सिनेमात धूम्रपान दाखवले तर तिथे धूम्रपान हानीकारक असल्याचे बंधन सेन्सॉरने घातले आहे ते व्यक्तीस्वातंत्र्याला मारक आहे असे अनुराग कश्यपचे मत आहे.
असले डिसक्लेमर्स दाखवल्याने रसभंग होतो असे मलाही वाटते. लोकांना अशा व्यसनापासून मुक्त करण्याची जबाबदारी सिनेमा निर्मात्यांची आहे का? असाच आचरटपणा आणखी वाढवायचा असेल तर स्मगलिंग, भ्रष्टाचार, चोरी, खून, बलात्कार अशी दृश्ये दाखवताना तिथेही असे करणे बेकायदा आहे अमुक एक शिक्षा होऊ शकते असे डिस्क्लेमर्स दाखवा असा सेन्सॉर आग्रह धरू लागला तर काय?
खरोखरच हे इतके जीवघेणे असेल तर सरकार ते थेट बेकायदेशीर का नाही ठरवत?
दुसरी बाजू हीसुद्धा आहे की सिगरेट कंपन्या पैसे देऊन मुद्दाम हिरोला कूल दाखवण्याकरता सिगरेट फुंकताना दाखवतात. काही करुन अशा प्रकारालाही आळा घालता आला तर बरे. पण सेन्सॉरचा हा उपाय म्हणजे भीक नको पण कुत्रा आवर ह्यातला वाटतो.
तुम्हाला काय वाटते?
वाचने
4843
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
सेन्सॉर बोर्ड (आमच्या एका
सेन्सॉर बोर्डचं म्हैत नै पण
In reply to सेन्सॉर बोर्ड (आमच्या एका by प्यारे१
ह्म्म्म्म.. चालायचंच
सरकारला महसूल मिळतो. म्हणून
केला इशारा जाता जाता
अत्यंत स्तुत्य कामगिरी.
सुषमा स्वराज बाईंना सांगा.
अनुराग कश्यप यांचं हे मत
In reply to सुषमा स्वराज बाईंना सांगा. by खटासि खट
धाग्याचा टायटल म.टा.
Rx
वा वा छान छान
फक्त या कारणामुळे वूडी एलेन
व्यक्तीस्वातंत्र्य
दुनियादारी पाहिला का