मिपाकर सभ्य स्त्रीपुरुषहो,
राम राम!
परवाच मिपावर झानटामाटिक ब्रेडची पाकृ एका मिपाकराने दिली होती. त्यातला 'झानटामाटिक' हा शब्द मला इतका प्रचंड आवडला होता की आपण स्वत:ही एकदा घरी ही झानटामाटिक ब्रेडची पाकृ करायची असं मी ठरवलं होतं. त्याप्रमाणे आज आम्ही इथे सौताच्या हाताने केलेल्या झानटामाटिक ब्रेडची पाकृ व फोटू देत आहोत. आपल्याला तो फोटू आवडेल अशी आशा आहे! :)
पाकृ एकदम सोप्पी. ब्रेड चांगला कुस्करून घ्यायचा आणि नंतर फोडणी करून त्यावर छान परतून घ्यायचा. चवीप्रमाणे तिखट-मीठ घालायचं, चिमुटभर साखर घालायची! झाला तिच्यायला झानटामाटिक बिरेड तैय्यार! हाय काय अन् नाय काय! :)
तशी ही पाकृ वास्तविक अगदी लहानपणापासून आम्ही खात आलेलो आहोत. आमच्याकडे याला 'फोडणीचा पाव' असा चक्क मराठमोळा मध्यमवर्गीय घरगुती शब्द आहे. पण काय पण म्हणा मंडळी, याच फोडणीच्या पावाकरता 'झानटामाटिक ब्रेड' हा शब्द ऐकल्यापासून हा फोडणीचा पाव उगाचंच गिरगावातल्या गोरेगावकर चाळीतल्या कुणा शित्र्यांच्या की जोश्यांच्या घरातून उठला आणि डायरेक्ट नेपियन सी रोडवरच्या एखाद्या हायफाय, झानटामाटिक घरात जाऊन बसला असं वाटायला लागलं आहे. खरं सांगतो मंडळी, 'झानटामाटिक' हे नांव इतकं छान आहे की या फोडणीच्या पावाचं झानटामाटिक हे नामकरण झाल्यापासून मला तो अधिक आवडूही लागला आहे! :)
'नावात काय आहे?' असं ज्यानं कुणी म्हटलं आहे त्यानं जर लहानपणापासून खात असलेला फोडणीचा पाव हा 'झानटामाटिक ब्रेड' या नावाने खाल्ला असता तर त्यानेसुद्धा 'नांवात काय आहे?' असं म्हटलं नसतं! :)
असो...
तर मंडळी, हा घ्या आम्ही केलेला झानटामाटिक ब्रेड आणि हादडा! :)
आपला,
(झानटामाटिक) तात्या.
आपला,
(झानटामाटिक) तात्या.
वाचने
13722
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त !!!
>>तात्या,
In reply to मस्त !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अहो सर...
In reply to मस्त !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विषयांतर...:)
In reply to अहो सर... by बिपिन कार्यकर्ते
आमच्याकडे
In reply to विषयांतर...:) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रा. डॉ. >>
In reply to विषयांतर...:) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
झानटामाटिक!
आम्ही
In reply to झानटामाटिक! by मनस्वी
क्या बात है ...
In reply to आम्ही by विसोबा खेचर
शेंगादाणेही घातले होते ...
In reply to क्या बात है ... by छोटा डॉन
बाप रे!
In reply to शेंगादाणेही घातले होते ... by मनस्वी
सोप्पे आहे रेवतीताई ...
In reply to बाप रे! by रेवती
डान्या...
In reply to क्या बात है ... by छोटा डॉन
मस्तच!!
क्या बात है !
वा..वा...
झानटामाटिक ब्रेड
तात्या, कांदा
होय,
In reply to तात्या, कांदा by विसुनाना
एकदम
आता
डानटामाटिक
तात्या...
कट - पेस्ट ???
In reply to तात्या... by बिपिन कार्यकर्ते
अवांतर
In reply to कट - पेस्ट ??? by छोटा डॉन
टिंग्या,
In reply to अवांतर by ब्रिटिश टिंग्या
मापी
In reply to कट - पेस्ट ??? by छोटा डॉन
?
इजाभौ, जरा
In reply to ? by विजुभाऊ
दिसला
In reply to ? by विजुभाऊ
छान..
मस्तच.
माझ्याकडच्या
In reply to मस्तच. by बापु देवकर
तात्या,
वा काय
तात्या ,
फोडणीचा पाव
"पावाची कोशिंबीर"
लय भारी..