Skip to main content

चित्रपटांचे शेवट/ट्विस्ट कितपत पटतात?

लेखक दिपक.कुवेत यांनी सोमवार, 18/11/2013 या दिवशी प्रकाशित केले.
धाग्यास कारण कि अगदि अलीकडेच "एक दुजे के लिये" (परत) बघत बसलो होतो. त्यात शेवटि सपना-वासु मरुन पिक्चर संपतो. पुर्वी असंहि एकलेलं कि हा चित्रपट बघितल्यावर म्हणे बर्‍याच पेमी युगुलांनी आत्महत्या केली होती. तसचं "हम आपके है कौन" चं सगळं सुरळित/चांगलं चालू असताना रेणुका शहाणेला जिन्यावरुन पाडुन मारायची काय गरज होती का? गोडिगोडित चित्रपट संपवता आला असता कि! बिचार्‍या त्या टफिला ती गेल्यावर कित्ति कित्ति वाईट्ट वाटलं. ह्रुतिकला अगदि त्याच्या पहिल्याच चित्रपटात मारुन मग परत जिवंत केलं. तर तुमचं मत काय? हे असे शेवट्/ट्विस्ट कितपत योग्य?

वाचने 4284
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

ट्वीस्ट पाहिजेत की राव. नुसतेच सरळसोट दाखवले तर काय मजा आहे? डी.डी.एल्.जे.तला 'जा सिमरन जा' वाला ट्वीस्ट कसा होता?

In reply to by टवाळ कार्टा

आपल्याही तो लक्षात आहे हे पाहून बरे वाटले.

काही चित्रपटांच्या शेवटचे ट्विस्ट झेपण्याइतपत असले तर पटतात. जसा शाहरूख खानच्या पहिल्या डॉन मध्ये फरहान अख्तरने शेवटच्या ५ मिनीटांत दिलेला ट्विस्ट अगदी भन्नाट होता. त्याउलट डोक्यात गेलेला ट्विस्ट म्हणजे आमीरच्या तलाश चित्रपटाचा. ती करीना भूत असते काय, त्याला ती पाण्याखाली दिसते काय, त्याला वाचवते काय, सगळंच बंडल...

माझा फेवरेट, आवडता, बेस्ट असा शेवटाचा दि एन्ड:- (मंगलामधे इन मिन तीन प्रेक्षक असताना पाहिलेला पिच्चर.) विक्रम भट्ट's: 1920 Evil returns s

'गुप्त' सिनेमा आठवतोय का? त्यावेळेस एक किस्सा ऐकला होता. एकजण त्या सिनेमाला जात होता. उतरता॑ना रिक्षावाल्याशी पैशावरुन काहितरी वाजलं. बराच वेळ भांडण झालं. शेवटी रिक्षावाला वैतागून म्हणाला 'च्यायला जाउ देत पैसे. जा तुम्ही. पण शेवटी काजोलच खुनी असते!! ' :D