आधुरी एक कहाणी
अचानक येनारी वळवाची सर जशी आसमंतात एक अनमिक थांडवा देऊन जाते काहीशी तशीच अनुभूती, तिचे पहिले वाहीले दर्शन त्याला देऊन गेली!भाणावर आला त्यावेळी कळले की तो शाळेच्या मैदानावर आहे आणि त्याचे वर्गमित्र त्याला बोलावत होते.कुठल्याही १६-१७ वर्षाच्या किशोर्वयीन मुलाचे व्हावे तसेच झाले त्याचे पण !मन कुठेच रमेना...कुणाला विचारू ते कळेना.......पण विचारू काय तेही सुचेना !तसाच घरी आला,पण रात्रभरसारखे तीचेच रूप डोळ्यासमोर!डोळे उद्या पुन्हा तिला बघायला आसुसलेले!
ती दुपारी दिसली होती म्हणजे हे नक्की होते की तिची आणि त्याची भेटी नक्कीच दुपारी होईल!पण राहून राहून त्याला इक प्रश्न सारखा सतावत होता,की आतापर्यंत ही आपल्याला का नाही दिसली ?मग त्याच्या डोक्यात एकदम वीज पडावी ,तसा प्रकाश पडला,अरे ही नवीन असेल आपल्या शाळेत!आणि त्याचा अंदाज बरोबर ठरला....कारण जेमतेम ४-५ हजार वसती च्या गावातील शाळेत प्रटेकाने प्रतेकल कधीरती बघितलेच असणार! अगदी स्वाभाविक होते ते !काहीसा सुटकेचा उसासा त्याने सोडला खरा,पण अगदी थोडा वेळ च!पुन्हा नवीन प्रश्न डोक्यात घर करायला लागले,कोण आहे ती?कुठे राहते ?अशी एकदम कशी काय आली टर्म च्या म्हद्दे ?इक ना दोन अनेक प्रश्न त्याला सटाउू लागले? पण सगळ्यात सातावणारा प्रश्न हा होता की त्याला का जाणून घायचेय तिच्याविषयी,का इतकी उत्सुकता लागलीय आपल्या ला तिची ? आज त्याचे कुठेच मन लागत नवते...वर्गात तर मुळीच नाही ! का कोण जाणे त्याला वाटत होते की आता जाऊन सगळे वर्ग चेक करून यावे.कुठेतरी दिसेल च की ती ! कधी इकदा ब्रेक होतोय आणि ग्राउंड वर जातोय असे झाले होते त्याला!शेवटी एकदाचा ब्रेक झाला आणि त्याच्या जीवात जीव आला.सगल्यात आधी तो वर्गाबहेर धावत निघाला.जाऊन अगदी मोक्याच्या जागी उभा राहिला आणि त्याची नजर घारीसारखी इकडे तिकडे फिरू लागली.कितीही लपवा पण तुमचे मित्र तुमची नस ओळखून असतात अगदी तसेच त्याचा एक मित्र जवळ येऊन उभा राहिला.चाहूल लागताच त्याने सावरायचा प्रयत्न केला खरा पण......कुणाला शोधतॉयेस? नाही ...कुठे ..कुणाला असले काहीतरी उतर देऊन तो मित्राचा वार
परतवण्याचा अयशस्वी प्रय्न्त करू लागला.....पण जीवभावाचा मित्रच तो....तो कसला हार मान्तोय.....हे बघ पक्क्या,मला शिकवू नको हां...हां वर्गात अशिल तू हुशार पण इथे आपल्या पुढे नाय ! मला माहितेय तू काय शोदटोयेस ! असमहणून त्याने पाकायची विकेटच काढली...आता पक्या काहीसा क्व्रए बावरा झला आणि आपली चोरी पकडलयाची जाणीव त्याला झाली. काही नहीरे यार...बस असेच ! मित्र म्हणाला,हो का ? मग नाव सांगू,की कुठे राहते हे सांगू >
चाय्स इस युवर्ज़ !
आता मात्र पक्या एकदम सुन्न झला.तसा मित्र हसला आणि म्हणाला तुला जे हवाय ते इथे नाहीय.पहिल्या मजल्यावर जा आणि हलूच त्याचे खांदे दाबून तो मित्र बाकीच्या ग्रूप कडे निघून गेला.एक अनामिक हूरहुर पकायाच्या मनात
सुरू झाली आणि त्याची पावले जिण्याकडून पहिल्या मजल्यावर जायला वळली.का कोण जाणे,आज पक्याला ते ५० पावलांचे अंतरही खूप वाटून गेले.कधी चडून तो वरती आलाय हे त्याच्या लक्षात पण नाही आले.
भिरभिरत नजरेला जे हवे होते ते कुठे दिसेना.तसाच तो मोकळ्या असणार्या गाकचीवर गेला आणि त्याचा चेहरा फुलून गेला. एका कोपर्यात त्याला जे हवे होते ते बघायला मिळाले.त्याला काय करावे ते सुचेना.तसाच भारवल्यासारखा तो उभा राहिला.हो तीच होती...जिणे त्याची झोप उडवली होती काल पासून.अचानक तिने त्याच्या कडे बघितले आणि हा कावरबावरा झाला.एक नापसंतीची पुसट भावना तिच्या चेहर्हयावर उमटली.साहजिकच होते.एक अनोळखी मुलगा तुम्हाला असे बघतोय म्हटल्यावर कुणीही नापसंती दर्शवेल.काही न बोलता ती मैत्रिनीकडे वळली आणि चालत वर्गाकडे निघाली.पक्या आपला उभाच....
दोन गोष्टी त्याला सुखावून गेल्या...ती परत तर दिसलीच आणि शिवाय ती कुठल्या वर्गात आहे हेही समजले.पण....हा पण त्याचा पिछा सोडायला तयार नव्हता.का,आपण तिला शोधतोय याचे मात्र उत्तर त्याला काही मिळत नव्हते.
क्रमक्ष:
वाचने
3263
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
येउद्या पुढचा भाग लवकर
लिखते रहो....
मु वि
In reply to लिखते रहो.... by मुक्त विहारि
***
उत्कंठा वाढली हो.
धन्यवाद.
In reply to उत्कंठा वाढली हो. by स्पंदना
खोटे खोटे
+१ काही काही शब्द सराईत
In reply to खोटे खोटे by साती
पहिलाच प्रय्त्न असल्याने
In reply to खोटे खोटे by साती
@पण चुचु, किचेन आणि युगंधरा
In reply to खोटे खोटे by साती
लगेच टाका