✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आम्हां घरी धन.....(३)

म
मोदक यांनी
Wed, 09/04/2013 - 16:02  ·  लेख
लेख
आम्हा घरी धन... आम्हां घरी धन ...(२) ---------------- धन्यवाद मंडळी! पहिल्या आणि दुसर्‍या धाग्याला उदंड प्रतिसाद मिळाला. अनेक उत्तमोत्तम उतारे, कविता सर्वांना वाचायला मिळाले. पण आता तिथे नव्या प्रतिक्रिया, नवे उतारे शोधणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे या धाग्याचा पुढचा भाग सुरू करत आहे. चला.. आपल्याला आवडलेल्या कविता, ओळी, छोटेखानी लेख, वन लाईनर्स, टॅन्जंट्स, सुभाषिते.. अगदी जे जे आवडले आहे ते येथे एकत्र करूया. लेखक आणि पुस्तकाचे नाव द्याच परंतु आवडलेला मजकूर 'का आवडला?' हे ही शक्य असेल तर द्या.

Book traversal links for आम्हां घरी धन.....(३)

  • ‹ आम्हां घरी धन... (२)
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
वाङ्मय
भाषा
साहित्यिक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
आस्वाद
प्रतिभा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
56346 वाचन

💬 प्रतिसाद (98)

प्रतिक्रिया

The gratitude of every home

आदूबाळ
गुरुवार, 09/05/2013 - 10:37 नवीन
The gratitude of every home in our Island, in our Empire, and indeed throughout the world, except in the abodes of the guilty, goes out to the British airmen who, undaunted by odds, unwearied in their constant challenge and mortal danger, are turning the tide of the World War by their prowess and by their devotion. Never in the field of human conflict was so much owed by so many to so few.
(विन्स्टन चर्चिल, २० ऑगस्ट १९४०) सलग तीन महिने आणि तीन दिवस नाझी लुफ्तवाफने इंग्लंडला भाजून काढलं होतं. त्या भीषण बॉम्बहल्ल्यात धीर देणारी गोष्ट म्हणजे ब्रिटिश हवाई दलाचं अतुलनीय शौर्य. राष्ट्राला त्यांच्याप्रती वाटणारी कृतज्ञता चर्चिलने या शब्दात व्यक्त केली. हे भाषण इतकं प्रसिद्ध झालं की रॅफच्या त्या सैनिकांना "द फ्यू" म्हणू लागले. चर्चिलची इतर काही भाषणंही बहुत प्रसिद्ध आहेत.
  • राष्ट्राला अंधारात न ठेवता खडतर परिस्थितीची स्पष्ट जाणीव करून देणारं "I have nothing to offer but blood, toil, tears and sweat"
  • कणखर इच्छाशक्ती दाखवणारं आणि बाहूंत बळ फुंकणारं "We Shall Fight on the Beaches"
  • आणि सर्वसामान्य ब्रिटला आपल्या कर्तव्यांची जाणीव करून देणारं "This was their finest hour"
आपल्या हातून या क्षणी इतिहास घडवला जात आहे ही जाणीव चर्चिलला होती की काय कोण जाणे...
  • Log in or register to post comments

मागच्याच आठवड्यात I Have a

मोदक
गुरुवार, 09/05/2013 - 15:44 नवीन
मागच्याच आठवड्यात I Have a Dream ला ६० वर्षे पूर्ण झाली त्यावेळी अशा प्रसिद्ध भाषणांचा विचार करताना चर्चिल आठवले होतेच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

चर्चिल उवाच

रमेश आठवले
Mon, 09/23/2013 - 12:17 नवीन
चर्चिल यांनी दुसर्या महायुद्धानंतर त्याची संपूर्ण गोष्ट चार खंडात आपल्या खास ओघवती भाषेत लिहून प्रसिद्ध केली आहे. पुण्यात लक्ष्मी रोड वर commonwealth बिल्डिंग मध्ये वरच्या मजल्यावर असलेल्या लायब्ररीत बसून मी हे खंड वाचले आहेत. या सगळ्या खंडात सुरवातीला चर्चिलची ही खालील ब्रीदवाक्ये मोठ्या मथळ्यात दिलेली आहेत. In defeat defiance in war courage in victory magnanimity in peace preparedness हि वाक्य आजही भारत सरकारला लक्षात घेण्यासारखी सारखी आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

वन लाईनर

चौकटराजा
गुरुवार, 09/05/2013 - 17:11 नवीन
मला नास्तिक केल्या बद्द्ल मी ईश्वराचा आभारी आहे. - कोण म्हणाले ..... ?
  • Log in or register to post comments

पुन्हा बा. भ. बोरकर

पैसा
Fri, 09/13/2013 - 18:19 नवीन
नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी जिणे गंगौघाचे पाणी कशाचा न लागभाग कशाचा न पाठलाग आम्ही हो फुलांचे पराग आम्हा नाही नाम-रूप आम्ही आकाश स्वरूप जसा निळा निळा धूप पुजेतल्या पानाफुला मृत्यू सर्वांग सोहळा धन्य निर्माल्याची कळा ---------------------- बा. भ. बोरकर
  • Log in or register to post comments

अभिषेकी बुवांनी गायलेले

रमेश आठवले
Fri, 06/16/2017 - 03:03 नवीन
https://www.youtube.com/watch?v=tZol6tvKek8
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

इंदिरा संत

पैसा
Fri, 09/13/2013 - 18:30 नवीन
अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकुळ; अशा अवेळी पैलतिरावर आज घुमे का पावा मंजुळ. मावळतीवर चंद्र केशरी; पहाटवारा भवती भणभण; अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती तिथेच टाकुन अपुले तनमन. विश्वच अवघे ओठा लावुन कुब्जा प्याली तो मुरलीरव; डोळ्यामधले थेंब सुखाचे: "हे माझ्यास्तव.... हे माझ्यास्तव ...." ------------ इंदिरा संत
  • Log in or register to post comments

एका अप्रतिम चालीची आठवण

चौकटराजा
Sat, 09/14/2013 - 09:55 नवीन
या गीताने एका जुन्या मस्त चालीची आठवण झाली. गाउन पाहिले पण अंतर्‍याची चाल मात्र आठवेना. पण एनीवे धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

"पावा , मावळतीचा चंद्र" ह्या

मराठी_माणूस
गुरुवार, 06/15/2017 - 14:24 नवीन
"पावा , मावळतीचा चंद्र" ह्या शब्दांवरुन मला हे आठवले https://www.aathavanitli-gani.com/song/Asach_Yava_Pahat_Vara
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

मनी माझिया नटले गोकुळ, मी

अनिता ठाकूर
Sat, 09/14/2013 - 17:26 नवीन
मनी माझिया नटले गोकुळ, मी राधा तू कान्हा प्रेमळ (गायिका माणिक वर्मा) हे गाणे मला आठवले. असो. वरील गाण्यातील, ' हे माझ्यास्तव.... हे माझ्यास्तव...'म्हणत कुब्जेने अनुभवलेली भावना तर केवळ अप्रतिम!!!!!
  • Log in or register to post comments

दोन माणसांच्या नातेसंबंधात एक

मोदक
Sat, 09/21/2013 - 13:34 नवीन
दोन माणसांच्या नातेसंबंधात एक गोष्ट मला सतत जाणवत आली आहे. ती दोन्ही माणसे हयात असताना एवढ्या-तेवढ्याने ताणले जाणारे त्यांचे संबंध, त्यातली एक व्यक्ती कालावश झाली की इतके शिथील होतात, मागे राहिलेल्या व्यक्तीला मग जीवनासाठी गेलेल्याच्या दोषांत इतके गुण जाणवू लागतात की वाटते, या तणावरहीत संथ शांत जीवनासाठी इतकी मोठी किंमत द्यायलाच हवी होती काय..? समजूतदारपणा ही इतकी दुर्मीळ चीज कां असावी..? या 'अहम्' चा प्रभाव किती जबरदस्त आणि सर्वव्यापी आहे! आम्ही संस्कृतीच्या कितीही गप्पा मारल्या किंवा सुसंकृतपणा बाणवण्याचा कितीही मनापासून प्रयत्न केला, तरी यच्चयावत मानवजात ही या 'अहम्'ने आतून अशी एखाद्या भयानक रोगासारखी पोखरून काढली गेली आहे, की संस्कृती पेलण्याची ताकदच माणसात शिल्लक राहिलेली नाही. मृत्यूपुढेच फारतर हा 'अहम्' शरणागती पत्करत असावा. रोगापेक्षा ही औषधयोजना किती भयंकर आहे! सुनीताबाई - आहे मनोहर तरी
  • Log in or register to post comments

खूपच भावलं

मीता
Tue, 12/10/2013 - 13:29 नवीन
खूपच भावलं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

खूपच भावलं

मीता
Tue, 12/10/2013 - 14:15 नवीन
खूपच भावलं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

रक्तामध्ये ओढ मातिची

अजया
Sun, 09/22/2013 - 19:51 नवीन
रक्‍तामध्ये ओढ मातिची, मनास मातीचे ताजेपण मातीतुन मी आले वरती, मातीचे मम अधुरे जीवन कोसळताना वर्षा अविरत स्‍नान समाधी मध्ये डुबावे दंवात भिजल्या प्राजक्‍तापरी ओल्या शरदामधि निथळावे हेमंताचा ओढुन शेला हळूच ओले अंग टिपावे वसंतातले फुलाफुलांचे छापिल उंची पातळ ल्यावे ग्रीष्माची नाजूक टोपली उदवावा कचभार तिच्यावर जर्द विजेचा मत्‍त केवडा तिरकस माळावा वेणीवर आणिक तुझिया लाख स्मृतींचे खेळवीत पदरात काजवे उभे राहुनी असे अधांतरि तुजला ध्यावे तुजला ध्यावे इंदिरा संत
  • Log in or register to post comments

मस्त!

पैसा
Sun, 09/22/2013 - 20:05 नवीन
सुनीताबाई आणि इंदिरा यांचे लिखाण वाचून बरे वाटले!
  • Log in or register to post comments

जगायास तेव्हा खरा अर्थ होता - सौमित्र

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 09/23/2013 - 11:19 नवीन
जगायास तेव्हा खरा अर्थ होता, निरार्थास ही अर्थ भेटायचे मनासारखा अर्थ लागायचा अन मनासारखे शब्दही यायचे नदी-सागराचे किनारे कितीही मुक्याने किती वेळ बोलायचे निघोनी घरी शेवटी जात असता वळूनी कितीदा तरी पहायचे उदासी जराशी गुलाबीच होती, गुलाबात ही दुखः दाटायचे जरा एक तारा कुठेही निखळता, नभाला किती खिन्न वाटायचे असेही दिवस की उन्हाच्या झळांनी जुने पवसाळे नवे व्हायचे ऋतुंना ऋतुंनी जरा भागिले की नव्याने जुने झाड उगवयाचे. मनाचा किती खोल काळोख होता किती काजवे त्यात चमकायचे मना भोवती चंद्र नव्हता तरीहि मनाला किती शुभ्र वाटायचे. आता सांज वेळी निघोनी घरातून दिशहीन होउन चालायचे आता पाऊलेही दुःखू लागली की जरा मीच त्यांना उरी घ्यायचे. - सौमित्र
  • Log in or register to post comments

व. पु. काळे

प्रमोद देर्देकर
Fri, 10/25/2013 - 16:06 नवीन
व. पु. काळे यांचे कोट. जर आधी कोणी हे लिहिले असेल तर पुढचे टंकत नाही . गार झालेल्या अन्न प्रमाणे गरम करीत रहयचं . आयुष्यभर, श्वासा पर्यंत शेवटचा श्वास च गरम. नंतर सगळं थंड . प्रेतच पुन्हा गरम करता येत नाही. स्वप्न बाळगण्यासाठी कर्तुत्व लागतं असं कुणी सांगितलं ? अनेक माणसांच्या बाबतीत ते जन्माने पुरुष आहेत एवढा एक पुरुषार्थ त्यांना पुरतो.
  • Log in or register to post comments

दोन ह्टके कविता

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 10/25/2013 - 16:19 नवीन
अजुनी चालतोचि वाट - एकनाथ पांडुरंग रेंदाळकर अजुनी चालतोचि वाट! माळ हा सरेना विश्रांतिस्थल केव्हा यायचे कळेना! त्राण न देहात लेश, पाय टाकवेना, गरगर शिर फिरत अजी होय पुरी दैना! सुखकर संदेश अमित पोचविले कोणा, भार वाहुनी परार्थ जाहलो दिवाणा! काट्य़ांवरी घातलाची जीव तयासाठी, हसवाया या केली किती आटाआटी! हेच खास माझे घर म्हणुनी शीण केला, उमगुनी मग चूक किती अश्रुसेक झाला; दिन गेले, मास तसे वत्सरेही गेली, निकट वाटते जीवनसंध्या ही आली! कुठुनी निघालो, कोठे जायचे न ठावे, मार्गातच काय सकळ आयू सरुनी जावे! काय निरुद्देश सर्व जीवन मम होते मरुसरितेपरी अवचित झरुनी जायचे ते? पुरे! पुरे ही असली मुशाफरी आता, या धूळित दगडावर टेकलाच माथा ----०----०----०----०----०----०---- खालील कवितेचे शिर्षक मला माहित नाही कवी श्री श्रीनिवास कृष्ण पाटणकर आहेत. कोण जाणे ते कशाला तोडताना केवडे पर्वताच्या पायथ्याला देह हा खाली पडे आतला संकोचलेला जीव झाला मोकळा अन् कुणाला पाहवेना भंगल्या देहाकडे भोवती एकेक आले भिल्ल या रानातले ओळखाया देह माझा अन् रचाया लाकडे नायकाचा शब्द आला ""हाच तो वेडा पाहा ओळखीचे पूर्ण माझ्या खड्ग याचे वाकडे'' एक बोले ""मित्र माझा खूण मैत्रीची पाहा कस्तुरीचा गंध याला हे मृगाचे कातडे खेळते होते जयाचे आर्जवी डोळे निळे आज ते मंदावलेले लागले कोणाकडे'' कोणशी आली म्हणाली, ""आणि बाई तोच हा ते पाहा तेजाळ याच्या रत्नमालेचे खडे'' केस माझे वेश माझा आणि माझी कुंडले हे कुणाला ते कुणाला ओळखीचे सापडे दूर थोडी विस्मृतीला सारुनी आता तरी अंतरीची प्रीत माझी ओळखाया ये गडे
  • Log in or register to post comments

अजुनी चालतोचि वाट-

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 10/25/2013 - 16:37 नवीन
अजुनी चालतोचि वाट- रेंदाळकरांनी हि कविता पोस्टमनवर लिहिलेली आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

रेंदाळकरांनी हि कविता

सुबोध खरे
Mon, 10/28/2013 - 09:19 नवीन
रेंदाळकरांनी हि कविता स्वतः वर लिहिल्याचे ललित या मासिकात वाचल्याचे आठवते. ते कोल्हापूरला प्राथमिक शिक्षक होते आणि रेन्दाळ या त्यांच्या गावाहून ते रोज तेथे काही कोस चालत जात आणि आर्थिक ओढ्गस्तीतून आलेल्या नैराश्यातून ती कविता लिहिली असल्याचे त्यात म्हटले होते. चु. भू. द्या. घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

मला आवडली आणि ज्याची अनेक

प्रमोद देर्देकर
Fri, 10/25/2013 - 17:04 नवीन
मला आवडली आणि ज्याची अनेक वेळा पारायणं केली अशी पुस्तके खूप आहेत. लेखक ऑस्कार वाईल्ड पुस्तक द पिक्चर ऑफ डोरियन ग्रे <--break--> संपूर्ण पुस्तकंच ग्रेट पण खालील काही कोट्स बघा <--break--> इंद्रिया खेरीज दुसरं कुणाही आत्म्याला बरं करू शकत नाही..... आणि इन्द्रियांना बर करणारं हे आत्म्याखेरीज दुसरं कुणी नाहि. <--break--> .... ते जीवनाचे एक मोठे गुपित आहे हे विसरू नकोस. . तू निसर्गाची एक आश्चर्यकारक निर्माती आहेस. स्वत:ला जितकं ज्ञान आहे असे तु समजत आहेस, त्या पेक्षा जास्त ज्ञान तुला आहे. मात्र तुला जितकं ज्ञान मिळवावसं वाट्तं, त्या पेक्षा तुला कमी ज्ञान आहे. आपण कोण आहोत आणि कोण होवू शकतो याची पुरती जाण तुला नाहीये. अरे साधं एवढसं लिलीची फुल फुलावे म्हणून सारं जग वर्षभर कष्ट करीत असतं.. इतरांपेक्षा वेगळं नसणंच चांगलं असतं. सर्वसामान्य दिसणार्याचं आणि बेताची बुद्धी असणार्याचं या जगात भलं होतें. ते डोक्याला त्रास न देता आरामात बसून, नाटक सिनेमा पाहू शकतात, विजय हे काय त्यांना माहित नसते आणि म्हणून ते पराजया पासून मुक्त असतात. बाकी इतर पुस्तके म्हणजे रॉबिन्सन क्रुसो च्या पुस्तकात जेव्हा तो बेटावर असताना आजारी पडतो तेव्हा देवा विषयी त्याला काय वाटले ते विचार जवळ जवळ ३ पाने भरून आहेत. आता ते आठवत नाहियेत. हे पुस्तक मी पुन्हा शोधयाचा खूप प्रयंत्न केला पण उपयोग नाही कोणाकडे असल्यास सांगावे मी विकत घ्यायला तयार आहे.. साक्रेटीस, दांते, गोनीदा, बाबा कदम , सु. शि. मक्सिम गोर्कीचे आई असे किती तरी शाळा कोलेजच्या दिवसात वाचलॆले आठवते. अब्राहीम लिंकनचे त्याच्या मुलाच्या मास्तारास पत्र त्याच्या अनुवाद वसंत बापट यांनी केला होता प्रिय गुरुजी, सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात, नसतात सगळीच सत्यनिष्ठ, हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी. मात्र त्याला हे देखील शिकवा, जगात प्रत्येक बदमाशागणिक असतो एक साधूचरित , पुरुषोत्तमही स्वार्थी राजकारणी असतात जगात, तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेतेही. असतात टपलेले वैरी , तसे जपणारे मित्रही, मला माहित आहे ! सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत......... तरीही जमलं तर त्यांच्या मनावर ठसवा, घाम गाळून कमावलेला एकच छदाम, आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे. हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा आणि शिकवा विजयाचा आनंद संयमाने घ्यायला , तुमच्यात शक्ती असती तर ......... त्याला द्वेष मत्सरापासून दूर रहायला शिकवा आणि शिकवा त्याला आपला हर्ष संयमाने व्यक्त करायला. गुंडांना भीत जावू नको म्हणावं, त्यांना नमविणे सर्वात सोपं असतं. जमेल तेवढं दाखवित चला त्याला , ग्रंथ भांडाराच अदभूत वैभव. मात्र त्याबरोबरच , मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा, सृष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला , पाहू दे त्याला , पक्षांची अस्मान भरारी ............ सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर .......... आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलं...... शाळेत त्याला हा धडा मिळू दे , फसवून मिळालेल्या यशापेक्षा , सरळ आलेल अपयश श्रेयस्कर आहे . आपल्या कल्पना, आपले विचार , यांच्यावर दृढ विश्वास ठेवायला हवा त्याने , बेहत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी , त्याला सांगा ................ भल्याशी भलायीन वागावं, आणि टग्यांना अद्दल घडवावी . माझ्या मुलाला हे पटवता आल तर पहा ......... जिकडे सरशी तिकडे धावत सुटणाऱ्या भाऊगर्दीत, सामील न होण्याची ताकद त्यान कमवायला हवी , पुढे हेही सांगा त्याला , ऐकावं जनाच अगदी सर्वांच ........... पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून , आणि फोलपट टाकून निव्वळ सत्व तेवढं स्वीकाराव. जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा, हसत रहावं उरातल दुख्ख दाबून , आणि म्हणावं त्याला आसवांची लाज वाटू देऊ नको. त्याला शिकवा ......... तुच्छतावाद्याना तुच्छ मानायला , अन चाटुगिरीपासून सावध रहायला . त्याला हे पुरेपूर समजवा की , करावी कमाल कमाई त्याने, ताकद आणि अक्कल विकून, पण कधीही विक्रय करू नये, हृदयाचा आणि आत्म्याचा. धिक्कार करणाऱ्यांच्या झुंडी आल्या तर, कानाडोळा करायला शिकवा त्याला. आणि ठसवा त्याच्या मनावर, जे सत्य आणि न्याय वाटते, त्याच्यासाठी पाय रोवून लढत रहा. त्याला ममतेन वागवा, पण, लाडावून ठेवू नका. आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय लोखंडाच कणखर पोलाद होत नसतं, त्याच्या अंगी बाणवा अधीर व्हायचं धैर्य, अन धरला पाहिजे धीर त्याने, जर गाजवायच असेल शौर्य . आणखीही एक सांगत रहा त्याला .......... आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर, तरच जडेल उदात्त श्रद्धा मानवजातीवर, माफ करा गुरुजी, मी फार बोललो आहे _ खूप काही मागतो आहे......... पण पहा........ जमेल तेवढ अवश्य कराच, माझा मुलगा, भलताच गोड छोकरा आहे हो तो. वसंत बापट आम्ही लहान असताना अशीच एक कविता इंग्रीजी मधून मराठीत अनुवादित केली होती तेव्हा असे वाटले होते कोणी आपल्या इकडील च कवी याचे निर्माते असतील एवढी ती मनात घर करुन बसली होती. कपिला मावशी कपिला मावशी माझा पिंजरा कुणी ग नेला बाई जसे जसे आठ्वत जाइल तसं तसं लिहित जाइन,
  • Log in or register to post comments

सूंदर

मन१
Sun, 10/27/2013 - 00:44 नवीन
मालिका सुंदर आहे. ह्यामुळे मला स्वतःला चार क्षण अत्यंत आनंदाचे, समाधान्चे मिळालेले आहेत. मोदकला धागा काढण्यासाठी आणि इतर सर्वांना त्यांच्या सुंदर प्रतिसादाम्साठी धन्यवाद.
  • Log in or register to post comments

कुसुमाग्रज

मनिम्याऊ
Sun, 10/27/2013 - 16:24 नवीन
लीमाउजेटताईनी सुचविल्यानुसार इथे मला आवडणा~या कुसुमाग्रजान्च्या काही ओळी लिहिते. याच http://www.misalpav.com/node/14147?page=2 इथेपण अगोदर टंकल्या आहेत. ‘देवाच्या दारी’ (१९३२ ते १९३९) ‘नाम तुझे गाती गाती थोर सान दारी तुझ्या दीन दान घेती।। चिखलात येता मूल माखोनिया प्रेमे न्हाऊ तया घालतोसी।। उधळीत आज भक्तीचीच फुले डोळे तुझे ओले करीन मी।।’ ‘चिमण्यांच्या घरा लावसी मशाल केवढी विशाल दया तुझी? तुझ्या महिम्याची प्रचंड पुराणे गमती तराणे अर्थहीन’ भित्या भावनेला शोधायसी धीर पाषाणास थोर मीच केले।। माझ्या जीवनाचा मीच शिलेदार व्यर्थ हा पुकार तुझ्या दारी।। आहेस की नाही आज नसे चिंता दोहोंमध्ये आता भेद नुरे।। ‘जोगीण’ ‘मला हवी आहे नास्तिकता, पण सहस्र वर्षे मनाला मिठी घालून बसलेली ही आस्तिकता होत नाही दूर माझ्यापासून..’ ‘याच मातीतून’ ‘पण याच, जागेवरच्या मातीतून, आता उगवतोय एक लखलखित अंजिरी कोंब नव्या ईश्वरतेचा, जिचे पर्यायी नाव, नास्तिकताही असू शकेल.’ ‘मार्जिन’ ‘अचेतनाला करी सचेतन, शून्याला दे अर्थाचे धन मन अपुल्या नजरेने जीवन सदा पाहते- म्हणून माझ्या डोळ्यापुढती किरीटधारी रूप प्रभुचे (मंदिरातले, तसबिरीतले) उभे राहाते. असो तसे पण- ईश्वर नाही या प्रश्नावर- अपुले जमते.’ ‘तो’ ‘पण तरीही मला माहीत आहे मला मानणाऱ्यांमध्ये तू अग्रेसर आहेस फक्त तुझा दिवाणखाना तुझ्या काळजापासून फार दूर आहे, इतकेच.’ परस्थ ‘तू हा विषय पाहण्याचा नाही, शोधण्याचाही नाही. तो विषय आहे फक्त अनुभवण्याचा. माझे पाहणे अनुभवापर्यंत पोचत नाही तोपर्यंत तू मला परस्थच. असून नसल्यासारखा. किंबहुना नसल्यामुळेच, नसल्यासारखा.’ ‘नजर’ ‘की या निरीश्वरवाद्यांनी, उत्तररात्री उठून पाहिलेले नाही कधीही, चांदण्यांनी खचलेले अपार धूसराने ओथंबलेले आकाश, माझ्या नजरेने.’ मनाच्या अंतर्चक्षूंना या दिव्यत्वाचे क्षणभर दर्शन होते- ‘आता आता, या मृत्यूयात्रेत मात्र, जेव्हा माझ्या शून्यारलेल्या मनाला तुझ्या अस्तित्वाची यादही नसते तेव्हा, सर्वाकडून दुर्लक्षित असा तू, माझ्या खांद्यावर हात ठेवून माझ्याबरोबर अनामंत्रित चालत आहेस.’ (आणि माझी अत्यंत आवडती कवितापंक्ती...) ‘स्मित करून म्हणाल्या, मला चांदण्या काही, तो मुक्त प्रवासी फिरत सदोदित राही उठतात तमावर त्याची पाऊलचिन्हे, त्यांनाच पुससी तू, आहे की तो नाही!’
  • Log in or register to post comments

विंदांची बकी कविता टंकली का कोणी ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 10/28/2013 - 15:41 नवीन
नै मला टंकायची आहे म्हणून विचारतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

शंकराच्या नृत्याला तांडव आणि पार्वतीच्या नृत्याला लास्य म्हणतात

शुचि
Wed, 10/30/2013 - 05:00 नवीन
वामांगीचा लास्यविलासु! जो हा जगद्रुपाआभासु| तो तांडवमिसे कळासु|दाविसी तू| शंकराच्या नृत्याला तांडव आणि पार्वतीच्या नृत्याला लास्य म्हणतात. न्रुत्यामध्ये लय आणि सुसंवाद असतो. माणसाला आनंद झाला की तो स्वाभाविकपणे नाचतोच पण दु:ख , वियोग, संहार इत्यादि अनुभवही नृत्यकलेमधून तो दाखवितो. म्हणजे त्या त्या भावांचे आभास निर्माण करण्याची शक्ती नृत्यामध्ये आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की जगदरूपी आभास हे पार्वतीचे (मायेचे) लास्य आहेत. हे लास्य गणपतीच्या साक्षीने चाललेले आहेत. इतकेच नव्हे तर हे गुरो, हे गणपती, मायेच्या नृत्यातील जगदाभास दाखविण्याचे कौशल्य तू आपल्या नृत्यकलेच्या द्वारे दाखवितोस. पार्वतीचे लास्य जसे गणपतीच्या साक्षीने चालतात, तसे शिष्याचे जीवन सद्गुरुंच्या साक्षीने चाललेले असते. आणि शिष्य जर या जगदाभासात रमू लागला, तर हा साक्षीभाव सोडून तांडवनृत्य करून ते तो आभास दूर करतात. स्त्रोत - http://www.scribd.com/doc/52892929/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87
  • Log in or register to post comments

पंढरीनाथा झडकरी आता

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 12/07/2013 - 12:48 नवीन
एक अतिशय मस्त गाणे आणि आशा भोसले यांनी ते गायलय पण तितकेच सुरेख पंढरीनाथा झडकरी आता पंढरी सोडून चला विनविते रखुमाई विठ्ठला ज्ञानदेवे रचिला पाया कळस झळके वरी तुकयाचा याच मंदिरी आलो आपण प्रपंच करण्या भक्त जनांचा भक्त थोर ते गेले निघुनी गेला महिमा तव नामाचा विक्रय चाले देव पणाचा रहायचे मग इथे कशाला धरणे धरुन भेटी साठी पायरीला हरिजन मेळा भाविक भोंदू पूजक म्हणती केवळ अमुचा देव उरला कलंक अपुल्या महानतेला बघवे नाही रखुमाईला यायचे तर लवकर बोला ना तर द्यावा निरोप मजला गायिका :- आशा भोसले संगीतः- वसंत प्रभू गीत :- पी. सावळाराम ऐकण्यासाठी इथे टीचकी मारा
  • Log in or register to post comments

माझ्या आईचे वडील कट्टर

पिलीयन रायडर
Tue, 12/10/2013 - 12:49 नवीन
माझ्या आईचे वडील कट्टर नास्तिक होते पण भाषा शुद्ध आणि बुद्धी तल्लख असावी म्हणुन ते खुप पाठांतर करुन रोज ते म्हणत असत. आम्हालाही ते सर्व त्याच चालीत, त्याच क्रमाने फक्त ऐकुन ऐकुन पाठ झाले. पैकी काही रचना मला खुप आवडतात म्हणुन देत आहे. त्यात मला जे शब्द जसे ऐकु आले तसे लिहीत आहे. कुणाला योग्य शब्द माहित असल्यास दुरुस्ती करावी. ह्या रचना कुणाच्या आहेत ते मला माहित नाही. चराचरी तू आवाहन ये काय तुझ्या कामी सकलाधारा द्यावे तुजला काय आसना मी निर्मळ जो त्या केले ठरती अर्घ्य पाघ्य वाया करवाहेना आचमन तुला शुद्धाला द्याया घालु कैसे तुला निर्मला देवा स्नाना ते विष्वोदर तु तुला वहावा पटकवण्या हाते (?) निरालंब तु उपविताचे महत्व तुज नाही नसे वासना फुले सुवासिक निष्फळ त्या ठायी गंधाची थोरवी कोणती नसे लेप ज्याला स्वतः रम्य तु फिकी तुजपुढे पडे रत्नमाला सदा तृप्त तू नैवेद्याची काय तुला वाणे विभोतुष्ट तुज कसे करावे म्या तांबोलाने नसे अनंता प्रदक्षिणेचे बळ माझ्या ठायी अभिन्न तु मी मग कवणाच्या लागावे पायी तुजला स्तविता हात टेकीले जेथे वेदांनी कशी टिकावी तेथे वाणी मग बापुडवाणी स्वयंप्रकाशी काय त्यापुढे निरांजन ज्योती विसर्जन तुला कोठे विश्वे नांदविसी पोटी कळुन सारे सजलो देवा तुझ्या पुजनासी भय न लेकरा वाटे जाया निज जनका पाशी चुकले मुकले शब्द मुलाचे गोडच जनका ते बालीशलीला बघुन त्याच्या मनी हर्ष दाटे अज्ञान मी लेकरू तुजकडे जनकाचे नाते तव सेवेचा देवा ओढा असे मात्र मा ते येईल तैशी करितो सेवा गोड करुन घ्यावी पुण्य पदाची जोड वत्सला विनायका द्यावी (ह्या नंतर लगेच .. "महायोगपीठे तेटे भीमरथ्यां वरं पुंडलिका यदा तुम्बनिंदै.. समागत्य चित्तं तं आनंदकदं परब्रह्मलिंगं भजेत पांडुरंगं.." हेच्च आठवतं.. आणि असेच. नेमके शब्द काय आहेत देव जाणे..)
  • Log in or register to post comments

विश्वाद्या करुणाकरा बहुत मी

पिलीयन रायडर
Tue, 12/10/2013 - 13:02 नवीन
विश्वाद्या करुणाकरा बहुत मी योनी पहा हिंडलो कोठेही सुख पाहीले न नयनी, ना ना परी दंडलो काहि पुण्य उभारीता अवचटे आलो नृदेहा प्रति आता जन्म पुन्हा नको रघुपते दे मुक्ती की शीघ्र ती रामा मी तव दास दास म्हणवी मा ते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुखधना होईल तेथे जय रामा या भुवनत्रयी तुजविणे नाही दुजा तारक रामा तु सकळार्थ पुर्ण करीसी तु तात मी बालक न जाणे मी पुजा न मज समजे कशी प्रिती करणे न जाणे रुपा ते न मज समजे ध्यान धरणे न जाणे पाया ते न मज जरी सत्संग घडला तुझे नामि रामा दिननीशी मम प्राण जडला तु सेव्य मी सेवक योग्य नाते तु गेय मी गायक तारी मा ते तु जाप्य मी जापक पुर्ण कामा सायुज्य दाता तरि तुची रामा स्तंभावाचुनी हे उभे नभ असे पृथ्वी जळी की तरे देहो हा बहुछिद्र मग्न असता त्या माजी वायु ठरे ऐसे खेळ अचाट दावुनी पहा तु भिन्न सर्वाहुनी तु ते स्वानुभवे विलो किती जगी नैराश वेत्ये मुनी (?) कोठे माहीश अंतरात शिरुनी वेदांत ही बोलीसी स्कंधी कावड वाहीसी निजमुखे कोणापुढे जेवीसी कोठे कागद तारीसी दळसी तु कोठे पशु ओढीसी कोणचे ऋण वारिसी परिमला का हा तिचा सोडिसी (?) जय जय रघुवीर समर्थ..
  • Log in or register to post comments

एमेस्सुब्बलक्ष्मींच्या आवाजातले

बॅटमॅन
Tue, 12/10/2013 - 13:02 नवीन
भाग्यदा लक्ष्मी बारम्मा नम्मम्मा नी सौभाग्यद लक्ष्मी बारम्मा ||धृ.|| हेज्जय मेले गेज्जे निक्कुत गेज्जे कालगळ ध्वनिय तोरुद सज्जन साधू पूजेय वेळगे मज्जिगेयोळगिन बेण्णेयन्ते भाग्यदा लक्ष्मी बारम्मा ||धृ.|| कनक वृष्टिय करेयुत बारे मनकामनेय सिद्धिय तोरे दिनकर कोटी तेजद होळेयुव जनकरायन कुमारी बेगा भाग्यदा लक्ष्मी बारम्मा ||धृ.|| अत्तितगळद भक्तर मनेयलि नित्य महोत्सवा नित्य सुमंगला सत्यव तोरुव साधु सज्जनर चित्तदि होळेव पुत्तळि बोम्बे भाग्यदा लक्ष्मी बारम्मा ||धृ.|| संख्येयिल्लद भाग्यव कोट्टु कंकण कैया तिरुवुत बारे कुंकुमांकिता पंकजलोचने वेंकटरमणन बिंकद राणी भाग्यदा लक्ष्मी बारम्मा ||धृ.|| सक्करे तुप्पद कालुवे हरिसी शुक्रवारद पूजेय वेळगे अक्करेयुळ्ळा अळगिरी नंदन चोक्क पुरंदर विठलन राणी भाग्यदा लक्ष्मी बारम्मा ||धृ.|| कवी आहेत प्रसिद्ध मध्ययुगीन कन्नड संत पुरंदरदास, काळ आहे इ.स. १५ वे शतक. अर्थासकट लिरिक्सची लिंक. http://sahityam.net/wiki/Bhagyada_lakshmi_baramma एम्मेस्सुब्बलक्ष्मींच्या आवाजातल्या गाण्याची लिंक.
  • Log in or register to post comments

ब्याट म्यान साहेब

सुबोध खरे
Tue, 12/10/2013 - 23:38 नवीन
ब्याट म्यान साहेब या गाण्याचा अर्थ सांगाल काय? पंडित भीमसेन जोशी आणि जयतीर्थ मेवुंदी यांच्या आवाजात अनेकदा ऐकले पण शब्दांचा अर्थ माहित नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

डॉ.साहेब, ही लिंक बघावी.

बॅटमॅन
Wed, 12/11/2013 - 03:25 नवीन
डॉ.साहेब, ही लिंक बघावी. http://sahityam.net/wiki/Bhagyada_lakshmi_baramma इथे डावीकडे वरिजिनल टेक्स्ट तर उजव्या बाजूस त्याचा अर्थ दिलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

बॅटमॅन

सुबोध खरे
Wed, 12/11/2013 - 09:37 नवीन
बॅटमॅनसाहेब त्रिवार धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

काही अर्धवट आठवणी

पिलीयन रायडर
Tue, 12/10/2013 - 13:07 नवीन
अजुन काही रचना मला अर्धवट आठवत आहे, कुणाला माहिती असल्यास कृपया पुर्ण रचना इथे द्यावी.. १. नाम सदा बोलावे, गावे भावे जनासी सांगावे.. हाची सुबोध गुरुंचा, ........ २. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया परमदिनदयाळा नीरसी मोहमाया अचपळ मन माझे नावरे आवरीता तुजवीण क्षीण होतो धाव रे धाव आता.. भजन रहीत रामा सर्वही जन्म गेला, स्वजन जन धनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला रघुपती मति माझी आपुलीशी करावी, .......... कास तुझी धरावी ३. काही मधल्याच ओळी आठवतात, नक्की कोणत्या भजनात होते माहित नाही.. नामस्मरणे घर जावे, नित्य आनंदे करावे...नामस्मरणे.. ..........., करुणा कि जे देवो देवा...नामस्मरणे..
  • Log in or register to post comments

भजन रहीत रामा सर्वही जन्म

तिरकीट
Tue, 12/10/2013 - 16:41 नवीन
भजन रहीत रामा सर्वही जन्म गेला स्वजन जन धनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला रघुपती मति माझी आपुलीशी करावी सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी विषयजनीत सूखे सौख्य होणार नाही तुजवीण रघुनाथा वोखटे सर्व काही रवीकुळटिळका रे हीत माझे करावे दुरीतदुरी हरावे सस्वरुपी भरावे तनु मनु धनु माझे राघवा रुप तुझे तुझविण मज वाटे सर्व संसार वोझे प्रचलीत न करावी सर्वथा बुद्धी माझी अचळ भजन लीला लागली आस तुझी चपळपण मनाचे मोडीता मोडवेना सकळस्वजनमाया तोडिता तोडवेना घडीघडी बिघडे हा निश्चयो अंतरीचा म्हणवूनी करुणा हे बोलतो दीन वाचा समर्थांच्या 'करुणाष्टकां' मधील पहीले पाच श्लोक आहेत हे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

माझी आई सुद्धा रोज हे म्हणते

खेडूत
Wed, 12/11/2013 - 00:12 नवीन
माझी आई सुद्धा रोज हे म्हणते म्हणून माहीत झाले. काही जण 'निरोप गुरुंचा' म्हणताना पण ऐकले आहे. दैवावर अवलंबून न रहाता प्रयत्नवाद दिसतो म्हणून जास्त आवडले! नाम सदा बोलावे गावे, भावे जनासी सांगावे | हाचि निरोप गुरुंचा, नामापरते न सत्य मानावे || 1 || नामांत रंगुनीया, व्यवहारी भोग सर्व सेवावे | हाचि निरोप गुरुंचा, भोगासंगे कुठे न गुंतावे || 2 || आनंदात आसावे, आळस, भय, द्वेष तूर त्यागावे | हाचि निरोप गुरुंचा, अनूसंधाना कधी न चूकवावे || 3 || गोड सदा बोलावे, नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे | हाचि निरोप गुरुंचा, भक्तीने रघूपतीस आळवावे || 4 || स्वांतर शुद्ध असावे, कपटचरणा स्वये न वश व्हावे | हाचि निरोप गुरुंचा, मन कोणाचे कधी न दुखवावे || 5 || माझा राम सखा, मी रामाचा दास, नित्य बोलावे | हाचि निरोप गुरुंचा, रामापाशी अनन्य वागावे || 6 || यत्न कसून करीन मी, यश दे रामा न दे तुझी सत्ता | हाचि निरोप गुरुंचा, मानवा राम सर्वदा कर्ता || 7 || आचार संयमाने, युक्त असा नीतीधर्म पाळावा | हाचि निरोप गुरुंचा, खेळा ऐसा प्रपंच मानावा || 8 || दाता राम सुखाचा, संसारा मान तू प्रभू सेवा | हाचि निरोप गुरुंचा, संतोशा सर्वदा मनी ठेवा || 9 || स्वार्थ खरा साधारे, नित्य तुम्ही नाम गायनी जागा | हाचि निरोप गुरुंचा, 'मी' पण जाळोनिया जागी वागा || 10 || अभिमान शत्रू मोठा, सर्वाना जाचतो सुखाशेने | हाचि निरोप गुरुंचा, मारावा तो समुळ नामाने || 11 || राज्याधिकार येवो, किंवा जावो समस्त धनमान | हाचि निरोप गुरुंचा, भंगावे ना कदा समाधान || 12 || प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगामाजी | हाचि निरोप गुरुंचा, गुरूरायाला तहान प्रेमाची || 13 || || श्री गुरुदेव ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

नाम सदा बोलावे, गावे, भावे

प्यारे१
Tue, 12/10/2013 - 13:55 नवीन
नाम सदा बोलावे, गावे, भावे जनासि सांगावे हाचि सुबोध गुरुंचा, नामापरते सत्य न मानावे|| नामात रंगुनिया व्यवहारी सर्व भोग सेवावे| हाचि सुबोध गुरुंचा, भोगासंगे कुथे न गुंतावे|| आनंदात असावे आळस, भय, द्वेष दूर सारावे| हाचि सुबोध गुरुंचा, अनुसंधाना कधी न चुकवावे|| गोड सदा बोलावे, नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे| हाचि सुबोध गुरुंचा, भक्तिने रघुपतिस आळवावे|| स्वान्तर शुद्ध असावे, कपटाचरणा स्वयें न वश व्हावे| हाचि सुबोध गुरुंचा, मन कोणाचे कधी न दुखवावे|| माझा राम सखा, मी रामाचा दास, नित्य बोलावे| हाचि सुबोध गुरुंचा, रामापाशी अनन्य वागावे|| यत्न कसून करिन मी, यश दे, न दे, रामा तुझी सत्ता| हाचि सुबोध गुरुंचा, मानावा राम सर्वथा कर्ता || आचार संयमाने युक्त असा, नीतिधर्म पाळावा| हाचि सुबोध गुरुंचा, खेळाऐसा प्रपंच मानावा || दाता राम सुखाचा, संसारा मान तू प्रभूसेवा| हाचि सुबोध गुरुंचा, संतोषा सर्वदा मनी ठेवा|| स्वार्थ खरा साधा रे, नित्य तुम्ही नामगायनी जागा| हाचि सुबोध गुरुंचा, मीपण जाळोनिया जगी वागा|| अभिमान शत्रू मोठा, सर्वांना जाचतो सुखाशेने| हाचि सुबोध गुरुंचा, मारावा तो समूळ नामाने|| राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान| हाचि सुबोध गुरुंचा, भंगावे ना कदा समाधान|| प्रेमात राम रंगतो, प्रेमाला मोल ना जगामाजि| हाचि सुबोध गुरुंचा, गुरुरायाला तहान प्रेमाची|| (कधी पाठ असलेली ही प्रार्थना आज विसरलीय. यु ट्युब चा दुवा youtube.com/watch?v=72dJW7qm130 ऐकून वाचून लिहीलंय)
  • Log in or register to post comments

देवा

नाखु
गुरुवार, 12/12/2013 - 10:43 नवीन
हि प्रार्थना गोंदवले नित्यपाठात असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

अजून एक दक्षिणेकडील रत्न

बॅटमॅन
Tue, 12/10/2013 - 15:45 नवीन
आपल्याकडे "आदी बीज एकले", "जेथे जातो तेथे तू माझा सांगाती", "आता विश्वात्मके देवे" इ. भक्तीपर अभंग/पदे जितकी फेमस आहेत तितके हे गाणे तमिळनाडूत फेमस आहे. अरुणगिरीनाथर म्हणून १४-१५ व्या शतकातील एक प्रसिद्ध संतकवी होते त्यांच्या तिरुप्पुगऴ नामक ग्रंथातील एक फेमस पद. मुरुगन देवाच्या स्तुतीपर आहे. मुत्तैत्तरु पत्तित्तिरुनकै अत्तिक्किरै़ सत्तिच्चरवण मुत्तिक्कोरु वित्तुक्कुरु...एनवोऽदुम्!!! मुक्कट्पर मऱ्कुच्चुरुयिन मुरंपट्टदु कऱ्पित् तिरुवरु म्मुप्पत्तुमु वर्क्कत्तमरुम...अडिपेणम्!! पत्तुत्तलै तत्त्तक्कणैतोदु ओट्रैक्किरि मत्तैप्पोरुदोरु पट्टप्पगल्वट्टत्तिगिरियिल्....इरवाग.!! प्पत्तऱ्किर तत्तैक्कडविय पच्चैप्पुयल्मेच्चत्तगुपोरुळ् पट्चत्तिरु रट्चित्तरुळ्वदुम्.....ओरुनाळे!! तित्तित्तेय ओत्तप्परिपुर निर्त्तप्पदम्वैत्तुप्पयिरवि तिक्कोट्तनडिक्क कळु़गोडु....कऴ्उरादं!!! तिक्कुप्परि अट्टप्पयिरवर्तोक्कुत्तोगु तोक्कुत्तोगुतोगु चित्रप्पवुरिक्कत्तरिगडग...एनवोदक्!! कोत्तुप्परै़ कोट्टक्कळमिसै कुक्कुक्कुगु कुक्कुक्कुगुकुगु कुत्तिप्पुदै पुक्कुप्पिडियेन....मुदुकूगै!! कोट्पुट्रेऴ नट्पट्रवुणरै वेट्टिप्पलि यिट्टुक्कुलगिरि कुत्तुप्पड ओत्तुप्पोरवल....पेरुमाळे!!! मूळ व्हिडिओ लिंक. गाणे साधारण ५० सेकंदांत सुरू होते. भयानक टंग ट्विस्टर आहे पण ऐकायला छान आहे.
  • Log in or register to post comments

माझ्या आवडीचे..

विटेकर
Tue, 12/10/2013 - 17:07 नवीन
परम सदगुरु परमार्थाप्रत न्यावी माझी मती पंच साधना चेतवूनीया करितो पंचारती जय जय सदगुरु , जय जय सदगुरु ||धृ|| आयुष्यातील सुख दु़:खांची मजसी का बाधा जीवाननामक यज्ञातील या दोन्हीही समिधा परंज्योतिला असोत अर्पण अवघ्या दैवगती पंचसाधना चेतवुनिया करितो पंचारती जय जय सदगुरु , जय जय सदगुरु ||१|| तनु-निर्वाहा आवश्यक मी यत्ने संपादावे अधिक लाभता सत्पात्री ते दान सुख घ्यावे कधीहीना मी उल्लंघाव्या वेदाज्ञा वा श्रुती पंचसाधना चेतवुनिया करितो पंचारती जय जय सदगुरु , जय जय सदगुरु ||२|| जगत दिसावे जगन्नाथमय त्याची करिता सेवा अहंपणाचा भाव मानसी कधी न उपजावा तप:साधने नमवावे मी मात्र अविद्येप्रती पंचसाधना चेतवुनिया करितो पंचारती जय जय सदगुरु , जय सदगुरु ||३|| विहित कर्म मी नित्य करावे आस नसे चित्ती निरिच्छ मानस तरिही असावी उल्हासित वृत्ती तुझ्या पदांचे तीर्थ ठरावी सहजच माझी कृती पंचसाधना चेतवुनिया करितो पंचारती जय जय सदगुरु , जय सदगुरु ||४|| स्वाध्यायाने उमजावी मज माझ्यामधली शक्ती अधिक लाभता सरे याचना उरते अमृत भक्ती अनंत जन्मासाठी म्हनुनी तुज ही शरणागती पंचसाधना चेतवुनिया करितो पंचारती जय जय सदगुरु , जय सदगुरु ||५|| परम सदगुरु परमार्थाप्रत न्यावी माझी मती पंच साधना चेतवूनीया करितो पंचारती जय जय सदगुरु , जय जय सदगुरु ||धृ||
  • Log in or register to post comments

नक्षत्रांचे देणे

सुबोध खरे
Tue, 12/10/2013 - 23:39 नवीन
गेले द्यायचे ते राहुनी या आरती प्रभू यांच्या गाण्याचा अर्थ सांगेल काय कोणी?
  • Log in or register to post comments

मुळ कविता :

गणेशा
Mon, 05/11/2020 - 10:39 नवीन
मुळ कविता : गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे माझ्यापास आता कळ्या आणि थोडी ओली पाने.. आलो होतो हासत मी काही श्वासांसाठी फक्त दिवसांचे ओझे आता, रात्र रात्र शोषी रक्त. आता मनाचा दगड घेतो कण्हत उशाला होते कळ्यांचे निर्माल्य आणि पानांचा पाचोळा.. गाणे https://youtu.be/yCrF5yQKlqM माझा अर्थ मला माहीत आहे, मी उंच नभ होतो तुझ्या पुढे... प्रिये , माझ्यापुढे तू अतिशय खुजी होऊन गेली होती.. माहीत आहे मला. तरीही मला माहीत आहे तुझ्या जगाचे सारे आभाळ मी व्यापले होते.. नव्हे मीच तुझे आभाळ होतो.. पण माफ कर प्रिये.. या आभाळाला तुझ्यात कधी समरसून जाता आलेच नाही.. माझे नक्षत्रांचे देणे तुला कधी देता आलेच नाही... _____ माझ्याकडे, बोलायचे राहिलेले आता खुप सारे आहे, अताशा त्या शब्दांच्या कळ्याच राहिल्या आहेत माझ्या मनात...अजुनही... त्या शब्दांची..त्या कळ्यांची फुले कधी झालीच नव्हती..तुझ्या साठी... त्या मुळे तुझ्या आठवणींची पाने आणि माझे डोळे दोन्ही ओले आहेत.. ||१|| तू आता या जगातून जायच्या तयारीत आहेस.. तरीही तुझे हे आभाळ तुझ्याकडे अजुनही आले नव्हते..तुला पाहिजे तसे... पण या तुझ्या अखेरच्या प्रवासात.. तुझ्या अखेरच्या श्वासांसाठी मी उगाच तुझ्याकडे खोटे हसू घेवून आलोय.. दुसरे आहे तरी काय माझ्याकडे तुला देण्यासारखे..? मी ना तुला कधी काही दिले ना काही देवू शकलो.. आता तुझ्या कडे आलोय तरी, तुझ्या मनासारखे मी जगु शकत नाही.. कारण तुझ्या श्वासांची ही शेवटची तडफड पाहतोय मी.. मग आता तुझ्या शेवटापर्यंत प्रत्येक दिवस मला ओझेच वाटतोय.. तुझ्या माझ्याप्रती असलेल्या अपेक्षांचे... आणि रात्र झाली की तुझ्या बद्दलच्या राहिलेल्या गोष्टी माझे मन पोखरून टाकतात.. जनू त्या माझे रक्त शोषीत आहेत असेच वाटते.. ||२|| आता ह्या असल्या रात्री विचार करताना, मला कळते आहे, माझे मन आधी तुझ्यापाशी कधी नव्हतेच.. नव्हे त्या मनाला तुझे कधी काही सोयरसुतक वाटलेच नव्हते.. आता या क्षणी माझी चुक माझ्या लक्षात आली आहे, पण आता काय करायचे ? नक्षत्रांचे हे देणे तुला कधी या आभाळाला देता आलेच नाही. पण आता या क्षणी मी त्या मनाचा दगड ,अन तुला दिलेले दु:खाचे घाव, डोळे मिटुन उगाच आठवतोय... आणि माझ्या शब्दांची तुझ्यापाशी कधी फुले झालीच नव्हती, त्या अश्या मी न बोललेल्या शब्दकळ्यांचे निर्माल्यच झाले येथे.. तुझ्या आयुष्यापाशी... आणि तुझ्या आठवणींचा पाचोळा उडतोय सैरभैर ..... ----------- शब्दमेघ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अनेक धन्यवाद

सुबोध खरे
Mon, 05/11/2020 - 13:51 नवीन
अनेक धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

एक कविता हवी आहे.. लहानपणी

पिलीयन रायडर
गुरुवार, 12/19/2013 - 12:57 नवीन
एक कविता हवी आहे.. लहानपणी बहुदा चंद्रकांत काळे (साजणवेळा वाले) ह्यांच्या आवाजात कवितेची कॅसेट ऐकली होती.. त्यात होती.. (एका म्हातार्‍याने म्हातारीला उद्देशुन म्हणलेलं आहे बहुदा..) छे ग आता कशी रहावी, स्म्रुती मला तेव्हाची सगळी.. होता का ग चंद्र तेधवा, की होती ती रात्र वादळी..
  • Log in or register to post comments

'शेवंतीचे बन' या अलबम मध्ये

गणेशा
Mon, 05/11/2020 - 19:00 नवीन
'शेवंतीचे बन' या अलबम मध्ये आहे का बघा तुम्हाला हवी. ती कविता..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

जगातले बरेचसे देश हिंडून

मोदक
गुरुवार, 02/13/2014 - 11:00 नवीन
जगातले बरेचसे देश हिंडून आल्यानंतर माझी खात्री पटली आहे की देवाचे आपल्या देशात जितके लाड केले जातात तितके इतरत्र कुठेही होत नसतील. महाराष्ट्रात एवढा मोठा दुष्काळ पडला तरी गणपतीच्या मोदकांची संख्या एकवीसच्या खाली आली नव्हती. प्रभादेवीच्या सिद्धीविनायकाच्या देवळातली दर मंगळवारची गर्दी वाढतच चाललेली दिसते. एकेकाळी हाच सिद्धीविनायक एकान्तवासात असल्यासारखा होता. आता अंगारकीला तर हजारा-हजारांच्या रांगा तिथे असतात. त्याच रांगा मग धान्याच्या दुकानापुढे लागतात. रॉकेलसाठी लागतात. साखर नाही तर डालडा आल्याचे ऐकल्यावर लागतात. एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजपुढे लागतात. आणखी एक रांग रात्री बारा-साडेबाराच्या सुमाराला आमच्या तळमजल्यावरच्या हॉटेलबाहेर लागते. आबालवृद्धांची रांग! हॉटेलची मुख्य दारे बंद झाल्यावर स्वैपाकघराच्या बाजूला. प्रत्येकाच्या हातात अ‍ॅल्युमिनियमची भांडी, पत्र्याची डबडी, कागदाची बॉक्से वगैरे काहीतरी आहे. हॉटेलात शिल्लक राहिलेले अन्न त्या भांड्यांत पडते. रोज रात्री हे उरल्यासुरल्या खाद्यपदार्थांचे अन्नसंतर्पण चालते. त्या मुहुर्ताची वाट पाहत ही माणसे मध्यरात्रीपर्यंत रोज ताटकळत असतात. काळोखात कुठे दडी मारून बसलेली असतात ते कळत नाही, पण स्वैपाकघराचा दरवाजा किलकिला झाला, की त्या अंधारातल्या कोन्या-कोपर्‍यातून चारपांच वर्षांच्या अर्भकापासून ते कमरेत वाकलेल्या म्हातार्‍यापर्यंत हा शे-सव्वाशे भुकेल्या जीवांचा घोळका त्या दारापाशी जमतो. मग कचकचाट होतो. अन्नवाटप करणारे आचारीबुवा जोरात खेकसून क्यू लावायला सांगतात. क्यू लागतो आणि ते अन्नसंतर्पण सुरू होते. सिद्धीविनायक त्या ठिकाणापासून फार दूर नाही. तसा म्हणे तो सर्वत्र आहे! पण तिथे देवळात कदाचित कीर्तन रंगात आलेले असेल. बुवा त्याचवेळी भक्तांच्या संकटकाली भगवंत कशी धाव घेतात ह्या विषयावरचे आख्यान संकष्टीचा उपास सोडून आलेल्यांना साग्रसंगीत ढंगात सांगत असतील. माझ्या डोक्यात त्या देवळापुढली रांग आणि रोज मध्यरात्री ही अन्नब्रह्माच्या याचनेसाठी लागलेली रांग, यातले काय खरे, काय खोटे ह्याचे प्रश्न उभे राहत असतात. आणि मग या दुसर्‍या रांगेसाठी काहीतरी करायला हवे असा विचार त्या विघ्नहर्त्याला कां येत नाही, हा प्रश्न छळायला लागतो. सानेगुरूजी, गांधी वगैरे मंडळींप्रमाणे देवबाप्पांनीही आता मला फसवले आहे याची खात्री पटली आहे. --पुलं. एक शून्य मी.
  • Log in or register to post comments

सुंदर!

अमीबा
गुरुवार, 11/05/2015 - 22:20 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

एक शून्य मी.....

हेमंतकुमार
Tue, 05/12/2020 - 17:28 नवीन
छान. अगदी आवडते पुस्तक माझे. त्यावर काही इथे लिहिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

धर्म

मूकवाचक
Sat, 06/21/2014 - 03:37 नवीन
'धारणात् धर्म इत्याहु: धर्मो धारयते प्रजा:'(महाभारत) - ज्यामुळे सर्व प्रजेची, सृष्टीची धारणा होते त्या व्यवस्थेला धर्म असे म्हणतात. 'धर्मो अस्य विश्वस्य जगतः प्रतिष्ठा'- म्हणजे स्थावरजंगम अशा सर्व विश्वाची प्रतिष्ठा म्हणजेच धर्म होय. धर्म ही भारतीयांची संकल्पना अद्वितिय आहे. हा धर्म कोणी प्रेषिताने, श्रेष्ठ पुरूषाने निर्माण केलेला नाही. ती नैसर्गिक व्यवस्था आहे. या अर्थाने धर्म हा अपौरूषेय आहे. सर्व मौलिक सत्य अपौरूषेयच असते. त्याचा द्रष्टा कुणी असामान्य असू शकतो. जसे वैदिक महर्षी होते. सर्व चराचर सृष्टीशी तादात्म्य पावणारा हा धर्म व त्यातून उदित झालेली 'वसुधैव कुटुंबकम्' ही विश्वकुटुंबवादी जीवनदृष्टी ही भारताची उत्तुंग महानता आहे. अशा या मूळ धर्माचे प्रबोधन थोर महर्षींनी जे केले, त्या उत्तुंग धर्मविचाराचे पुनर्जागरण व प्रतिष्ठापना सर्व संतांना करावयाची आहे. त्यासाठी संत अवतरतात. आम्ही वैकुंठवासी| आलो याची कारणासी| बोलिले जे महर्षी| साच भावे वर्तावया|| असे आपल्या जीवितकार्याचे वर्णन तुकोबा करतात. धर्म रक्षावयासाठी| करणे आटी आम्हांसी| असे जे ते म्हणतात ते या मूळधर्माच्या रक्षणासाठीच! विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म असा त्यांचा सर्वव्यापक धर्मविचार आहे. - श्री संत बाबामहाराज आर्वीकर कृत 'संतधर्म जीवनदर्शन'
  • Log in or register to post comments

सिद्धांत मतभिन्नता

मूकवाचक
Sat, 06/21/2014 - 04:22 नवीन
दृश्याच्या मागे दडून असलेल्या, दृष्याचे व्यासपीठ असलेल्या तत्वाची अवस्था गूढ आहे. या अचुंबिताचे चुंबन घेण्याचा प्रयत्न साहित्यिक भावनेद्वारा, कल्पनेद्वारा करतो. पण त्याचा बोध वास्तवतेपासून दूरच राहतो. प्रेयसीच्या प्रतिमेचे चुंबन घेणार्‍या प्रेमी जीवासारखीच साहित्यिकाची अवस्था असते. पण साक्षात्कारी तत्ववेत्ते मात्र विश्वामागील सत्य विश्वस्वरूपातूनही वास्तव स्वरूपात कसे आहे याची अतीव शुद्ध व्यवस्था जाणतात. त्यांनी या तत्वास शाश्वत, नि:स्पंद, निरालंब आत्मतत्व असे म्हटले आहे. या तत्वाचा दृश्यतेशी संबंध कोणत्या पातळीवर कसा आला आहे हे विशद करतानाच फक्त तत्ववेत्यांमधे काही मतभेद आढळतात. अशा प्रकारच्या मतभेदांनाच भारतीय विचारसृष्टीत 'सिद्धांत मते' असे म्हणतात. द्वैत, अद्वैत, विशिष्टाद्वैत, द्वैताद्वैत, शुद्धाद्वैत, शांभवाद्वैत, सामरस्याद्वैत, अद्वय अजातवाद तसेच चिद्विलास या नावांनी ती सिद्धांत-मते ओळखली जातात. या मतांमधे अनेकता जर मानली तर सत्ये अनेक आहेत असे मानावे लागेल. ते तर शक्य नाही. एकच सत्य मानावे तर इतर सिद्धांत मांडणार्‍यांना द्रष्टे कसे म्हणावे? अशा अनेक आक्षेप आणि आरोपांना शब्दांच्या दातांनी चावत राहणे म्हणजेच तत्वचर्चा असा बोलाच्याच भोजनाचा रिकामा विद्वत्ताप्रचुर गोंधळ म्हणजेच तत्वज्ञानाचा अभ्यास असे मत आज रूढ झाले आहे. त्यामुळे सामान्यपणे सत्यनिष्ठा भंग पावून, तत्ववेत्त्यांच्या सत्यान्वेषी बुद्धीचा आणि नानाविध प्रकारे केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचा ज्ञाते म्हणविणार्‍यांनीच अवमान करण्याचे तंत्र अवलंबलेले दिसते. पण खरे पाहता या सर्व तत्ववेत्त्यांच्या मतात भेद व भिन्नता मुळीच नाही असे सिद्धमत आहे. मत सत्ये अनेक आहेत का? तर सत्ये अनेक नव्हेत, पण सत्य अनंत मात्र आहे. सत्यं अनंतं ब्रह्म! या अनंताच्या शोधात विविध तत्ववेत्त्यांना सत्याचे जसे स्वरूप दिसते, ते तसे सत्यच असते. कारण सत्य हे अनंत आहे. म्हणून त्या त्या तत्ववेत्त्यांना कळलेला सत्यांश व त्यासाठी त्यांनी मांडलेला सिद्धांत तोही शाश्वत व सनातनच होय. याचा अर्थ एवढाच, की सत्य हे द्वैत आहे, अद्वैत आहे आणि सारे द्वैताद्वैतविलक्षणही तेच आहे. कारण ते अनिर्वचनीय आणि स्वसंवेज्ञ आहे. सत्य कुठे दिसेल याचे उत्तर त्यामुळेच ते सत्यातच दिसू शकते हेच असते. ज्यांना सत्याचा बोध द्वैतात झाला त्यांचे द्वैतही सत्य होय. ज्यांना सत्याचा बोध अद्वैतात झाला त्यांचे अद्वैतही सत्यच होय. सत्याचा बोध जिथे झाला तिथे केवळ सत्यच असू शकते एवढेच येथे लक्षात घ्यावयाचे आहे. - श्री संत बाबामहाराज आर्वीकर कृत 'संतधर्म जीवनदर्शन'
  • Log in or register to post comments

गुलज़ार यांच्या काही त्रिवेणी

इनिगोय
Mon, 06/23/2014 - 18:39 नवीन
गुलज़ार यांच्या काही त्रिवेणी (triplets) ------------------------------------ इतने लोगों में कह दो अपनी आँखों से इतना ऊंचा न ऐसे बोला करें लोग मेरा नाम जाने जाते हैं॥ ------------------------------------ ये माना इस दौरान कुछ साल बीत गए हैं फिर भी आँखों में चेहरा तुम्हारा समाया हुआ है किताबों पर धुल जमने से कहानी कहाँ ख़तम होती है॥ ------------------------------------ मुझे आज कोई और न रंग लगाओ पुराना लाल रंग अभी भी ताज़ा है अरमानो का खून हुए जियादा दिन नहीं हुआ है॥ ------------------------------------ तेरे गेसू जब भी बातें करते हैं उलझी उलझी सी वो बातें होती हैं मेरी उँगलियों की मेह्मांगी उसे पसंद नहीं॥ ------------------------------------ उड़ के जाते हुए पंछी ने बस इतना ही देखा देर तक हाथ हिलाती रही वह साख फिजा में अलविदा कहने को ? या पास बुलाने के लिए? --------–-------------------------- ज़िन्दगी क्या है जान ने के लिए ज़िंदा रहना बहुत ज़रूरी है आज तक कोई भी रहा तो नहीं॥ ------------------------------------ सब पे आती है सबकी बारी से मौत मुंसिफ है, कम-ओ-बेश नहीं ज़िन्दगी सब पे क्यूँ नहीं आती॥ ------------------------------------ कोई चादर की तरह खींचे चला जाता है दरिया कौन सोया है तलए इसके जिसे ढूंढ रहे हैं डूबने वाले को भी चैन से सोने नहीं देते ---------------------------------- आणि ही आणखी एक आवडलेली - जरा आवाज का लहजा तो बदलो जरा मद्धम करो इस आँच को सोना कि जल जाते हैं कँगुरे नरम रिश्तों के जरा अल्फाज के नाखून तो तराशो बहुत चुभते है जब नाराजगी से बाते करती हो...
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा