Skip to main content

वसा संस्कृतीचा

लेखक BONGALE SANTOSH SHAHU यांनी शनिवार, 30/11/2013 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
वसा संस्कृतीचा ऋण सावकारीच फेडण्या कुणब्याला दुष्काळाचा शाप रात्रंदिन कष्ट करायचा नाही थांबला कधी बाप उठून पहाटे रोज माय सारवते दुःखाच्या भिंती सोसत चटके दारिद्र्याचे दिस रोज मावळती राणी डुलणाऱ्या पिकामंधी दिसू लागे साखर गोड जल्म गेला मातीत अवघा तळहाताला आले किती फोड गाई गुरांच्या हंबरात वाढे संसार शेणामातीचा सुख नांदावे घरीदारी वसा जपतो संस्कृतीचा थकलेला चार घास खाऊन जाई तृप्त होऊन वाटसरू जिच्यावर जगतो आम्ही त्या काळ्या आईला कसं विसरू संतोष बोंगाळे
लेखनविषय:

वाचने 1371
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

@राणी डुलणाऱ्या पिकामंधी दिसू लागे साखर गोड जल्म गेला मातीत अवघा तळहाताला आले किती फोड>>> __/\__

कवितेचं शीर्षक पाहून बराच वेळ उघडली नव्हती, पण चांगली रचना आहे!

जिच्यावर जगतो आम्ही त्या काळ्या आईला कसं विसरू ही काळ्या आई विषयीची कृतज्ञता मनास भावली