Skip to main content

वॉरेन बफे आणि आपण...

लेखक अत्रन्गि पाउस यांनी शनिवार, 07/12/2013 या दिवशी प्रकाशित केले.
मुळात कोणी कुणाचे आयुष्य विषयक तत्वज्ञान वाचून/ऐकून आपले आयुष्य तसे बनवू शकत नही असं आपलं मला वाटते.. आपण सगळेच जगतांना एका ट्राफिक जाम मधल्या ड्रायव्हर सारखे असतो...आपापले स्टीयारिंग सांभाळत... मुद्दा असा कि त्या वॉरेन बफे चे काही मौलिक विचार मधून मधून धडकत असतात आणि बरेच जन आपण असे का केले नही म्हणून दुखी होतात.. त्यातील काही विचार आणि माझ्या प्रतिक्रिया १.त्यांनी वयाच्या अवघ्या अकराव्या (११) वर्षी शेअर बाजारात गुंतवणुक करण्यास सुरुवात केली. आणि तरी देखील आपण खुप उशीरा सुरुवात केली याची त्यांना खंत आहे. अत्रंगी म्हणे >> म्हणजे? ११व्य वर्षी अभ्यास, शाळा, येणारी दहावी ह्याचा विचार नं करता आपल्या मुलांनी हे करावे??? आणि उशिरा सुरु केली याची खंत आहे म्हणजे? एवढा पैसा मिळवून समाधान नही? २. वृत्तपत्रे विकुन मिळवलेल्या कमाईतून त्यांनी एक छोटीशी शेत जमीन विकत घेतली. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी. रोजगार नोकरी संदर्भ अत्रंगी म्हणे >> खरंच? वृत्तपत्रे विक्रीतून जमीन खरेदी? ११व्य वर्षी शेयर्स १४ व्य वर्षी शेत जमीन? असे करणारे ते एकटेच का अजून कुणी त्यांच्या सारखे आहेत? कारण ह्या वेगाने २५ व्या वर्षी अब्जाधीश होते का? आणि ह्यात त्यांच्या नशिबाचा भाग किती? त्यंच्या समकालीनांनी अन्य क्षेत्रात जे काही केले असेल (उदा. संशोधन, कला साधना वगैरे, ते सगळे फुकट?) ३. ते आजही मिड टाउन येथील त्यांच्या जुन्या ३ बेडरूमच्या घरात राहतात, जे त्यांनी ५० वर्षांपुर्वी त्यांच्या लग्नाच्या आधी घेतले होते. वॉरन बफे यांच्या मते त्यांना मोठ्या घराची गरज नाही. आजही त्यांच्या घराला कुंपणाची भिंत नाही. अत्रंगी म्हणे >> मोठ्या घराची गरज नही? मग ३ बेडरूम चे तरी कशाला? वरील विधान नीट वाचले तर कशाचा कशाशी संबंध नही... ४. वॉरन बफे त्यांची कार स्वतःच चालवतात. त्यांना ड्रायव्हर अथवा सुरक्षारक्षकांची गरज नाही. अत्रंगी म्हणे >> बरं मग? विकत मिळणारी जगातील सर्व सुखे मनसोक्त उपभोगुन हे जगाला सांगण्याचे प्रयोजन??सामान्य भारतीय नोकरदाराला ह्याचा काय उपयोग ?? बाकीची विधाने खालील प्रमाणे...आपल्या रोजच्या आयुष्यात ह्याचा उपयोग का..? का केवळ बफे म्हणाले म्हणजे आपण तसे वागावे? नही म्हणजे अंतू बरवा म्हणाला तसे माणूस आहे मोठा पण आपल्याला त्याचे काय? आणि पुन्हा समजा आपण हे सगळे करायचे ठरवले तर त्याचे झाले तसेच आपले होईल का??? आणि आपल्याला ते हवे आहे का? मला बफे ह्यांच्या बद्दल काहीच म्हणायचे नही...त्यांची तत्वे वाचून आपण जागच्या जागी कत्थक करण्यात अर्थ नही असे वाटते... त्यांच्या बद्दलची आणखीन काही माहिती खालील प्रमाणे वॉरन बफे जगातील सर्वात मोठ्या विमान कंपनीचे मालक आहेत. ६. त्यांची कंपनी बर्कशायर हाथवेच्या (Berkshire Hathaway) मालकीच्या ६३ कंपन्या आहेत. या सर्व कंपन्यांच्या CEO's (कार्यकारी अधिकारी) ना ते फक्त वर्षाला एक पत्र लिहितात. सर्व CEO's ना त्यांनी दोन नियम सांगीतले आहेत. पहिला नियम कधीही आपल्यागुंतवणुकदारांचे पैसे बुडणार नाहीत याची काळजी घ्या. दुसरा नियम कधीही पहिला नियम विसरु नका. ७. घरी आल्यावर स्वतःसाठी काही पॉपकॉर्न बनवुन चित्रपट बघणे हा त्यांचा आवडता छंद आहे. ९. वॉरन बफे आजही मोबाइल फोन वापरत नाहीत. १०. या वर्षी मी तुम्हा सर्वांना पुराणकाळापासून चालत आलेल्या (पण विस्म्रुतीत गेलेल्या) अशाच काही शहाण पणाच्या गोष्टी सांगणार आहे रोजगार नोकरी संदर्भ * अपार कष्ट करा : मेहनत कधीच वाया जात नाही, पण काम न करता केलेली बाष्फळ बडबड माणसाला लयास नेल्या खेरिज राहत नाही. * आळस झटकुन टाका : वाळुवर झोपुन राहणारा खेकडा कोणत्याही लाटेबरोबर समुद्रात वाहुन जातो. * उत्पन्न (मिळकत) : कधीही केवळ एका उत्पन्नाच्या साधनावर अवलंबून राहु नका. एका मार्गाने येणाऱ्या १०० रुपयांपेक्षा १०० मार्गांनी येणारा १-१ रुपया नेहमीच चांगला रोजगार नोकरी संदर्भ * खर्च - आवश्यकतेपेक्षा जास्त खरेदी केली तर लवकरच आवश्यक असणाऱ्या गोष्टी विकण्याची वेळ येईल. * बचत - खर्च करुन उरलेल्या उत्पन्नाची बचत करण्यापेक्षा, आधी बचत करुन नंतर उरलेले पैसे खर्च करा. * कर्ज - कर्ज घेणारा हा कर्ज देणाऱ्याचा गुलाम हॊउन जातो. * जमाखर्च - जमाखर्च मांडणे आणि त्याचा अभ्यास करणे अतिशय महत्त्वाचे आहे. जर बूटच फ़ाटला असेल तर पावसाळ्यात छत्रीचा काय उपयोग? * हिशोब तपासणे - लहान लहान खर्चांचा ताळेबंद ठेवा, एक छोट्याशा भोकामुळे पुर्ण जहाज बुडू शकते. RDH Sir * आर्थिक धोका - बऱ्याच इन्वेस्ट्मेन्ट्स भरपुर फायदा देणाऱ्या आणि आकर्षक असतात मात्र त्यात तेवढाच धोका लपलेला असतो. त्यामुळे अशा इन्वेस्ट्मेन्ट्स जरा काळजीपुर्वक विचार करुन करा. जर नदीची खोली पहायची असेल तर दोन्ही पाय पाण्यात टाकुन कसे चालेल? * गुंतवणुक - सर्व अंडी एकाच पारड्यात टाकुन कसे चालेल बरे? रोजगार नोकरी संदर्भ मला खात्री आहे की जे या सर्व सुचनांचे आधीपासून पालन करत आहेत, त्या सर्वांची आर्थिक परिस्थिती उत्तम असेल. आणी मी हे देखिल खात्रीपुर्वक सांगु शकतो, कि जे या सर्व सुचनांचे पालन करायचे ठरवतिल तेही लकरच आर्थिक सुखाचा आनंद घेतिल. चला आपण सर्वजण हुशार हॊउया आणि एक सुखी, समाधानी आणि शांत जीवन जगुया. माणुस आर्थिक गरजेपोटी आयुष्यभर धडपडत असतो, त्याचं मुख्य कारण म्हणजे माणसाने शाळा व कॉलेजमध्ये बरीच वर्षे शिक्षण जरी घेतले असले तरी पैश्याबद्दल त्याला काहीच शिकवलं गेलेलं नसतं. परिणामस्वरुपी माणुस पैश्यासाठी काम करायला शिकतो परंतु स्वत:साठी पैश्याकडून काम करवून घ्यायला मात्र कधीच शिकत नाही.

वाचने 7564
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

जर १० व्या मुद्द्यानंतरचे विचार तुमचे असतील् तर खरोखरच योग्य असतील. इतर कोणाचे असतील तरीही योग्यच आहेत. आता बफेबद्दलः १. त्याने चिक्कार पैसा कमावला, उपभोगला आणि धर्मादायी दान सुद्धा केला. त्यांनी आयुष्ञ पुर्णपणे आणि योग्य प्रकारे उपभोगले. २. घरी आल्यावर ते पॉपकॉर्न बनवुन चित्रपट बघतात की चित्रपट बनवुन पॉपकॉर्न बघतात ही क्षुल्लक माहिती झाली पण लोकांना अश्या गोष्टीत इंटरेस्ट असतो. ३. ते खरेच ३ बेडरुमच्या घरात राहत असतील तर त्यांना खरेच मानले पाहिजे. उत्पन्नाच्या हिशोबात घराच्या खोल्या किंवा घरेच वाढवणार्‍या भारतीय मानसिकतेशी तुलना करत त्यांची राहणी नक्कीच साधी आहे. भारतातल उच्च मध्यमवर्गीय माणुस देखील ४-५ बेडरुमच्या फ्लॅट किंवा बंगल्याच्या मोहात पडतो. ते तर जगातल्या सगळ्यात श्रीमंत लोकांपैकी एक. एवढा पैसा असल्यावर किमान ३ बेडरुमचा फ्लॅट घेणे कोणालाही आवडेल. अर्थात त्यांचा प्रचंड मोठा बंगला असेल तर त्याच्यातही वाईट वाटण्यासारखे काहिच नाही. ४. स्टार्ट इन्व्हेस्टिंग अर्ली हा त्यांचा मंत्र आहेच. त्यांनी खरेच वयाच्या १४ व्या वर्षी जमीन घेतली की नाही हे महत्वाचे नाही.

महाराजांनी वयाच्या १६व्य वर्षी तोरणा घेतला...त्या काळाची ती गरज होती. बफे ह्यांनी ११व्या वर्षी बाजारात गुंतवणूक केली किंवा गोल्फचे चेंडू विकून किंवा पेपर विकून पैसे उभे केले ती त्यांच्या त्या काळातील गरज असेल ... किती खोटे किती खरे हे पाहण्यापेक्षा किंवा त्यांना आंधळेपणाने अनुकरणीय न मानण्यापेक्षा त्यांचे जीवनविषयक तत्व लक्षात घ्यावे हा मुद्दा आहे. त्यांनी लवकर सुरवात केली आणि ते जगातले सर्वात श्रीमंत गणले गेले हि वस्तू स्थिती नाकारता येत नाहीच. चांगली तत्वे मग ती कुणाची का असेनात बफे(अर्थवृद्धीसाठी)असुदेत की वैज्ञानिक(ज्ञानवृद्धीसाठी),संत(पुण्यवृद्धीसाठी) किंवा आणि कुणीही असुदेत ते मार्ग दाखवताहेत "स्टीअरिंग" काढून घेत नाही आहेत. कुणाचेहि अनुकरण करणे म्हणजे आत्महत्या. बाकी अंतू बरवा म्हणाल तर "शिंचा कोकणातला ना तो"

मुळात कोणी कुणाचे आयुष्य विषयक तत्वज्ञान वाचून/ऐकून आपले आयुष्य तसे बनवू शकत नही असं आपलं मला वाटते..
+१

आमच्याकडे एक मास्तर आहे. थोरा मोठ्यांच्या विचारांच्या पुस्तकातून काही मौक्तिकं वाटत असतो. वॉरेन बफेबद्दल असेच रिपिट रिपिट विचार आम्हाला फेकून मारत असतो. ''मुळात कोणी कुणाचे आयुष्य विषयक तत्वज्ञान वाचून/ऐकून आपले आयुष्य तसे बनवू शकत नही असं आपलं मला वाटते..'' मलाही असंच वाटतं. -दिलीप बिरुटे

बफेट साहेबांनी प्रवचन देताना ये ज्ञान प्रबोधन केलेलं नाहि. त्यांच्या उत्तुंग कामगिरी आणि व्यक्तीमत्वाचा अंध/डोळस धांडोळा घेणार्‍यांनी जे काहि बघितलं ते पसरवलं. बफेटचालिसा, बफेटलीलामृतवाल्यांनी हे लक्षात घ्यायला हवं कि बफेटने जे काहि कमवलं त्याकरता त्याने आपल्या बर्‍याच सुखांची आहुती दिली असणार... तेव्हढी पॅशन असेल आणि नशिबाची योग्य साथ असेल कुणीही, अगदी बफेट नाहि पण, बर्‍यापैकी यशस्वी बनेल.

यश म्हणजे काय याची व्याख्या ज्याची त्याने ठरवावी. दोन-चार लोकांपलिकडे ज्याचे नावही कुणाला ठाउक नाही, जेमतेम पैसा, असे जीवनही यशस्वी असू शकते. अश्या लोकांना वॉरन बफे इत्यादि काय म्हणतात, याचेशी काही सोयरे-सुतक असण्याचे कारण नाही.

मला तर असे वाटते कि माणूस अचानक नशिबाने बँक ब्यालेंस ने मोठ्ठा झाला कि त्याला असे त्याला असे तत्वज्ञान सुचत असावे . कोणत्याही बड्या बिझनेसमन चे उदाहरण घ्या हि समान गोष्ट सापडेलच !

नक्की काय म्हणायच आहे ते कळल नाहि. पण अत्रंगिपेक्शा बफेचे विचार नक्किच थोडा तरि विचार करण्याजोगे आहेत. आणी बफे हे पूर्णपणे आपल्या अभ्यास आणी इन्वेस्ट्मेंट डिसिप्लिन नि श्रिमंत झालेले आहेत. अचानक नशिबाने मुळिच नाहि हे पण नमुद करावेसे वाटते.

ही मोठ्ठी लोकं ज्या काळात मोठ्ठी झाली तो काळ अज्ञानाचा होता म्हणजे ज्ञान तर होतेच पण आजच्यासारखा माहिती तंत्रज्ञानचा झंझावात नव्हता. त्यामुळे एकाच देशातील, दोन टोकाच्या, दोन माणसांना असणारी एकाच गोष्टीची माहिती, ज्ञान बऱ्याच कष्टाने, अभ्यासाने मिळवावे लागत असे. ती माहिती, ज्ञान दुसऱ्यापर्यंत पोहोचण्याच्या आधी त्यावर आधारित आपला कार्यभाग साधायला बराच वेळ मिळत असे. पण तरीही त्या काळात अंबानी, टाटा, गोदरेज आणि अनेक विदेशी घराणी जसे बुफे, फोर्ड इत्यादी श्रीमंत झाली, कोणी पेपर विकून, कोणी पंपावर काम करून, तर कोणी साधा अभियंता म्हणून तसे आता शक्यच नाही. आजच्या काळात एखाद्या अभियंत्याने आपल्या मालकाला एखादी चांगली कल्पना दिली तर त्याचा मालक त्याला कॉम्पनसेशन म्हणून प्रमोशन देईल जास्तीत जास्त पण त्याला आपल्या कंपनीची पार्टनरशिप नाही देणार. पंपावर पेट्रोल भरणारा कितीही चांगला काम करीत असेल म्हणून आयुष्यभराच्या कमाईत तो पंप विकत नाही घेऊ शकणार. आणि अशी अनेक उदाहरणे देत येतील. आज प्रत्येक कल्पनेवर अक्षरश हजारो लोग काम करीत असतात. त्याच वेळी शेकडो लोक त्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी झटत असतात. अशा वेळी आपण केलेल्या प्रयत्नांत अगदी थोडे जरी कमी पडलो तरी अयशस्वी हा शिक्का बसतो. ह्या घराण्यांकडे किंवा व्यक्तींकडे सध्या एवढा पैसा नक्कीच आहे की अकलेच्या सहाय्याने निव्वळ रोलींग करूनही बक्कळ पैसा कमावता नि राखता येतो. त्यात कसली आलीये डोंबलाची स्ट्रेटेजी. असे असले तरीही त्या माणसांनी त्या वेळी केलेले कष्ट आणि श्रम लहान होत नाहीत.

In reply to by सुहासदवन

प्रतिसाद कै पटला नै. ज्या काळात अंबानी वैग्रे मोठे झाले त्या काळातही सामान्य माणसाने असे स्वप्न पाहणे अतर्क्यच होते. एका मर्यादेपलीकडे पैसे कमवणे हे कुठल्याही काळात अवघडच असते. अन आजही तुम्हाला-मला अंबानीसारखे मोठे व्हायला जरूर स्कोप आहे पण मग तेवढ्या कष्टांची अन धूर्ततेची गरजही आहे. ते जर नसेल तर काळ कुठला याला कै स्कोप नाही.

In reply to by बॅटमॅन

अन आजही तुम्हाला-मला अंबानीसारखे मोठे व्हायला जरूर स्कोप आहे पण मग तेवढ्या कष्टांची अन धूर्ततेची गरजही आहे.
मला हे तर अजिबातच पटत नाही. आज कोणीही असं मोठं होऊ शकत नाही. उगाच कशाला आशा दाखवायची. मी काय किंवा तुम्ही काय. पटो अगर ना पटो. जे आहे ते असं आहे.

In reply to by सुहासदवन

न पटेना! तसे तर मग शिवाजीमहाराजांच्या वेळीही स्वराज्य स्थापणे हा वेडेपणाच समजत होते ना सगळे. त्यांनीही "पूर्वी यादवराजे अन विजयनगरचे राजे होऊन गेले, आजच्या काळात कोणीही असं मोठं होऊ शकत नै, आदिलशहा अन मुघलांपुढे तर नाहीच नाही" असा विचार केला असता तर??? आशा नेहमी दाखवलीच पाहिजे. हजारो झटतात तेव्हा एकाचे स्वप्न साकार होते. तो एक अंबानी झाला म्हणून बाकीचे काय खितपत पडत नाहीत, त्यांचेही जीवनमान सुधारते- अंबानीइतके नसले तरी बरेच सुधारते. आशा नसेल तर त्या जिण्यात काहीच अर्थ नाही. देअर इज ऑल्वेज होप. आपण शिवाजी होऊ शकत नसलो तरी थोडे काहीतरी नक्कीच करू शकतो. तुमच्या विचारांना तथ्याचा आधार नाही इतकेच सांगावयाचे आहे.

In reply to by बॅटमॅन

आशा नेहमी दाखवलीच पाहिजे. हजारो झटतात तेव्हा एकाचे स्वप्न साकार होते. तो एक अंबानी झाला म्हणून बाकीचे काय खितपत पडत नाहीत, त्यांचेही जीवनमान सुधारते- अंबानीइतके नसले तरी बरेच सुधारते. आशा नसेल तर त्या जिण्यात काहीच अर्थ नाही. देअर इज ऑल्वेज होप. आपण शिवाजी होऊ शकत नसलो तरी थोडे काहीतरी नक्कीच करू शकतो.
प्रतिसाद प्रचंड आवडला गेलाय. आशावादावर विश्वास ठेवून प्रयत्न करणारा यशस्वी होतोच. सनफार्मावाल्या संघवीचं नाव कालपर्यंत कुणास ठावूक नव्हतं. आज भारतातला सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. म्हणजे कालपर्यंत कफल्लक होता असे नाही ना? प्रसिद्धी लाखापैकी एकाला मिळते, तेही त्याच्या व्यवसायानुसार. याचा अर्थ टाटा, बिर्ला, अंबानीच फक्त श्रीमंत आहेत असा थोडीच होतो. मर्क, बीमर, पोर्शवाले हजारो-लाखो आहेत भारतात. ते त्यांच्या परीने यशस्वी आहेत. ते यश त्यांनी मेहनत, धुर्तपणा यामुळेच मिळवलंय. आशा असेल तरच हजार प्रयत्न करण्याची ताकत येते. हजार प्रयत्नातला एक प्रयत्न तरी यशस्वी होतोच. आशाच नसेल तर वाट थांबते. माणूस चालेल तर वाट तयार होते. थांबेल तर थडगं. आयुष्यात एका क्षणी मीही डगमगलो होतो. पण त्याआधी आणि त्यानंतर दुर्दम्य आशावाद होता आणि आहे. तो असेल तर जगण्याला अर्थ आहे. नाही तर जिवंत प्रेत बनण्यात काय मजा? 'उगा स्वप्नं दाखवू नका' म्हणणारे आहेत तिथंच राहतात. तर प्रयत्न करणारे फक्त स्वप्नं विकूनही यशस्वी होतात.

एक वाहन चालक निव्वळ खेळावर आधारित माहितीच्या ज्ञानाच्या आधारे, प्रथम कंपनीत फोन ऑपरेटर नंतर मेनेजर आणि नंतर चक्क कंपनीच्या मालकाच्या मुलीचा पती होतो म्हणजे कंपनीचा मालक. ह्यात आपल्याला त्या चालकाची हुषारी दाखवली गेलीये पण त्याच वेळेला त्या मालकाचा मूर्खपणा सोयीस्करपणे लपवला गेलाय.

हा विचारच आत्मघातकी आहे ठरवले तर काहीहि होऊ शकते (शब्दशः अर्थ घेऊ नका नाहीतर मला तीळे व्हावे असे मी ठरवले होते पण इच्छा तिथे मार्ग काही सापडला नाही..)थोडक्यात काय हवे आहे ते ठरवणे आणि ते अतर्क्य नाही ना हे पाहणे महत्वाचे आहे. अंबानी किंवा कुणीही सतत एकाच ध्येयाने पिडीत होते म्हणून ध्येय गाठू शकले. कशाला ? काय गरज आहे? हेच प्रश्न सकारात्मक दृष्ट्या त्यांनी स्वतःला विचारले आपण ते विचारतो पण.......सुज्ञास सांगणे न लगे माणूस कुणालातरी फॉलो करून कधीच मोठा होत नाही तो फक्त आणि फक्त स्वतःला फॉलो करूनच मोठा होतो हेच एकमेव सत्य आहे.
अन आजही तुम्हाला-मला अंबानीसारखे मोठे व्हायला जरूर स्कोप आहे पण मग तेवढ्या कष्टांची अन धूर्ततेची गरजही आहे
माझे हि तंतो तंत हेच मत आहे पण धूर्तता....आय डाउट

In reply to by ज्ञानव

माझे हि तंतो तंत हेच मत आहे पण धूर्तता....आय डाउट
एका मर्यादेपलीकडे धूर्तताही अनिवार्य असते असे आपले मला वाट्टे. त्या शब्दाला अंमळ वाईट अर्थ चिकटलेला आहे खरा.