मुळात कोणी कुणाचे आयुष्य विषयक तत्वज्ञान वाचून/ऐकून आपले आयुष्य तसे बनवू शकत नही असं आपलं मला वाटते..
आपण सगळेच जगतांना एका ट्राफिक जाम मधल्या ड्रायव्हर सारखे असतो...आपापले स्टीयारिंग सांभाळत...
मुद्दा असा कि त्या वॉरेन बफे चे काही मौलिक विचार मधून मधून धडकत असतात आणि बरेच जन आपण असे का केले नही म्हणून दुखी होतात..
त्यातील काही विचार आणि माझ्या प्रतिक्रिया
१.त्यांनी वयाच्या अवघ्या अकराव्या (११) वर्षी शेअर बाजारात गुंतवणुक करण्यास सुरुवात केली. आणि तरी देखील आपण खुप उशीरा सुरुवात केली याची त्यांना खंत आहे.
अत्रंगी म्हणे >> म्हणजे? ११व्य वर्षी अभ्यास, शाळा, येणारी दहावी ह्याचा विचार नं करता आपल्या मुलांनी हे करावे??? आणि उशिरा सुरु केली याची खंत आहे म्हणजे? एवढा पैसा मिळवून समाधान नही?
२. वृत्तपत्रे विकुन मिळवलेल्या कमाईतून त्यांनी एक छोटीशी शेत जमीन विकत घेतली. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी. रोजगार नोकरी संदर्भ
अत्रंगी म्हणे >> खरंच? वृत्तपत्रे विक्रीतून जमीन खरेदी? ११व्य वर्षी शेयर्स १४ व्य वर्षी शेत जमीन? असे करणारे ते एकटेच का अजून कुणी त्यांच्या सारखे आहेत? कारण ह्या वेगाने २५ व्या वर्षी अब्जाधीश होते का? आणि ह्यात त्यांच्या नशिबाचा भाग किती? त्यंच्या समकालीनांनी अन्य क्षेत्रात जे काही केले असेल (उदा. संशोधन, कला साधना वगैरे, ते सगळे फुकट?)
३. ते आजही मिड टाउन येथील त्यांच्या जुन्या ३ बेडरूमच्या घरात राहतात, जे त्यांनी ५० वर्षांपुर्वी त्यांच्या लग्नाच्या आधी घेतले होते. वॉरन बफे यांच्या मते त्यांना मोठ्या घराची गरज नाही. आजही त्यांच्या घराला कुंपणाची भिंत नाही.
अत्रंगी म्हणे >> मोठ्या घराची गरज नही? मग ३ बेडरूम चे तरी कशाला? वरील विधान नीट वाचले तर कशाचा कशाशी संबंध नही...
४. वॉरन बफे त्यांची कार स्वतःच चालवतात. त्यांना ड्रायव्हर अथवा सुरक्षारक्षकांची गरज नाही.
अत्रंगी म्हणे >> बरं मग? विकत मिळणारी जगातील सर्व सुखे मनसोक्त उपभोगुन हे जगाला सांगण्याचे प्रयोजन??सामान्य भारतीय नोकरदाराला ह्याचा काय उपयोग ??
बाकीची विधाने खालील प्रमाणे...आपल्या रोजच्या आयुष्यात ह्याचा उपयोग का..? का केवळ बफे म्हणाले म्हणजे आपण तसे वागावे?
नही म्हणजे अंतू बरवा म्हणाला तसे माणूस आहे मोठा पण आपल्याला त्याचे काय? आणि पुन्हा समजा आपण हे सगळे करायचे ठरवले तर त्याचे झाले तसेच आपले होईल का??? आणि आपल्याला ते हवे आहे का?
मला बफे ह्यांच्या बद्दल काहीच म्हणायचे नही...त्यांची तत्वे वाचून आपण जागच्या जागी कत्थक करण्यात अर्थ नही असे वाटते...
त्यांच्या बद्दलची आणखीन काही माहिती खालील प्रमाणे
वॉरन बफे जगातील सर्वात मोठ्या विमान कंपनीचे मालक आहेत.
६. त्यांची कंपनी बर्कशायर हाथवेच्या (Berkshire Hathaway) मालकीच्या ६३ कंपन्या आहेत. या सर्व कंपन्यांच्या CEO's
(कार्यकारी अधिकारी) ना ते फक्त वर्षाला एक पत्र लिहितात. सर्व
CEO's ना त्यांनी दोन नियम सांगीतले आहेत.
पहिला नियम
कधीही आपल्यागुंतवणुकदारांचे पैसे बुडणार नाहीत याची काळजी घ्या.
दुसरा नियम
कधीही पहिला नियम विसरु नका.
७. घरी आल्यावर स्वतःसाठी काही पॉपकॉर्न बनवुन चित्रपट बघणे हा त्यांचा आवडता छंद आहे.
९. वॉरन बफे आजही मोबाइल फोन वापरत नाहीत.
१०. या वर्षी मी तुम्हा सर्वांना पुराणकाळापासून चालत आलेल्या (पण विस्म्रुतीत गेलेल्या) अशाच काही शहाण पणाच्या गोष्टी सांगणार आहे
रोजगार नोकरी संदर्भ
* अपार कष्ट करा : मेहनत कधीच वाया जात नाही, पण काम न करता केलेली बाष्फळ बडबड माणसाला लयास नेल्या खेरिज राहत नाही.
* आळस झटकुन टाका : वाळुवर झोपुन राहणारा खेकडा कोणत्याही लाटेबरोबर समुद्रात वाहुन जातो.
* उत्पन्न (मिळकत) : कधीही केवळ एका उत्पन्नाच्या साधनावर अवलंबून राहु नका. एका मार्गाने येणाऱ्या १०० रुपयांपेक्षा १०० मार्गांनी येणारा १-१ रुपया नेहमीच चांगला
रोजगार नोकरी संदर्भ
* खर्च - आवश्यकतेपेक्षा जास्त खरेदी केली तर लवकरच आवश्यक असणाऱ्या गोष्टी विकण्याची वेळ येईल.
* बचत - खर्च करुन उरलेल्या उत्पन्नाची बचत करण्यापेक्षा, आधी बचत करुन नंतर उरलेले पैसे खर्च करा.
* कर्ज - कर्ज घेणारा हा कर्ज देणाऱ्याचा गुलाम हॊउन जातो.
* जमाखर्च - जमाखर्च मांडणे आणि त्याचा अभ्यास करणे अतिशय महत्त्वाचे आहे. जर बूटच फ़ाटला असेल तर पावसाळ्यात छत्रीचा काय उपयोग?
* हिशोब तपासणे - लहान लहान खर्चांचा ताळेबंद ठेवा, एक छोट्याशा भोकामुळे पुर्ण जहाज बुडू शकते.
RDH Sir
* आर्थिक धोका - बऱ्याच इन्वेस्ट्मेन्ट्स भरपुर फायदा देणाऱ्या आणि आकर्षक असतात मात्र त्यात तेवढाच धोका लपलेला असतो. त्यामुळे अशा इन्वेस्ट्मेन्ट्स जरा काळजीपुर्वक
विचार करुन करा. जर नदीची खोली पहायची असेल तर दोन्ही पाय पाण्यात टाकुन कसे चालेल?
* गुंतवणुक - सर्व अंडी एकाच पारड्यात टाकुन कसे चालेल बरे? रोजगार नोकरी संदर्भ मला खात्री आहे की जे या सर्व सुचनांचे आधीपासून पालन करत आहेत, त्या सर्वांची आर्थिक परिस्थिती उत्तम असेल. आणी मी हे देखिल
खात्रीपुर्वक सांगु शकतो, कि जे या सर्व सुचनांचे पालन करायचे ठरवतिल तेही लकरच आर्थिक सुखाचा आनंद घेतिल. चला आपण सर्वजण हुशार हॊउया आणि एक सुखी, समाधानी आणि शांत जीवन जगुया. माणुस आर्थिक गरजेपोटी आयुष्यभर धडपडत असतो, त्याचं मुख्य कारण म्हणजे
माणसाने शाळा व कॉलेजमध्ये बरीच वर्षे शिक्षण जरी घेतले असले तरी पैश्याबद्दल त्याला काहीच शिकवलं गेलेलं नसतं.
परिणामस्वरुपी माणुस पैश्यासाठी काम करायला शिकतो परंतु स्वत:साठी पैश्याकडून काम करवून घ्यायला मात्र कधीच शिकत नाही.
वाचने
7564
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
जर १० व्या मुद्द्यानंतरचे
इदं नं मम
In reply to जर १० व्या मुद्द्यानंतरचे by मृत्युन्जय
बफे....
मुळात कोणी कुणाचे आयुष्य
हे पटलं.
एक लक्षात घ्या...
नो फॉर्म्युला.
यश म्हणजे काय
मला तर असे वाटते कि माणूस
नक्की काय म्हणायच आहे ते कळल
तो काळच वेगळा होता
प्रतिसाद कै पटला नै. ज्या
In reply to तो काळच वेगळा होता by सुहासदवन
दुरुस्ती- शेवटचे वाक्य
In reply to प्रतिसाद कै पटला नै. ज्या by बॅटमॅन
प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असतो.
In reply to दुरुस्ती- शेवटचे वाक्य by बॅटमॅन
न पटेना! तसे तर मग
In reply to प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असतो. by सुहासदवन
+१००००००००००००००
In reply to न पटेना! तसे तर मग by बॅटमॅन
अवांतर - स्टार प्लस वरील जाहिरात
मुळात काही होऊ शकत नाही
माझे हि तंतो तंत हेच मत आहे
In reply to मुळात काही होऊ शकत नाही by ज्ञानव