Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विकास on गुरुवार, 11/21/2013 - 02:52
तेहेलकाचे नाव ऐकल्यावर भारतात "स्टींग ऑपरेशन" कसे प्रचलीत झाले ते लक्षात येते. बंगारू लक्ष्मण यांचे लाच घेताना काढलेल्या चित्रफिती आठवतात. तोच प्रकार इतर राजकारण्यांबरोबर देखील केला. मोदींच्या विरोधात गोध्रादंगलीवरून आवाज करणार्‍यांमधे तेहलकाच पुढे होते. त्याचे संस्थापक - प्रमुख संपादक तरूण तेजपाल हे इंडीया टूडे, आउटलूक आदी कम्युनिस्ट विचारसरणींच्या माध्यमातून वर आलेले असल्याने सगळा तेहेलका हा भाजपा, संघ आणि तत्सम (आणि कधी कधी काँग्रेसच्या) विरोधातच असणे ह्यात काहीच आश्रर्यकारक नव्हते. पण त्यासंदर्भात दाखवली गेलेली नैतिकता ही किती कचकड्याची होती हे आज तेहेलका सोडून इतर प्रसिद्धी माध्यमात आलेल्या बातम्यातून समजते. थोडक्यात खालील प्रकार घडला आहे. (संदर्भ: आउट्लूक आणि एनडीटीव्ही) स्वतःच्या मुलीच्या वयाच्या असलेल्या स्त्री पत्रकाराशी त्यांनी अशोभनीय कृती (sexual misconduct) केल्या, त्या देखील परत परत. त्या स्त्रीपत्रकाराने जेंव्हा तक्रार केली तेंव्हा तिची माफी मागितली आणि स्वतःच प्रायश्चित्त घेत आहे असे म्हणत स्वतःस संपादकपदावरून ६ महीन्यांसाठी बाजूस ठेवले आहे. वर असे देखील म्हणले आहे की त्या स्त्रीची माफी मागितल्यावर आणि हे प्रायश्चित्त घेतल्यावर ती समाधानी आहे. पण त्या स्त्रीच्या पत्रकार सहकार्‍याच्या म्हणण्यानुसार तसे काही झालेले नाही आणि ती काही निव्वळ माफीवरून समाधानी नाही... आता काही प्रश्न निर्माण होतातः
  1. जर त्या स्त्रीने व्यवस्थापनाकडे तक्रार केली असली तर लैंगिक छ्ळ केला म्हणून व्यवस्थापनाने ती केस पोलीसांकडे सुपूर्द का केली नाही?
  2. तरूण तेजपाल स्वत:च मर्यादीत प्रायश्चित्त घेऊन गप्प कसे बसू शकतात? त्या काळात देखील त्यांना पगार मिळणार आहे का नाही, हे स्पष्ट झालेले नाही.
  3. त्यांनी स्वतःचा गुन्हा मान्य केला आहे. "The last few days have been most testing, and I squarely take the blame for this. A bad lapse of judgment, an awful misreading of the situation, have led to an unfortunate incident that rails against all we believe in and fight for. I have already unconditionally apologised for my misconduct to the concerned journalist, but I feel impelled to atone further." मग त्यांना कायद्याच्या हातात सुपूर्द का केले गेलेले नाही?
  4. भारतातील राष्ट्रीय महीला समितीचे या संदर्भात काय मत आहे?
  5. तेहेलकासमर्थकांचे या संदर्भात काय मत आहे/असेल?
  • Log in or register to post comments
  • 32978 views

प्रतिक्रिया

Submitted by प्रसाद१९७१ on Fri, 11/22/2013 - 10:08

In reply to स्त्रियांचा गैरफायदा by राजेश घासकडवी

Permalink

फणीश मुर्थी च्या केस मधे पण असेच झाले आहे.

नक्की कोण कोणाचा गैरफायदा घेत होते हे फक्त तेजपाल आणि त्या मुलीला च माहीती. पहिल्या दिवशी अतिप्रसंग झाल्या वर दुसर्‍या दिवशी तेजपाल बरोबर ती एकटी असते. हा प्रकार संशयास्पद आहे. माझ्या मते हा राजीखुशी चा मामला होता. नंतर त्या मुलीच्या अपेक्षा वाढल्या आणि त्या मुलीला तेजपाल कडुन जे पाहीजे होते मिळणार नाही असे लक्षात आल्यावर ही बोंबाबोंब केली. फणीश मुर्थी च्या केस मधे पण असेच झाले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सौंदाळा on Fri, 11/22/2013 - 10:19

In reply to फणीश मुर्थी च्या केस मधे पण असेच झाले आहे. by प्रसाद१९७१

Permalink

+१

+१ माझे असे स्पष्ट मत आहे की २ महिन्यापासुन, २ वर्षापासुन बलात्कार वगैरे जे प्रकार असतात त्यात राजीखुषीचाच मामला असतो. (काही दुर्दैवी अपवाद वगळता)
  • Log in or register to post comments

Submitted by उद्दाम on Fri, 11/22/2013 - 12:35

In reply to फणीश मुर्थी च्या केस मधे पण असेच झाले आहे. by प्रसाद१९७१

Permalink

.

अगदी सहमत.
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Fri, 11/22/2013 - 12:39

In reply to फणीश मुर्थी च्या केस मधे पण असेच झाले आहे. by प्रसाद१९७१

Permalink

असे थेट निकाल लावून मोकळे होउ

असे थेट निकाल लावून मोकळे होउ नकात. दोन दिवस होते, वीस नाही. फणिश मुर्ती केस बद्दल सहमत.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Fri, 11/22/2013 - 13:24

In reply to फणीश मुर्थी च्या केस मधे पण असेच झाले आहे. by प्रसाद१९७१

Permalink

कधीकधी वर्तमानपत्रांमध्ये

कधीकधी वर्तमानपत्रांमध्ये येणारे मथळे नि त्यातल्या बातम्या हास्यास्पद म्हणाव्या इतक्या उथळ प्रकारे हाताळल्या जातात. 'लग्नाचे आमिष दाखवून ६ महिने/ दीड वर्षं/ ... बलात्कार) अमुकने तमुकला लग्नाचे आमिष दाखवून ह्या गावात, त्या लॉजमध्ये, ह्या बागेत, त्या घरी.... बलात्कार केला. नम्तर लग्नासाठी टाळाटाळ करु लागला. इ.इ.इ. हसावं का रडावं तेच कळत नाही. एक- दोन वेळा ठीक, सहा महिने??? तो पण बलात्कार? आय मीन असं करुन घेण्यात काय साध्य आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Sat, 11/23/2013 - 11:00

In reply to स्त्रियांचा गैरफायदा by राजेश घासकडवी

Permalink

पोलिसमध्ये तक्रार

जिला त्रास झालेला आहे तिने रीतसर पोलिसमध्ये तक्रार करावी आणि तिची योग्य दखल घेतली जाऊन रास्त कायदेशीर कारवाई व्हावी. थोडक्यात या केसमधे जो पर्यंत ती मुलगी पोलीसात जात नाही तो पर्यंत तेजपाल यांच्यावर कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही असे आपले (शोमा चौधरींसारखेच) म्हणणे दिसत आहे. त्यात फक्त प्रॉब्लेम असा आहे की सुप्रिम कोर्टाने घालून दिलेल्या "विशाका गाईडलाईन्स" प्रमाणे: "Where such conduct amounts to a specific offence under the Indian Penal Code or under any other law, the employer shall initiate appropriate action in accordance with law by making a complaint with the appropriate authority." थोडक्यात एम्प्लॉयरची ही जबाबदारी आहे की एखाद्या स्त्री विरोधात असे कुठलेही गैरवर्तन घडले तर भारतीय दंड विधानानुसार कारवाई करण्यासाठीची पावले उचलावीत. स्त्री वरील अत्याचार कशाकशाला धरले आहे? तर खालील प्रमाणे: For this purpose, sexual harassment includes such unwelcome sexually determined behaviour (whether directly or by implication) as: a) Physical contact and advances; b) A demand or request for sexual favours; c) Sexually coloured remarks; d) Showing pornography; e) Any other unwelcome physical, verbal or non-verbal conduct of sexual nature असो.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Sat, 11/23/2013 - 18:49

In reply to पोलिसमध्ये तक्रार by विकास

Permalink

थोडक्यात या केसमधे जो पर्यंत

थोडक्यात या केसमधे जो पर्यंत ती मुलगी पोलीसात जात नाही तो पर्यंत तेजपाल यांच्यावर कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही असे आपले (शोमा चौधरींसारखेच) म्हणणे दिसत आहे.
नाही. पोलिस हा शब्द जास्त स्पेसिफिक झाला होता. 'ऑथॉरिटीज' असा शब्द वापरायला हवा होता. त्यात ऑफिसच्या आंतर्गत चौकशीची जबाबदारी घेणाऱ्या ऑथॉरिटिजदेखील आल्या. 'स्त्रियांचा गैरफायदा घेणारांना जात, धर्म, पक्ष वगैरे काही नसतं. या विशिष्ट स्त्रीला योग्य तो न्याय मिळावा' अशी इच्छा मांडायची होती.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Fri, 11/22/2013 - 13:09

Permalink

स्टिंग ऑपरेशन करून ब्लॅकमेल

स्टिंग ऑपरेशन करून ब्लॅकमेल करणे व बदनामी करणे हा एक नवीन व्यवसाय झाला आहे. तहलका, गुलैल, कोब्रापोस्ट इ. या व्यवसायातील खेळाडू. यांची मोड्यूस ऑपरंडी म्हणजे एखादी काल्पनिक समस्या घेऊन एखाद्या नेत्याला भेटायचे व त्याची मदत मागायची. नेता भल्याबुर्‍या मार्गांनी मदत देण्याचे आश्वासन देतो. या सर्व प्रसंगाचे गुपचूप चित्रीकरण करायचे आणि ते प्रसिद्ध करून तो नेता कसा वाईट आहे हा निष्कर्ष काढायचा. यातली समस्याही काल्पनिक असते व प्रत्यक्षात नेत्याने ती समस्या सोडविण्याकरीता काहीच कृती केलेली नसते. पण जरूर पडली तर आपण कायदाबाह्य मार्गाने समस्या सोडवायला मदत करू या वाक्यावरून त्याच्यावर राळ उठवायची. प्रत्यक्षात त्याच्या हातून ही कृती घडलेलीच नसते. सर्वसाधारणपणे सगळेच पुढारी भल्याबुर्‍या मार्गाने मदत करण्याचे आश्वासन देतात. त्यात नवीन काहीच नाही. जर तशी कृती घडली असेल तर मात्र तो गुन्हा आहे. काल आम आदमी पक्षाच्या अनेक उमेदवारांविरूद्ध असेच योजनाबद्ध स्टिंग ऑपरेशन केले गेले. एका संस्थेची माणसे आआप च्या ५-६ उमेदवारांना वेगवेगळी जाऊन भेटली व आपले कुठेतरी अडकलेले १५-२० लाख रूपये सोडविण्यासाठी त्यांची मदत मागितली. निवडणुकीचा काळ असल्याने त्या उमेदवारांनी आपण सर्व तर्‍हेची मदत करू असे सांगितले. याचे गुपचूप चित्रीकरण प्रसिद्ध करून आआप चे उमेदवार कसे नालायक आहेत हे काल दिवसभर दाखवित होते. असे ऑपरेशन कोणत्याही पक्षाच्या नेत्याविरूद्ध केले तरी ते नेते अशीच आश्वासने देतील. यातून उमेदवाराची बदनामी होण्यापलिकडे काहीच होत नाही. उद्या एखाद्या तरूणाला किंवा विवाहित पुरूषाला खाजगीत विचारले की तुला कोणती नटी आवडते आणि त्याचे उत्तर गुपचूप चित्रीकरण करून असा दावा केला की हा तरूण बहकलेला आहे किंवा हा विवाहीत पुरूष बायकोशी एकनिष्ठ नाही, तर हे योग्य होईल का?
  • Log in or register to post comments

Submitted by चिरोटा on Fri, 11/22/2013 - 13:48

Permalink

हे

उद्या एखाद्या तरूणाला किंवा विवाहित पुरूषाला खाजगीत विचारले की तुला कोणती नटी आवडते आणि त्याचे उत्तर गुपचूप चित्रीकरण करून असा दावा केला की हा तरूण बहकलेला आहे किंवा हा विवाहीत पुरूष बायकोशी एकनिष्ठ नाही, तर हे योग्य होईल का?
उद्या एखाद्याने खाजगीत 'मी पंतप्रधान्,राष्ट्रपती ह्यांना ठार मारायचा कट करत आहे' असे म्हंटले तर त्यास पकडणे योग्य होईल का?
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Fri, 11/22/2013 - 17:27

In reply to हे by चिरोटा

Permalink

उद्या एखाद्याने खाजगीत 'मी

उद्या एखाद्याने खाजगीत 'मी पंतप्रधान्,राष्ट्रपती ह्यांना ठार मारायचा कट करत आहे' असे म्हंटले तर त्यास पकडणे योग्य होईल का? हो. कारण तो राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न होतो.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Fri, 11/22/2013 - 14:08

Permalink

शेवटी तरुण देखील अडकला !

शेवटी तरुण देखील अडकला ! स्टिंग ऑपरेशनचा धमाका घडवुन आणणारा स्वतः नैतिकेतेच्या कसोटीवर फसला ! बंगारु लक्ष्मण अडकले होते तेव्हा बरं झालं अशी घाण साफकरणारे देखील पत्रकार आहेत याचा कुठेतरी आनंद वाटला होता... परंतु स्वतः तरुण देखील अशा प्रकरणामधे यावा याचे जास्त वाईट वाटले. बाकी वटवाघुळ मानवा तुझ्याशी सहमत रे ! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by उद्दाम on Sat, 11/23/2013 - 09:35

In reply to शेवटी तरुण देखील अडकला ! by मदनबाण

Permalink

.

तरुणला का दोष देतोहेस मदना? ही सर्व तुझ्या मदनबाणाची करामत आहे . :)
  • Log in or register to post comments

Submitted by क्लिंटन on Sat, 11/23/2013 - 10:12

Permalink

comeuppance

बंगारू लक्ष्मणांना स्टिंग ऑपरेशनमध्ये अडकविणाऱ्या तरूण तेजपालचे पायही मातीचेच आहेत हे स्पष्ट झाले आहे.बंगारू अजिबात धुतल्या तांदळासारखे नव्हते.पण हे घ्या पैसे असे म्हणत पहिल्यांदा समोरच्या माणसापुढे जायचे आणि त्याच्या मनात थोडी चलबिचल निर्माण करायची आणि मग त्या माणसाने पैसे घेताना कॅमेऱ्याने टिपायचे हे नक्की पत्रकारितेच्या कोणत्या तत्वांमध्ये बसते?मला पैसे नकोत असे स्पष्टपणे म्हणणारा माणूस खरोखरच चारित्र्यसंपन्न हवा.बंगारू तसे नव्हते हे उघडच आहे.पण मला पैसे द्या मी तुमचे अमुकतमुक काम करतो असे पहिल्यांदा बंगारूंनी म्हटलेले नव्हते तर पैसे घेऊन तेजपाल आणि कंपनीच बंगारूंच्या मागे गेली होती आणि त्यांच्या मनात चलबिचल निर्माण केली.मोहाच्या त्या क्षणी बंगारू स्वत:वर नियंत्रण ठेऊ शकले नाहीत आणि त्यात त्यांचा घात झाला.यात बंगारूंचे समर्थन करायचा प्रश्नच नाही पण वाईट याचे वाटत होते की असे पैशाचे प्रलोभन बंगारूंना दाखविणारे मात्र नैतिकतेचे मोठे पुतळे आणि paragon of virtue ठरले आणि एकटे बंगारू तुरूंगात गेले.लाच घेणाऱ्याप्रमाणे लाच देणाराही तितकाच दोषी असतो हे न्यायाचे तत्व विसरले गेले याचे नक्कीच वाईट वाटते. गेली जवळपास १३ वर्षे हा तरूण तेजपालही असाच कधीतरी अडकावा असे अगदी मनोमन वाटत होते.पण तरूणने इतरांना त्याला अडविण्याची संधीच दिली नाही तर स्वत:च्याच कृत्याने तो आपोआप कायद्याच्या कचाट्यात सापडणार असे दिसते.इंग्रजीत ज्याला comeuppance म्हणतात तो हाच का?
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Sat, 11/23/2013 - 11:05

In reply to comeuppance by क्लिंटन

Permalink

धक्कादायक

>>यात बंगारूंचे समर्थन करायचा प्रश्नच नाही पण वाईट याचे वाटत होते की असे पैशाचे प्रलोभन बंगारूंना दाखविणारे मात्र नैतिकतेचे मोठे पुतळे आणि paragon of virtue ठरले आणि एकटे बंगारू तुरूंगात गेले.लाच घेणाऱ्याप्रमाणे लाच देणाराही तितकाच दोषी असतो हे न्यायाचे तत्व विसरले गेले याचे नक्कीच वाईट वाटते. शॉकिंग आर्ग्युमेंट. अ‍ॅण्टीकरप्शन ब्यूरो सुद्धा असाच सापळा लावून पकडत असतात. तेव्हा जो मनुष्य खुणा केलेल्या नोटा वगैरे देतो तो दोषी नसतो. त्यामुळे असे प्रलोभन दाखवून पकडणे यात गैर काहीच नाही. तेजपाल यांचे आत्ताचे कृत्य शिषापात्र आहे. पण बंगारुंना जाळ्यात पकडण्याचे कृत्य शिक्षापात्र नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by क्लिंटन on Sat, 11/23/2013 - 12:02

In reply to धक्कादायक by नितिन थत्ते

Permalink

कमाल आहे

अ‍ॅण्टीकरप्शन ब्यूरो सुद्धा असाच सापळा लावून पकडत असतात.
पोलिसही चोरांना पकडून तुरूंगात ठेवतात म्हणून उद्या याच न्यायाने कोणीही उठेल आणि कोणालाही आपल्या घरी कैद करून ठेवेल--कारण काय तर पोलिसही तसेच करतात!! बंगारूंच्या केस मध्ये अ‍ॅण्टीकरप्शन ब्यूरो मार्फत सापळा लावला गेला असता तर त्यात आ़क्षेप घेण्यासारखे काहीच नाही.किंवा अगदी रेकॉर्डिंग केले तरी ते संबंधित यंत्रणेच्या हाती देणे ही कायद्याची प्रक्रीया आहे. नाहीतर उद्या उठल्यासुटल्या कोणीही लाच देणारा म्हणेल की मी स्टिंग ऑपरेशन करत होतो!!
  • Log in or register to post comments

Submitted by उद्दाम on Sat, 11/23/2013 - 13:21

In reply to कमाल आहे by क्लिंटन

Permalink

.

लाच देणे हाही गुन्हा आहे. पण लाच देणारा घेणार्‍याला पकडून देण्यासाठी सापळा म्हणून काम करत असेल तर त्याला कायद्यातून सूट आहे. जस्ट लाइक माफीचा साक्षीदार. एकाने लाच दिली, दुसर्‍याने घेतली... तिसर्‍याने हे सिद्ध केले की हे गैरकृत्य केले गेले .. वगैरे तर दोघानाही शिक्षा होणार .. कारण इथे लाच देणारा स्वतःच्या स्वार्थासाठी लाच देतो आहे , घेणार्‍याला पकडण्यासठी नाही. सापळा पत्रकारांनी लावला तरी चालतो.. कुणीही लावला तरी चालतो. स्त्रीभ्रुण हत्या प्रकरणातही सापळे लावताना सामाजिक संस्था शुटिंग करतात .. त्यात ती 'केस' झालेली प्रेग्नंट बाई डॉक्टरला मुलगा आहे का हे पहा, असे बोलल्याचेही शुटिंग होतेच.. पण तरीही तिला शिक्षा होत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Sat, 11/23/2013 - 13:59

In reply to . by उद्दाम

Permalink

आमिष

अशा प्रकरणातील लाच ही 'लाच' नसून सावजाला सापळ्यात पकडण्यासाठी लावलेलं आमिष असतं. त्यामुळे 'लाच देण्याचा' गुन्हा इथे अप्रस्तुत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Sat, 11/23/2013 - 17:04

In reply to comeuppance by क्लिंटन

Permalink

+१

>>> पण मला पैसे द्या मी तुमचे अमुकतमुक काम करतो असे पहिल्यांदा बंगारूंनी म्हटलेले नव्हते तर पैसे घेऊन तेजपाल आणि कंपनीच बंगारूंच्या मागे गेली होती आणि त्यांच्या मनात चलबिचल निर्माण केली. एखाद्या खर्‍या प्रकरणात संबंधित अधिकारी आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी लाच मागत असेल तर तो गुन्हा आहे. बंगारूच्या केसमध्ये एक खोटे डील घेऊन तेजपाल व मंडळी त्याच्याकडे गेली होती. अंधारात सुद्धा स्पष्ट दिसेल अशा दुर्बिणी लष्कराला विकण्यासाठी बंगारूने आपल्याला मदत करावी अशी त्यांनी विनंती केली. त्याबदल्यात आपण पक्षाला १ लाख रू. देणगी देऊ असे सांगून त्यांनी पैसे दिले व त्याचे गुपचूप चित्रीकरण करून प्रसिद्ध करून त्यांनी बंगारूला आयुष्यातून उठविले. मुळात या दुर्बिणीची कथा खोटी होती. बंगारू कोणत्याही खात्याचा मंत्री नव्हता व लष्कराची खरेदी त्याच्या अधिकारात येतच नव्हती. बंगारूला अडकविण्यासाठी हे प्रकरण करण्यात आले व त्यात तो आपल्या मूर्खपणाने अडकला. लष्कराच्या अनेक खर्‍या व्यवहारात लाचखोरी घडलेली आहे (बोफोर्स तोफा, जर्मन पाणबुड्या, वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी इ.). या खर्‍याखुर्‍या व्यवहारात खरोखर लाच दिली गेली व लाचेची रक्कम प्रचंड होती. पण आजतगायत एकाही लाचखोराला शिक्षा झालेली नाही. पण बंगारूला एका अस्तित्वात नसलेल्या व्यवहारासाठी जीवनातून उठावे लागले. या प्रकरणात चित्रीकरणातील व्यवहाराशी कोणताही संबंध नसलेल्या आणि अत्यंत स्वच्छ चारित्र्य व कार्यक्षम असणार्‍या जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर देखील चिखल उडाला. बंगारूचे प्रकरण हा योगायोग नव्हता. मार्च २००१ मध्ये हे प्रकरण घडले. मे २००१ मध्ये ५ राज्यांच्या निवडणुका होत्या. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण घडविण्यात आले होते. डिसेंबर २००३ मध्ये म.प्र., छत्तीसगड, राजस्थान, दिल्ली व मिझोराम या ५ राज्यांच्या निवडणुका होत्या. त्यावेळी डिसेंबर २००३ च्या पहिल्या आठवड्यात छत्तीसगडमधील भाजपच्या दिलीपसिंह जुदेवला अशाच एका काल्पनिक व्यवहाराच्या बोलण्याचे चित्रीकरण करून आयुष्यातुन उठविले गेले. तहलका सारख्यांनी पत्रकारितेत एक नवीन घृणास्पद प्रकार आणलेला आहे. एखादी काल्पनिक समस्या घेऊन एखाद्या नेत्याकडे जायचे व त्याला बोलण्यात गुंतवून व त्याचे गुपचूप चित्रीकरण करून त्याला आयुष्यातून उठवायचे हा यांचा किळसवाणा धंदा आहे. यांना जर खरोखरच भ्रष्टाचार्‍यांचा पर्दाफाश करायचा होता तर त्यांनी कलमाडी, लालू, राजा अशा खराखुरा भ्रष्टाचार करून देशाला बुडविलेल्यांचे अनेकांचे स्टिंग ऑपरेशन करून एक नवा आदर्श निर्माण केला असता. पण त्याऐवजी त्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसविरोधी पक्षाच्या नेत्यांना आयुष्यातून उठविणे हा नवा किळसवाणा धंदा सुरू केला. फारच क्वचित तहलकावाल्यांनी काँग्रेसच्या नेत्यांचे स्टिंग ऑपरेशन केलेले आहे. प्रत्यक्षात सर्वाधिक भ्रष्टाचारी काँग्रेसमध्येच आहेत. पण काँग्रेस व तहलकावाल्यांचे साटेलोटे असल्याने विरोधी पक्षांना अडकविण्यातच हे मग्न असतात. तरूण तेजपाल बलात्काराच्या प्रकरणात अडचणीत आला हे योग्यच झाले. अनेकांना काल्पनिक व्यवहाराचे निमित्त करून आयुष्यातून उठविणार्‍यांना शिक्षा व्हायलाच हवी.
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Sat, 11/23/2013 - 17:39

In reply to +१ by श्रीगुरुजी

Permalink

१. स्टिंग ऑपरेशन करणारे तहलका

१. स्टिंग ऑपरेशन करणारे तहलका एकमेव नाहीत. २. बंगारूंना नंतर रीतसर शिक्षा वगैरे झाली आहे. टीपः तेजपालची आत्ताची कृती शिक्षापात्र आहे त्याला शिक्षा व्हायला हवी.
  • Log in or register to post comments

Submitted by क्लिंटन on Sat, 11/23/2013 - 19:44

In reply to +१ by श्रीगुरुजी

Permalink

प्रतिसाद

हा प्रतिसाद गोव्यातील प्रसंगाशी संबंधित नसला तरी ’पत्रकारीतेतील नैतिकता’ या शीर्षकातील भागाशी संबंधित आहे. समजा अबक हा मनुष्य एखाद्या ठिकाणी कामाच्या निमित्ताने गेला आहे.त्या ठिकाणच्या अधिकाऱ्याने त्याच्याकडे ते काम करण्यासाठी लाच मागितली. ’मला अमुक इतकी रक्कम लाच म्हणून द्या’ असे तो अधिकारी म्हणत असताना कॅमेऱ्यात पकडले असते आणि नंतर लाचलुचपतविरोधी विभागाकरवी सापळा लावून त्या अधिकाऱ्याला धरले असते तर त्यात काहीच तक्रार करण्यासारखे नाही. या केसमध्ये तसे झालेले नाही.तेहलकाच्या लोकांनी लाचलुचपतविरोधी खात्याला अंधारात ठेऊन बंगारूंना पैसे दिले होते.आता जर कोणी म्हटले की तेहलकावालेही पहिल्यांदा या लाचखोरीत willful participants होते पण नंतर बंगारूंबरोबर काहीतरी बिनसले म्हणून त्यांनी कॅसेट जगजाहिर केली--तेव्हा बंगारू दोषी आहेतच पण त्याचबरोबर तेहलकावालेही लाच देणारे म्हणून तितकेच दोषी आहेत तर त्यात नक्की काय चुकले? स्टींग ऑपरेशन वगैरे सगळे ठिक आहे.पण जेव्हा तपासयंत्रणांना सामील न करता परस्पर पैसे दिले जातात तेव्हा ते स्टींग ऑपरेशन नाही तर कोणत्याही लाचखोरीच्या प्रकारांप्रमाणे गुन्हा आहे.नाहीतर उद्या कोणीही लाच देणारा अंगाशी आल्यावर "मी स्टींग ऑपरेशन करत होतो" असा बचाव करू शकेल.स्टींग ऑपरेशन जर का काही असेल तर--बंगारू मला पैसे द्या असे म्हणत असताना कॅमेऱ्यात पकडणे आणि तिथेच थांबणे आणि मग तपासयंत्रणांकरवी पुढची कारवाई करणे! एकूणच तेहलकाने कोणालातरी अडकवून स्वत:ला फुकटची प्रसिध्दी मिळवायचा घाणेरडा प्रकार केला तो मला तरी भयंकर चीड आणणारा होता.दुसऱ्यासाठी खड्डा खणायला जाणारे स्वत:साठीही नकळत त्यापेक्षा मोठा खड्डा खणत असतात आणि कधीनाकधी ते त्याच खड्ड्यात पडतात.तरूण तेजपाल त्या खड्ड्यात शेवटी पडलाच. एक गोष्ट नक्कीच आहे. या प्रकारामुळे मिडियातील सेक्युलर/डावे विचारवंत(?) अडचणीत आले आहेत त्यांची स्वत:ची बाजू सावरतानाची धांदल बघून मला तरी असुरी आनंदच होत होता.काल विनोद मेहता म्हणत होते--अजून तरूण तेजपालांवरील आरोप सिध्द झालेले नाहीत तेव्हा कायद्याला त्याचे काम करू द्या,आपण इथे ज्युरी नाहीत, आपल्याला कोण दोषी किंवा कोण निर्दोष हे सिध्द करायचा अधिकार नाही वगैरे वगैरे.पण मग अशाच लोकांच्या मागणीवरून सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या एस.आय.टी च्या अहवालाला फाट्यावर मारत स्वत: ज्युरीच नव्हे तर न्यायाधीश बनून नरेंद्र मोदींना दोषी ठरविताना ही न्यायबुध्दी कुठे जाते?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Sat, 11/23/2013 - 15:15

Permalink

कलाटणी....

तरूण तेजपाल ह्यांनी आरोप फेटाळला आहे. ते म्हणताहेत, ' ती मुलगी खोटं बोलत आहे.' त्यांच्या मते हा 'राजीखुशीचा' मामला होता. गोव्याच्या हॉटेलच्या CCTVचे फुटेज तपासण्याची त्यांनी पोलीसांना विनंती केली आहे. त्यांच्या जागी आलेली नविन संपादक शोमा ही सुद्धा म्हणते आहे की मिडियाकडे असलेल्या बातम्या चुकीच्या आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Sat, 11/23/2013 - 19:37

Permalink

मामा-भांजा आणि काँग्रेसी कनेक्शन

आत्ताच वाचल्याप्रमाणे, तरूण तेजपाल हे कपील सिब्बल यांचे सक्खे भाचे आहेत. हे जर खरे असले तर काँग्रेस अजून ही, "हात रे, चावट कुठला..." स्टाईलमधे का विरोध करत आहे आणि तेहेलकाची स्टींग ऑपरेशन्स सिलेक्टीव्हा का असतात ते समजते.
  • Log in or register to post comments

Submitted by क्लिंटन on Sat, 11/23/2013 - 20:20

In reply to मामा-भांजा आणि काँग्रेसी कनेक्शन by विकास

Permalink

धक्कादायक

तरूण तेजपाल हे कपील सिब्बल यांचे सक्खे भाचे आहेत.
ही माहिती नवीनच कळली.बातमीचा दुवा मिळू शकेल का?बातमी खरी असल्यास हा प्रकार खरोखरच अत्यंत धक्कादायक आहे. मध्यंतरी ई-मेलमध्ये फॉरवर्ड आला होता. मिडियावाले राजकारण्यांशी कसे संबंधित आहेत याबद्दल त्यात माहिती होती.ही माहिती खरी आहे का की नाही माहित नाही.यावर कोणी प्रकाश टाकू शकेल का? १. हिंदुस्थान टाईम्सच्या संपादक शोभना भारतीय कॉंग्रेसच्या राज्यसभा सदस्य आहेत. २. एन.डी.टी.व्ही चे प्रणॉय रॉय हे कम्युनिस्ट नेते प्रकाश करातचे साडू आहेत. प्रणॉयची पत्नी राधिका आणि प्रकाश करातची पत्नी आणि कम्युनिस्ट नेत्या वृंदा करात या सख्ख्या बहिणी आहेत. ३. एन.डी.टी.व्ही च्या सोनिया सिंग या कॉंग्रेस नेते आणि केंद्रिय मंत्री आर.पी.एन. सिंग यांच्या पत्नी आहेत. ४. सी.एन.एन आय.बी.एन च्या सागरिका घोष यांचे वडिल भास्कर घोष हे इंदिरा-राजीव गांधींच्या मर्जीतले नोकरशहा होते.इंदिरांना "committed bureaucracy" आणि "committed judiciary" पण हवी होती म्हणजे इंदिरांच्या मर्जीतले असणे याचा अर्थ लक्षात येईलच. ५. १९६२ च्या चीन युध्दात अकार्यक्षमतेबद्द्ल बदनाम झालेले जनरल थापर म्हणजे जवाहरलाल नेहरूंच्या बहिण विजयालक्ष्मी पंडित यांचे मेहुणे होते.करण थापर म्हणजे या जनरल थापरचे पुत्र! मार्क्सवादी विचारवंत (?) आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील नामवंत (?) इतिहास संशोधक रोमिला थापर म्हणजे याच जनरल थापरची बहिण!! ६. द हिंदू चे एन.राम एकेकाळी कम्युनिस्टांची विद्यार्थी संघटना Students Federation of India चे अध्यक्ष होते. ७. द हिंदू चे पी.साईनाथ हे माजी राष्ट्रपती व्ही.व्ही.गिरी यांचे नातू आहेत. व्ही.व्ही.गिरी हे इंदिरा गांधींच्या ’मर्जीतले’ होते (आठवा १९६९ ची राष्ट्रपती निवडणुक) ८. न्यूज २४ हा कॉंग्रेस नेते राजीव शुक्ला यांचा न्यूज चॅनेल आहे. ९. लोकमत हे कॉंग्रेस नेते विजय दर्डा आणि राजेंद्र दर्डांच्या मालकीचे वर्तमानपत्र. आय.बी.एन लोकमत हे त्याच ग्रुपचा न्यूज चॅनेल!! मिडियावाले Pro- डावे आणि Pro-कॉंग्रेस का असतात हे यावरून समजतेच.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Sat, 11/23/2013 - 21:01

In reply to धक्कादायक by क्लिंटन

Permalink

संदर्भ

बातमीचा दुवा मिळू शकेल का? हे मी आधी ट्वीटरवर वाचले पण तो संदर्भ योग्य वाटला नाही, मग मला आउटलू़कमधील एका कॉमेंटमधे दिसले आणि इतर अनेक ठिकाणी देखील दिसले- अर्थात प्रस्थापित माध्यमे सोडून... पण नंतर कालचा बरखा दत्तचा कार्यक्रम (आत्ता) पहाताना तिने देखील एकदा तेहेलका आणि काँग्रेसचे कनकेशन असा ओझरता उल्लेख केला (मला शोधावा लागेल), त्यामुळे यातील तथ्य मला अधिक जाणवले आणि हे नाते खरे असेल असे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Sat, 11/23/2013 - 20:29

In reply to मामा-भांजा आणि काँग्रेसी कनेक्शन by विकास

Permalink

आदर्श नि वास्तव!

आदर्श नि वास्तव! अहो पण ह्याचा अर्थ असा कुठं होतो की मामा नि भाच्याचं पटायला हवं म्हणून. नातलग असणं हा निकष असू शकत नाही. नये. चांगल्यासाठी ही नाही नि वाईटासाठी देखील नाही. विजयाराजे शिंदे नि माधवराव शिंदे आई मुलगा असून विरोधक होते. अभयसिंहराजे भोसले नि उदयनराजे सक्खे चुलता पुतणे अनेक वर्षं विरोधक होते. नातेवाईक आहे/नाही म्हणून वाईटपणा नि नाही/आहे म्हणून चांगुलपणा असं समीकरण मांडलं जाऊ नये म्हणून मत मांडलं ....
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Sat, 11/23/2013 - 20:50

In reply to आदर्श नि वास्तव! by प्यारे१

Permalink

दोन मुद्दे आहेत...

भारतीयांमधे काँग्रेस आणि डावे यांनी विशेष करून गांधीहत्येनंतर कायम त्या संदर्भात अथवा इतर कोणत्याही संदर्भात एक सातत्याने अक्षम्य प्रकार केला आहे: Guilt by association. आता त्यांच्याच तत्वाने आणि त्याच न्यायाने हे नाते देखील असाच गुन्हा ठरू शकतो का हा एक तात्विक प्रश्न आहे. दुसरा भाग म्हणजे, कपील सिबल हे कायदा मंत्री आणि त्याहूनही अधिक प्रस्थापित केंद्र सरकारातील एक महत्वाची व्यक्ती आहे. त्यामुळे जर केंद्रसरकारला यात कायद्याने पडावे लागणार असेल तर मग सिबल यांचा "conflict of interest" किती असू शकेल?
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sat, 11/23/2013 - 21:29

In reply to दोन मुद्दे आहेत... by विकास

Permalink

पक्षीय राजकारण, नैतिकता आणि conflict of interest

यासाठी थोडे अवांतर लिहिते. नुकताच गोव्यात ड्रग्ज विकणार्‍या आणि भारतात अनधिकृतरीत्या रहाणार्‍या नायजेरियन्सनी पोलिसांना मारहाण करून धिंगाणा घातला. आधीच्या ९ वर्षाच्या काँग्रेस राजवटीत याना अभय मिळाले होते. एका माजी मुख्यमंत्र्याचे आणि त्याच्या सुपुत्राचे नाव ड्रग्ज विकण्याच्या आणि एका साखळी खूनमालिकेत उघड घेण्यात येते. या प्रकरणानंतर नायजेरियन्स कडून तिथे रहाणार्‍या भारतीय लोकांचे काही झाले तर आम्ही जबाबदार नाही अशी वक्तव्ये आली. या प्रकरणात भारतीय केंद्रीय सरकारने नायजेरियन सरकार्/प्रतिनिधींना योग्य माहिती पुरवण्याची जबाबदारी पुरी न करता उलट पर्रीकर सरकारला धारेवर धरले होते. या प्रकरणात भारतीय सरकार हे भारतीय सरकार असल्यासारखे वागले नाही, तर काँग्रेसचे सरकार असल्यासारखे वागले. शिवाय नायजेरियात रहाणार्‍या भारतीयांना धोका निर्माण झाला ते वेगळेच. आम्हाला तर भीती वाटत होती की आंतरराष्ट्रीय संबंध बिघडल्याचे निमित्त करून पर्रीकर सरकार बरखास्त केले जाईल की काय. पण तरुण तेजपालला गोव्यात येऊन काय बुद्धी सुचली देवजाणे, त्यामुळे पर्रीकरांना या सगळ्या मंडळींना चिमटीत धरायला उत्तम निमित्त मिळाले आहे. तेजपाल केसचे काय होईल ते पाहूच. सध्या तरी त्याच्यावर बलात्काराचा आरोप लावला आहे. त्याला काही दिवस तुरुंगात काढावे लागले तर त्या पीडित मुलीला काही प्रमाणात न्याय मिळेल. आणखी किती मुलींनी असले प्रसंग एवढ्या वर्षात लपवून ठेवले असतील तेही नकळे. कारण, समजुतीचा घोटाळा असे हा माणूस म्हणतो तेव्हा यापूर्वी असे प्रसंग रेग्युलर घडत असावेत असा अंदाज करायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Tue, 11/26/2013 - 12:44

In reply to मामा-भांजा आणि काँग्रेसी कनेक्शन by विकास

Permalink

>>>> आत्ताच वाचल्याप्रमाणे,

>>>> आत्ताच वाचल्याप्रमाणे, तरूण तेजपाल हे कपील सिब्बल यांचे सक्खे भाचे आहेत. हे जर खरे असले तर काँग्रेस अजून ही, "हात रे, चावट कुठला..." स्टाईलमधे का विरोध करत आहे आणि तेहेलकाची स्टींग ऑपरेशन्स सिलेक्टीव्हा का असतात ते समजते. २-३ दिवसांपूर्वीच वाचले की सिब्बलने तहलकात आपले पैसे गुंतविल्याचा इन्कार केला आहे. तहलका ही भ्रष्टाचार बाहेर काढणारी शोध-पत्रकारिता संस्था असल्याने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण तहलकाला देणगी दिलेली आहे. त्या देणगीला गुंतवणूक समजू नये असेही त्याने सांगितले. आता लक्षात आलं की तहलका कलमाडी, लालू, पवार इ. सोडून फक्त भाजप नेत्यांनाच का सापळ्यात पकडत आहे ते.
  • Log in or register to post comments

Submitted by हुप्प्या on Sun, 11/24/2013 - 00:03

Permalink

ऐकीव माहिती

अशी माहिती ऐकून आहे की मुरब्बी भ्रष्टाचारी जे हजारो की लाखो कोटी रुपयांचे घोटाळे पचवतात ते ह्या बाबतीत चांगले पोचलेले असतात. बंगारु लक्ष्मण हा एक लाख रुपयासारख्या अगदी किरकोळ रकमेकरता पकडला गेला. कदाचित त्यामुळे ह्याहून कित्येक पट जास्त रकमांची अनधिकृत उलाढाल करणारे जास्त सावध होऊन असे लोक पकडले जाण्याची शक्यता अजून कमी झाली आहे. थोडक्यात गळाला अगदी किरकोळ मासा लागला आणि मोठे मासे सावध झाले आहेत. कदाचित हाच उद्देश असावा.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Mon, 11/25/2013 - 09:49

Permalink

आमचे आवडते वाक्य .....

हे सगळे वाचले. आमचे आवडते वाक्य इथे देतो. काँग्रेस हा भाजपाचा राजकीय गुरू आहे. हळू हळू काँगीचा बेरकीपणा, भ्रस्टाचार हे धडे तो पक्ष शिकत आहे.सत्ता हातात असल्याने वा नसल्याने दोघात काही फरक असेल तेवढाच !
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 11/26/2013 - 14:37

Permalink

तरी म्हटलं

http://indiatoday.intoday.in/story/tarun-tejpal-sexual-assault-case-bjp-manohar-parrikar-tehelka-shoma-chaudhury/1/326512.html अजून याच्या मागे भाजपाचे राजकारण असल्याचा आरोप कसा झाला नाही!
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Tue, 11/26/2013 - 18:07

Permalink

नक्की काय घडले

पत्रकार तरूणीने जे काही सर्वप्रथम शोमा चौधरींना लिहीले होते त्यात अत्यंत विस्तॄत लिहीलेले आहे. (काही वेळेस ज्याला ग्राफिक म्हणतात तसे).
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Tue, 12/03/2013 - 14:37

In reply to नक्की काय घडले by विकास

Permalink

त्या तरुणीचे बदलेले आरोप आणि तरुण तेजपालची बॉडी लँग्वेज पाहून

मला ही नक्की काय निवाडा होईल याविषयी शाश्वती नव्हती. कारण गुन्हा IPC सेक्शन्स 376 (rape), 376 (2)(K) (rape by a person of a woman in his custody taking advantage of his official position) and 354 (outraging modesty) खाली दाखल झाला आहे. लिफ्टमधे विनयभंग होऊ शकेल पण इतक्या कमी वेळात रेप कसा होऊ शकेल असा प्रश्न होता. त्यामुळे सेक्शन 376 एस्टॅब्लिश करणं अवघड होतं. रेप परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित आहे तर विनयभंग स्त्रीच्या व्यक्तिगत निकषांवर आधारित आहे. टू बी स्पेसिफिक, विनयभंगाचा फोकस (Section 354) स्त्रीला लज्जा उत्पन्न होईल अश्या वर्तनावर आहे. लिफ्टमधे कॅमेरा नसल्यानं घडलेल्या घटनेनं तरुणीला लज्जा उप्तन्न झाली की नाही हा खरा प्रश्न होता. पण वर दिलेल्या लिंकवरुन आणि घटनाक्रमावरुन Section 354 निर्विवादपणे शाबित होईल. त्यात तरुणच्या मुलीचं वाक्य "I told him to keep it in his pants.” अत्यंत भेदक आहे. तरुण तेजपाल नि:संशयपणे दोषी ठरेल. समाजाच्या अत्यंत प्रतिष्ठीत आणि कमालीच्या इलाइट क्लासमधे काय चालतं याचं विदारक चित्र यानिमित्तानं सर्वांसमोर आलं आहे. या लिंकबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by सुमीत भातखंडे on Wed, 11/27/2013 - 14:54

Permalink

बापरे...

खरोखरी भयंकर वर्णन केलाय प्रसंग. Tiya replied saying, “I saw him do this to a woman when I was thirteen, so it doesn’t surprise me anymore,” हे त्याची स्वतःची मुलगी म्हणत्ये. आता काय बोलणार.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Mon, 12/02/2013 - 11:05

Permalink

तेहेलका आणि नैतिकता

राजू नायक (संपादक, लोकमत, गोवा) यांच्या शब्दात
तरुण तेजपाल यांचा मुखवटा जरी आपल्या एका पत्रकार सहकार्‍याच्या लैंगिक छळामुळे गळून पडलेला असला, तरी तहलकाचा उपक्रम असलेल्या ज्या विचार महोत्सवात हा प्रकार घडला, तेथील तेजपाल यांचे वर्तन तेथे उपस्थित असणार्‍यांना नेहमीच खटकले आहे.
तेजपाल या महोत्सवात 'किंग मोमो'च्याच अवतारात असायचे. व्यासपीठावर लोकांनी त्यांना जवळजवळ झिंगत नेहमी उद्धटपणे वावरताना पाहिलेय. ते तयारी न करता येत आणि उद्धटपणे प्रश्नोत्तरे करत. तीन वर्षांपूर्वी त्यांनी गोव्याचे वर्णन करताना 'दारू प्या आणि कोणाबरोबरही झोपा', असे केले होते. त्यामुळे महिला संघटनांनी प्रचंड गहजब माजविला होता; परंतु तेजपाल यांच्या वर्तनात, तुच्छतापूर्ण उद्गारांमध्ये व फाजिल आत्मविश्‍वासात या वेळीही फरक पडलेला दिसला नाही. त्यांनी या वेळी अमिताभ बच्चन यांचीही व्यासपीठावर टर उडविण्याचा प्रयत्न केला. 'राजेश खन्ना यांना तुम्ही संपवले', असे म्हटले. अमिताभ शांतपणे त्यांना उत्तर देत होते, तर तेजपाल आपल्याच उद्धटशाहीने त्यांना सतत पाडत होते. शेवटी लोकही संतापले. त्यांनी तेजपालांची हुर्यो उडविली. हाच फाजिल आत्मविश्‍वास आपल्याच मुलीच्या वयाच्या असलेल्या तरुण सहकार्‍याचा भक्ष्य म्हणून वापर करण्यात झाला. मद्याच्या नशेत चूर तेजपाल सतत दोन दिवस विरोध असतानाही तिला लिफ्टमध्ये खेचत होते. तिच्यावर जबरदस्ती करीत होते. या घटनेने तेजपाल यांच्यासारखे कॉर्पोरेट पत्रकारितेने 'यशस्वी' बनविलेले पत्रकार (गोव्यात आसगाव येथे करोडो रुपयांचा बंगलाही त्यांनी खरेदी केला आहे.) बंद भिंतीपलीकडे कसे वर्तन करतात व या विश्‍वात काय चालत असेल आणि शोषण कोणत्या थराला गेले असेल, त्याचा हा जगाने पाहिलेला पुसटसा चेहरा आहे.
या लेखात ते पुढे म्हणतात की
यावर्षी या थिंकफेस्टला म्हणे एक कोटी रुपयी फायदा झाला. तो कसा? तर काही वर्षांपूर्वी तेहेलकाने गोव्यातल्या खाण उद्योगाचा बुरखा फाडणारी एक फिल्म बनवली होती. मात्र ती लोकांपर्यंत पोचली नाही तर गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि खाणमालक यांना दाखवण्यात आली. (ते मुख्यमत्रीच खाणींचे खाते सांभाळत होते.) त्यांनी आणि काही खाणमालकांनी त्यांनंतर या थिंकफेस्टला सर्व मदत पुरवायला सुरुवात केली!!
याला पत्रकारिता म्हणावे की बुरख्याआड ब्लॅकमेलिंग? आज तेजपाल तुरुंगात आहे. त्याच्या केसचा तपास सुनीता सावंत या कर्तव्यकठोर आणि अनुभवी पोलीस अधिकारी करत आहेत. निदान यावेळी तरी न्याय व्हावा अशी अपेक्षा.
  • Log in or register to post comments

Submitted by क्लिंटन on Mon, 12/02/2013 - 11:47

In reply to तेहेलका आणि नैतिकता by पैसा

Permalink

हीच शोध पत्रकारिता

याला पत्रकारिता म्हणावे की बुरख्याआड ब्लॅकमेलिंग?
अहो यालाच 'शोध पत्रकारिता' म्हणतात!!आणि त्याचे इथले आणि इतर ठिकाणचे 'विचारवंत' समर्थनही करतात.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Mon, 12/02/2013 - 20:16

In reply to तेहेलका आणि नैतिकता by पैसा

Permalink

खंडणीखोर

तेहेलकाची पत्रकारीता ही खंडणीखोरांची पत्रकारीता आहेच पण त्याच बरोबर त्याचा राजकारणासाठी वापर करणारे देखील तितकेच आहेत... म्हणूनच असली पत्रकारीता आणि तेजपालसारखे पत्रकार ह्यांचे बोलविते धनी वेगळेच असतात. कपील सिब्बल यांनी पाच लाख दिल्याचे सांगितले आहेच (पण ते मामा-भाचे आहेत याला नकार दिला आहे. अर्थात त्यांनी मला केवळ एकच सख्खी बहीण आहे असे म्हणले आहे...जे उत्तर अंमळ नरोवा कुंजरोवा स्टाईल आहे!). तॄणमूलचे खासदार के.डी.सिंग, राम जेठमलानी, भावाशी बंदूकीच्या मारामारीत (भावाबरोबर) प्राण गमावलेला वादग्रस्त उद्योगपती (?) पाँटी छड्डा यांच्याशी देखील तेजपाल यांचे साटेलोटे होते. या छ्ड्डांबरोबर त्यांना प्रूफ्रॉक नामक, "vibrant cultural space, where a highly accomplished, eclectic community of select urban Indians can meet and engage in an atmosphere of great intimacy with eminent people who make and shape the world" क्लब काढायचा होता. असो.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com