✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

PLAN F शो मध्ये सहभाग

स
सुबोध खरे यांनी
गुरुवार, 11/21/2013 - 13:24  ·  लेख
लेख
येत्या शनिवारी (२३ NOV) सायंकाळी सात वाजता(19.00) माझ्या मुलाखतीचा गुंतवणूक आणी अर्थ विषयक कार्यक्रम DSP BLACKROCK प्रायोजित Plan F: Your Financial Fitness Plan, Episode - ५ हा CNBC TV -18 प्रसारित होणार आहे. हाच कार्यक्रम रविवारी(२४ NOV) सायंकाळी आठ(20. 00) वाजता पुनः प्रसारित होईल. याची झलक तू नळी वर उपलब्ध आहे. पण त्याच्या दुव्यावर टिचकी मारली तर तो भलतीकडेच जातो. पण वरील इंग्रजी शब्दच दुवा म्हणून तेथे टाकल्यास आपल्याला तो पाहता येईल. हा कार्यक्रम फारसा उपयोगी नाही असे माझे स्वतःचे मत आहे परंतु त्या कार्यक्रमानंतर देण्यात येणाऱ्या टिप्स चांगल्या असतात. हा कार्यक्रम "जागो इन्व्हेस्टर" या जालावरील वैयक्तिक अर्थकारण आणी गुंतवणूकदारांचे शिक्षण देणारा ब्लॉग (http://www.jagoinvestor.com/) यांनी सह प्रायोजित केला आहे. हा ब्लोग अतिशय उपयुक्त आहे असे माझे मत आहे आणी माझे अर्थविषयक शिक्षण आणी जागृतीकरणा च्या टप्प्यावर मला भेटलेला एक चांगला ब्लॉग आहे असे माझे मत आहे. याची मूळ पार्श्व भूमी अशी आहे. लष्करातून निवृत्त होताना मला एक जाणवले कि इतकी वर्षे लष्कराच्या भाकऱ्या भाजताना स्वतःच्या आर्थीक सुरक्षिततेचा मी विचारच केलेला नव्हता. तसेच आपल्या शिक्षण अभ्यासक्रमात आर्थिक शहाणपण(FINANCIAL WISDOM) याचा कोठेही उल्लेख सुद्धा नव्हता. तशात माझे एक रुग्ण सेन्ट्रल बँकेत लिपिक होते ते तेथे असणार्या गुजराती ग्राहकांकडून ते समभागात गुंतवणूक शिकले आणी निवृत्त होताना त्यांनी बरीच माया जमविली आहे असे त्यांच्याशी बोलताना मला कळले . त्यांच्याशी बोलताना आपण अर्थविषयक किती निरक्षर आहोत हि मला जाणीव झाली त्यामुळे मी स्वतः या गोष्टींकडे लक्ष देण्यास सुरुवात केली . आणी ज्या चुका माझ्या आयुष्यात झाल्या त्या आपल्या मुलांच्या आयुष्यात होऊ नयेत म्हणून मी जाणीवपूर्वक लक्ष घालायला सुरुवात केली. मुलांचे अर्थ विषयक शिक्षण सुद्धा सुरु केले आहे. यात अर्थविषयक नियतकालिके मासिके आणी वृत्तपत्रे यांचा समावेश आहे. त्यात मला वरील ब्लॉगचा संपर्क आला. यात स्वतः चा उदो उदो केल्याची भावना मला जाणवत आहे परंतु त्याला दुसरा इलाज मला सापडत नाही. असो DISCLAIMAR -- जागो इन्व्हेस्टर किंवा DSP BLACKROCK शी माझा कोणताही वैयक्तिक व आर्थिक संबंध नाही. एकमेका साह्य करू अवघे होऊ श्रीमंत
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
7965 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

धन्यवाद डॉ. कार्यक्रम तर

मिलिंद
गुरुवार, 11/21/2013 - 13:59 नवीन
धन्यवाद डॉ. कार्यक्रम तर नक्कीच पाहीन. पण आपण नक्कीच काही वेगळे केले असाल म्हणून आपणांस कार्यक्रमात सहभागी करुन घेतले असेल ना त्याविषयीपण लिहा ना जरा.... आणि हो 'एकमेका साह्य करू अवघे होऊ श्रीमंत' हे मात्र आवडले.
  • Log in or register to post comments

+१

अनिरुद्ध प
गुरुवार, 11/21/2013 - 14:52 नवीन
+१ सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिलिंद

लहानपणी ज्या गोष्टी कानावर

कंजूस
गुरुवार, 11/21/2013 - 22:36 नवीन
लहानपणी ज्या गोष्टी कानावर पडतात त्याचा पुढे कळत नकळत उपयोग आपण करत असतो अथवा त्याची जाण राहाते . पैसा याविषयी मुले ऐकतील तर त्याचा नक्कीच फायदा होईल .कार्यक्रम पाहाणार आहे .
  • Log in or register to post comments

अरे वा!

पैसा
गुरुवार, 11/21/2013 - 22:43 नवीन
तुमचा कार्यक्रम म्हणून जरूर पाहीन!
  • Log in or register to post comments

कार्यक्रम म्हणून जरूर पाहीन

मुक्त विहारि
गुरुवार, 11/21/2013 - 23:05 नवीन
कार्यक्रम म्हणून जरूर पाहीन
  • Log in or register to post comments

माहिती दिल्याबद्दल धन्यवाद....

रुस्तम
गुरुवार, 11/21/2013 - 23:48 नवीन
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद....
  • Log in or register to post comments

"एकमेकां साह्य करू, अवघे होऊ

बॅटमॅन
Fri, 11/22/2013 - 00:48 नवीन
"एकमेकां साह्य करू, अवघे होऊ श्रीमंत" हे बाकी मस्त आवडले.
  • Log in or register to post comments

खरं आहे ! कार्यक्रम जरूर

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 11/22/2013 - 01:07 नवीन
खरं आहे ! कार्यक्रम जरूर बघण्यात येईल. कोणीतरी म्हटले आहेच की, "नाय खिशात मनी, तर पुसंना कुनी !"
  • Log in or register to post comments

अभिनंदन.

स्पंदना
Fri, 11/22/2013 - 05:48 नवीन
अभिनंदन. पैसा नुसता कमवुन चालत नाही, तो सांभाळायचीही अक्कल असावे लागते. तु नळीवर कार्यक्रम पाहेन.
  • Log in or register to post comments

लेखमाला

तुषार काळभोर
Fri, 11/22/2013 - 09:05 नवीन
आता अर्थविषयक एक लेखमाला अपेक्षित आहे. डॉ. खरे, क्लिंटन आदींनी मिळून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अर्थकारण, वैयक्तिक अर्थनीती, गुंतवणूक, सामान्य लोकांना साहाय्यकारी होतील अशा सरळ-सोप्या योजना इ. विषयी एखादी लेखमाला सुरू करता येईल का? लेखकाने शेवटच्या परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे, आपल्याकडे सर्वच (आर्थिक)थरात अर्थविषयक शिक्षणाचा (व ज्ञानाचा) अभाव आहे. सामान्य लोक बँकेतील एफडी, प्रॉव्हीडंड फंड, पोस्ट, विमा(गुंतवणुकीच्या हेतुने काढलेला) याच्या पलिकडे जात नाहीत. तर त्या अनुषंगाने थोडाफार प्रचार-प्रसार करता येईल का? प्रत्येक लेखानंतर प्रतिक्रियांमधून होणार्‍या चर्चा-वादविवाद-मंथन-प्रश्नोत्तरे यातून आणखी माहिती मिळेल.
  • Log in or register to post comments

#पैलवान पूर्ण सहमत .सुरू कराच

कंजूस
Fri, 11/22/2013 - 14:13 नवीन
#पैलवान पूर्ण सहमत .सुरू कराच .साधा रेल्वे रेझर्वेशन फॉम ,बैंकेचा KYC फॉम भरता येत नाही ,शिकायची पण इच्छा कित्येक दाखवत नाहित तर इन्वेस्टमंट दूरच राहिली .परवा डोंबिवली कट्टयावर मुवि हेच सांगत होते परदेशी जाण्याबद्दल मराठी तरुणांना मार्गदर्शनासाठी तयार आहोत पण पुढे येऊन कोणी वकशॉपचे आयोजन करत नाहित . बघु पुढे काय होते ,
  • Log in or register to post comments

तू नळी चा दुवा

सुबोध खरे
Wed, 11/27/2013 - 19:54 नवीन
माझ्या कार्यक्रमाचा तू नळी चा दुवा खाली देत आहे Plan F: Your Financial Fitness Plan, Episode - 5 http://youtu.be/B13fS4Y0NgY
  • Log in or register to post comments

धन्यवाद तु नळीच्या दुव्याबद्दल....

राघवेंद्र
Wed, 11/27/2013 - 20:47 नवीन
मी हा कार्यक्रम बघितला. आशिश सरांचे मुद्दे एवढे पटले नाहित. तुमची गुंतवणुक पटण्यासारखी आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी मधील गुंतवणुक मर्यादा १ लाख आहे. एका कुटुंबातील सर्व सदस्यानी खाते काढले तर जास्त फायद्याचे होते. आशिश सरांचा जोर यावर का होता हे कळाले नाही. या निधी मधे रोकडात रूपांतर करण्याची सुलभता (liquidity) पण जास्त नाही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी मधील गुंतवणुक

सुबोध खरे
गुरुवार, 11/28/2013 - 20:07 नवीन
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी मधील गुंतवणुक हि अतिशय सुरक्षित समजली जाते म्हणजे अफरातफर केल्याच्या गुन्ह्यात आपण तुरुंगात गेलात तरीही त्या पैशातून सरकार पैसे वसूल करू शकत नाही.शिवाय हि गुंतवणूक सहजा सहजी काढता येत नसल्याने लोक समभागात टीप मिळाली म्हणून त्यातून पटकन काढून गुंतवू शकत नाहीत. त्यामुळे बर्याच लोकांचे पैसे वाचलेले आहेत. यात एक लाखापर्यंत गुंतवणूक करता येते परंतु त्यातील सत्तर हजारावर करमाफी आहे. शिवाय याचे व्याज आणि मुदतीनंतर मुद्दल सुद्धा करमुक्त आहे. त्यामुळे हि गुंतवणूक EEE (exempt -exempt -exempt) अशी एकमेव गुंतवणूक आहे( ज्यात मुद्दल व्याज करमुक्त असून गुंतवणुकीवरही करमाफी आहे. आशिष सरांचा थोडासा गैरसमज झाला होता कि माझे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी मध्ये खाते नाही. (खाती मी मुलांच्या नावाने त्यांच्यासाठी उघडलेली आहेत. त्यात माझा हेतू असा कि मुलांना पण तिशी च्या आसपास थोडे फार पैसे उपलब्ध व्हावेत आणि ते (गद्धे) पंचविशीच्या अगोदर त्यांना काढता येऊ नयेत). असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघवेंद्र

अतिशय छान पोर्टफोलियो आहे तुमचा डॉक्टरसाहेब

एस
गुरुवार, 11/28/2013 - 21:22 नवीन
मला एक प्रश्न विचारायचा आहे. साभनिनिधी जरी सर्वात सुरक्षित गुंतवणूक समजली जात असली तरी तरुणांनी त्यात गुंतवणूक करणे कितपत योग्य ठरू शकेल? विशेषतः कल्पना करा की एखादी व्यक्ती तरूण आहे आणि कमावती नुकतीच झाली आहे. त्याचबरोबर इतरही अनेक जबाबदार्‍या असल्याने कमाईतून खर्चही बराच जास्त होतो आहे. मग अशा व्यक्तीने तिची स्वप्ने किंवा आर्थिक उद्दिष्ट्ये पूर्ण करण्याच्या दृष्टीने हाय-रिस्क बेस्ड म्हणजेच इक्विटी/म्युच्युअल फंड हा रस्ता निवडण्याशिवाय तिला पर्याय नसेलच. इथे जी काही थोडीफार बचत होते आहे ती भविष्यनिर्वाहनिधीमध्ये गुंतवणे आणि त्यातही हवी तशी तरलता नसणे हीच मोठी रिस्क ठरणार नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

साहेब

सुबोध खरे
Fri, 11/29/2013 - 14:08 नवीन
साहेब, सत्तर हजारापर्यंत केलेल्या गुंतवणुकीवर तीस टक्के पर्यंत कर माफी होते म्हणजेच जर आपण हि गुंतवणूक दहा वर्षे साठी ठेवली तर वर्षाला तीन टक्के अधिक आत्ताचा व्याज दर ८.७ म्हणजे आपल्याला ११.७ टक्के "करमुक्त" परतावा आहे.शिवाय त्यात कोणताही धोका नाही.निव्वळ मुद्दलचा नव्हे तर व्याजसुद्धा हमखास आणी सुरक्षित आहे. तेंव्हा नोकरीला लागल्यावर लगेच यात निर्धोक गुंतवणूक करू शकता.शिवाय याने एक बचतीची सवय सुद्धा लागते. जरी PPF १५ वर्षाचा असला तरी आपण ७ वर्षांनी त्यातून पैसे काढू शकता म्हणून हे सरासरी दहा वर्षे धरले आहे. (खरं तर सातव्या वर्षापासून आपण "आपले" पैसे काढून तेच पैसे परत PPF मध्ये गुंतवून एक पैसा न भरता कर वाचवू शकतो आणी जसा काळ जाईल आणी आपल्याला अनुभव येइल तसे आपण जास्त धोकादायक गुंतवणुकीत (समभाग किंवा म्युच्युअल फंड) पडू शकतो. अर्थात एखादा जर "अर्थ" शिक्षित असेल तर तो हा मार्ग अगोदर सुद्धा स्वीकारू शकतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

विचार करण्यासारखा मुद्दा आहे.

एस
Sat, 11/30/2013 - 00:35 नवीन
तीस टक्के करमाफी मिळायला त्या उत्पन्नगटात आपण मोडायला हवे. मी उल्लेख केलेला गुंतवणूकदार हा दहा टक्क्यांपर्यंतच कर भरणारा असेल तर त्याला एवढा परतावा तसा मिळणार नाही. दहा वर्षांनी तो कदाचित तेवढ्या गटात पोहोचेन पण आत्ता त्याला जे नजिकच्या भूतकाळातले काही खर्चिक प्रश्न आहेत ते सोडवायचे आहेत. त्यासाठी अधिक जोखीम पत्करून गुंतवणूक करणे आणि त्यातही तरलता सांभाळणे हेच आव्हान ठरेन. अर्थातच किमान थोडा का भाग होईना सार्वजनिक भविष्यनिर्वाहनिधीत गुंतवले पाहिजेत हे मान्य. त्यातही करबचतीसाठी सातव्या वर्षापासून पैसे काढून पुन्हा गुंतवणे हा करबचतीचाही चांगला मार्ग आहे. ह्या क्लूबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

तू नळी चा दुवा

रुस्तम
Wed, 11/27/2013 - 20:11 नवीन
तू नळी चा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद....
  • Log in or register to post comments

उत्तम धागा

पिवळा डांबिस
Wed, 11/27/2013 - 23:46 नवीन
मराठी माणसांनी, मग त्यांचा मूळ व्यवसाय काहीही असो, गुंतवणुकीचे शिक्षण घेणं आवश्यक आहे असं माझं मत आहे. आमच्या पिढीत हे फारसं नव्हतं पण हल्ली बरीच मुलं हे शिक्षण घेत आहेत याचा आनंद आहे. बाय द वे, जागो इन्व्हेस्टर ब्लॉग फेवरिट करून ठेवला आहे. काही नवीन शिकायला मिळालं तर आनंदच होईल. डॉक्टर, तुम्हालाही तुमच्या गुंतवणूक प्रकल्पामध्ये हार्दिक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

+१ सहमत

सहज
Fri, 11/29/2013 - 11:48 नवीन
उत्तम धागा. बदलेल्या पोर्टफोलीओबद्दल , हा कार्यक्रम झाल्यावर नव्याने कळालेल्या काही बाबींबद्दल जरुर सांगा. गेली काही वर्षे आवर्जून गुंतवणूक संदर्भात जालावरुन, पुस्तकातुन, माध्यमातून वाचून, पाहून फायदा झाला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा