५ राज्यांच्या डिसेंबर २०१३ मधील निवडणुका - भाग २
५ राज्यांच्या डिसेंबर २०१३ मधील निवडणुका हा श्रीगुरुजी यांचा धागा दोन पानाहून जास्त झालेला असल्याने निवडणुकांचे काही तासात लागणारे निकाल ट्रॅकींग करणे आणि त्यावर / त्यासंदर्भात चर्चा करणे अवघड जाऊ शकते. म्हणून हा धागा काढत आहे आणि त्या धाग्याऐवजी हा धागा वापरण्याची विनंती करत आहे.
काही मुलभूत माहिती:
२०१३ अंदाज
| राज्य | २००८ |
|
| काँग्रेस | भाजप | |
| मध्य प्रदेश | ७१ | १४३ |
| राजस्थान | ९६ | ७८ |
| दिल्ली | ४३ | २३ |
| छत्तीसगड | ३८ | ५० |
प्रतिक्रिया
काही निरीक्षणे - अनुमान
सगळ्यात पहील्यांदा आम आदमी पार्टी आणि केजरीवाल यांचे अभिनंदन
राजकीय पक्ष म्हणून शुन्यातून सुरवात करून वर्षभरात दोन प्रमुख पक्षांना धक्का दिला आहे. ही गोष्ट कुठल्याही देशात/राज्यात सत्तेच्या राजकारणात सोपी नाही. तरी देखील तेलगू देसम सारखे उदाहरण आधीच्या काळातले आहे नाही असे नाही.आम आदमीचे यश
आम आदमी पार्टीला जरी मोठे यश मिळाले असले तरी सत्ता मिळाली नाही हे जनतेप्रमाणेच त्यांच्यासाठी पण चांगले झाले असे वाटते. विधमंडळाचा कुठलाही अनुभव नसलेल्या संपूर्ण पक्षास अचानक देशाच्या राजधानीची सत्ता जाणे अवघड ठरले असते. यात जशा त्यांच्याकडून उत्साहाच्या भरात काहीतरी चुका घडू शकतात तसेच केंद्रसरकारचा दिल्लीवर काही झाले तरी कंट्रोल असल्याने (उ.दा. पोलीसदल) त्यांना (आप ला) चूक ठरवणे देखील सोपे जाऊ शकले असते. क्रांती होण्यापेक्षा उत्क्रांती होणे हे त्यांच्या आणि जनतेच्या/देशाच्या हिताचे आहे.भाजपा
भाजपाने चार राज्यात एकत्रीतपणे मला वाटते साधारण ७०% जागा जिंकल्या. हे नक्कीच मोठे यश आहे. तरी देखील दोन राज्यात निर्विवाद बहुमत नाही. त्यामुळे मोदी तसेच इतर नेत्यांना जरा चेक बसलेला आहे. आपापल्या राज्यात "डिलिव्हरेबल्स" देणे आणि तसेच उगाच जास्त तोंडाळ न होणे...काँग्रेस
ये तो होना ही था! असेच म्हणावेसे वाटते आहे. काँग्रेसला विरोध म्हणून नाही पण ज्या पद्धतीचे राज्य (आणि देश) चालवणे चालले आहे त्यातून काँग्रेस जिंकावे असे जर कुणाला कुठल्याही कारणामुळे वाटत असेल तर कठीण आहे... अर्थात काँग्रेस काही शिकायला तयार नाही हे सोनीयाजींच्या बोलण्यावरून समजते. त्यांनी आत्ता स्वतःस अथवा राहूलला कुठेच जबाबदार धरले नाही. स्थानिक नेत्यांना जबाबदार धरले. राहूल गांधींकडून कुठलीच अपेक्षा करता येत नाही. तरी देखील काँग्रेस ही सरंजामी पार्टी असल्याने, तमाम काँग्रेसजन "हाजी हाजी" ला पर्याय नाही असेच समजत राहतात. त्यांचे पार्टी कल्चर, भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारी नेत्यांकडे दुर्लक्ष, कधीकाळी चाललेले व्होट बँक पॉलीटीक्स याच्यापुढे जर त्यांना विचारच करता येत नसेल तर काय बोलणार, शेवटाची सुरवात (beginning of end) आहे.इतर पक्ष
इतर पक्षांच्या नेत्यांना टिव्हीवर येण्याचा चान्स देखील न मिळणे स्वागतार्ह आहे. दिल्ली सोडल्यास फक्त काँग्रेस-भाजपा आणि दिल्लीत आम आदमी देखील. कम्युनिस्ट, समाजवादी, बहुजन समाजवादी वगैरे कुठेच नाही. तरी देखील थर्ड फ्रंट ची टूरटूर करतील ते वेगळेच... असो.+१००
"विधमंडळाचा कुठलाही अनुभव
आप व केजरीवाल
जसे मनसे
काय गंमत आहे बघा. अरविंद
मराठी माणसाबद्दल अतिशय योग्य मत....
नक्की
हा हा
सुब्रम्हण्यम स्वामींनी पार्टी बदलली का ?
छत्तीसगडविषयी अजूनही
एनडीटीव्ही
कदाचीत काही कॉंग्रेस आमदार
भाजप ३२, आप २८
छत्तीसगड
नितिन ग्डकरि टीव वर बोलत होते
हर्षवर्धन
दिल्लीमध्ये आम्ही सरकार
त्याचा अरोगन्स डोक्यात जायला लागला आहे.
आप आनि आरविंद केज्ररिवाल
वाचा :)
#मंदारकात्रे १+
भाजपाला फक्त एकाच राज्यात
पहिल्यांदा "आप्"ले
तीनवेळा निवडून आलेले मप्र
.
मध्य प्रदेश आणि छत्तिसगड
अभिनंदन
या सर्व गदारोळापासून मनमोहन
निदान
बोलले बोलले...
मनमोहन सिंगांचा पी वी
दिल्लीमध्ये सर्वाधिक जागा
>>>>>>> जर पुन्हा निवडणूका
वाईल्ड कार्ड
आआपाच पुढे
अजून थोडे पुढे
- केजरीवाल हे अण्णांच्या आंदोलनात सहकारी-नेते होते, असे आंदोलन ज्याला दिल्लीत (आणी इतरत्रही) प्रचंड पाठींबा मिळाला होता.
- हे आंदोलन गेल्याच वर्षी झाल्याने आणि त्यात अण्णांच्या खांद्यास खांदा लावून नेतृत्व केल्याने केजरीवाल यांना नवीन पक्षस्थापनेस लागणारे नैतिक भांडवल मिळाले (इतर आर्थिक भांडवल त्यांना भारतातून आणि परदेशातून मिळाले हा भाग सोडून द्या).
- निवडणूका लगेच असल्याने त्या नैतिक भांडवलाचा नक्कीच फायदा झाला आणि त्यात गैर काही नाही, योग्यच होते.
- पण आता जनतेने निवडून दिले आहे. आता कुठलेही आंदोलन चालू नाही आणि तसे देखील तेच तेच आंदोलन करून काही फायदा होत नाही हे देखील वास्तव आहे. ते व्हिपि सिंगनी पाहीले आहे, अडवाणी-भाजपाने पाहीले आहे आणि केजरीवाल देखील बघतील. (रामदेवबाबांचे आंदोलन देखील त्यांचे फॉलोअरपब्लीक विसरले). जनतेला सकारात्मक देखील हवे असते.
- जर दिल्लीत कुणाचेच राज्य आले नाही आणि राष्ट्रपती राजवटीमुळे सहा महीन्यांनी निवडणूका घेण्याची वेळ आली तर आप च्या आमदारांना काही काम दाखवायची अथवा जनतेसमोर सकारात्मक गोष्टी करून दाखवता येणार नाही ज्यासाठी जनतेने त्यांना निवडून दिले आहे. थोडक्यात एक अण्णांच्या आंदोलनाचे अपत्य इतका बायोडेटा सोडल्यास बाकी अनुभव शून्य! त्याचे कसे परीणाम होतील अथवा त्यासाठी आप चे नेते कसे धोरण आखतील यावर त्यांचे भविष्य ठरेल असे वाटते.
(मला स्वत:स आप एक पक्ष म्हणून पुढे यावा असे वाटते, फक्त "क्यो ना, करले आप से प्यार हम, आहीस्ता आहीस्ता" असेच. ;) )केजारीवांची "आप" सध्या
अजून एक.
दिल्लीत तरी आआपाला सत्ता
पुनर्मतदान आप साठी फायद्याचे ठरेल.
कुठले मतदारसंघ हे अटीतटीने
आय अॅग्री विथ द स्टॅटीस्टीक्स.
काँग्रेसचे अभिनंदन
गिरे तोभी टांग उप्पर
नॉट सो फास्ट
अभिनंदन, खरोखरच फेकूची लाट
तुम्ही सर्व तिघे चौघे मिळून
कारण
दिल्ली
Pagination