Skip to main content

ग़ावातलं भुत

लेखक mohite jeevan यांनी गुरुवार, 21/11/2013 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
‘भुत भुत.. भुत... भुत....’ आसा आवाज विहीरीजवळ जसा घुमला तसे ग़ावातले लोक जाग़े झाले. पण घराबाहेर कोणी पडेना, का ? तर मध्यरात्री नुकतीच आमावस्या लाग़ली होती, कुत्री भुकत होती,रडत होती. जो तो घरात दडुन बसावा तसा बसलेला. सकाळ झाली आणि जो तो घरात लिंबु दोरा बांधु लाग़ला, नारळ फोडु लाग़ला, सकाळी बायका विहीरीवर पाणी भरण्यास ग़र्दी केली होती,त्या विहीरीवर एकच विषय ‘भुताचा’, कोणि म्हणत काल रात्री भुत दिसलं,तर कोणि म्हणत भुताची पालखी निघाली रात्री, आता बायकाच्या तोडंचा विषय पुर्ण ग़ावभर झाला,आता ज्या त्या घरात भुताच्या बाता. घरची पोरं पुरी भुताच्या नावानं घाबरु लाग़ले, काहीनी तर मुलाच्यावरुन लिंबु उतरुन टाकले, ग़ावात कोणाला ताप आला आसेल त्याला भुतानं झपाटलंय म्हणुन पायातली खेटरं उतरुन विहीरीजवळ टाकत होती.सकाळ पासुन विहीरीच्या पड्याला लिंबु,कुकुं,हाळद,बुट्या पडलेल्या होत्या, काहीनी तर कोँबडे मारुन उतरुन टाकले होते. जेव्हा हे ग़ांवभर झालं,तेव्हा ग़ण्यानं कबुल केलं की,म्या भुताला पाहीलय,हे जेव्हा मोठ्या लोकांना माहीत झालं तेव्हा सभा घ्यायचं ठरवलं. शेवटी चावडीवर सायकांळी या भुतावर ग़्रामसाभ घेण्यात आली,गावं सगळं जमा झालं होतं, सभा चालु होईपर्यत सगळ्यांच्या तोंडात भुताचाचं विषय होता, सभेला ग़ावातील आनेक मान्यवर मंडळी होती, मग़ संरपचानी विषय काढला, ‘हे बघा आपल्या ग़ांवात भुत हाय हे पहील्या पासुन माहीती हाय,पण ते आता जागे झालंया,कुणाच्या आग़ांत शिरलं सांग़ता येत नाही,’ भुत जाग़ं झालया म्हटल्यावर गावकर्याच्यात बडबड चालु झाली, सरपंच म्हणाले,’हे पहा काही घाबरु नका,इथं फक्त ग़ण्यानं भुत रातच्याला बघितलं हाय, ते भुत कसं हाय ते ग़ण्या खुद सांग़तो बघा,’ सरपंचानी ग़ण्याला पुढ करुन सांग़ायला सांग़ितलं,तसा ग़ण्या लाजत पुढ आला आणि ग़ावकर्याना सांग़ु लाग़ला,’परवा दिसी रातच्याला वाटीभर खरडा व भाकर खाली आणि पोट बिघडलं,मग़ रातच्याला पोटात कळा आल्या ,सडांसला जावं म्हणुन बाहेर पडलो, मला आमावस्या हाय माहीत नव्हतं, विहीरीकडं सडांसला चाललो ,संडासला बसावं म्हटंल आणि विहीरीत वाकुन बघतोय तर भुत विहीरीत पायरीवर उभं होतं, जसा बघितलो आणि ठो ठो भुत भुत आरडत तिथनं पाळालो,’ हे सांग़ताच ग़ावकर्याच्यात आता खुपच ग़ोधंळ चालु झाली, सरपंच म्हणाले,’हे पहा आज रातच्याला आमावस्या सपंली की आपन समंद्यानी उद्याच्या उद्या ती विहीर मुजवुन टाकु,म्हणजे भुत कायमचं निघुन जाईल’, सर्वानी सरपंचाना प्रतीसाद दिला, उद्या सकाळी दहा वाजता ग़ावकर्यानी जमायचे ठरले. सर्व ग़वकरी आप आपल्या घरी ग़ेले,रात्रीला मात्र एक जर कुत्रं भुकलं तर ग़ावकरी भीऊ लाग़ले,सायकाळी सात नंतर कोणि सुद्धा बाहेर पडत नव्हंत. सकाळ झाली चावडी जवळ सर्व ग़ावकरी जमा झाले, फावडे, बुट्या,कुदंळ घेऊन विहीरीकडे निघाले. सुमारे दहाच्या सुमारास शहरातुन येणारी एस.टी. ग़वात थांबली, ग़ावातुन शहरात जाऊन कामधंदा करणारी ग़ावकरी एस.टी.तुन उतरु लाग़ली, त्यात ग़ावचे मास्तर मोरे,पाटील,माने,कांबळे सुद्धा होते, चांवडीवर येताच त्यानी ग़ावात कोणिच दिसत नव्हते,म्हणुन मास्तरानी चावडीसमोर आसलेले रामप्रसाद या हाँटेलात ग़ेले, तेथे चौकशी केली आसता सग़ळा प्रकार कळुन आला. मग़ मोरे मास्तराना हा सर्व प्रकार कळाला व ते सरळ तेथुन विहीरीकडे निघाले ,त्याच्याबरोबर इतर मास्तर हि निघाले. विहीरीजवळ जाताच त्यानी तो सग़ळा प्रकार थांबवीला, सर्व ग़ावकर्याना एकत्र झाडाखाली ग़ोळा केले,आणि म्हणाले,’हे पहा ग़ावात किंवा या विहीरीत भुत वैग़ेरे काही नाही, भुतावर कींवा भुताटकीवर विश्वास ठेवु नका, ही सर्व आधंश्रद्धा आहे, आणि ग़ण्यानं जे काही तुम्हाला सांग़ितले आहे त्यावर विश्वास ठेऊ नका. कारण त्या रात्री त्या विहीरीत मीच आघोंळ करत होतो,' सर्व ग़ावकरी एकमेकाकडे पाहुन कुजबुजु लाग़ली, मास्तर म्हणाले,’म्हणजे झालं काय ते सांग़तो,त्या रात्रीच्या दुसर्या दिवशी शहरात मतदान आसल्याने आमची ड्युटी मतदान केद्रांवर होती, त्यामुळे सकाळी सात वाजता मला मतदान केंद्रावर पोहचायचे होते,म्हणुन मी त्या रात्री लवकर झोपलो आणि जाग़ आली तेव्हा मी घड्याळ पाहीले तर माझं घड्याळ बंद पडलेलं,त्यावेळी मला वाटलं मी भिंतीवरील घड्याळ का घेतले नाही?, पण मला वाटले पाहटेचे पाच वाजले आसतील म्हणुन मी विहीरीवर आघोंळीला ग़ेलो, आघोंळ करता करता वरुन भुत भुत आसा ओरडण्याचा आवाज आला,मी घाबरुन वर पाहीले तर कोणी नव्हते,वरती येऊन पाहतो तर कोणी तर पळताना दिसला,तसा मी आघोंळ करुन बाहेर पडलो, खोलीवर आलो,सकाळच्या सहाच्या ग़ाडीची वाट पाहु लाग़लो,पण सकाळ काही होईना आणि ग़ाडी काय येईना,तासभर झाला आसेल वाटलं तरी रात्रच होती म्हणुन सकाळ होई पर्यत जाग़ा राहीलो,आघोंळीनं झोप येईना,बसलो मग़ सकाळची वाट पाहत,तर आसा सग़ळा प्रकार होता, सकाळी ग़ाडीत बसलो आणि नंतर विचार केला की मी रात्री साधारण एक दोनच्या सुमारास विहीरीवर आघोंळ केली,’ ग़ावकरी ग़ालाला हात लावत एकमेकाकडे पाहत आश्चर्याने पाहात चर्चा करु लाग़ले, पुढे मास्तर म्हणाले,’हे पहा भूत वैग़रे काही नसते हे घडलेल्या प्रकरणावर सर्वाना कळाले आसेल,तर मग़ विहीरीतील सर्व माती काढा आणि विहीर साफ करा,’ आसे म्हणताच सर्व ग़ावकरी भुताच्या विषयावर हासु लाग़ले, आणि विहीर साफ करायला वळाले.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 39673
प्रतिक्रिया 216

प्रतिक्रिया

पहिल मुवि चा प्रतिसाद पडू द्यायचा कि ? पॉपकॉर्न विक्रेता - तथास्तु *clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:

In reply to by मुक्त विहारि

जोरात ठसका लागला वाचून!!!!!!! असं घडू नये म्हणून मी उद्याच नागलिंगेश्वराला प्रार्थना करतो..

In reply to by लॉरी टांगटूंगकर

"असं घडू नये म्हणून मी उद्याच नागलिंगेश्वराला प्रार्थना करतो.." आत्ताच का नाही???

कथाबीज छान आहे. थोडे अजुन फुलवता आले असते. ग्रामीण वातावरण अजुन नीट जमवायला पाहिजे होते असे वाटते. पुलेशु

ग़- ग फ्रॉम इपिग्लॉटीस?? बाकी चलते रहो!

In reply to by लॉरी टांगटूंगकर

हॅ... तुम्हाला " पुरी भुताच्या नावानं" चाललं ना? मग? जीवनराव, तुम्हाला नक्की काय म्हणायचं होतं तिथे? पुरी भाताच्या नावानं की पोरी भुताच्या नावानं? काहीही म्हणा, पण आपण तुमचे फुल्ल फॅन झालोय...

जीवनभौ, कोँबडे गोष्ट लिहिताना त्यांत कोंबडा शब्द आल्यावर त्या शब्दालाही तुम्ही तुरा काढला आहे हे बघून धन्य झालो. खरी सचित्र कथा हाय राव.

In reply to by तिमा

लेखापेक्षा प्रतिसाद जड ( हे नाकापेक्षा मोती जड च्या तालात गावे)  @ मो़जी साहेब, हे कथबीज आवडलं. एकदम सरळसोट न उलगडता जरा वेगळी कलाटणी दिली असतीत तर अजून मजा आली असती.

In reply to by तिमा

गोष्ट लिहिताना त्यांत कोंबडा शब्द आल्यावर त्या शब्दालाही तुम्ही तुरा काढला आहे >> :D हसून हसून पुरेवाट . आपकी पारखी नजर ...

>>>मिपाकर ग़ालाला हात लावत एकमेकाकडे पाहत आश्चर्याने पाहात चर्चा करु लाग़ले mohite jeevan ही आधंश्रद्धा आहे

In reply to by अनिरुद्ध प

जे नस्तंय पण असल्यासारखं वाटतंय त्याला आधंश्रद्धा म्हणतात!

तुमच्या कथा पुनर्प्रत्ययाचा आनंद देतात. लगे रहो. पुढची कथा पण लौकर टाका राव.

कलेकलेनं वाढणार्‍या चंद्राप्रमाणे आपले लेखन दिवसेंदिवस बहरत (सुधारत?) चालले आहे.. एक मोSSठ्ठी कादंबरी लिहुन लवकरच पौर्णीमेच्या चंद्राचं दर्शन आम्हा रसीकांना द्याल अशी आशा करतो.. _/\_ अवांतरः अंधश्रद्धा निर्मुलनासाठी, 'बालभारती'मध्ये बोलुन आपल्या कथा पाठवता येतील का ते पहा.

In reply to by यसवायजी

काय यसवायजी तुम्ही ?तुम्ही लेखकाला दुखवले आहे गण्यावर कमेंट न देउन, भलतीकडे का पळता ? चला आता चुक सुधरा एक चान्स तुम्हाला ;)

In reply to by पियुशा

काय पियुशा तुम्ही ?तुम्ही मला दुखवले आहे अहो-जाहो म्हणुन, असं का करता ? चला आता चुक सुधरा एक चान्स तुम्हाला ;) (जळकुकडा)

In reply to by यसवायजी

अगदी अगदी, जीवनभौसलवागी येन बेकाद् माडतेवी!!! निन्ने इवत्तु नाळे कूडा ;)

In reply to by बॅटमॅन

:)) निन्ने इवत्तु नाळे कूडा :)) आण्णा.. निम्मसलुवागी एन बेकाददु..

In reply to by यसवायजी

चनागिदे चनागिदे!!! सोल्प यमक बेकादरे हेंग हेळबेकु? वन्दु ट्रै माडतिनी- "आण्णा निम्मसलवागी एन बेकाददु, नम्मदु निम्मदु यारद बेकाददु!!" " हुडगुरु माडिदरु तप्पु, अण्णा नोडि बण्णा आतु कप्पु" =))

In reply to by यसवायजी

जीवन भौंच्या इतकी नसली तरी किमान मराठी मध्ये तरी अभिव्यक्ती होऊ द्या रे पोरांनो! -मराठी भाषेबद्दल सचितं ;) प्यारे

In reply to by प्यारे१

कन्नडमध्ये दोनचार वाक्ये काय खरडली, हे झाले सचिंत!!! काका कसं होणार तुमचं =))

In reply to by बॅटमॅन

अरे बाळा अणुस्वार कशावर आहे ते तरी बघ! जीवन भौ कडून काहीतरी शिकायला नको????????

In reply to by प्यारे१

अणुस्वार???? घोडेस्वार माहिती होता, हे आणि काय? अणुस्वार म्हणजे इलेक्ट्रॉन म्हणायचे आहे का =))

In reply to by प्यारे१

'भौं'चे गुण आम्ही पामर मराठीत काय वर्णणार? ती तर "ज्योतीने तेजाची आSSरती" होईल.. म्हंताना आमी कनडा बोलतया वो..

In reply to by यसवायजी

तेजा वरुन 'तेजा मय हू मार्क इधर है' नि अशा सगळ्या एव्हरग्रीन ड्वायकॉल ने सुसज्ज 'अंदाज अपना अपना' ची आठौण आली. ड्वाळे पाणावले. अमर प्रेम कुठं आहात रे?

In reply to by प्यारे१

ड्वायकॉल
हा शब्द काळजाला भिडला. फेविकॉलसारख्या घट्ट चिकटलेल्या आठवणी असतील =))

In reply to by बॅटमॅन

आता तुमच्या प्रत्येक कन्नड प्रतिसादाचं मराठी भाषांतर पाह्यजे.

In reply to by सूड

खरंतर वरचं सगळं 'होउ दे खर्च'चं कनडा भाषांतर आहे.. सूड दुर्गेऽऽऽ सूड :))

In reply to by सूड

होऊदे खर्च वैग्रे वाक्यांचे कन्नड भाषांतर करायचा प्रयत्न होता तो. :)

In reply to by बॅटमॅन

म्हराया . होत्टे नोवुत्तदे . याको हिंग माडतिरा . ऑफिसदाग कंट्रोल अगान्गील्लो =)) =)) =))

In reply to by बॅटमॅन

अब्बे ओय्य यसवाय अन ब्याट्या काय लीहीता बे ? मराठी संस्थळ आहे हे कळ्ळ का ? " i will not tolrate this do u unsdestand " ;)

In reply to by पियुशा

अबे ओय.. नुस्त यसवाय न्हाई.. यसवायजी.. नोटः- आजकल पारलेको भी जी लगाते हैं.. ;)

In reply to by पियुशा

i will not tolrate this do u unsdestand
शेक्सपिअरला वेदना झाल्या की गं हे वाचून, कस्ला tol rate म्हणे =))

In reply to by बॅटमॅन

एक तर तु कायबाय लिहितोस ब्याट्या कन्नड मधुन अन माझ्या चुका काढतोस ? ;) ये ना चॉलबे ;) यसवायजी कोथाय ? कोथाय यसवायजी

In reply to by पियुशा

ओये होये.. तरी म्हटलं एवढ्या उचक्या का येउन राह्यल्या आज? ;) बोल ग पिवशे.. ब्याट्या तरास देतोय काय?

In reply to by यसवायजी

अय्यय्यो यसवायजी....हम तरास नै देता जी, पीऽचे मत पडो जी ;)

In reply to by पियुशा

अगं माझ्यासाठी मराठी अन कन्नड दोन्हीही मातृभाषाच आहेत :) बाकी र्‍हस्वदिर्घंचं बगा कि ओ जरा ;)

In reply to by बॅटमॅन

र्‍हस्वदिर्घंचं काय घिऊन बसलैसा? भावना पोचल्या न्हवं? :)

In reply to by बॅटमॅन

वडील कुठल्या भाषेत बोलतात? मराठी कन्नड 'मातृ' भाषा आहेत म्हणून विचारलं आपलं. =)) हलकं घ्या हो नाहीतर उगाच अश्व आरुढ कराल !

In reply to by प्यारे१

एक माता दोन्ही भाषा बोलू शकत नाही काय? पिजनहोल प्रिन्सिपल अप्लाय करा की प्यारेकाका. आले आपले लगेच. :)

In reply to by बॅटमॅन

अरे पण तु काय लिवतोस हे डोक्यावरुन जातया णा माझ्या त्याच काय यसवायजी आपण सुपारी घेत्लिये का तिघांनी ह्या धाग्याची शंभरी गाठूण द्यायची ;) हे बरय राव इथे मला २ वरिस झाली मिपवर एकाबी धाग्याला १०० नाही गवाले मोहितच बरय ब्वो नुसती शेन्चुरी मारत अस्तार नेहमी ( जळ्कुकडी ) पियु

In reply to by पियुशा

हा हा हा, डोके अंमळ उंच करा, सगळं स्पर्शेल ;) बाकी सुपारीबद्दल सहमत. पण तसेही आपण नव्हे, अख्ख्या मिपाकरांनीच सुपारी घेतलेली आहे असं दिसतंय =))

In reply to by बॅटमॅन

बर बर... पण माझ्या भविष्यातील येणार्या धाग्यांना तुम्ही( तु , प्यारेकाका अन यसवायजी ) किमान १० -१० प्रति नाही दीले ना तर तुम हय अन मे हय सांगुन ठेवते ;)

In reply to by पियुशा

बर बर... पण माझ्या भविष्यातील येणार्या धाग्यांना तुम्ही( तु , प्यारेकाका अन यसवायजी ) किमान १० -१० प्रति नाही दीले ना तर तुम हय अन मे हय सांगुन ठेवते
अय्या काय सांगतेस? खर्रंच ;)

In reply to by पियुशा

@ आपण सुपारी घेत्लिये का तिघांनी झाSSलं..घ्या.. सांगुन टाकलं.. आता काय करायचं आपण? दुसरा कायतर उद्योग शोधा.. तरी मी सांगत होतो.. :P तीन तीगाडा काम बिगाडा.. :P

In reply to by यसवायजी

दुसरा कायतर उद्योग शोधा..
हौ अबौट विषामृत/लंगडीपळती/चोरपोलीस/भिकारसावकार?

In reply to by सूड

चालेल. तूपण आलास तर च्यालेंज उचलेंज देखील खेळता येईल.

In reply to by बॅटमॅन

आनी णॉटेठोम पन खेलुया. भौंना सांगा.. गावातली ४ भुतं इकडं खेळतायत. :P चांडाल चौकडी :P