तेहेलकाचे नाव ऐकल्यावर भारतात "स्टींग ऑपरेशन" कसे प्रचलीत झाले ते लक्षात येते. बंगारू लक्ष्मण यांचे लाच घेताना काढलेल्या चित्रफिती आठवतात. तोच प्रकार इतर राजकारण्यांबरोबर देखील केला. मोदींच्या विरोधात गोध्रादंगलीवरून आवाज करणार्यांमधे तेहलकाच पुढे होते. त्याचे संस्थापक - प्रमुख संपादक तरूण तेजपाल हे इंडीया टूडे, आउटलूक आदी कम्युनिस्ट विचारसरणींच्या माध्यमातून वर आलेले असल्याने सगळा तेहेलका हा भाजपा, संघ आणि तत्सम (आणि कधी कधी काँग्रेसच्या) विरोधातच असणे ह्यात काहीच आश्रर्यकारक नव्हते. पण त्यासंदर्भात दाखवली गेलेली नैतिकता ही किती कचकड्याची होती हे आज तेहेलका सोडून इतर प्रसिद्धी माध्यमात आलेल्या बातम्यातून समजते. थोडक्यात खालील प्रकार घडला आहे. (संदर्भ: आउट्लूक आणि एनडीटीव्ही)
स्वतःच्या मुलीच्या वयाच्या असलेल्या स्त्री पत्रकाराशी त्यांनी अशोभनीय कृती (sexual misconduct) केल्या, त्या देखील परत परत. त्या स्त्रीपत्रकाराने जेंव्हा तक्रार केली तेंव्हा तिची माफी मागितली आणि स्वतःच प्रायश्चित्त घेत आहे असे म्हणत स्वतःस संपादकपदावरून ६ महीन्यांसाठी बाजूस ठेवले आहे. वर असे देखील म्हणले आहे की त्या स्त्रीची माफी मागितल्यावर आणि हे प्रायश्चित्त घेतल्यावर ती समाधानी आहे. पण त्या स्त्रीच्या पत्रकार सहकार्याच्या म्हणण्यानुसार तसे काही झालेले नाही आणि ती काही निव्वळ माफीवरून समाधानी नाही...
आता काही प्रश्न निर्माण होतातः
- जर त्या स्त्रीने व्यवस्थापनाकडे तक्रार केली असली तर लैंगिक छ्ळ केला म्हणून व्यवस्थापनाने ती केस पोलीसांकडे सुपूर्द का केली नाही?
- तरूण तेजपाल स्वत:च मर्यादीत प्रायश्चित्त घेऊन गप्प कसे बसू शकतात? त्या काळात देखील त्यांना पगार मिळणार आहे का नाही, हे स्पष्ट झालेले नाही.
- त्यांनी स्वतःचा गुन्हा मान्य केला आहे. "The last few days have been most testing, and I squarely take the blame for this. A bad lapse of judgment, an awful misreading of the situation, have led to an unfortunate incident that rails against all we believe in and fight for. I have already unconditionally apologised for my misconduct to the concerned journalist, but I feel impelled to atone further." मग त्यांना कायद्याच्या हातात सुपूर्द का केले गेलेले नाही?
- भारतातील राष्ट्रीय महीला समितीचे या संदर्भात काय मत आहे?
- तेहेलकासमर्थकांचे या संदर्भात काय मत आहे/असेल?
प्रतिक्रिया
या संदर्भात "डिसलोजर" हा मायकल डग्लस आणि डेमी मूरचा चित्रपट पहा. (त्याचे भ्रष्ट हिंदीकरण असलेला अक्षय कुमारचा चित्रपट नाही!).
डिसलोजर पाहिला आहे, अत्यंत सुंदर चित्रपट आणि दोघांचा अभिनय देखील फार आवडला होता आणि कथा देखील ! अक्षय कुमारचा चित्रपट देखील पाहिला होता आणि अत्यंत टुकार वाटला होता !
अवांतर :- मायकल डग्लस म्हणजे तोच Basic Instinct वाला ना ? ;) या चित्रपटात मायकल डग्लस आणि शॅरन स्टोन यांचा क्लब मधला एक सेंश्युल डान्स आहे,हा डान्स तर भन्नाट आहेच पण त्यातले क्लब म्युझिक अप्रतिम आहे. या संगीताने एक वेगळेच घर माझ्या मनात घर कायमचे केले आहे. त्या क्लब म्युझिकचा संपूर्ण ट्रॅक इथे ऐकता येईल :-
Blue by LaTour
वैयक्तिक शेर्यांची सुरुवात कोणी केली?
हे तुम्हाला लक्षात तरी येत नाहीये किंवा लक्षात आणून तरी घ्यायचं नाहीये असं दिसतंय.असो. झोपलेल्याला जागे करता येते. झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करता येत नाही. एकदा डोळ्यावर विपळा चष्मा चढवला की सगळे जग पिवळे दिसू लागते एवढेच बोलून मी या धाग्यावरून रजा घेते.
हॅ हॅ हॅ. चालूद्या. पुढे जै हिंद लावायला विसरलात, असो.
ब्यॅट्याच्या ब्यॅटींगला टाळ्या.
या 'अरे राजा' प्रकरणाला कॉर्पोरेट भाषेत 'कन्वर्जन ऑपोरचुनीटी' म्हणतात.
जर ती स्त्री आणि बॉस दोघं अविवाहित असतील तर 'कन्वर्जन ऑपोरचुनीटी' बाद ठरते.
बाकीच्या स्थितीमध्ये (म्हणजे दोघं किंवा कोणी एक विवाहित असल्यास) जर बॉस किंवा ती स्त्री ही 'अरे राजा' वाली ऑपोरचुनीटी व्यवस्थित कन्वर्ट करू शकली/शकला तर ते 'बेब' किंवा 'माचो' ठरतात आणि जर नाही करू शकले तर मग ती 'बीच' आणि तो 'ठरकी'
बहुत धन्यवाद मालोजीराव! एवढे सगळे फिक्स्ड आहे म्हणजे हे सगळे प्रकार कॉर्पोरेट जगात अगदी नॉर्मल दिसताहेत. आम्ही कोणत्या जमान्यात वावरतोय देवच जाणे!
नेमके हो मालोजीराव!!!
माझ्या राजा वाल्या बाईचा उद्देश 'माझा फायदा घे' असा असू शकतो. त्यात फक्त पुरुषाला दोष द्यायचे कारण नाही. शिवाय पुरुशानेही लगेच तिला जवळ करायची गरज नाही. इथे लिंगसापेक्ष न्याय लावून चालणार नाही, व्यक्तीसापेक्ष लावावा लागेल. कोणीही असो, पुरुष किंवा स्त्री व्यभिचार करायचा का नाही हा तिचा प्रश्न आहे कोणीही कितीही प्रोव्होक केले तरी !
माझ्या राजा वाल्या बाईचा उद्देश 'माझा फायदा घे' असा असू शकतो. त्यात फक्त पुरुषाला दोष द्यायचे कारण नाही. शिवाय पुरुशानेही लगेच तिला जवळ करायची गरज नाही.नेमके!!! पुरुषाने तिचा फायदा घेऊ नये (साला, काय वाक्यरचना आहे. बाई स्वतःहून आमंत्रण देतेय तरी पुरुषच फायदा घेणार काय. औघडे.) पण घेतला तर अशा परिस्थितीत बाईनेही ओरडू नये.
ही नंतरची चर्चा आज वाचली.
बरेच लिहून झाले आहे. फक्त एकच पॉइंट आउट करायचे होते (कोणा एका बाजूने असे नाही, इन जन्रल)
अ. बाईने आमंत्रण दिले की नाही माहिती नाही (बाईची कोणती कृती कोणाला आमंत्रण वाटेल याचा ठोस नियमही नाही - काही थंब रूल आहेत हे मान्य पण ते सार्वत्रिक नसावेत). त्या पुरूषाला तीची कृती आमंत्रण आहे असे वाटले
ब. आमंत्रण म्हणजे प्रत्येकवेळी प्रत्येक गोष्टिची परवानगी नव्हे! जोपर्यंत दोघांमधील संबंध (मानसीक/शारीरीक वगैरे कसेही) एकमेकांच्या संमती परवानगी विना होतील तोपर्यंत ती गोष्ट परवानगीविना करणार्या व्यक्तीचाच दोष आहे (मग ती व्यक्ती स्त्री असो वा पुरूष.)
बाकी, बाई अथवा पुरूष दोघांनीही त्या ठिकाणचे, तत्कालीन थंब रूल्स नुसार चुकीचे सिग्नल्स जाणार नाहीत ही काळजी घेत सार्वजनिक जीवनात वावरले की बर्याच गोष्टी सुकर होतात. (अर्थात तरी शाश्वती नाहीच पण शक्यता कमी)
अवांतरः (शेजार्यांनी पाळलेला पोपट आवडला नाही म्हणून चाळ सोडली च्या चालीवर) माझ्या ओळखीतील एका म्यानेजरच्या टिममधील एक कन्या नेहमी त्याला जमेल तेव्हा इतकी खेटून उभी राहत असे की शेवटी त्याने प्रोजेक्ट सोडले ;)
सहमत आणि उदाहरणाबद्दल आभार ;)
च्च च्च च्च त्याने प्रोजेक्ट सोडायला नको होते ;)
एका म्यानेजरच्या टिममधील एक कन्या नेहमी त्याला जमेल तेव्हा इतकी खेटून उभी राहत असे की शेवटी त्याने प्रोजेक्ट सोडलेइथे 'पोपट आवडला नाही म्हणून....' हे उदाहरण चुकीचे वाटते.
=))
:D
येथे मुद्दा व्याभिचाराचा नाही कारण त्या मुलीने त्याला विरोध केला होता, तो त्याने जुमानला नाही आणि नंतर तिने पुढील तक्रार केली. यात एका संस्थेचा संस्थापक-संपादक हा स्वत:च्या हाताखाली काम करणार्या व्यक्तीवर लैंगिक अत्याचार (अत्याचार - मानसीक अथवा शारीरीक त्रास) करतो हा मुद्दा आहे. येथे केवळ शरीर संबंध म्हणून व्याभिचार हा मुद्दा नसून त्याच्या मागची प्रेरणा - स्वतःच्या पोझिशन मधून आलेली पॉवर आणि त्या पॉवरचा गैरवापर हा मुद्दा आहे.
विकासराव आपण एकाच रुळावर आहोत तेजपालच्या केस मध्ये. वरील माझा प्रतिसाद शिवाय ब्याटम्यान आणि पैसाताई यांचे प्रतिसाद हे 'प्रसाद' नामक आयडी ने दिलेल्या प्रतीसादावरची उत्तरे आहेत.
बाईची अक्कल काय आहे माहीत नाही...कारण अगदी मुळाशीच जायचे तर तेहेलका मध्ये कामच कशाला करायला गेली, असे देखील कोणी म्हणू शकेल. त्याला काही अर्थ नाही. मी वर दिलेल्या एनडीटिव्हीतल्या बातमीतली काही वाक्ये खाली चिकटवत आहे, त्यात सर्व काही येते...
"The act happened continuously over a period of time...and despite the girl pleading that she is almost the age of his daughter...she pleaded 'please don't do this'...Her 'no' was not accepted...it happened once and it happened the next day," the journalist's confidante alleged. "
विकास साहेब, माझा विरोध तेजपालवाल्या बाईला नाहीच. पुन्हा एकदा प्रतिसाद बघावा, तो मिसरीड होण्याची शक्यता फार आहे. त्या बाईला माझी सहानुभूती आहे आणि राहील. अक्कल काढलीये ती दुसर्या एका बाईची.
असो, अवांतर केल्याबद्दल आयमाय स्वारी.
बॅटमॅनच्या वरील खरडीच्या स्पष्टीकरणाला माझा पाठिंबा आहे.
१.बॅटमॅनची पहिली गळेपडू बाईबद्दल ची खरड तिच्यापुरतीच सीमित आहे असं जाणवतंय.
२. पैसातैने दोन केस एकत्र केल्यात.
त्या तशा अंगानं पाहिल्या तर पैसातैचा मुद्दा देखील बरोबर आहे. मात्र सहानुभूति अथवा काळजीची भावना स्त्रियांना मिळते किंबहुना दाखवली जाते.
अर्थात ही काळजीची भावना काय पात्रतेची असते अथवा कशा पद्धतीनं दाखवली जाते तो आणखी एक शतकी धागा ठरणारा विषय होईल.
उदाहरणादाखलः तीन मुली नि एक मुलगा पदरात घेऊन विधवा झालेल्या बाईचं सांत्वन ज्या पद्धतीनं करायला समाज आला होता ते बघून अतिशय घृणा निर्माण झाली ह्या सगळ्या लोकांबद्दल. स्थानिक नेते मंडळी त्या बाईला लिटरली कवेत घेत होती. :(
स्थानिक नेते मंडळी त्या बाईला लिटरली कवेत घेत होती. Sadअसे काही वाचले की राग येतो, पण शष्प काही होणार नसल्याने त्याला 'इंपोटेंट रेज' असे अतिशय अन्वर्थक नाव आहे. :(
२. पैसातैने दोन केस एकत्र केल्यात.माझे सर्व प्रतिसाद हे तेजपाल केस मुख्य धरूनच आहेत. मधेच प्रसाद१९७१ यानी दुसरा उल्लेख केल्याने त्यावर काही बोलले आहे.
वस्तुस्थिती या केस मध्ये नाही. सलग दोन रात्री तिच्यावर तरुण चक्क बलात्काराचा प्रयत्न करत होता. हा तिने लिहिलेला मेल :
Here is the copy of email in which the victim journo has given the detail of what #Tarun #Tejpal did to her..
Dear Shoma
It is extremely painful for me to write this email to you - I have struggled with finding an easier way to say it, but there isn't one. The editor in chief of Tehelka, Tarun Tejpal sexually assaulted me at Think on two occasions last week. From the very first moment, I wanted to call you, or find you and tell you what he had done to me -but given how absorbed you were at Think; preparing for and conducting sessions, and the fact that it was impossible for the two of us to get even a minute alone together, I could not. To add to this, I had to process the fact that it was Tarun who molested me —my father's ex colleague and friend, Tiya's dad, and someone I had so deeply respected and admired for so many years.
Both times, I returned to my room in a completely distraught condition, trembling and crying. I went straight to Shougat and Ishan's room, where I called G Vishnu and told them what had been done to me. (All three of them are copied on this email. You can contact them for any clarifications you see necessary). The second time he molested me, I even told Tiya what happened. When he heard I'd told Tiya (she confronted him), he lashed out at me, and I became truly terrified of what he would do. I avoided him in all situations except in rooms full of people, until I checked out of Think on Sunday.
As of Saturday evening, he sent me text messages insinuating that I misconstrued "a drunken banter". That is not what happened. Banter does not involve forcing yourself on someone, trying to disrobe them, and penetrate them with your fingers despite them pleading for you to stop. As you read through the details of what happened in the attachment to this mail, I hope you will also understand how traumatic and terrifying it has been for me to report this to you —and yet how critical it is that Tehelka constitute an anti sexual harassment cell as per the Vishakha guidelines immediately, to investigate this matter. At the very least, I will need a written apology from Mr Tejpal and an acknowledgement of the same to be circulated through the organization. It cannot be considered acceptable for him to treat a female employee in this way.
..........
Principal Correspondent Tehelka (Mumbai)
#Tejpal #rapiest # Tehelka
हे सर्व फार चमत्कारीक आहे.
एकदा असे झाल्यावर त्याच आठवड्यात ती मुलगी पुन्हा तेजपाल च्या जवळ गेलीच कशी ते सुद्धा तो आणि ती एकटी असताना? कुठली मुलगी अशी risk घेइल?
जसे लिहिले आहे तसेच ते असावे असे वाटत नाही. माझ्या engg college च्या एका senior मुलाच्या बाबतीत अश्याच प्रकारची घटना २ वेळेला घडली आहे. एका मुलीने त्या मुलावर आणि त्याच्या बायको वर बलात्कार केल्याचा २ वेळेला आरोप केला. तो मुलगा असे काही करणारच नाही ह्याची मला २००% खात्री आहे.
ह्या केस मधे कीतीतरी प्रश्न येतात.
१. त्या मुलीला तेजपाल च्या इतके दिवसातल्या वागण्या वरुन कधीच काही शंका आली नाही का? का इतके दिवस तो एकदम चांगला होता आणि गोव्यात गेल्यावर त्याचा राक्षस झाला?
२. तहलका मधे गेल्या २० वर्षात बर्याच स्त्री पत्रकार असाव्यात, त्यांचा काय अनुभव?
३. तेहलका ची संपादक सुद्धा एक स्त्री च असावी असे वाटते. तिचा तेजपाल चा अनुभव काय होता?
उगा झोपल्याचे सोंग घेऊ नका. जर त्याने अतिप्रसंग केला नसता तर त्याने ते मान्य करून दोष घेतला नसता. शिवाय तो 'टार्गेटेड' स्टिंग कार्यवाही करणारा पत्रकार आहे तुमच्या कॉलेज मधला विद्यार्थी नव्हे !
त्याने "अतिप्रसंग" केल्याचे मान्य केले नाहीये.
त्याच्या मते "त्याचा गैरसमज झाला, त्याला परिस्थिती वेगळी वाटली" त्यामुळे त्याने काहीतरी केले.
बर्र बोवा ती पोरगीच व्यभिचारी कुलटा आहे. तिने आदल्या रात्री तेजपालने तिचे बळजबरीने कपडे काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्या 'थिंक' नावाच्या संमेलनातून निघून जायला हवे होते, ती गेली नाही चूक तिची आहे *** कुठली.
खुश ?
कुठला गुन्हेगार स्वतःच असे मान्य करतो? आणि जर त्याचे तसे म्हणणे नाही तर मग स्वतःच पोलीसात जाउन केस का करत नाही. म्हणजे ती मुलगी खोटे स्टींग ऑपरेशन करत आहे, इतके तरी समजेल.
१. प्रसाद अतिप्रसंग केल्याचे कदाचित त्या मुलीनेही म्हटलेले नाही. इथे "trying to penetrate with fingers" हा आरोप आहे. बलात्कार नाही.
२. कुठलीही वस्तु किंवा अवयवाच्या सहाय्याने penetrate करणे हे बलात्कारात मोडते. तेजपालने तसा प्रयत्न केला पण त्यात तो यशस्वी झाला नाही असे दिसते. आरोप प्रयत्न करण्याचा आहे. शिवाय बळजबरीने त्या मुलीचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला गेला आहे. दोन्ही प्रसंग "विनयभंग" या प्रकारात मोडतात "बलात्कार" या प्रकारात नाही. त्यामुळेच आरोप Sexual Assault चा आहे "Rape" चा नाही.
३. तेजपालने आधीच्या सगळ्या महिला वार्ताहरांकडुन राखी बांधुन घेतली असेल किंवा त्यांची आई मानुन आरती केली असेल तरी त्यामुळे त्याला या मुलीवर अशी बळजबरी करण्याचा अधिकार प्राप्त होत नाही.
४. ती मुलगी त्याच्या माजी सहकर्याची मुलगी आहे आणि असे दिसते की त्याच्या मुलीची मैत्रिण देखील. कायदेशीर दृष्टीकोनातुन जे काही झाले तो केवळ गैरसमज होता की अजुन काही हे नंतर कळेलच पण मुळात नैतिक दृष्टीकोनातुन हे बरोबर नाही. अर्थात क्षणिक मोहाला बळी पडुन नैतिकता बाजुला पडु शकते. त्याला चूक म्हणता येइल पण गुन्हा नाही. Sexual Assualt किंवा Attempt to Rape हा मात्र गुन्हाच मानला पाहिजे.
५. प्रत्यक्षात जे काही घडले ते बंद खोलीत त्या दोघांमध्ये घडले त्यामुळे त्याबद्दल नक्की काही निष्कर्ष काढता येत नाहित. ज्या अर्थी तेजपालने माफी मागितली आहे त्या अर्थी त्याची "चूक" तरी नक्की झालेली आहे. म्हणजे मुलगी म्हणते तसे प्रसंग आले आहेत हे नक्की. त्यात बळजबरी होती की नाही हे आत्ता सांगता येत नाही. जर मुलगी म्हणते तसे "कपडे ओरबाडताना" किंवा " बोटांनी penetrate करण्याचा प्रयत्न करताना" तिने विरोध दर्शवला असेल आणि तरीही तेजपालने बळजबरी केली असेल तर तो नक्कीच एक Sexual Assualt होतो.
६. Inappropriate Use of Power किंवा Undue Influence हे दोन्ही मुद्दे महत्वाचे ठरु शकतात. त्यापैकी "Inappropriate Use of Power" हा थोडा कळीचा मुद्दा आहे. तेजपालने त्याच्या व्यावसायिक वर्चस्वाच्या अधिकाराचा उपयोग करुन त्या मुलीला कुठलेही कृत्य तिच्या मनाविरुद्ध करण्यास भाग पाडले असेल तर तो Inappropriate Use of Power होतो. जर मुलीने विरोध दर्शवला आणि मग आपली चूक झाल्याची उपरती होउन तेजपालने तिला अधिक बळजबरी न करता सोडुन दिले असे जर झाले असेल तर Inappropriate Use of Power सिद्ध करणे अवघड आहे. Undue Influence मात्र अजुन थोडा कळीचा मुद्दा होतो. कारण यात तेजपालकडे अधिकारसामर्थ्य आहे हे दोघांनाही माहिती होते. असे असताना कुठल्याही प्रकारचे वाकडे पाऊल तेजपालसाठी गुन्हा ठरु शकते.
७. दारुच्या नशेत कृत्य केले हा बचाव होऊ शकत नाही. तसे असल्यास यापुढे बलात्कार करु इच्छिणारा प्रत्येक माणूस थोडीफार दारु ढोसुन काहिही कृत्य करेल.
८. इथे तेजपाल आणि एक तरुण मुलगी असे नसुन "एक लेडी बॉस" आणि एक "तरुण मुलगा" असे समीकरण असले असते तरीही अश्याप्रकारचे कृत्य ६ व्या मुद्द्यात दिलेल्या प्रकारात बसु शकले असतेच. त्यामुळे "Official Code of Conduct" अंतर्गत तो गुन्हा ठरु शकतो. अधिकारातल्या व्यक्तीच्या दुसर्याच्या व्च्यावसायिक जीवनावर कुठलाही इष्ट किंवा अनिष्ट प्रभाव टाकु शकण्याच्या शक्यतेमुळे असे कुठलेही प्रकार झाल्यानंतर दुसरी व्यक्ती " लैंगिक शोषणाचे" आरोप करु शक्ते. प्रत्येक वेळेस हे आरोप खरे असतीलच असे नाही. खोटे असतील असेही नाही. पण एखादी व्यक्ती अधिकारिक पद भूषवत असल्यास हे असले "फायदे" त्याला सहज साध्य होतात आणि केवळ त्याचमुळे एखादी व्यक्ती त्याला भुलु शकते ही शक्यता लक्षात घेतल्यास एखाद्या वेळेस वरकरणी आपखुशीचा मामला असेल जरी तरी तो तसा असेलच असे नाही. त्यामुळे अधिकारिक व्यक्तींनी सर्व शक्यता विचारात घेउन कायदेशीर मार्गांचा वापर करुनच प्रेमात पुढचे पाऊल उचलणे योग्य ठरेल (मी कायदेशीर पळवाटा शोधुन बलात्कार करण्याबद्दल बोलत नसुन खरोखर कनिष्ठ सहकार्याच्या प्रेमात पडलेल्या अधिकार्याबद्द्ल बोलत आहे हे लक्षात घ्यावे.)
या प्रतिसादाला मुद्देसूदपणासाठी माझ्याकडून १५ लाइक्स!
अवघड आहे
असेच म्हणतो.
तेजपाल यांचा दोष प्रथमदर्शनी दिसतोच आहे. विनयभंग हा एक गुन्हा. आणि तो पावर दाखवून केल असेल तर आणखी एक गुन्हा.
अवांतरः
सिझर्स वाईफच्या न्यायाने तेजपाल यांची जबाबदारी अधिकच वाढते.
अतिअवांतरः
त्यात तहलकाने पूर्वी प्रत्यक्ष भाजप अध्यक्षांचेच स्टिंग ऑपरेशन केलेले असल्याने त्यांना कुठल्याच प्रकारची दयामाया दाखवता कामा नये. (अदरवाईजसुद्धा दयामाया दाखवता कामा नयेच).
>>>त्यात तहलकाने पूर्वी प्रत्यक्ष भाजप अध्यक्षांचेच स्टिंग ऑपरेशन केलेले असल्याने त्यांना कुठल्याच प्रकारची दयामाया दाखवता कामा नये. (अदरवाईजसुद्धा दयामाया दाखवता कामा नयेच).
थत्ते चाचा ग्रो अप मॅन!
कस्सलं वाईट रिलेट करताय राव! बादरायण संबंध जोडताय?
खरं सांगा! कंसातलं वाक्यच तेही 'अदरवाईजसुद्धा' वगळून तेवढंच अॅप्लिकेबल राहतं ना?
+१
संतुलीत निकषांवर केलेले उत्तम विश्लेषण !
आतापर्यंत सार्वजनिक मंचांवर उघड झालेल्या तथ्यांवरून यापेक्षा जास्त निष्कर्ष काढणे योग्य नाही.
प्रतिसाद एकदम मस्त आहे. यात अजून एक गोष्ट समजली ती म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या: Vishaka Guidelines ...
फक्त झापड लावणं आणि कानाडोळा करणे चमत्कारीक आहे... आउटलूकचे संपादक विनोद मेहता यांनी तर "ऐसे छोटेमोठे हादसे..." च्या स्टाईल वर "no big deal" असेच टाईम्स नाऊ वर म्हणले!
गंमत म्हणजे, आउटलूक मधेच तेजपाल यांनी त्या मुलीस लिहीलेली आणि त्या मुलीने शोमा चौधरीस लिहीलेली अशा दोन्ही इमेल्स प्रसिद्ध केल्या आहेत. त्या जशाच्या तशा खाली चिकटवत आहेच. शिवाय येथे Outlook चा दुवा पण दिलेला आहे. त्यात तेजपाल यांनी स्वत:च that I was your boss, “That makes it simpler,” असे स्पष्ट म्हणले आहे. जरी त्यांनी नंतर ते शब्द मागे घेतो असे म्हणले असले तरी त्याला काही अर्थ नाही, लाथ मारून नंतर नमस्कार करण्यासारखे आहे. त्या व्यतिरीक्त असे काही मागे घेतलेले नाही असे त्या मुलीचे म्हणणे आहे ते वेगळेच.
Following is the full text of the email sent by Tarun Tejpal to the young journalist who has levelled serious charges of sexual assault against him on November 19, 2013. The journalist's response of November 21 follows this email:
Dear XXX,
This is the hardest thing I will ever do in my life. You are a young woman I have been very proud of, as a colleague’s daughter, and then as a colleague in my own office. I have watched you grow and mature professionally into a journalist of great integrity and promise.
It wrenches me beyond describing, therefore, to accept that I have violated that long-standing relationship of trust and respect between us and I apologise unconditionally for the shameful lapse of judgement that led me to attempt a sexual liaison with you on two occasions on 7 November and 8 November 2013, despite your clear reluctance that you did not want such attention from me.
I understand the extreme distress you have been feeling and if regret could turn time back, the force of mine would surely place us all back in a space and time before this terrible lapse.
I know you feel I used my position as Editor, Tehelka to force my attention on you, and I acknowledge that I did at one point say to your contention that I was your boss, “That makes it simpler,” but I do want to put on record that the moment those words escaped my lips, I retracted them saying “I withdraw that straight away – no relationship of mine has anything at all, ever, to do with that”. I want to reiterate that again today: despite my colossal lapse, working and succeeding in Tehelka will never be predicated on anyone acquiescing to anything untoward. It never has and never will. Having said that though, I acknowledge that there is an inherent disbalance of power in my position as editor-in-chief and you as an employee of Tehelka and there is absolutely no ground or circumstance in which I should have violated the propriety and trust embedded in that relationship.
Tehelka has a proud legacy and body of work, to which you yourself and legions of other journalists have contributed. As the founder and editor-in-chief, I have helmed and nurtured this proud institution, and I cannot imagine what insanity drove me to compromise these long, proud years of trust and public work.
There are many, many reasons, therefore, why I am smothered with regret. But I want you to know that foremost among them is the fact that I have hurt you and broken your trust in me, and that of many others around me. I have often spoken for the absolute rights and freedoms of women, and it shames me beyond words, to find myself located in this awful context. I would say it was a moment of insanity, except that would mean evading responsibility for it, and that I will not do. I hold myself, first and last, accountable.
I know Shoma has urged you not to leave Tehelka, and even as I acknowledge that I have lost the right to say this to you, I would urge you not to leave either. At the very least, I would like to assure you that the space to do your work proudly and freely, without worrying about fear or favour, will always be available to you here.
For long years, you have known a different man, a man and editor you trusted and were proud to know. In extreme contrition, I would like you to know that but for this unconscionable lapse, that man still exists and holds you in highest regard.
If an apology can heal, please consider this an unconditional one.
Tarun
***
In response to this email, the complainant responded on November 21
Subject: Re Tarun's apology
Dear Shoma,
Tarun’s account of what happened on the 7th and 8th of November at Think differs from mine on the following counts:
1. The use of the words “sexual liaison” is a clear misrepresentation of facts, and an attempt to obfuscate the truth — that he sexually molested me, on two separate occasions and that he violated my bodily integrity and trust.
2. He did not even once, utter the words “I withdraw that straight away – no relationship of mine has anything at all, ever, to do with that”. I have written this in my response to his ‘private’ email to me as well, which is cc’d to you and my colleagues who have known about him sexually molesting me from the 7th of November.
In conversations with my colleagues you have said that you do not contest the facts of my testimony, which is why you do not see it necessary to constitute an anti sexual harassment cell as per the Vishakha guidelines in this case. However, given that his apology presents an entirely different version from my testimony, i.e. attempts to establish that a “sexual liaison” took place as opposed to him sexually molesting me, I insist once again in the spirit of justice, to constitute an anti sexual harassment cell in accordance with the Vishakha guidelines to investigate this matter.
Further, I request you to publicly withdraw your statement that I or other Tehelka journalists are “satisfied”, since my colleagues do not know the full extent of what was done to me, and I am deeply hurt that as my mentor, you could suggest in any way that this blatant misrepresentation of facts would be satisfactory to me.
ही घटना गोव्यात घडलीय त्यामुळे पर्रिकर कदाचीत योग्य कारवाई करतील अशी आश्या आहे .
गोवा सरकार कडून चौकशीचे आदेश नेघाले आहेत.
अरे माझ्या कर्मा,
या धाग्यावरील आणि लेस्बियन विवाहासंबधी धाग्यावरील लोकांचे प्रतिसाद वाचुन लोकांना मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर झाल्यासारखे वाटले.
ईकडे एक, तिकडे एक!
जर एकादी स्त्री एकाद्या पुरुषाशी संबध ठेवु इच्छीत असेल व त्या पुरुषाला देखिल ती आवडत असेल तर आपन इथे कशाला आरडाओरड करायची?(माझ्या राजा हिच्या बद्दल).काही लोकाना स्त्रीया जवळ देखिल उभा करुन घेत नाहीत त्यांचा प्रश्न वेगळा आहे.
आता इथे ती मुलगी आपल्या बॉस कम मैत्रिणीच्या वडिलांसोबत गोव्याला मिंटीग साठी आली आहे. प्रथम तिचे काका लगट करतात त्यावेळी ती एकादी चुक म्हणुन सोडुन देते,पण तेच जर परत घडत असेल तर तिने तक्रार करायला हवी ती केली. मग तिचा दोष कसा?
आउट्लूक हे कम्युनिस्ट मासिक आहे आणि तेजपाल कम्युनिस्ट विचारसरणीचे आहेत हा जावईशोध आपण कसा काय लावला.
कम्युनिस्ट शब्द आपल्याला ऑफेन्सिव्ह वाटला असल्यास क्षमस्व. तसा तो शब्द आणि त्यामागील हिंसक/देशविघातक वृत्ती आहेच तशी वाईट. पण जाउंदेत तो वेगळा मुद्दा आहे. आपण व्यक्तीगत घेऊ नये ही विनंती. :)
Tehelka case: VP withdraws Tarun Tejpal's name from Prasar Bharti panel
थोडक्यातः तेजपाल यांचे नाव उपराष्ट्रपतींनी प्रसारभारती समितीसाठी सुचवले होते ते आता त्यांनी या प्रसंगानंतर मागे घेतलेले आहे.
तेजपाल यांनी पदावरुन काही काळ पाय उतार होण्याचे "प्रायश्चित्त" का घेतले असावे याचा अंदाज बांधता येतोय. हा काही पापभीरुपणातून आलेला निर्णय नाही.
पण ज्या व्यवहाराला आपल्या देशात "गुन्हा" मानले आहे (कायद्याने तरी नक्कीच मानले आहे) त्याबाबत स्वतः निर्णय घेऊन तेजपाल "some are more equal" हा ताठा का दाखवत आहेत? त्यांना तसा अधिकार कुणी दिला?
फेसबुकवरची (मधु किश्वर यांच्या ट्विटवरची) एक बोलकी प्रतिक्रिया: Durgesh Singh: Dont know madam what is wrong with people of this country...they defend a rapist and cry for a cricketer
वर्तमान पत्रातल्या आणि माध्यमातल्या बातम्यांचा आधार घेवून पोलिस स्वत: कारवाई करू शकत नाहीत का ? का कोणीतरी तक्रार केल्यावरच पोलिस येणार?
या संदर्भात कसे होईल ते माहीत नाही कारण तेजपाल यांची इमेल जाहीर आहे, पण कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तयार झाला तर पोलीस पकडू शकतात, पण एकंदरीत खाजगी प्रकरणात आपणहून उत्साहात पोलीस पकडू शकत नाहीत. आणि पोलीसांवरील असे बंधन योग्यच आहे.
स्त्रियांचा गैरफायदा घेणाऱ्यांना जात, धर्म, पक्ष, व्यवसाय काही नसतो हेच खरं. जिला त्रास झालेला आहे तिने रीतसर पोलिसमध्ये तक्रार करावी आणि तिची योग्य दखल घेतली जाऊन रास्त कायदेशीर कारवाई व्हावी.
गैरफायदा घेणाऱ्यांना जात, धर्म, पक्ष, व्यवसाय काही नसतो हेच खरं. जिला त्रास झालेला आहे तिने रीतसर पोलिसमध्ये तक्रार करावी आणि तिची योग्य दखल घेतली जाऊन रास्त कायदेशीर कारवाई व्हावी.हे असे हवे 'कुणाचाही गैरफायदा घेणाऱ्यांना जात, धर्म, पक्ष, व्यवसाय काही नसतो हेच खरं. जिला त्रास झालेला आहे तिने रीतसर पोलिसमध्ये तक्रार करावी आणि तिची योग्य दखल घेतली जाऊन रास्त कायदेशीर कारवाई व्हावी.' स्त्रीच का? लहान मुले, पुरुष यांचा कधी गैरफायदा घेतलाच जात नाही की काय?
तुम्ही दिलेलं वाक्य जास्त जनरल आहे. ते अर्थातच चुकीचं नाही. पण विषयाला धरून राहण्यासाठी अधिक स्पेसिफिक विधानं करावी लागतात. नाहीतर प्रत्येकच विषयावर 'दुरितांचे तिमिर जावो... जो जे वांछील तो ते लाहो' म्हणावं लागेल.
मज्जा मज्जा =))