Skip to main content

अधुरि एक कहानी भाग-४

शुक्रवार, 06/12/2013 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्दैवाने पक्याला आपल्या कॉलेज साठी गाव सोडावे लागले.त्यापूर्वी ती आणि पक्या एकदाच भेटले होते,हां पण दोघांच्याही कुटुंबासोबत...पण पक्या जवळ इतके धैर्य नव्हते की तो मनातील तिला बोलू शकेल.तिलाही माहीत होते की याच्या मनात काय आहे आणि यालाही माहीत होते की तिच्या मनात काय आहे !पण कुणी मात्र बोलायला तयार नव्हते. काळ त्याच्या वेगाने पुढे सरकत गेला.गाव सोडल्यावर पक्या चे कशात मन लागेना.सारखी तिची अबोल प्रीत त्याला खूणावत् असे.२ वर्षाच्या गॅप नंतर दोघे ही त्याच शहरात पुन्हा एकदा भेटले.तिचे कुटुंब ही आता तिथेच आले होते राहायला.पक्याला आणि तिलाही बरे वाटले.पण मनातील कुणीच काही बोलेना.अबोल प्रेम तसेच सुरू राहीले. याचे कॉलेज संपून हा आता नोकरीला लागलेला.तीही तिच्या पुढच्या शिक्षणासाठी दुस-या शहरात निघून गेलेली.कधीतरी दिवाळसणाला गाट भेट होत.पण अबोल प्रेम असेच चालू राहीले.डोळे एकमेकाशी बोलायचे.दोघं ही इकमेकाला गृहीत धरून चालत होते.ती शेवटच्या वर्षाला होती.हाही आता बर्यापैकी स्टेबल होत होता लाइफ मधे.त्याला वाटले बस,आता हिचे शिक्षण झाले की मी ही घरी बोलेल आणी तिलाही सांगेल एकदाचे.म्हणून तोही आपल्या आणि तीही आपल्या लाइफ मधे बुडून गेले. एके दिवशी,सायंकाळी घरी आल्यावर आईने जेवता जेवता सहज सांगितले की तिची आई आणि ती आज घरी येऊन गेली.त्यानेही अगदी सह्ज एकतोय असे दाखविले.आणि लगेच त्याच्या जीवनातील सगळ्यात वाईट क्षण त्याच्या समोर आला.आईने तिचे लग्न ठरल्याचे सांगितले.त्याला अगदी सुन्न झाल्यासारखे वाटले.काही न बोलता त्याने कसे बसे जेवण आटोपले.रात्रभर त्याला झोप आली नाय.मागच्या ५-६ वर्षाचा काळ झरझर त्याच्या नजरेसमोर येऊन गेला.आता त्याला स्वता:चा राग यायला लागला ! का नाही बोललो मी! का नाही सांगितले तिला !का मी तीला गृहीत धरले ? त्याला अगदी काहीच कळेना.पण अचानक विचार आला की तिने मला का नाही सांगितले की तिचे लग्न ठरतेय.एकदा तर मला कळावायला हवे होते.मी बोललो असतो ना घरच्यांशी! ही फसवणूक का केली तिने ? अजुन तिचे शिक्षण पण पूर्ण नाही झाले.तरी का घाई केली ? आणि हा सगळा विचार करत त्याने शेवटी तिच्यावर राग धरला! हिने आपल्याला न सांगता निर्णय घेतला!आणि म्हणून तिच्या लग्नाला जायचे आणि स्वता:ला आणि तिलाही आपल्या चुकीची जाणीव करून द्यायचीच!हे ठरवून तिचे लग्न बघण्याची जहाल शिक्षा त्याने स्वीकारली.प्रेयसीचे लग्न अनुभवने ही किती भयंकर शिक्षा असते हे,जावे त्यांच्या वंशा.........तेव्हाच कळते.तिने अनेकदा त्याला मांडवात स्टेज वर येण्यासाठी निरोप पाठवला.पण नाय गेला तो.त्याच्यात आता हिंमत उरली नव्हती तिच्या डोळ्यात बघण्याची!.............. खूप वर्ष लोटली.ती संसारात रामली तिच्या! याला मात्र तिला विसरता नाय आले.घरच्यांसाठी तो लग्न या बेडीत अडकला पण मन मात्र त्याचे आजही त्या शाळेत,त्या मैदानावर,त्या गावात कुठेतरी दूर कुणाच्या तरी आठवणीत रमायचे,जेव्हा तो उदास असायचा.......... क्रमक्ष:
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2200
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

हो..कारण कहानी अजुन आहे...आता कुठे त्याला प्रेम सम्झलेय पण अजुन खरे प्रेम काय असते हे नयिकेकडुन शिकायचेय......