Skip to main content

गूज

लेखक अमेय६३७७ यांनी सोमवार, 25/11/2013 07:47 या दिवशी प्रकाशित केले.
शिशिराची ती असो पानगळ गदमद किंवा दाहवणारी तुझ्या संगती कळे न काही निशा नवी की ... मालवणारी दूर राहता उमजत जाते नात्याच्या विरहाची खोली मनांसारखी उधाणलेली देहांचीही असते बोली सभोवताली निसर्गलीला चराचराचे खेळ वेगळे आज पाहता नसे स्वस्थता कर्पूरासम चित्त पेटले गंध स्मृतींचा होय अनावर हसू सांडते दारी जाई भूल घालतो तशात चाफा हिवाळ्यातही चटका देई शब्दासोबत अर्थ स्मरावा सहवासाचे आठव तैसे अंगोपांगी मोहरतो मी गूज कुणा सांगावे कैसे ! -- अमेय
लेखनविषय:

वाचने 4072
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

In reply to by स्पंदना

बोरकरांची आठवण का येतेय?>> ....की मर्ढेकर ? कवितेची बांधणी मर्ढेकरांची आठवण करून देणारी आहे.. :) कविता आवडली अमेयदा.. :)

तुझ्या संगती कळे न काही निशा नवी की ... मालवणारी दूर राहता उमजत जाते नात्याच्या विरहाची खोली कर्पूरासम चित्त पेटले गंध स्मृतींचा होय अनावर हसू सांडते दारी जाई शब्दासोबत अर्थ स्मरावा सहवासाचे आठव तैसे या ओळी खूप आवडल्यात! पु.ले.शु. :)

गंध स्मृतींचा होय अनावर हसू सांडते दारी जाई भूल घालतो तशात चाफा हिवाळ्यातही चटका देई स्सही रे स्सही. -दिलीप बिरुटे

कसं जमतं राव अस लिहायला. आवडली कविता

कविता मस्तच आहे. आवडली आणि भावलीही.

>>>शब्दासोबत अर्थ स्मरावा सहवासाचे आठव तैसे अंगोपांगी मोहरतो मी गूज कुणा सांगावे कैसे ! मस्तच! नेमक्या शब्दात भावना पोचवण्याचं सामर्थ्य लाभलेल्या मोजक्या कवितांपैकी एक. मिका नंतर एक समर्थ कवी मिसळपावला लाभलेला आहे. बहोत खूब!

सुंदर कविता, अर्थ छान आणि वृत्तात बांधूनही कारागिरी वाटत नाही हे अजूनच छान!

कूल!!!! आवडलीय राव.. जाम आवडलीय... आहा!