Skip to main content

अनुराग कश्यपचे सेन्सॉर बोर्डाला आव्हान

लेखक हुप्प्या यांनी बुधवार, 27/11/2013 या दिवशी प्रकाशित केले.
सिनेमात धूम्रपान दाखवले तर तिथे धूम्रपान हानीकारक असल्याचे बंधन सेन्सॉरने घातले आहे ते व्यक्तीस्वातंत्र्याला मारक आहे असे अनुराग कश्यपचे मत आहे. असले डिसक्लेमर्स दाखवल्याने रसभंग होतो असे मलाही वाटते. लोकांना अशा व्यसनापासून मुक्त करण्याची जबाबदारी सिनेमा निर्मात्यांची आहे का? असाच आचरटपणा आणखी वाढवायचा असेल तर स्मगलिंग, भ्रष्टाचार, चोरी, खून, बलात्कार अशी दृश्ये दाखवताना तिथेही असे करणे बेकायदा आहे अमुक एक शिक्षा होऊ शकते असे डिस्क्लेमर्स दाखवा असा सेन्सॉर आग्रह धरू लागला तर काय? खरोखरच हे इतके जीवघेणे असेल तर सरकार ते थेट बेकायदेशीर का नाही ठरवत? दुसरी बाजू हीसुद्धा आहे की सिगरेट कंपन्या पैसे देऊन मुद्दाम हिरोला कूल दाखवण्याकरता सिगरेट फुंकताना दाखवतात. काही करुन अशा प्रकारालाही आळा घालता आला तर बरे. पण सेन्सॉरचा हा उपाय म्हणजे भीक नको पण कुत्रा आवर ह्यातला वाटतो. तुम्हाला काय वाटते?

वाचने 4843
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

सरकारला महसूल मिळतो. म्हणून ते सिगरेट उत्पादनाला बंदी घलत नाहीत. तंबाखु उत्पादक शेतकरी भरडला जाऊ नये म्हणून सरकार चिंता करते. सामान्य नागरीक तंबाखुमुळे मेला तर सरकारचे काहीच जात नाही. संघटीत असल्याचा हा फायदा आहे.

सिग्रेट बद्दल वैधानीक इशारा देणं कंपल्सरी केल्याबद्दल मंडळाचे अभिनंदन करावं तेव्हढं कमि.

In reply to by खटासि खट

अनुराग कश्यप यांचं हे मत म्हणजे भाजपविरोधी कटकारस्थान तर नसेल ना ? नाही म्हणजे व्यक्तीस्वातंतत्य्र वगैरे शब्द आले कि धस्स होतं काळजात. स्वराज बाईंना चॅलेंज केल्यासारखं वाटतंय. बाईंपर्यंत पोहोचवा रे....

फक्त या कारणामुळे वूडी एलेन चा एक चांगला चित्रपट त्याने भारतात प्रदर्शित होऊ दिला नाही … आणि असल्या वैधानिक इशार्यांमुळे लोक जसं काही खरंच सोडनारेत सिगारेट…

काही प्रश्न १. व्यसनमुक्ती हे सेन्सॉरबोर्डाचे काम आहे का? २. सिगारेट ओढणे हे बेकायदा नाही तरी त्यावर असा डिसक्लेमर दाखवण्याची सक्ती. मग सिनेमात कितीतरी बेकायदेशीर गोष्टी दाखवतात. खून, बलात्कार, स्मगलिंग, ड्र्ग्जचा व्यापार आणि वापर, अतिरेकी कारवाया वगैरे. त्या सर्वावर डिस्क्लेमर का नसावा? तंबाखूचे काय? दारूचे काय?