Skip to main content

कुठली कार घ्यावी?

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी मंगळवार, 19/11/2013 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर मंडळी माझा कार घ्यायचा विचार चालु आहे. बजेट- ५-६ लाख वापर शनिवार/रविवार नक्की. इतरवेळी कधीतरी ऑफिसला येण्यासाठी.. नेहमीप्रमाणे जास्त मायलेज,कमी मेंटेनन्स्,सर्व सुविधा,आफ्टर सेल सर्व्हिस या अपेक्षा आहेतच. काही प्रतिक्रिया मारुती-- स्पेअर पार्ट स्वस्त आणि मस्त,सगळीकडे उपलब्ध,पण पिक अप नाही (ओवरटेक करताना दम तोडते),पत्रा पुचाट,अक्सिलेटरला जोर लावावा लागतो फोर्ड्-दणकट गाडी,लाँग ड्राइव्हला मस्त पण सर्विसिंगला महाग,अॅव्हरेज कमी टोयोटा- गाडी बेस्ट,स्पेअर पार्ट महाग फोक्सवॅगन- फारशी माहीती नाही ऑफिसमध्ये आंजाव्रर वेबसाइट बघुन झाल्या असल्याने कृपया त्या लिंक देउ नयेत.प्रत्यक्ष वापरणारर्‍यांचे अनुभव अपेक्षित आहेत. याआधी मिपावर असा धागा वाचला नाही किंवा राहुन गेला असेल.तर समस्त मिपाकरांना आवाहन कि कार सुचवावी.

वाचने 54513
प्रतिक्रिया 139

प्रतिक्रिया

मारुती ने फियाटचं क्वाड्राजेट इंजिन वापरण कधिच बंद केलं आहे. आता मारुती k-series नावाचं सुझुकी मेड इंजिन वापरते (सर्व गाड्यांमधे). फियाट ही पुर्वी पासुन उत्क्रुष्ट इंजिन बनवणारी कंपनी. क्वाड्राजेट इंजिन बद्दल सहमत.
भौ, मारुती अजुन पन फियाटचं क्वाड्राजेट इंजिन वापरतं फक्त त्याचं नाव डी डी आय (ड्रीम डिझल) अस ठेवलय. k-series इंजिन हे फक्त पेट्रोल कार्स मधे येते आणी डी डी आय एस (फियाटचं क्वाड्राजेट) हे डिझल इंजिन आहे.

वॅगन आर बद्दल बरीच अनुकूल मतं आहेत. खरंच आहे ते. ही एक बेस्टसेलर गाडी आहे. विशेषतः नवी वॅगन आर. फक्त एकच मुद्दा जरा लक्षात आणून द्यावासा वाटतो, जो केवळ तुलनेनेच सिद्ध होऊ शकेल. वॅगन आरच्या मागच्या सीटवर तीनजण नीटपणे बसू शकत नाहीत. लहान मुले ठीक,पण तीन नॉर्मल आकाराचे मोठे लोक तिथे बसताना खूप ओढाताण होते. बाळसेदार मोठे लोक तर अशक्यच. नुसती तीन पार्श्वभागांच्या एरियाची बेरीज असा भाग नसतो.. जरा मोकळीक लागतेच.. प्रवासात / लिफ्ट देताना एकमेकांशी जवळचं नातं नसलेले एक स्त्री आणि दोन पुरुष किंवा उलट, असं कॉम्बिनेशन नातेवाईकांत मित्रमंडळात किंवा कलीग्जमधे झालं तर इतके खेटून बसवता येत नाहीत. सँट्रो बरी मग त्याबाबतीत. मागचा भाग किंचित फुगीर असल्याने तीनजण आरामात बसतात. मी तर पहिली कार म्हणून वॅगन आर या एका मुख्य कारणाने नाकारली होती. नवी वॅगन आर थोडी वाईड दिसते पण प्रत्यक्षात हा इफेक्ट किरकोळच आहे.

In reply to by गवि

दुसरं, वॅगन आर घेवून कधी ८०-९० च्या वेगात कॉर्नरींग कराव लागतंय अशी कल्पना करुन बघा.. प्रचंड अन्स्टेबल गाडी आहे ती. या वेगात गाडी वळवावी असा याचा अर्थ नव्हे पण आणीबाणीच्या वेळी जेंव्हा असं कराव लागतं तेंव्हा गाडीवर विसंबता आलं पाहीजे

राजेंद्र मेहेंदळे साहेब, CNG ला पीक अप मिळत नाही चांगला तसेच मेटेनंन्स पण फार ठेवावा लागतो. परत जर बाहेर गेलात तर CNG पंप फारसे मिळत नाही.

मुळातच गाड्या, ड्रायव्हिंग हा अत्तिशय जिव्हाळ्याचा विषय असल्याने 'ज्या वाटेला जायचं नाही तिथला पत्ता कशाला विचारायचा?' हा नियम न मानता गाड्यांचे रिव्ह्यूज, स्पेक्स मी वाचत, अभ्यासत असतो. त्यावर आणि स्वानुभवावर आधारित माझी काही मतं/सल्ले तुम्हाला सांगतो. ५-६ लाखाच्या रेंज मधे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. गविंनी म्हटल्यानुसार इंजिन, किंवा तांत्रिक बाबी पहिले, मग दृश्य बाबी असा क्रम असावा. नंबर १ पर्याय. मारुती. आमच्या घरात आजवर केवळ मारुतीच्या गाड्या आल्यात. परंतु मांडतोय ती मतं अनबायस्ड आहेत. स्विफ्टः ड्रायव्हिंग चं वेड असेल; तर यासारखी पेप्पी गाडी नाही. मायलेज खूप भारी नाही पण खूप कमीही नाही. १५-१६. रियलिस्टिक. मागे बसायला इतर गाड्यांच्या तुलनेत अडचण होते. सिटी असो किंवा हायवे; दोन्हीसाठी योग्य. तुम्ही दिलेल्या वापरास साजेशी. डिझेल इंजिन जबरदस्त आहे; पण सर्वसाधारण नियमानुसार डिझेल घेणार असाल तर रनिंग भरपूर असलेलं बरं; तरंच डिझेल ची प्फ्युएल इकॉनॉमी जमेची बाजू ठरते. पेट्रोलही सुरेख आहे. मारुती ची ASS (वेगळा अर्थ न काढणे. आफ्टर सेल्स सर्व्हिस म्हणायचंय) सर्वोत्तम आहे यात वाद नाही. वॅगन आर - एक ट्राईड अ‍ॅण्ड टेस्टेड गाडी. उंच किंवा बुटक्या सर्वांनाच स्विफ्ट पेक्षा जास्त आरामशीर बसता येईल अशी. मायलेज छान. १७-१९. ड्युओ चा पर्याय उपलब्ध. लगेज स्पेस सुधा चांगली. गाडी तुम्हाला निराश करायची नाही. आय१० ग्रँड - नवीन चेहरा. पण अतिशय प्रॉमिसिंग. रिव्ह्यूज सुरेख आहेत. स्पेक्स वरूनही ती गाडी चांगलीच आहे यात शंका नाही. साधी आय१० चांगली आहेच; पण हिच्यात खूप गोष्टी सुधारलेल्या आहेत. काही फीचर्स तर सी क्लास सेडान्स मधे नाहीत अशी आहेत. त्यामुळे हिचा विचार कराच. ह्युंडईची पेट्रोल व डिजेल दोन्ही इंदिन्स डोळे मिटून घेण्यासारखी आहेत. त्यामुळे ती चिंता नसावी. मायलेज चांगलं. १७-१९ फोर्ड फिगो - फोर्ड हा ब्रँड तसा नवीन नाही; (एस्कॉर्ट, आयकॉन, इ.) पण आता खूप बदललेला आहे. फिगो गाडी सर्वगुणसंपन्न आहे. पण नख-याची आहे. मेंटेनन्स लई जास्त येऊ शकतो. बाकी जागा, फीचर्स, पर्फॉर्मन्स, सगळं मस्त. नक्की विचार करायला हरकत नाही. महिंद्रा व्हेरिटो व्हाईब - केवळ महिंद्रा ब्रँड एका विशिष्ट प्रकारच्या गाड्यांबरोबर जोडला गेलेला आहे म्हणून की काय, पण या गाडीला हायलाईट केलं जात नाही. अनसंग हीरो प्रमाणे असलेली ही गाडी खरं तर खूप छान आहे. स्पेस मधे हिला दुसरी कुठलीही गाडी मागे टाकू शकत नाही. बसण्याची स्पेस असो वा सामानाची. रेनो चं १.५ लि. इंजिन स्विफ्ट डीडीआयस (व्हाईब फक्त डिझेल मधे येते) इतकं पेपी नसलं तरी इट्स अ वर्कहॉर्स. टेक माय वर्ड. Driving behaviour of the car isnt really refined though, as much as that of i10 or i10 grand and WagonR. बाकी रिट्झ आहे, सेल आहे, लिव्हा आहे, विस्टा आहे. या सगळ्याही आपापल्या जागी छान आहेत. पण माझ्या मते टॉप पाच पर्याय असे असावेत. If I was at your place. 1. आय१० ग्रँड (टेक्नॉलॉजिकली लेटेस्ट, खूप फीचर्स आणि विश्वसनीय इंजिन) २. वेरिटो व्हाईब (प्रचंड स्पेस, स्टर्डी डिझाईन, चांगलं डीजेल इंजिन) ३. वॅगन आर किंवा स्टिंग रे (ट्राईड टेस्टेड, मस्त ऑल राउंड समाधान देणारी गाडी. नो नॉनसेन्स) ४. फिगो (केवळ बसायला खूप लो, आणि खर्चिक, म्हणून नंबर ४) ५. सेल/व्हिस्टा/लिव्हा (सगळं छान असूनही स्टँड आउट न होणा-या गाड्या. म्हणून शेवटी. माझ्या मते बरं का.) बघा बुवा. ऑल द बेस्ट.

In reply to by वेल्लाभट

महिंद्रा व्हेरिटो व्हाईब - केवळ महिंद्रा ब्रँड एका विशिष्ट प्रकारच्या गाड्यांबरोबर जोडला गेलेला आहे म्हणून की काय, पण या गाडीला हायलाईट केलं जात नाही. अनसंग हीरो प्रमाणे असलेली ही गाडी खरं तर खूप छान आहे. स्पेस मधे हिला दुसरी कुठलीही गाडी मागे टाकू शकत नाही. बसण्याची स्पेस असो वा सामानाची. रेनो चं १.५ लि. इंजिन स्विफ्ट डीडीआयस (व्हाईब फक्त डिझेल मधे येते) इतकं पेपी नसलं तरी इट्स अ वर्कहॉर्स. टेक माय वर्ड. Driving behaviour of the car isnt really refined though, as much as that of i10 or i10 grand and WagonR.
मी बराच वेळ ही गोष्ट बोलणार होतो, पण थोड थांबलेलो.. मी गेली १ वर्ष महींद्रा वेरिटो चालवतोय, वर्षभरात ४२००० किमी रीडींग आहे, मुंबैहुन थेट नागपुर, जबल्पुर ते खाली नांदेडपर्यंत , आजवर सर्विसिंग सोडुन खर्च शुन्य.. मेटल क्वाळीटी ए १, , बिल्ट अतिशय मजबुत, गाडी रस्ता पकडुन चालते, ८०-१०० या टप्प्यात गाडी लोण्यासारखी पळते. आत जागा इतकी आहे की SUV वाल्यांनापण कॉम्प्लेक्स येतो. प्रचंड मोठा बूट.. वाइब मध्येही या सगळ्या गोष्टी मिळतील पण ३-४ वर्षात विकणार असाल तर नका घेवू

गवि साहेब, तुमचा मुद्दा चु़कीचा आहे कारण माझ वजन ११५ किलो. असुन मी, माझी आई जी बर्‍यापैकी स्थुल आहे व माझी बायको आम्ही आरामात मागे बसु शकतो. माझ्या साईजला साजेशी म्हणुनच मी वॅगन आर VXI घेतली.

अजुन ऐक टाटा इंडिगो नविन ताकदवान इंजिन असलेली जरुन घ्या. ५ लाखात येत. अतिशय सोलीड इंजिन आहे. मायलेज साधारणपणे १३ ते १५ मीळत. मी ती २०१३ सप्टेंबर मध्ये घेतली. ३ महिन्यात ८००० किमी चालवली आहे. गविसाहेब म्हणाले तसे टाटांची सर्व्हिस ऐ वन आहे. गाडी चालवायला ही अतिशय दमदार आहे. लेगस्पेसलाही ठीक आहे.

आणि माझा गोंधळ वाढत चाललाय..म्ह्णजे तुम्ही सर्व बरोबर सांगताय त्याबद्दल वादच नाही पण माझे निकष बदलत/वाढत चालले आहेत .. एक अजुन प्रश्न---डिलरनुसार किंमत बार्गेन होउ शकते का? म्ह्णजे अमुक डिलर नवीन म्ह्णुन किंमत कमी..तमुक एस्टॅब्लिश म्हणुन no compromise वगैरे

माझ्या मते आपण फोर्ड इकोस्पोर्ट बाबत (टाइटनिएम सिरिज्)आधिक माहिति घ्यावी. हि सुद्धा आपल्या बजेट मधे आहे आणि शीवाय दणकट सुद्धा.....

In reply to by दिपस्तंभ

शी... फ्रँन्कली, ही गाडी फोर्ड ने केवळ डस्टर च्या तोडीचा आपला पत्ता उतरवायचा म्हणून अट्टाहास करून काढलेली आहे चायला. अ‍ॅग्रेसिव्ह फ्रंट डिझाईन सोडलं तर वाया आहे ही गाडी. माझ्या मते यायची नाही ६ च्या आत; आणि आली तरी नका घेऊ असा माझा सल्ला आहे.

In reply to by वेल्लाभट

भारतात पैसा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे साहेब ! लाँच नंतर डस्टर ला ५०००० चा टप्पा गाठायला १० महिने लागले ईकोस्पोर्ट ने ते ३ महिन्यात केलंय

In reply to by मालोजीराव

असेना का! ती गाडी नाहीच आहे मुळी पैसे घालण्यासारखी. ईकोस्पोर्ट चं आधीच खूप हाईप करून ठेवलं गेलं होतं. त्यामुळे धडाधड बुक केल्या लोकांनी. पण बहुतांश मंडळी पस्तावतायत आता; ओळखीतलंच एक उदाहरण आहे माझ्या. Duster is just far better than the others in the class. आता डस्टर ने प्राइस जवळजवळ दीडपटीच्या वर केलीय लाँच पासून.

In reply to by वेल्लाभट

भारतातल्या पब्लिकला आपल्या गरजेपेक्षा, लोकांचं बघुन किंवा लूक बघुन गाडी घ्यायची वाईट सवय आहे.. डस्टर, इकोस्पोर्ट या गाड्या थोड्या ऑफरोडींगसाठी बनवल्यात. ज्याला बराच वेळ एकट्याला गाडी चालवायचीय, किंवा पुणे/मुंबईसारख्या शहरात चालवायचेय, त्याने कार घ्यावी, एव्हरेज चांगला मिळतो, स्वस्तही पडते..

In reply to by शैलेन्द्र

भारतातल्या पब्लिकला आपल्या गरजेपेक्षा, लोकांचं बघुन किंवा लूक बघुन गाडी घ्यायची वाईट सवय आहे...
यकदा हिकडं गावठानात या समोरच्यानी मर्शीडिज बेंज घेतली कि हा बांगडीवाली गाडी घेतुय आन शेजारचा वाघुर लावलेली दारात उभी करतोय

मी सध्या ह्युन्दाई आय २० वापरतोय. एकदम झकास. १२० /१३० च्या स्पीडला एकदम स्टेडी चालते. रीअर सीट कम्फर्टेबल. दोन्ही बाजुचे आरसे, कार रेडीओ यांचे कन्ट्रोल्स स्टेअरिंग मधे आहेत. पाचवा आणि सहावा गिअर वापरताना अक्षरशः तुम्ही येन्जॉय करत असता. इतर फीचर्स जसे रीव्हर्स घेताना मागे एखादे ऑब्जेक्ट आले तर तुम्हाला सिग्नल मिळतो वगैरे . गाडी एकदम भन्नाट. रोड क्लीअरन्स थोडा कमी आहे. अ‍ॅव्हरेज कमी आहे. पण ड्रायव्हिंग कम्फर्ट ला तोड नाही.

जर तुम्ही ऐखाद्या कंपनीत नोकरी करत असाल व ती कंपनी कार डिलरच्या कंपनी डिसकाउंट यादीत असली तर तुम्हाला त्या डिलर कडुन कंपनी डिसकाऊंट मिळतो. मलाही असाच मिळाला होता.

रेनोची स्कॅला आणि निसानची सनी.दोघांचेही इंजिन रेनॉचे आहे.दोन्ही गाड्या मोठ्या असल्याने ८ ते ९ लाखापर्यंत जातात. टोयोटा एटियॉस लिवा बघा. no-nonsense गाडी म्हणतात.६ लाखापर्यंत बेसिक मॉडेल यायला हरकत नाही.

रिसेल कार हा ऑप्शन आहे का? असल्यास ८-१० लाखांची नवी गाडी एक वर्षा नंतर रिसेल ला ५-६.५ लाखात मिळू शकते.

In reply to by मी-सौरभ

रिसेल गाडी ही पहिल्या लग्नाचा घटस्फोट झालेल्या व्यक्तीसारखी असते, ती चांगलीही असु शकते पण पहिला घटस्फोट का झाला असावा हा प्रश्न छळत राहतो. :) ओळखीत, रोजच्या पाहण्यात वगैरे असेल तर घ्या, ट्रु व्हॅल्यु वगैरेला फारसा अर्थ नाही.

पण स्पेअर पार्ट्बद्दल गॅरंटी काय? म्हणजे कितीही true value/first choice म्हटले तरी.. म्हणजे सोर्स चांगला पाहीजे.शिवाय पहीला ओनर की दुसरा ओनर ,RTO transfer वगैरे आलेच

In reply to by ऋषिकेश

एस्टिलो ही ईतर मारूती hatback सारखीच आहे. Alto आणि wagon R च्या मधला ऑप्शन. माझ्यामते नवीन alto एस्टिलोपेक्षा फारच बरी आहे . त्यापेक्षा एस टी लो. (म्हणजे एस टी ने प्रवास करा).

वापर शनिवार/रविवार नक्की. इतरवेळी कधीतरी ऑफिसला येण्यासाठी.. नेहमीप्रमाणे जास्त मायलेज,कमी मेंटेनन्स्,सर्व सुविधा,आफ्टर सेल सर्व्हिस या अपेक्षा आहेतच.
I-10 Auto घेऊन टाका. मस्त चालवा. विषय संपला!

In reply to by संजय क्षीरसागर

पेट्रोल फार खातात हो Auto transmission गाड्या :(

भारी आहे सर्व चर्चा. विस्टा मध्ये प्रचंड जागा आहे. :) मध्यंतरी एक धागा होता की. त्यात दुचाकी आणि चारचाकीची काळजी कशी घ्यावी ह्याची माहिती होती. शोधतोय पण सापडेना..

In reply to by झकासराव

मध्यंतरी एक धागा होता की. त्यात दुचाकी आणि चारचाकीची काळजी कशी घ्यावी ह्याची माहिती होती. शोधतोय पण सापडेना...
हा इथे आहे: दुचाकी /चारचाकिंच्या काळजी /देखभाल संदर्भात चर्चेचा धागा

डिजेल वाली .. ही अप्रतिम कार आहे .. अगदी आखूड शिंगी , बहुदुधी , कमी चारा खाणारी ! व्हॅल्यु फोर मनी आहे ! फक्त इकडून तिकडून ( कर कर , कच कच वगैरे ) तर थोडे दुर्लक्श करा. कधी कधी आपोआप हे आवाज बंद होतात. ओवर टेक करताना थोडीशी सस्लगिश वाटेल पण अगोदरची पेट्रोल वाली कार असेल तरच ! अन्यथा मजा कराल.हाय एन्ड , सेफ्टी फिचर वाली घ्या. थोडे बजेट ताणाल तर मान्झा पण मस्त आहे.

वा ! वाचुन आनंद वाटला, मी ही याच विवंचनेत होतो. wagon R / आय१० मधली द्वीदा संपलेली नाही. पण सघ्या पार्कींग फार क्रिटीकल आहे, दादरला भाड्याने रहात असल्याने तर जास्तच मालक ३००० रु महीना सांगतोय....तोच भाव आहे सध्या ...लोकांचा ऐवढा हप्ता असेल.

In reply to by आर्य

कधीपण आय१० ! जबरदस्त पिक अप ..आतमधे wagon R पेक्षा जास्त जागा (अनुभवाचे बोल).. मॉड्र्न ईंटेरीयर..ह्युंडाईची रीलायबल टेकनोलॉजी.. टेस्ट ड्राईव्ह करा .. दोन्ही गाड्यांची ..आय१० घ्याल

In reply to by कपिलमुनी

नवीन वॅगन आर आणि नवीन आयटेन नाही चालवली पण आयटेन मध्ये आतमध्ये जास्त जागा हे पटत नाही मला तरी. आयटेन स्मुथ मख्खन वै आहे चालवायला. वॅगन आर देखील मस्त स्मुथ चालते. गीअर शिफ्टिन्ग आयटेनच जास्त स्मुथ वाटलं. दोन्ही गाड्यात सेफ्टी फीचर्स काही फारसे नाहियेत.. आयटेन हाय स्पीडला जास्त स्टेबल असेल. चालवुन नाही पाहिली.

In reply to by कपिलमुनी

माझ्या मते सगळ्याच गाड्या टेस्ट ड्राईव्ह घेताना, किंवा अगदि नवीन असताना / पहिल्या वर्षी उत्तम वाटतात, खरी चांगली गाडी नंतरही चांगली वाटते. त्यामुळे, कोणाकडे तीन वर्ष जुनी गाडी असेल तर त्याच्या टेस्ट ड्राईव्ह चा अनुभव घेउन काय ते ठरवा -

In reply to by कपिलमुनी

आय दहा चांगली असेल हो पण जागा मात्र फार नाही त्यात. बसल्यावर मोडेल की काय असे वाटते पण मोडली नाहीये कधी. आमचे ढीगभर सामान कोंबून आलं गेलं तरी चांगली चालली. पिक अप चांगला वाटला. बाकी गाडीतलं काही कळत नाही पण वाचतीये.

टायपो आहे काय? एक शुन्य कमी पडलेय....जाता जाता...माझे पार्किंग रिकामेच आहे...भाड्याने देइन म्हणतो :)))

एस टी लो प्रचंड टाळ्यांची स्मायली>>>

कुणाला बीट चा उल्लेखही करावासा वाटला नाही याचे आश्चर्य वाटतेय.

जरा थांबायची तयारी असेल तर फोक्सवॅगन 'अप' चा विचार करा.. मी थांबलोय.. नाहितर वॅगन-आर व्हीएक्साय / आयटेन ग्रँड १.२ मॅग्ना घ्यायचा विचार होता..

रिनो पल्स बरी वाटतेय.त्यांचे पेट्रोल इंजिन चांगले आहे. ६ लाखापर्यंत RXL-Petrol येते.दोन वर्षांचा इन्शुरंस मोफत आहे.लहान गाड्यांमध्ये दोन प्रकार आहेत हे हल्ली कळले. Basic hatchback व premium hatchback.Basic मध्ये wagon R,i10,figo येतात तर premium मध्ये i20,pulse,micra,Ritz,punto येतात. micra व pulse चे इंजिन रिनोचे आहे.डिझेल गाडी पाहिजे असेल तर फियाटची घ्यावी.

मी गेले दोन वर्षें मान्जा वापरत आहे (डिझेल) शहरात १४-१५ कि मी प्रतिलिटर आणि हाइवे ला २४. देखभालीचा खर्च अत्यंत कमी आहे. सामान ठेवायला भरपूर जागा अणि बसायला आरामदायक.टाटांची सर्व्हीस चांगली आहे।service करता गाडी पिकप आणि ड्रोप करतात (without any extra charge) ( Concorde Motors, Bangalore) फक्त शहरात पार्किंगला त्रास होउ शकतो, तेवढं बघा.

मी ५ लाखात फोक्सवॅगन पोलो गेऊन आपली गाडी चांगली आहे असे मानून राहत आहे. :) जोवर फारसा आर्थिक भार पडत नाही आणि गाडीचा वापर कमी आहे तोवर ते सुख फारच आल्हाददायक असेल असे वाटते. असो. :)

स्टिंग रे VXI घेतली आहे. वॅगन -आर चे सर्व फिचर शिवाय ट्युबलेस टायर, अलॉय व्हील्स. मिरर कंट्रोल, प्रोजेक्टेड लँप्स आणि ४५ हजारचा डिस्काउंट ... सर्व अक्सेसरी सकट ५ ला पडली. ६ महीने होत आले. तक्रार नाही. पुन्हा सर्व सल्लागारांचे धन्यवाद.

एक वेगळा विचार-- ज्याला कार विकत घ्यायची आहे त्याने आपली कार पक्की करण्यापूर्वी http://www.carzonrent.com/car-rental-Mumbai-4/ येथून एक दिवसासाठी ती कार भाड्याने घ्या. अडीच ते तीन हजार रुपये जातील पण एक दिवस संपूर्ण स्वतः कडे ती कार असेल. किंवा तसेही नको असेल तर तासावर भाड्याने घ्या ओंड सिटी किंवा डस्टर सुद्धा १६० रुपये तासाला भाड्याने मिळेल चार तास फिरवा आणि प्रत्यक्ष अनुभव घ्या. आवडली तर विकत घ्या. फुकट मिळणाऱ्या पाच मिनिटांच्या टेस्ट राइड पेक्षा नक्कीच जास्त माहिती आणि अनुभव मिळेल. आवडली नाही तर घेणे नाही आणि देणे नाही.

आधीची रीट्झ गाडी बदलायची आहे. स्विफ्ट चा विचार चालू आहे. पण रस्त्यावर नविन बलेनो बघितली आणि आवडली, मुख्य म्हणजे बलेनो चे १५ इंची टायर. खरे तर मला रिट्झ आवडते तिच्या उंचीमुळे. नविन बलेनो बद्दल काही मते, माहीती आहे का?

In reply to by प्रसाद१९७१

बलेनो ही मारुती कडची सर्वोत्तम दिसणारी कार आहे. खालच्या लिन्क वर पुर्ण माहिती मिळेल. http://www.team-bhp.com/forum/official-new-car-reviews/171209-maruti-ba… What you'll like: • A well-priced, smart looking hatchback • User-friendly cabin with loads of space! Can easily seat 5 tall adults • Accommodating 339 liter boot. The 2nd biggest among hatchbacks (after the Jazz) • Peppy petrol, efficient diesel & smooth automatic - take your pick • Comfortable ride quality matched to neutral handling • Dual Airbags & ABS with EBD are standard across all variants! • Maruti's excellent after-sales service & fuss-free ownership experience • Loaded with features such as UV-cut glass, projector headlamps + DRLs, reversing camera, Apple CarPlay, navigation, electrically-foldable ORVMs and more What you won't: • Ordinary interior quality is Swift-like. Several budget grade parts in here • Rear seat headroom & under-thigh support are limited for tall passengers • Light build quality (weighs merely 865 kilos). Lacks the solidity of its rivals • CVT variant only in Delta trim (one above base). Suffers from rubber-band effect on the highway too • More substantial & premium Elite i20 is priced only Rs. 17,000 - 37,000 above • Waiting period running over 4 months for some variants / cities • Sold exclusively through Nexa outlets. Limits the reach of the car

गाडी घ्यायची आहे असे अनेक महिने चालू आहे. निर्णय होत नाहीये. जानेवारीत घ्यायची आहे. सद्य परिस्थिती / पार्श्वभूमी: १. गेली बरीच वर्षे ह्युंडाई अ‍ॅक्सेंट पेट्रोल वापरतो आहे. वापर अतिशय कमी होता. मोठा प्रॉब्लेम कधी आला नाही. फारसे हायवे ड्रायव्हिंग झाले नाही. आता गाडी बरीच जुनी झाली आहे एकूण रनिंग कमी असूनही. ट्रॅफिकमध्ये एसी कमी पडतो. हायवे वर खूप भरवसा वाटत नाही. गाडी दणकट आहे, पण त्यामुळे आणि जुन्या इंजिनमध्ये जास्त ओव्हरटेकिंग कपॅसिटी नाही. २. बरीच वर्षे सेडान वापरल्याने आतल्या ऐसपैस जागेची सवय आहे. (अ‍ॅक्सेंट सिटी / व्हर्ना कॅटेगरी नाही पण जागा प्रचंड आहे.) ३. पेट्रोलच पाहिजे. डिझेल प्रदूषण नको आणि त्या अधिक मायलेज व अधिक पॉवर इतका वापर नाही. रोजचे ऑफिस जाऊन येऊन १०-१२ किमी एकूण पार्किंग ते पार्किंग. - २२०-२५० किमी / महिना शनिवार रविवार मिळून - किमान २५-३० किमी ते कमाल ७०-८० किमी - १२० ते कमाल २०० किमी / महिना माझ्याकडे दुचाकी नाही. त्यामुळे ३-४ किमी अंतरालाही गाडीच वापरली जाईल. भविष्यात जवळपासची १५०-३०० किमी परिघातील ठिकाणे फिरण्याचा मानस आहे. सेडान पर्याय आणि मतः १. सियाझ - होम मिनिस्ट्री व्हेटो - मारुती नको आणि फ्रंट डिझाईन सेडानचे नाही. परंपरागत स्विफ्ट बेस ची कॉपी आहे. २. व्हेंटो / रॅपिड / लिनिया - आफ्टर सेल्स सर्व्हिसचे प्रॉब्लेम्स - दणकट पण dull डिझाईन्स. कमी फीचर्स फोक्सवॅगनच्या जागतिक फ्रॉड केस मुळे आणि भारतात ३ लाख गाड्या रिकॉलच्या बातमीमुळे भरवसा नाही. लिनिया सेल्स प्रचंड कमी आहे. - सिटी ७००० असेल तर लिनिया ४००-५०० आहे. ३. होंडा सिटी - विशेष कारण काही नाही. गाडी उत्तम आहे. डिलरचा अनुभव वाईट आहे. दोन तीनदा खेपा घालून काही सपोर्ट नाही. गाड्या उत्तम विकल्या जातात त्यामुळे ते बेफिकीर आणि उर्मट आहेत. हाच अनुभव सर्व्हिस मध्ये आहे. (बंगलोर). गाडी एक्स्चेंज घेत नाहीत. ४. व्हर्ना - पहिली पसंती - ह्युंडाईच्या सवयीमुळे, आणि जुनी गाडी परत देण्याच्या सोयीमुळे आणि दिसायला आवडते. आतले false wood कचकड्याचे कमी दर्जाचे वाटते. इतर सेडान प्रमाणे काही गोष्टी नाहीयेत - AVN सिस्टीम, मागे एसी व्हेंट्स, रिव्हर्स कॅमेरा इ. पुढचे व्हर्जन (फक्त फेस लिफ्ट नव्हे - नवीन रचना, सोयी वगैरे) २०१६ अखेरीस / २०१७ मध्ये भारतात अपेक्षित आहे. त्यामुळे आत्ताची गाडी ही पटकन जुनी होऊ शकते. नवीन मॉडेल मध्ये लक्षणीय सुधारणा असल्यास उगाच चिडचिड होईल. टीम बीएचपी वरचे एकूण मत असे आहे की सर्वगुणसंपन्न कुठलीही सेडान नाही. ड्राईव्ह साठी युरोपियन गाड्या चांगल्या आहेत. हॅचबॅक किंवा लहान एस यु व्ही पर्याय आणि मतः १. पोलो - फोक्सवॅगन आणि व्हेंटोचे प्रॉब्लेम्स २. स्विफ्ट - जुने डिझाईन ३. बॅलेनो - रिअर डिझाईन आवडले नाही. कमी वजन आणि मारुती ४. पुंटो / अव्हेंचुरा वगैरे - फियाट चे प्रॉब्लेम्स ५. आय १०, इऑन, लिव्हा - इतक्या लहान गाड्या विचारात नाहीत. ६. इटिऑस क्रॉस, पोलो क्रॉस - डिझाईन्स आवडले नाहीत ७. एस क्रॉस - महाग ! आणि पेट्रोल पर्याय नाही ८. क्रेटा - महाग ९. आय२० एलिट - उत्तम गाडी, आवडलेले डिझाईन पण १.२ लि चे लहान पेट्रोल इंजिन, १६७ मिमी ग्राऊंड क्लिअरन्स १०. आय२० अ‍ॅक्टिव्ह - उत्तम गाडी, आवडलेले डिझाईन - सोयीची गोष्ट - १९० मिमी ग्राऊंड क्लिअरन्स, १.२ लि चे लहान पेट्रोल इंजिन, पण जवळजवळ १० लाख ऑन रोड किंमत ! विचित्र निळे इंटिरिअर - निळा डॅशबोर्ड, निळे सीट्स, काळे सुंदर इंटिरिअर घेतले तर गाडीचा रंग ब्राउन, लाल किंवा काळा. ११. डस्टर / टेरानो - युरोपातील लेव्हल २/३ चा ब्रँड डॅशिया ची भारतातील rebadge १३. इकोस्पोर्ट - महाग / फ्रंट डिझाईन आवडले नाही. आत्ता व्हर्ना घ्यावी जी मॉडेल लाईफ सायकलच्या शेवटाला आहे की आय२० की अ‍ॅक्टिव्हच्या क्लिअरन्सचा उपयोग करुन घ्यावा पण रंग लाल / काळा. (सर्व माहीती एकदम देण्याचे कारण - प्रत्येक मॉडेलचे प्रतिसाद येऊन ही माहीती वेगळी देण्यापेक्षा सोयीचे. प्रत्यक्ष अनुभव / मत मतांतरे शेअर करा. )

आवडलेल्या गोष्टी अ) ऑटो ट्रान्समिशन - गेअर टाकायचा त्रास नाही / गाडी उतारावर रिव्हर्स येत नाही. ब) मायलेज - मुंबईत १५ ते १८ आणि हायवेला साधारणपणे २०-२२ kmpl मिळते. क) देखभाल खर्च - अजुन नवी असल्याने काहीच नाही. (पुणे किस्सा वगळ्ता) - वर्ष होऊ घातले आहे. ड) बुट स्पेस (डिक्की) पुरेशी आहे. क) आंतरंग - आराम दायी आणि फिल गुड आहे ड) ग्राउंड क्लिअरन्स - १६५ + अजिबात घासत नाही. इ) स्पिड - जास्त जोरात पळवताना स्टेबल राहते. (मी १४० पर्यंत गेलो आहे) १०० तर लिलया न आवडलेल्या गोष्टी : अ) ओवरटे़कींग - गाडी स्वतःचा वेळ घेते कधी कधी दम लावावा लागतो. ब) आवाज - काचा बंद असतील तर कमी पण एसीचा येतो क) एसी - फार प्रभावी नाही पण पुरेसा आहे. मुंबईत टायर बदललं पंक्चर जास्त (१५-२०) होती- चाक पहताच मालक म्हणाला पुण्याला गेला होत का ? बर्याच जणाना हा अनुभव असेल....पुणे बायपास. सेलेरीओ/ स्विफ्ट / आय१० / फिगो तपासुन -चालवुन - घासुन बघितल्या होत्या पण मुंबई ट्राफिक ला उतारा म्हणुन ऑटो ट्रान्समिशन सेलेरीओ (व्ही एक्स आय) घेतली.