Skip to main content

अल्का झाडकावकर यांच्या शोधाचे पुढे काय झाले?

लेखक संचित यांनी शुक्रवार, 15/11/2013 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
फार थोडेच शोध असतात ज्यामध्ये सामान्य माणसाचं जीवन बदलण्याची क्षमता असते. अल्का झाडगावकर १०-१२ वर्षाआधी यांनी प्लास्टिक पासून पेट्रोल निर्मिती करण्याचा शोध लावला. हा शोध असाच एक वाटतो. या संशोधनात बरेच काही बदलण्याची क्षमता आहे असे वाटत असतानाच काही म्हणावे तसे ऐकण्यात आले नाही. http://www.goodnewsindia.com/index.php/magazine/story/alkaz/ त्यामुळे त्यांच्या बद्दल बरेच प्रश्न पडतात. यावर कोणी मिपाकर प्रकाश टाकू शकेल का? काही प्रश्नः * झाडगावकर यांनी त्यासाठी प्रयत्न सुरु केले. रोज ५ टन प्लास्टिकचे विघटन करणारा कारखाना सुरु केला. याचे पेट्रोल कुठे विकले जाते याबद्दल कुणी काही ऐकले आहे का? * जगात प्लास्टिक ची कमी नाही मग म्हणावी तशी प्रसिद्धि का होत नाही? * झाडगावकर यांच्या या प्रक्रियेतून निर्माण होणारया प्रक्रियेत नक्की काय अडचणी आहेत ?

वाचने 4210
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

प्लास्टिक पासून पेट्रोल निर्मिती हे कमर्शियली तितकेसे शक्य नाही आहे (बहुदा तयार झालेल्या पेट्रोलचा कमी सीटेन संख्यांक असल्याने )त्यामुळेच हा प्रयोग फारसा पुढे गेलेला नसावा व इंडिअन ओईल कोर्पोरशन ने त्यात जास्त स्वारस्य दाखवले नसावे ! ओर्गानिक केमिस्ट्री मधील किडाच ह्यावर जास्त प्रकाश टाकू शकेल अवांतर : उर्जेच्या अश्याच एका मोठ्या स्त्रोत्रा बद्दल "कोल्ड फ्युजन " बद्दल अनेक वर्षे भारतात संशोधन झाले होते व त्याचे चांगले परिणाम पण मिळाले होते परंतु काही कारणांमुळे ते हि बासनात गुंडाळले गेले .

In reply to by चेतनकुलकर्णी_85

तुम्ही म्हणता तसे असेलही.फार efficient नसेलही पण प्लास्टिक चे विघटन आणि पर्यायाने त्याची विल्हेवाट लावणारा म्हणून पाहायला काय हरकत आहे?

In reply to by मन१

रमर पिल्लई त्याच कस आहे मनोबा , जगात तुमचे संशोधन जर जगमान्य व्हायचे असेल तर आधीच जगमान्य झालेल्या शास्त्रज्ञ यांचेकडून "क्लेअरेन्स " घ्यावा लागतो नाही मिळाला कि गेले तुमचे संधोधन केराच्या टोपलीत !

प्रा. झाडगावकरांच्या संशोधन व उत्पादनाविषयी हा दुवा पहा. अशाच प्रकारचे इतरत्रही प्रयत्न चालू असावेत असं दिसतं. इथे थोडी आधिक माहिती.

झाडगावकरांच्या कारखान्यातलं उत्पादन "वाहनांसाठी पेट्रोल" म्हणून जरी वापरता येत नसलं तरी (निदान जालावरती उपलब्ध असलेल्या माहितीवरून तरी) इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने खालील उपयोग सुचवले असावेत असं दिसतं: "....IOC then declared its findings in a report: "The products have been tested at IOC R&D and recommended possible end uses are as follows: For liquid hydrocarbon: agricultural pumps, DG sets, boiler fuel, marine bunker fuel, as input for petroleum refineries, fuel oil etc; For gas: any nearby industries using LPG, in-house consumption; For solid fuel: thermal power plants, metallurgical industries." या उत्पादनाची ही सर्व माहिती खरी आहे का हे कुणीतरी नागपूरकर मिपाकर सहज सांगू शकतील, वस्तुस्थिती काय आहे? आज ही बुटीबोरी भागातील Zadgaonkars' Unique Waste Plastic Management & Research Company अस्तित्वात असेल, आणि खरोखरच प्लास्टीकच्या कचर्‍यापासून किफायतशीर इंधन निर्मिती करीत असेल तर त्यांचं कौतुकच केलं पाहिजे.

In reply to by बहुगुणी

थोडक्यात म्हणजे वाह्नासाठी पेट्रोल स्वस्त होण्याची शक्यता नसली तरी निदान घरगुती gas निदान स्वस्त होऊ शकेल.

प्रा. अलका झाडगावकर यांच्याबद्दलच विचारताय ना ? नागपुरात हा प्लांट व्यवस्थित चालू आहे. सिंगापूरमधल्या एका एनआरआय बरोबर त्यांनी आता एका कंपनीचं संचालकत्व स्विकारलं आहे. या शोधाचा फॉर्म्युला आपल्याला मिळावा म्हणून त्यांच्यावर मध्यंतरी दबाव आला होता असं ऐकण्यात आलं. त्यामुळं जपून पावलं टाकत असावेत. सध्याच्या कंपनीमार्फत उद्योगांमधे मार्केटिंग चालू आहे त्यांचं. एकदा प्लांट चालू केला कि थांबवता येत नाही या एका त्रुटीमुळे सुरूवातीला उत्साह दाखवणारे उद्योग नंतर फेरविचार करतात. या पेक्षा सुरक्षित पद्धत एका अमेरिकन कंपनीने शोधून काढली आहे. मोठ्या प्रमाणावर उत्पादनाला सुरूवात होणार आहे.