मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंना विनम्र अभिवादन

सचीन · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
क्रांतीज्योत महात्मा फुले ह्यांचा २८ नोव्हेंबर हा महानिर्वाण दिवस. जातीयवादाच्या चक्रात सापडलेल्या दिन दुबळ्यांचा कैवारी म्हणजे महात्मा फुले. ह्या स्वाभिमानी नेत्याने देशाच्या सामाजिक जीवनात अशी काय उलथापालथ घडवली कि त्याची दखल इतिहासाला घ्यावीच लागली.त्याग,आदर्श, साहस ह्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महात्मा फुले. समाजसेवेला आपले पूर्ण जीवन वाहून घेतलेले दाम्पत्य म्हणून फुले दाम्पत्याचे स्थान इतिहासात कायम अग्रणी राहील.तथाकथित उच्चवर्णीय समाजाकडून होणाऱ्या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून तथाकथित शूद्रातिशूद्र नि समस्त स्त्री वर्गाची मुक्तता व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे ह्या महात्म्याचे जीवितकार्य होते. केशवपन सारख्या विकृत नि अमानवी रुढीविरुद्ध हा महात्मा उभा ठाकला नि त्यांनी विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.स्त्री नि अस्पृश्य ह्यांच्या शिक्षणाविरुद्ध शब्दही काढणे हे पाप मानले जात असतानाच्या काळात त्यांनी स्त्रियांसाठी नि अस्पृश्यांसाठी शाळा काढली. सनातन्यांनी धर्म बुडाला,धर्माचा नाश झाला. असा नेहमीप्रमाणे प्रचार सुरु केला पण त्याला ज्योतीबांनी भिक घातली नाही. स्त्रियांना आणि अस्पृश्य शाळेत शिकवण्यासाठी जाणार्या सावित्रीमाई ह्यांच्यावर शिव्यांची लाखोली वाहिली गेली दगड शेणाचा मारा झाला पण हि विद्येची देवता आपल्या निर्णयापासून जराही परावृत्त झाली नाही.स्वताला होणाऱ्या त्रासापेक्षा ह्या दाम्पत्याला स्त्रिया व शुद्र ह्यांच्या जीवनात परिवर्तन होणे ते सन्मानाने जगणे महत्वाचे होते. समाजात विधवाविवाह व्हावेत स्त्रीला पुन्हा नवे जीवन सुरु करण्याची संधी मिळावी ह्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. दुष्काळात आपल्या घरचा हौद अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजासाठी खुला केला. महात्मा फुले हे केवळ बोलके सुधारक नव्हते तर कर्ते सुधारक होते. आपल्या स्वताच्या उदाहरणातून ते समाजापुढे आदर्श ठेवत.सनातन्यांनी त्यांना रोखण्यासाठी बरेच प्रयत्न केले त्यांच्यावर मारेकरीही घातले पण ज्योतिबा नावाच्या वादळापुढे धर्मांध सनातन्यांचा पाला पाचोळा हा उडून गेला. समाज सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी व व्यापक करण्यासाठी १८७३ साली त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. ‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ ह्यावर त्यांचा ठाम विश्वास होता. अश्या ह्या महामानवास व त्यांच्या पवित्र स्मृतींस विनम्र अभिवादन.

वाचने 5052 वाचनखूण प्रतिक्रिया 11

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 11/28/2013 - 21:23
लेखन समयोचित असेच आहे. काही विचारांचं आणि दृष्ट्या महापुरुषांचं पुन्हा पुन्हा स्मरण झालं पाहिजे. म.फुलेंचे कार्य सर्वस्पर्शी होती. स्त्री-शिक्षण, विधवाविवाह, बालहत्या प्रतिबंध, केशवपण, शेती सुधारणा, सार्वत्रिक शिक्षण, अंधरुढी, जातीभेद या सर्वच विषयावर त्यांनी कर्त्यासुधारकाची भूमिका पार पाडली. शंभर दिडशेवर्षानंतरही त्यांच्या कार्याचा विचार केल्यावर लक्षात येते की जर त्यांनी अशा सुधारणांचा विचार केला नसता तर.. अजून आम्ही किती मागे राहीलो असतो. असो, विनम्र अभिवादन. _/\_ -दिलीप बिरुटे

शशिकांत ओक Fri, 11/29/2013 - 08:02
महात्मा फुले यांना सामाजिक कार्य व रुढिवादी परंपरेतील गैरलागू प्रथांना बंदकरून त्याकाळातील स्त्रियां ना शिक्षणाच्या विशाल क्षितिजांवर नेण्यासाठी केलेल्या निर्धारामुळे आजच्या सामाजिक विकासाचा महाराष्ट्रात पाया रचला गेला. त्यांना अभिवादन.

ह्या निमित्ताने आमची फेसबुक वरील एक चर्चा पोस्ट : गणपती वरील महात्मा फुले यांचा अख्ंड पशु शीरी सोंड पोर मानवाचे !सोंग गनोबाचे नोन्द ग्र्ंथी !! बैसे उन्द्रावरी ठेउनीया बुड ! फुंकीतो शेंबुड सोंडेतुन !! अंत्यजासी दुर भटा लाडु देतो ! नाकाने सोलीतो कान्दे गणु !! चीखला तुडवुनी बनवीला मोरया ! केला ढंबुढेर्या भाद्रपदी !! उत्सवाचे नावे द्रव्य भोंदाडीती !वाटी खीरापती धुर्त भट !! जय मंगल मुर्ती जय मंगल्मुर्ती !गाती नीत्य कीर्ती टाळ्यासह !! गनोबाची पुजा भावीका दावीती ! हरामाच्या खाती तुप पोळ्या !! देवाजीच्या नावे जगाला पीडीती !अधोगती जाती निश्चयाने !! खरे देवभक्त देह कष्टवीती ! पोषन करीती घरच्यांचे !! आजानाशी ग्यान पांगळ्या अन्नदान ! हेच बा स्मरन नीर्मीकाचे !! स्वजातीहीता साठी बोधीले पाखांड !धर्मलन्ड खरे जोती म्हणे !! महाराष्ट्र सरकार ने छापलेल्या महात्मा फुले समग्र ग्रंथ यातुन कमेंट : This is the beauty of Hinduism , Someone writes about X religion and X ppl declare fatava against him , Someone criticizes Y religion and they kill him in the name of GOD , but when someone criticizes Hindu religion we make him "AVATAR" the incarnation of our god , when someone does blasphemy , we make him Mahatma !! असो.

In reply to by प्रसाद गोडबोले

श्रीगुरुजी Sat, 11/30/2013 - 12:46
>>> This is the beauty of Hinduism , Someone writes about X religion and X ppl declare fatava against him , Someone criticizes Y religion and they kill him in the name of GOD , but when someone criticizes Hindu religion we make him "AVATAR" the incarnation of our god , when someone does blasphemy , we make him Mahatma !! खरं लिहायचं धाडस केल्याबद्दल अभिनंदन

In reply to by श्रीगुरुजी

ग्रेटथिन्कर Sat, 11/30/2013 - 17:00
धर्माचा वापर करुन लुबाडणूक करणार्यांचा विरोध केला तर 'ब्लासफेमी'..... या YZ तत्वज्ञानालाच लाथ देणार्या सर्वांना विनम्र अभिवादन.

सचीन Sat, 11/30/2013 - 10:23
देवाने जे जग निर्माण केले त्यात मानवाने जी विकृती आणली होती त्याविरुद्ध लढणारा महात्मा म्हणजे ज्योतिबा फुले देवाने निर्माण केलेल्या जगाला सुंदर बनवण्याचा प्रयत्न करणारा महात्मा दिनदुबल्यांचे अश्रू पुसण्यासाठी झटणारा हा महात्मा आज आमची आई बहिण पत्नी जी काही शिक्षण घेत स्वताच्या पायावर उभे राहत आहेत त्यात ह्यांचे योगदान मोठे आहे