच..... by ज्ञानव
३६% वर्षाला ?
चांगलं काम करताय.. धन्यवाद.
फारच मजेदार लेखन आणि माहिती
मालक आपणच पुढाकार घ्या की.....
In reply to फारच मजेदार लेखन आणि माहिती by कंजूस
मग मी जेव्हा श्री धीरूभाई
In reply to मालक आपणच पुढाकार घ्या की..... by ज्ञानव
शरद पवार
In reply to मग मी जेव्हा श्री धीरूभाई by प्रकाश घाटपांडे
नक्कीच वेगळा धागा काढावा! खूप
In reply to फारच मजेदार लेखन आणि माहिती by कंजूस
ब्लु चिप stock आणि sip
सलग ६५ महिने NSC
माझ्या मते शेअर मार्केटमध
सॉरी, तसे नाहीये
आपल्याला फक्त विजेते दिसतात.
In reply to सॉरी, तसे नाहीये by ज्ञानव
आपल्याला फक्त विजेते दिसतात.
In reply to आपल्याला फक्त विजेते दिसतात. by उपाशी बोका
आनंदयात्री जी..
आनंदयात्री जी.. आणि मार्केट चा अभ्यास करायचा नसेल तर सरळ blue chip stock घ्यायचे आणि SIP करायची..ह्या आपल्या विधानावर सविस्तर विवेचन कराल काय?
अव्यक्त जी, मला जेवढे ज्ञान आहे ते आपल्या समोर मांडतो . तज्ञांनी चूक सुधारावी . blue chip stock म्हणजे ज्यांची बाजारातील पत खूप चांगली आहे अशी कंपनी . ही ढोबळ व्याख्या झाली . उदा : TCS , INFOSYS , रिलायंस , एल & टी वगैरे . या कंपन्या मध्ये investment केली असता ती बुडण्याचा धोका फारसा नस्तो. ( हे माझे विधान खूप धाडसाचे आहे ). म्हणजे तुम्ही केलेली गुंतवणूक ची किंमत आज समजा १०रु आहे . ती उद्या ८ झाली तरी धोका नस्तो. काही दिवसांनी त्या ८ चे १६ पण होतात . उदा : रिलायंस २००८ साली ३२०० रु होता ननतर खाली येउन १२०० वर कितीतरी दिवस होत. मी स्वत १,०५० ने घेतला अहे. . आज ५ वर्ष झाली त्याने १००० चा पण भाव दाखवला नहिये. पण मी निर्धास्त आहे. कारण ते पैसे मी बाजूला ठेवले असल्यासारखे आहे. कारण कंपनी ब्लु चीप आहे. तर असे शेअर्स तुम्ही निवडा आणि दरमहा थोडे थोडे घेत चला. त्यामध्ये ३ भाग करा . १) असे शेअर्स कि जे तुम्ही ५ वर्षानंतर विकू शकता . २) असे शेअर्स कि जे तुम्ही १० वर्षानंतर विकू शकता . ३) असे शेअर्स कि जे तुम्ही फक्त तुमच्या म्हातारपणात तुमच्या गरजेला विकू शकाल . पण या मध्ये जोखीम अशी आहे की असे शेअर्स तुम्हाला कोणीही सांगणार नहि. तर तुम्ही तुमच्या सद्सद्विवेकबुद्धीला जे पटतील तेच शेअर्स घेऊन पुढे जा. आनि संयम ठेवा । आता पासूनच अभ्यासाला सुरुवात करा . इतर कोणत्याही व्यवसायापेक्षा यामध्ये जर चांगला अभ्यास केलात तर यश तुमचेच अहे. अहो , सायकल शिकताना पण ४-५ वेळा पडतोच की आपण . काय ?घाटपांडे जी,
माझ्या मते शेअर मार्केटमध अत्यल्प कमावतात व बहुसंख्य गमावतात. इरॅशनल मार्केट आहे. समजा एखादा सर्वसामान्य गुंतवणुकदार जर दहा वर्षे गुंतवण करत असेल तर त्याची सरासरी कमाई ही एफडी पेक्षा जास्त नसेल प्रकाश घाटपांडे
घाटपांडे जी, एक गम्मत बघा . ज्या व्यक्ती ने १९८० साली विप्रो मध्ये रु १०,०००/- गुंतवले असतील तर त्याची आजची किंमत रु ४७५ कोटी होईल .माझं मत
१००% बरोबर
गुंतवणूक आणि ट्रेड ह्यातला फरक
In reply to १००% बरोबर by ज्ञानव
पण गुंतवणूक आणि ट्रेड ह्यातला फरक तसेच गुंतवणूकदार आणि त्याची मानसिकता जवळून पहिल्याने "गुंतवणूकदारांबद्दल" काही वेळा अत्यंत वाईट वाटते आणि काही वेळेस कीव येते.केवळ हे वाक्य वाचून उत्तर लिहिण्याचा मोह आवरता आला नाही. सविस्तर प्रतिसाद थोड्या वेळात लिहितो.बर्याच दिवसांनी जर
In reply to गुंतवणूक आणि ट्रेड ह्यातला फरक by उपाशी बोका
गुंतवणूक आणि ट्रेड
In reply to १००% बरोबर by ज्ञानव
पण गुंतवणूक आणि ट्रेड ह्यातला फरक तसेच गुंतवणूकदार आणि त्याची मानसिकता जवळून पहिल्याने "गुंतवणूकदारांबद्दल" काही वेळा अत्यंत वाईट वाटते आणि काही वेळेस कीव येते.मला स्वत:ला "ट्रेडर"बद्दल अत्यंत वाईट वाटते आणि कीव येते. कारण का ते सांगतो. ट्रेडरला झटपट फायदा हवा असतो. (Nothing wrong with that approach). भारतात tax चे नियम काय आहेत ते मला माहीत नाही, पण मी राहतो तिथे short term gain (१ वर्षाच्या आतला फायदा) हा रेग्युलर उत्पन्नात जमा होतो आणि मला त्याच्यावर अधिक दराने tax भरावा लागतो; पण तोच फायदा long term gain असेल तर कमी दराने tax भरावा लागतो. दुसरे म्हणजे सारखे सारखे ट्रेडिंग करून ब्रोकरेज वजा करून Net किती फायदा होत आहे, ते बर्याचदा लक्षात घेतले जात नाही. तुमचा फायदा होवो अथवा न होवो, ब्रोकरचा फायदा मात्र नक्की होतो. त्यामुळे ते ट्रेडिंगला उत्तेजन देतात. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ट्रेडर्स हा फायदा (वरचे उदाहरण ३६%) consistently किती वर्ष कमवू शकतात, ते बघणे रोचक ठरेल.१००% सहमत
In reply to गुंतवणूक आणि ट्रेड by उपाशी बोका
ज्ञानव जी
हे पूर्वी बर्याच जणानी .....
१००% बरोबर ! पूर्ना मान्य !
In reply to हे पूर्वी बर्याच जणानी ..... by ज्ञानव
संदर्भ ग्रंथ
मराठीत कुणीच नाही.
In reply to संदर्भ ग्रंथ by विअर्ड विक्स
नमस्कार ज्ञानव साहेब,
In reply to मराठीत कुणीच नाही. by ज्ञानव
धन्यवाद,
In reply to नमस्कार ज्ञानव साहेब, by शैलेश लांजेकर
चढत्या क्रमाने वाचा (सोपी आधी लिहिली आहेत)
In reply to संदर्भ ग्रंथ by विअर्ड विक्स
घेतलेल्या शेअरना विकून
हा ना राव. मलाही नेमका हाच
In reply to घेतलेल्या शेअरना विकून by अभ्या..
शेअर्स लीजवर देऊन
In reply to घेतलेल्या शेअरना विकून by अभ्या..
पण हे आर्बिट्रेज फार कमी
In reply to शेअर्स लीजवर देऊन by ज्ञानव
हल्लीच्या संगणक युगात,
In reply to पण हे आर्बिट्रेज फार कमी by बॅटमॅन
नक्कीच.
धन्यवाद सर. प्रश्न इतकाच होता
In reply to नक्कीच. by ज्ञानव
धन्यवाद
In reply to धन्यवाद सर. प्रश्न इतकाच होता by बॅटमॅन
सर!!!!
In reply to धन्यवाद सर. प्रश्न इतकाच होता by बॅटमॅन
ब्योर्र !!
In reply to सर!!!! by ज्ञानव
धन्यवाद
पुढील सरसरी 3 वर्षासाठी
चुकिचा प्रश्न
In reply to पुढील सरसरी 3 वर्षासाठी by बर्फाळलांडगा
वैयक्तिक सल्ला ?????