Skip to main content

विचार

लेखक अमोल मेंढे यांनी शनिवार, 23/11/2013 17:27 या दिवशी प्रकाशित केले.

तुला प्रेमपत्र लिहतांना साक्षी ठेवलेल्या,

प्रेमदेवतेला विचार...

तु येण्याची वाट पाहत जिच्यावर तासन् तास बसलो,

त्या वाटेला विचार...

दिवसरात्र तुझीच स्वप्ने बघणार्‍या,

माझ्या डोळ्यांना विचार...

चंद्राची व तुझी तुलना करतांना,

तयार झालेल्या कवितांना विचार...

तुझ्या आठवणीत रात्री जागतांना, ज्यांना मला पाहिलं,

त्या चांदण्यांना विचार...

माझं तुझ्यावर किती प्रेम आहे,

हे तेव्हा तुला कळेल...

माझ्या राखेतील अस्थींतुन सुद्धा,

तुला तुझेच नाव ऐकायला मिळेल...

लेखनविषय:

वाचने 1501
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया